मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
फोल समाधान

प्रकाशित कविता - फोल समाधान

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति चन्द्रकान्त]

समाधान व्हावयास म्हणतों, भोग कुणा चुकले ?
समाधान होऊना म्हणुनि हें कोडें नच अकले,
अर्भक दुर्बल, कोमल निर्मळ यास भोग कुठले ?
कल‘गकच्छटा ऐतक्यांतच तुज कुठली ऐन्दुकले ?
सुमन अजुनि जों उमललें न तों हाय दिसे सुकलें !
वृथा न्हाणणें हृदय पिळवटुनि या प्रेमाश्रजलें !
वृथा चुम्बणें करुणा भाकित ममत्व हेतु - बळें.
आळवितांना प्रभूस निन्दी विचित्र मन दुबळें.

९ जानेवारी १९३५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP