प्रकाशित कविता - देवाची समाधि ५
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
देवा तुझ्यावरी माझा भक्तिभाव, घेतसे अठाव म्हणूनीच.
सम्राट विश्वम्भर रङकांचा किङकर, संन्यासी शङकर स्मशानींचा.
न लगे बळाने आणावया ओठीं, राजनिष्ठा खोटी कशीतरी.
न ये अपयोगीं येथे हांजी हांजी, कर्मदशा गाञ्जी ज्याची त्याला.
न तो अपकार लाभल्यास फळ, श्रेय तें केवळ ज्याचें त्याचें.
असून नसल्यासारखा आश्वर, घ्येयरूपधर स्फूर्तिदाता.
जेथे जातों तेथे तो माझा साङगाती, न धरीच हातीं. चाल म्हणे,
तो न पण्ढरींचा, तो न अम्बरींचा, धनी अन्तरींचा सर्वत्र तो.
३० जून १९३६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP