मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
पंचामृत पूजेवीं अनुक्रमश: पदें

पंचामृत पूजेवीं अनुक्रमश: पदें

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


पद १ लें (राग - विभास)
(दुग्धं)

दुग्धाब्धिशायिन् शरणागत सुखदायिन् भगवन्नमस्ते ॥धृ०॥
दुग्धफेन धवलयशा दुग्धदिग्धसितहासा ॥
दुग्धप्रद उपमन्यो र्भो दुग्धस्नायिन् ॥ दुग्धाब्धिशायिन् ॥१॥
दुग्धचौर्यलंपटा दुग्धदिग्ध अधरपुटा ॥
दुग्ध मधुरनामधेय दुग्धप्रदायिन् ॥ दु० ॥२॥
दुग्धांबुधि तनयावर दुग्धांबुधिमथनचतुर ॥
पंतविठ्ठलाख्यकवे र्दुग्धप्रदायिन् ॥ दु० ॥३॥

पद २ रें (चाल व राग “सदर”)
(दधि)

नमोनमस्ते दधिवामन भो ॥धृ०॥
पूर्ण दयोदधि दधिभक्तप्रिय ॥ दधि घटहरुनिजाय ॥१॥
दधिमथिता जननिसुतप्रेमें ॥ नवनीत चोरुनि स्वाय ॥२॥
दधिघट्भंगुनिम्हणे भुलला ॥ दधि खा आणि दधिसाय ॥३॥
दधिघृतनवनीतप्रिय यशहि ॥ प्रेमें विठ्ठलगाय ॥४॥

पद ३ रें (राग बिलावल किंवा असावरी)
(घृत)

रामकथाघृतधार सेवा राम ॥धृ०॥
द्दष्टि दोषहर तुष्टि वृष्टिकर ॥ ज्ञानपुष्टि केदार सेवा रामक० ॥१॥
फार फार संसार विहारज ॥ दाह सुधाकासार ॥ सेवा राम० ॥२॥
वित्तवासना पित्त चित्तगत ॥ कृत्त करुनि करि गार ॥ सेवा० ॥३॥
हंत संतमत पंतविठ्ठल ॥ स्वांत शांति भांडार ॥ सेवा राम० ॥४॥

पद४ थें (राग विभास, ताल तिताला)
(मधु)

मधुरिपुमधु विपिनी मधुकाली ॥धृ०॥
सखिमधु मधुरतरमंजुल ॥ वाजवितो मुरली ॥१॥
मधुकरनिकरे मधुररवेंमधु ॥ माधव कां त्यजिली ॥ मधु० ॥२॥
मधुनि मधुनि विधु सद्दशमुख ॥ वधूतानलये मुरली ॥ मधु० ॥३॥
विठ्ठलपदिं स्वर्धुनिशीं अधुना चित्तवृत्ति जडली ॥ मधु० ॥४॥

पद ५ वें (संतपदाची या - चालीवर)
(शर्करा)

नाम शर्करा गोड हरिची नाम ॥ सोडविं दुर्मति खोड ॥ हरिची ॥धृ०॥
दुष्ट धृष्ट परि पुष्ट अहंकृति - महिष होतसे रोड ॥ हरिची ॥१॥
हरउनि संशय सकल मनाचे ॥ उपजविं सन्मति मोड ॥ हरि० ॥२॥
सुलभ सेवितां सहज होतसे ॥ ब्रम्हापदाची जोड ॥ हरि० ॥३॥
पंतविठ्ठल - प्रेक्षित ही भलि ॥ भवतरणातरि जोड ॥ हरि० ॥४॥

पद ६ बें (राग - बिभास) आरतीचा ताल. (संस्कृत)
(शुद्धोदकस्नानं)

जय देवि गंगे विमलतरतरंगे ॥धृ०॥
कृतनिजसलिलनिमज्जज्जनकल्मषभंगे ॥
नारायण चरण नलिनरवराहितसंगे ॥ जय० ॥१॥
मज्जत्सुरगजकरदलदब्जचलद्‌भृंगे ॥
द्युतिलसखलनविपोथितहिमवद्निरिश्रृंगे ॥ जय० ॥२॥
सुरयोषित्कुचकलशक्षरदगरुकपिंगे ॥
जलकल्लोलविलोलित पुरवैरिवरांगे ॥ जय० ॥३॥
जगदुद्धृतये नटसि त्रिभुवनतलरंगे ॥
मातर्वितर जलभरं पंतविठ्ठलांगे ॥ जय० ॥४॥


N/A

References : N/A
Last Updated : January 09, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP