मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
लक्ष्मण शक्ती

लक्ष्मण शक्ती

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


पद १ लें - राग जोगी - माझा कृष्ण देखि० या चालीवर.

माझा मित्र बिभीषण आज ॥ कोठें जाइलरे ॥ मा० ॥धृ०॥
होइल दीनाहुनि अतिदीन ॥ जैसा जळाविणें मीन ॥
ज्याला उद्दस लोक तीन ॥ होइल दीन सर्वस्वें ॥ मा० ॥१॥
मजवरि अर्पुनियां सुखदु:ख ॥ झाला प्राणासी विन्मूख ॥
आतां कोणाचें बा मूख ॥ पाहुनि सूख पावें रे ॥ मा० ॥२॥
बारे मिळालीं माकडें ॥ धरतिल पर्वताचे कडे ॥
नाहीं कोणाचें वांकडें ॥ एक बापुडें अंतरलें ॥ मा० ॥३॥
राम त्रिभुवनिचा श्रीमंत ॥ किती वर्णुं मी कृपावंत ॥
म्हणूनीया विठ्ठलपंत ॥ त्याचा पंथ लक्षितसे ॥ म० ॥४॥

पद २ रें - राग देस, ताल दीपचंदी.

म्हणोनि बारे मजवरि कां रुसलासी ॥धृ०॥
गांजियलें तुज सीतेनें बहु ॥ तें कां आजि स्मरलासी ॥ म्ह० ॥१॥
नूतन हें सापत्न तुझ्या कीं ॥ रुचलें काय मनासी ॥ म्ह० ॥२॥
भुक्तं वत्स नवेति वनीं कधिं ॥ मंद मी पुशिलें न तुसीं ॥ म्ह० ॥३॥
विठ्ठलपंत प्रभुतुज टाकुनि ॥ भोगितों काय सुखासी ॥ म्ह० ॥४॥


Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP