मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
मूक झुरणी

प्रकाशित कविता - मूक झुरणी

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[गज्जल नूपुर वृत्त]

दूर तुझ्यावीग मूक जीव झुरे ऐकला,
राहुं तया दे क्षणैक वक्षिं तुझ्या टेकला.

स्पर्शुनिया तूज धन्य मञ्जुळ नादामधे
नूपुर पायीं सशब्द आणि कटी मेखला.

देवि. तुझा दे प्रसाद गीत तुझें गावया.
का करिशी गे कठोर वृत्ति तुझी प्रेमला ?

त्या नयनांतूनि फेक आद्यरसाची द्युती,
जोडुनि का शुष्क्त शब्द अच्छवसुनी ये कला ?

थिल्लर हा व्यर्थ शब्द, मूकपणें हार तो
गाढ अरीं स्पन्दमान, वास हवा तेथला.

२१ डिसेम्बर १९३५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP