मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
प्रार्थना

प्रार्थना

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


पद - प्रार्थना राग भूपाळी (कांहीं धरिली अढी० या चालीवर)

रामकृष्ण नरहरे स्वामिन् रामकृष्ण नहरहरे ॥
कधिं करशिल बा दया दयाळा गर्भवासहापुरे ॥धृ०॥
काय करूं मी बरें सांगा काय० ॥
कळों येति मज माझे दोषगुण ॥ चित्त परी नावरे ॥१॥
विषयीं मन नावरे । सदोदित विषयीं० ॥
कामक्रोध हे चोर लुटतिमज । प्राण होति घाबरे ॥२॥
धांव धांव धांवरे सत्वर धाव धा० ॥
बुडतों भवसागरीं दीन हा उद्धरिं आपुल्या करें ॥३॥
विचार मज नस्फुरें कांहीं विचार० ॥
केविं गति होईल म्हणुनियां, जिव हा अंतरिं झुरे ॥४॥
प्रार्थितसें आदरें, आतां एक ॥ प्रार्थि० ॥
असें करीं तव नाम निरंतर पंत विठ्ठल स्मरे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 09, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP