मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने| श्री परशुरामावतार श्री दासगणु महाराजांची आख्याने श्रीनरहरि अवतार श्रीनरहरि अवतार ( संक्षिप्त ) श्रीवामन अवतार श्रीवामन अवतार ( संक्षिप्त ) श्री परशुरामावतार श्रीरामजन्माख्यान श्रीहनुमानसेवा १ श्रीहनुमानसेवा २ श्री कृष्ण लीला १ श्री कृष्ण लीला २ हरण १ हरण २ हरण ३ गर्वहरण १ गर्वहरण २ जन्म - कथा १ जन्म - कथा २ चरित्र १ चरित्र २ जन्म - चरित्र श्रीमल्हारी अवतार चरित्र १ चरित्र २ चरित्र ३ चरित्र १ चरित्र २ चरित्र ३ श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र १ श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र २ श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र ३ श्रीमत्स्येंद्रनाथ चरित्र ४ श्रीजालंदरनाथ चरित्र १ श्रीजालंदरनाथ चरित्र २ चरित्र १ चरित्र २ चरित्र ३ चरित्र ४ श्रीज्ञानेश्वरमहाराजांचें चरित्र १ श्रीज्ञानेश्वरमहाराजांचें चरित्र २ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र १ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र २ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ३ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ४ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ५ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ६ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ७ श्रीसांवतामाळी चरित्र १ श्रीसांवतामाळी चरित्र २ श्री भक्त गोराकुंभार चरित्र १ श्री भक्त गोराकुंभार चरित्र २ श्री संत जनाबाईचें चरित्र १ श्री संत जनाबाईचें चरित्र २ श्रीनरहरी सोनार चरित्र १ श्रीनरहरी सोनार चरित्र २ श्री माणकोजी बोधले चरित्र १ श्री माणकोजी बोधले चरित्र २ श्री माणकोजी बोधले चरित्र ३ श्री माणकोजी बोधले चरित्र ४ श्री कबीर चरित्र १ श्री कबीर चरित्र २ श्री कबीर चरित्र ३ श्री कबीर चरित्र ४ श्रीलाखाभक्त चरित्र १ श्रीलाखाभक्त चरित्र २ श्रीलाखाभक्त चरित्र ३ श्रीरोहिदास चरित्र १ श्रीरोहिदास चरित्र २ श्रीरोहिदास चरित्र ३ श्रीरोहिदास चरित्र ४ श्रीसंत सेना न्हावी चरित्र १ श्रीसंत सेना न्हावी चरित्र २ श्रीसंत सेना न्हावी चरित्र ३ श्रीसंत सेना न्हावी चरित्र ४ कान्होपात्रा आख्यान १ कान्होपात्रा आख्यान २ कान्होपात्रा आख्यान ३ कान्होपात्रा आख्यान ४ श्री संत दामाजी चरित्र १ श्री संत दामाजी चरित्र २ श्री तुलसीदास चरित्र १ श्री तुलसीदास चरित्र २ श्री तुलसीदास चरित्र ३ श्री तुलसीदास चरित्र ४ श्री तुलसीदास चरित्र ५ श्री परशुरामावतार श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे. Tags : akhyandasganusantआख्यानदासगणुसंत श्री परशुरामावतार Translation - भाषांतर ॥ आर्या ॥राजश्री द्रव्यमदें क्षत्रिय ते मत्त जाहले फ़ार ।तन्नाशास्तव धरि हरि जमदग्नीच्या कुलांत अवतात ॥१॥॥ दिंडी ॥सोमवंशी हयहाय कूळ एक ।कुळाचा ज्या सर्वांस असे धाक ॥सहस्रार्जुन तो भूप होय त्यांचा ।प्रबल योद्धा परि कोष अहंतेचा ॥२॥या सहस्रार्जुनाच्या वंशांतील क्षत्रिय राजकुमार मृगयेसाठीं नर्मदेच्या तीरावरील अरण्यामध्यें आले.॥ ओवी ॥एके दिनीं नर्मदा तीरीं । गोष्ट घडली ऐशापरी ।क्षत्रिय - कुमार अत्यादरीं । आले सहल करावया ॥३॥॥ कटिबंध ॥समवयी मुलेम तीं सारी नर्मदातिरीं जयांच्या करीं ।धनुष्यें असती । झळकती वाण - भाते ते पाठिच्यावरती ॥मस्तकीं मुकुट घातिले तेज फ़ांकलें चमकुं लागलें । कंठे कंठांत ॥तारुण्य - भराच्यामुळें अवघे धुंदींत ॥( चाल ) अवघ्यास छंद मृगयेचा लावला ।प्रत्येक वाण धनुलागीं जोडिला ।इर्षेस पूर अनिवार लोटला ।तारुण्यभराच्यामधी विबुधहो कधीं नीति नाठवते ।गणू म्हणे आग काडीचि माडिला जाते ॥४॥त्यांच्या त्या मृगयेच्या गडबडीमध्यें त्या अरण्यांत असलेल्या जमदग्नी ऋषींच्या आश्रमास उपसर्ग होऊं लागला म्हणून तेथील ऋषिकुमारांनीं राजपुत्रास सांगितलें कीं,॥ श्लोक ॥ येथें तुम्ही मुळीं न हो मृगया करावी ।ही गोष्ट नित्य आपुल्या मनिं वागवावी ॥धेनूस बाण तुमचा वनिं लागल्यास ।कोपेल व्यर्थ जमदग्नि मुनी विशेष ॥५॥राजपुत्र उर्मटपणें म्हणाले,॥ साकी ॥दावुं नका आम्हास किमपिही भय त्या जमदग्नीचें ।राजपुत्र आम्ही सत्ताधारी मालक या भूमीचे ॥व्याघ्रालागि ससा । जिंकिल सांगा तरि कैसा ? ॥६॥या अहंकारी बोलण्यावर ऋषिकुमारांनीं त्यांना बजाविलें.॥ दिंडी ॥तुम्ही अवघे धनमदें मत्त झाला ।नाश तुमचा हो खचित जवळ आला ॥दीप जाते समयास थोर होतो ।धांव बुडता भंवर्यांत बळें घेतो ॥७॥परंतु त्या सूचनेचा उपयोग झाला नाहीं. राजपुत्रांनीं उन्मत्तपणें आश्रमास उध्वस्त केलें; पशुपक्ष्यांना जखमी केलें; झाडें तोडून टाकलीं. ध्यानस्थ जमदग्नीच्या गळ्यांत मृतसर्प अडकविला. ध्यान उतरल्यानंतर उन्मत्त क्षत्रियांनीं केलेली आश्रमाची ती दशा पाहून,॥ ओवी ॥जमदग्नी मुनी कोपला । खडतर तपा बैसला ।कोपानल तो पेटला । क्षत्रियाविषीं मानसीं ॥८॥तपानें प्रसन्न झालेल्या विष्णूस जमदग्नी म्हणाले,॥ दिंडी ॥जगन्नाथा ! क्षत्रिय मत्त झाले ।ब्राह्मणांचे त्यापुढें काय चाले ॥नाश त्यांचा करण्यास तुझ्यावीण ।नसे कोणा सामर्थ्य विभो जाण ॥९॥विष्णूंनीं आश्वासन दिलें कीं -॥ श्लोक ॥होईन मी त्वदिय पुत्र तृतीय साचा ।अंशे करून करण्या वध क्षत्रियांचा ॥स्कंधावरी धरिन तीव्र कुठार देख ।रक्षावया सकल विप्र नि संत लोक ॥१०॥या आश्वासनाप्रमाणें जमदग्नीची पत्नी रेणुका गर्भवती झाली व योग्य वेळीं, ॥ आर्या ॥वैशाख शुद्ध पक्षीं तृतियेला सुप्रदोष समयालाउदरास रेणुकेच्या आले श्रीपरशुराम जन्माला ॥११॥समाप्त N/A References : N/A Last Updated : August 10, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP