मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
फटकळ अभङग १

प्रकाशित कविता - फटकळ अभङग १

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[छन्द देवद्वार]

१.

चालला असेल आज नामघोष - काय कण्ठशोष देवासाठी !
माणूसपुराचा राऊळाला वेढा, विठ्ठलाचा वेडा भक्तगण.
चन्द्रभागेकाठी वालुकेचे कण, त्यांहूनहि जन उदण्ड ते.
विठ्ठल विठ्ठल ! तुम्बळ गजर, कोन्दलें अम्बर टाहोने त्या
चौदा चौकडयांचें राज्य मूल्यहीन, देवपदीं लीन भागवत.
प्राण गेला जावो देवाचिये द्वारीं, मोक्षाची पायरी भेटली ना ?
कासया हें जिणें ? दे गा देवा, मुक्ति; काहीतरी युक्ति कर राया,
विटेवर पाय कटीवर हात, तटस्थ पहात ऊभा कां तू ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP