मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे| कित्ताध्यान श्रीविठोबाअण्णाकृत पदे श्रीमत्सीतारामायनम: श्रीविठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र. रघुवीरराव रचित पदे राम प्रार्थना प्रकरण रघुपतीचें ध्यान कित्ताध्यान रामपरिवार प्रार्थना प्रार्थना पश्चात्तापपर पद मारूतीचें पद मारुतीवर्णन पश्चात्तापपर पद दशावताराचें वर्णन पदे १ ते ४ पदे ५ ते ८ पदे ९ आणि १० षट्कोण यंत्र ध्यान भजन पंचामृत पूजेवीं अनुक्रमश: पदें अपराध स्तोत्र ध्यान प्रकरण शिवजयजयकारध्यानं रामजयजयकारध्यानं रामाचें जयजयकार ध्यान वेंकटेशाचें नीरांजन ध्यान श्रीमहालक्ष्मीचें ध्यान आरती नृसिंहाची आरती रामाची आरती जानकीची आरती कृष्णाची आरती तुलसीची नामध्यान शतक स्वकीय मनास उपदेश उपदेश पद कृष्णपर पद आख्यानांत अवश्य लागणारी कविता कौसल्या वसिष्ठ दशरथाचें सांत्वन करितो अहिल्योद्धार रामराज्य वियोग सीतास्वयंवर जानकीची धन्यता सीताहरणानंतर रामाचा वियोग लक्ष्मण शक्ती रामाचे मंद भाग्य रामायण कथेचा सारांश प्रल्हादचरित्र ध्रुवचरित्र रुक्मिणी स्वयंवर सुभद्राहरण भीष्मपर्वांतील भीष्मप्रतिज्ञा द्रौपदीस्वयंवराचें पद रामायण बालकांडे पत्रिका कंकणबंधनमुक्तिप्रसंग भगवन्नामरत्नमालाष्टक श्रीजगदंबिकास्तोत्रम् रामस्तोत्रम् शिवगीतिमाला पंचाशती कित्ताध्यान अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते. Tags : padevithobaपदविठोबा कित्ताध्यान Translation - भाषांतर कित्ताध्यान (चाल - ओव्याची.)पाहून पवित्र विजनस्थान । तेथें घालावें मृदुलासन ॥ वरी साधोन पद्मासन । निश्चलमन बसावें ॥१॥काय शिरो ग्रीवासमान । उत्संगीं ठेऊनि कर उत्तान ॥होऊनिया मुकुलित नयन । भुवन मोहन चिंतावा ॥२॥शरयूतीरीं अयोध्या नगर । तेथें कल्पवृक्षाचा बाग सुंदर ॥तयामाजी श्रीराममंदिर । हेमप्राकार चिंतावा ॥३॥सुवर्ण मंडपीं पुष्पक विमान । मध्यें विराजे रत्नसिंहासन ॥वरी अष्टदल नलिन । कर्णिका विस्तीर्ण जयाची ॥४॥सूर्य मंडलमय प्रथमास्तरण । सोममंडलमय द्वितीयास्तरण ॥वन्हिमंडलमय तृतीयास्तरण । योगपद्मासन त्यावरी ॥५॥मृदुश्लक्ष्ण सुतूलिका उपधान । उभयपार्श्वीं उपबर्हण ॥ जेथें घालूनि वीरासन । श्रीरघुनंदन बैसला ॥६॥जें शुद्ध ब्रम्हा केवल । लोकत्रय व्यापून उरल ॥तें रविवंशीं प्रगटल । तो हा निर्मल श्रीराम ॥७॥दशवार्षिक बालकाकृति । ध्यातां पहातां न होय तृप्ती ॥ऐसी ज्याची रमणीय मूर्ति । तो रघुपति ध्याइजे ॥८॥जयाची अंग प्रभा श्यामल । अतसीकुसुम कां मेघ सजल ॥सहस्त्रार्क प्रकाश सोज्वल । ध्यावा निर्मल श्रीराम ॥९॥जयाचें आरक्त पादतल । पद्मपत्राहूनि मृदुला ॥ऊर्ध्वरेखा वज्रध्वज कमल । चिन्हें निर्मळ ध्याइजे ॥१०॥जयाच्या अंगुली दीर्घ सरल । पूर्ण चंद्रसे नखचक्रवाल ॥ प्रभा कोंदाटली बहुला । ध्यावा निर्मल श्रीराम ॥११॥जयाची टांच जणू विद्रुमदल । नवनीत गर्भापरी मृदुल ॥पुढती निगूढगुल्फयुगल । घ्यावा निर्मल श्रीराम ॥१२॥जयाचे पायीं कनक नूपुर । घागर्या वाजती अत्यंत मधुर ॥वरि विराजे रत्नतोडर । घ्यावा निर्मल श्रीराम ॥१३॥जयाचें रम्य जंघायुगल । मागुती पोठर्या अत्यंत मृदुला ॥वरी शोभतसे जानुमंडल । घ्यावा निर्मल श्रीराम ॥१४॥जयाचें ऊरुद्वंद्वपीवर । बरवा झळके पीतांबर ॥कांठ जयाचें विद्यत्पिंजर । घ्यावा० ॥१५॥कटीं जयाच्या कनक शृंखल । नवरत्न कोंदणें अत्युज्वल ॥किंकिणी गजबजती मंजुळ । घ्यावा निर्मल० ॥१६॥जयाचें गंभीर नाभिकुहर । जलावर्ता सारिखें रुचिर ॥ब्रम्हायाचें जन्ममंदिर । घ्यावा निर्म० ॥१७॥जयाचें उदर त्रिवलि भंगुर । मध्यें रोमराजि सूक्ष्मतर ॥कोटि ब्रम्हांड विहार चत्वर । घ्यावा० ॥१८॥जयाचें त्द्ददय कपाट विशाळ । किचिदुन्नतस्तन मंड्ळ ॥अनुमानगम्य जतुस्थल । घ्यावा निर्म० ॥१९॥आजानुबाहू पीनस्कंध । मध्यें विराजे कनकांगद ॥भव्य प्रकोष्ठ रम्य मणिबंध । आनंदकंद ॥घ्यावातो ॥२०॥कटक तोडरे रत्नखचित । करतल सुरेख आणि रक्त ॥अंगुली रत्नमुद्रांचित । घ्यावा निर्म० ॥२१॥नख चंद्राची झळके चंद्रिका । दक्षिण हस्तीं ज्ञानमुद्रिका ॥ सांगे वेदांत चिंतनिका । वायु बालका सच्छिष्या ॥२२॥अंगीं केशराची उटी । शेला झळके जरि कांठी ॥सुवर्ण यज्ञसूत्र प्रभा गोमटी । त्द्ददय संपुटीं ध्याइजे ॥२३॥श्रीवत्सश्रीची शोभा अपार । गळां शोभे मुक्तहार ॥मध्यें कौस्तुभप्रभेचा बहर । घ्यावा० ॥२४॥जयाची परिणद्ध कंबुकंठ । सुरेख नीट हनुवट ॥पक्व बिंबाधरपुट । घ्यावा निष्कपट श्रीराम ॥२५॥मंदहासें विकसित गल्ल । उत्तुंगरम्य नासिका सरळ ॥कर्णांतविशाळ नयन युगल । घ्यावा० ॥२६॥भिवया चापाकृति कुटिल । विशाळभाल कुरळकुंतल ॥श्रवणीं रमणीय मकरकुंडल । घ्यावा० ॥२७॥भाळीं चर्चिलें गंध केशरी । मध्यें लाविला तिलक कस्तूरी ॥सुवर्ण किरीट शोभे शिरीं । घ्यावा० ॥२८॥शिरपेंचाचा झळके हिरा । वरती शोभे कलगी रुचिरा ॥दक्षिणभागीं मौक्तिक तुरा । घ्यावा साजिरा श्रीराम ॥२९॥वाम भागीं जनक नंदिनी । सीता देवी आमुची जननी ॥मेघा जेवीं सौदामिनी । घ्यावी मनीं नित्यदा ॥३०॥दक्षिण भागीं सुमित्रा सुत । तुणीरधनुर्द्वंद्व संयुत ॥उभा भक्तिरस मूर्तिमंत । चित्तीं सतत घ्याइजे ॥३१॥कर जोडुनि उभा पुढती । अनुपम ज्याची दास्य स्थिती ॥अंजनेचि उत्तम गति । घ्यावा मारुती सदगुरु ॥३२॥श्रीराम चरणीं ठेवूनि माथा । प्रार्थीत जावें त्या समर्था ॥मायबापा गा रघुनाथा । भवव्यथा सोडवी ॥३३॥नलगे भुक्ति नलगे मुक्ति । मायबापा गा रघुपती ॥द्यावी जन्मजन्मीं सत्संगती । अनन्यभक्ती निज चरणीं ॥३४॥पंत विठ्ठलाचा कित्ता । प्रात:काळीं नित्य वळवितां ॥सहज सदक्षर येईल हाता । हा सर्वथा निश्चय ॥३५॥होऊनिया निर्मत्सर । हें आचरितां एक संवत्सरा ॥पुढती तुम्हा माझे उपकार । वारंवार स्मरतील ॥३६॥ N/A References : N/A Last Updated : January 09, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP