मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
दिपावली

प्रकाशित कविता - दिपावली

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[सुनीत]

बाल्याच्या चिमण्या जगांत गमला दीपावलीचा मला
सारा ऐकच अर्थ - चार दिन घ्या सुट्टी, वरी चङगळ !
साटोर्‍या नि अनारसे नि चकल्या जाऊ अता खायला,
चन्द्रज्योति, फटाकडे, भुऊनळे रात्रीं मजा दङगल !
होऊ व्यापक तें जगत प्रिय तरी वाटेच दीपावली,
येतां आप्त, सुहृद निब बन्धुभगिनी हो स्नेहसम्मेलन !
गप्पा, वादविवाद यांतहि मिळे गोडी नवी आगली,
हास्याचे मग वायबार सुटती माजे मजेचें रण !
द्दष्टि व्यापक होय याहुनि तदा वाटे दिवाळी न ही;
गोळीबार, नि सम्प, धर्म - झगडे; भूतेंच की मातलीं !
स्वार्थाचीच जगांत आग धुमसे, कोन्दे धुराने मही.
प्रेमज्योति कुठे न जी अजळिते राष्ट्रीय दीपावली.
राष्ट्रस्वत्व न ज्यांस पार्थिव रुचे त्यांना न दीपोत्सव -
द्दष्टी वैश्विक ती खुळावुन बघो व्योमीं निशा - वैभव.

कोल्हापूर - शाहुपुरी, २४ सप्टेम्बर, १९३९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP