मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
भीष्मपर्वांतील भीष्मप्रतिज्ञा

भीष्मपर्वांतील भीष्मप्रतिज्ञा

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


पद - राग जोगी (माझा कृष्ण या चालीवर)

देवा भक्त वत्सला गा ॥ यदुराया ॥धृ०॥
आलों गंगेच्या उदरास ॥ जरि मी या चरणाचा दास ॥
तरी आजिच्या प्रसंगास ॥ धरविन खास चक्र करीं ॥ देवा० ॥१॥
माझे शर हे केवळ काळ ॥ हें त्नो पार्थ अल्पसें बाळा ॥
तूं तो भक्ताचा कनुवाळ ॥ करि सांभाळ सर्वखें ॥ देवा० ॥२॥
देवा आजिच्या समरां ॥ घातला वत्स तुझे पदरांत ॥
आता याचा जो कुशलार्थ ॥ धरि चित्तांत पूर्णपणें ॥ देवा० ॥३॥
ऐसें वदतां भीष्मदुरंत ॥ कैसा काय होईल पंथ ॥
चित्तीं व्यग्र होय भगवंत ॥ विठ्ठलपंत - शंतम जो ॥
देवा भक्तवत्सला गा ॥ यदुराया ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP