मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
दुक्खान्तीं दुक्ख

प्रकाशित कविता - दुक्खान्तीं दुक्ख

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति दोहा]

नव नव जीवन नननीच्या प्राणान्तिक दुक्खांत,
हाय ! काय या सत्याचा होऊ वज्राघात !

आऊ किंवा बाळ अता घ्या दोहोंतुनि ऐक,
आनन्दाचे शोकाचे करा मिश्र अभिषेक.

मग लोकोत्तर हृदयाचा शस्त्रकुशल तो हात
गुप्तपणें निज कार्य करी, सापडे न मोहात.

प्रसङग तो अजुनीहि कसा डोळ्यांपुढूनि न जाय
जन्मा आधिंच बाळ रिघे निर्वाणाप्रति हाय !

अनघ अर्भका रे माझ्या, हा का रे तुज ताप ?
मरणांतहि किति सुन्दर तू शान्त मधुर निष्पाप ?

गौर किती तव कान्ति किती तनु गोण्डस सुकुमार !
स्पर्श करावा सुमनांनी मात्र जया हळुवार.

भीति आणि आशा यांच्या द्वन्द्वामधुनी तूज
वाढविलें ना रे कथुनी जीवीचें हितगूज ?

रक्त देऊनी हृदयींचें केला तर सांभाळ
अशा प्रसङगासाठी का ? कठिण कठिण हा काळ !

जपली जपली जी तुज ती ही येथे निस्त्राण
प्राणहि देती तुजसाठी मातृत्वाची आण !

सत्कारास्तव जमलेलीं वस्त्रें हीं अनुरूप
दुपटीं गलुतीं झबलीं हीं भिऊन झालीं चूप

हौसेचे घालुनि टाके शिवी यांजला माय -
मृण्मयवस्त्रीं परि होता पडयचा तव काय !

घरीं परततां जडहृदयें ये बाळांची साद
ज्यांच्या तोण्डावर खेळे आतुर कुतुकाल्हाद.

‘बाळ कधी येऊल साङगा; असा घेती घ्यास,
काय साङ्गु समजावुनि मी या चिमण्या जीवांस ?

“बाळ घरीं येऊना रे जरि म्हटलें मी ‘थाम्ब’-
गेलें देवाच्याच घरीं. तें घर भारी लाम्ब.”

‘आम्ही खेळूं कोणाशी ?’ ‘मजशी साञ्ज - सकाळ’ -
‘तुम्ही मोठे आहां हो ! लहान आणा बाळ’

बाळांची या कशीतरी होऊलच समजूत -
काय करावें थोरांनी जरी कळे सब झूट ?

आवरूनि हें पुन:पुन्हा घेतों मनें निरोप !
शान्तपणाने अता तरी काळ - झोप जा झोप.

अठुनी येशिल भेटाया तेव्हा न करीं चूक -
दुक्खान्तीं हें दुक्ख पुरें ! दे दुक्खान्तीं सूख !

२९ जून १९३६

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP