प्रकाशित कविता - देवाची समाधि ४
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
क्रूसारोहणाची कोठून रे चिन्ता, तुला भगवन्ता अपजावी ?
प्रभूचे न होती सुळावरी हाल, अत्क्रान्ति पहाल प्रभूची ही.
भगवन्ताच्याच ठायीं ठायीं मूर्ती, अवतारपूर्ती झाली तेथे.
सुखें हाणा मारा या मूर्ती अभङग, सङगांत निस्सङग सदा अभ्या,
तुकोबा पाहता असें विश्वरूप, तर तो अमूप आनन्दता.
आपुलें मरण पाहतां तो डोळां, मानी तो सोडळा अलौकिक.
आपुलें मरण देवा, तूच डोळां, पाहतां सोहळा काय वानूं ?
या रे सानथोर बघावया आधी, जिवन्त समाधि आश्वराची.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP