मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
देवाची समाधि ३

प्रकाशित कविता - देवाची समाधि ३

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


शिकविल्यावीण तुझी शिकवण, राष्ट्रास कवण पटली गा ?
जग आज म्हणे ज्याला धर्मलण्ड, तो करी प्रचण्ड धर्मकार्य.
भेद जन्मसिद्ध, भोग जन्मसिद्ध, - हे सारे निषिद्ध झाले तेथे;
अळशी विलास गेला देशोधडी, नरभक्ति खडी काम करी.
अकमेकासाठी धरिती सुपन्थ, बळ हें अनन्त स्वकष्टाचें.
न लगे प्रेषित, न लगे मन्दिर, घण्टांचा गजर कशाला तो !
देवखुळेपणा क्रूसींच लटके, भक्तीचे झटके आटपले.
प्रेषितच काय, प्रेषिताचा बाप, झाला आपोआप क्रूसारूढ.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP