प्रकाशित कविता - सुखरूप आहे ना ग ?
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
१
सुखरूप आहे ना ग
माझा खेळकर तान्हा
कसा मोतियाचा दाणा
बाळ मझा; १
सुखरूप आहे ना ग
चेण्डूवाणी टणाटण
उडया मारूनि अङगण
गाजवी जो ? २
सुखरूप आहे ना ग
माझा पण्डित पोपट !
करी प्रश्न पटापट
अवघड ? ३
सुखरूप आहे ना ग
माझा छोटा तानसेन !
अर्थ बोलीं गवसे न
गवयाच्या ? ४
सुखरूप आहे ना ग
माझा छान्दिष्ट कुमार
खातो ना ग मऊ मार
मायेचा तो ? ५
सुखरूप आहे ना ग
दिनभर गलबला
करूनिया बिलगला
रात्रीं तुला ? ६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP