मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
फटकळ अभङग २

प्रकाशित कविता - फटकळ अभङग २

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


२.

तुझ्या माहात्म्याचा आषाढीचा दिन, तथापि वन्दीन दुरून मी.
या लोकासारखा कसा घेऊं धाव ? मोक्षाची त्या हाव नाही मला.
कशी मागू देवा कैवल्याची भीक, हवी मोकळीक प्रपञ्चाची.
माझ्या ऐकटयाचा कशाला शुद्धार ? राहिला संसार करोडांचा,
फार झाला देवा स्वार्थाचा सङकोच, आता तो नकोच परमार्थ,
प्रपञ्चीं मङगल सावधान नीट राहूं द्या, का झीट भक्तीची ती ?
अफूच्या गुङगींत विस्मृतीचें सुख, तयाचें कौतुक मी न करीं,
तू पण साम्भाळ, वेडयांची या सेवा विपरीत देवा फळायची.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP