मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
रामायण कथेचा सारांश

रामायण कथेचा सारांश

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


पद - राग जोगी (अजुनि कां रे न येसी) या चालीवर. ताल दीपचंदी.

त्रिभुवन पालक मानी मम राम धणी ॥धृ०॥
एक अयोध्यावासी रघुवंशमणी ॥ दशरथ, चार तयाला सुत फार गुणी ॥
राम ज्येष्ठ तयामध्यें जो बाळपणीं ॥ वधुनि ताटिका राहे मुनिवर्यजनीं ॥ त्रिभु० ॥१॥
रक्षुनि यज्ञ अहल्या पथिं उद्धरिली ॥ भंगुनि त्र्यंबककार्मुक सीता वरिली ॥
जिंकुनि भार्गव स्वपुरी मग आदरिली ॥ स्त्रीजिततातनिदेशें अटवी वरिली ॥ त्रिभु० ॥२॥
पंचवटींत खरादिक चमु संहरिली ॥ दशवदनें तद्रमणी कपटें हरिली ॥
गृध्र कबंधहि शबरी पथिं उद्धरिली ॥ सुग्रीवासह मैत्री सहसा घडली ॥ त्रिभु० ॥३॥
मारुनि वाली स्वभक्ता पदिं बैसविलें ॥ सीताशोध कराया कपि पाठविले ॥
ते रत्नाकरतिरीं नियमें बसले ॥ संपातीनें येउनि हितगुज कथिलें ॥ त्रुभु० ॥४॥
त्यांतुनि एक मि सिंधु ये लंघुनिया ॥ रघुरायाची राणी ममद्दग्बिषया ॥
विरमे विनवी विठ्ठल कर जोडुनिया ॥ त्रिभुवन पालक मानी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP