मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
ऐक चान्दणी रात्र

प्रकाशित कविता - ऐक चान्दणी रात्र

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[सुनीत]

आहे शान्त निशा, टिपूर पडलें हें चान्दणें शीतल
आकाशांत निरभ्र चन्द्र विलसे सिंहासनीं की स्थिर;
व्याधावीण दुज्या पहा फिकटल्या स्वर्बालिका चञ्चल.
साधूंच्या जणु की तपे अभविलें वाटे नभोमन्दिर,
भासे हें परि खिन्न आणिक सुनें, या गुल्छबूंच्या परी
नाही ऐकहि फूल आज, न कुठे सौगन्ध तो मादक,
वायूच्या लहरी सलील नकळे कोठे दडाल्या तरी,
शुभ्र व्यापक शीत हें मज मुळी वाटे न आल्हादक,
जाऊ होऊनिया असहय अगदी जीवास ही शान्तता,
श्वानाचेंचि दुरूनि तों श्रुतिपथीं अस्पष्ट ये भुङकणें -
जागे जीव मनीं, जणो धडपडे होकार दे त्या अता -
गेला विस्मरुनी अष:समयिंचें तें भृङगवत गुङगणें,
तत्रापी न निघेच शब्द, पडला तो स्तब्ध लोकांत की !-
पानें स्तब्ध सुशान्त केळिवरचीम तैशींच हीं फाटकीं !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP