मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
वसिष्ठ दशरथाचें सांत्वन करितो

वसिष्ठ दशरथाचें सांत्वन करितो

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


पद - घ्या हरिच्यानामा या चालीबर.

राजा वेड तुझें हें काय ॥ सत्वर वर जा मुनिचे पाय ॥धृ०॥
कथितों आजीं तुज गुज एक ॥ राया सावधान ऐक ॥
अजि तूं म्हणसि जयासी लेक ॥ राम तो पूर्ण ब्रम्हा देख ॥
तो हा अवतरला अनपाय ॥ सत्व० ॥१॥
पूर्वीं कश्यप तूं आर्या ॥ अदिति हे कौशल्या भार्या ॥
उभयतां करूनि तपश्चर्या ॥ आराधुनी देव धुर्या ॥
प्रार्थिलें तया वरद वर्या ॥त्वयाऽस्म त्सुतता स्वीकार्या ॥
तो हा तव गेडीं रघुराय ॥ सत्व० ॥२॥
तयाची प्रिया जगज्जननी ॥ प्रगटली असे जनक - सदनीं ॥
 घडो तद्योग भला सुजनी ॥ हेतु हा मुनिच्या आगमनी ॥
न धरुनि चिंता किमपि मनीं ॥ मुलें हीं अर्पी मुनिचरणीं ॥
हा निज कल्याण सदुपाय ॥ सत्व० ॥३॥
असें हें परम गुहय वृत्त ॥ ऐकतां राजा पंक्तिरथ ॥ नयनीं प्रेमाश्रू वाहात ॥
आपणा मानी कृतकृत्य ॥ मुनिला सानुज तो रघुनाथ ॥
अर्पी कृपण जसें हो वित्त ॥ हर्षे मुनिसह विठ्ठलराय ॥ सत्व० ॥४॥

श्रीरामानें, पादरजानें शिलारूपी अहल्येचा उद्धार केला. श्रीरामकृपेनें ती दिव्यदेही होऊन रामस्तुति करितें.

N/A

References : N/A
Last Updated : January 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP