वेधकालेग्रहणेवाभोजनेप्रायश्चित्तमुक्तम् माधवीयेकात्यायनेन चंद्रसूर्यग्रहेभुक्त्वाप्राजापत्येनशुद्ध्यति तस्मिन्नेवदिनेभुक्त्वात्रिरात्रेणैवशुद्ध्यतीति ग्रहणेचत्रिरात्रमेकरात्रंवोपवासः श्रेयोर्थिनाकार्यः एकरात्रमुपोष्यैवस्नात्वादत्वाचशक्तितः कंचुकादिवसर्पस्यनिवृत्तिः पापकोशतः त्रिरात्रंसमुपोष्यैवग्रहणेचंद्रसूर्ययोः स्नात्वादत्वाचविधिवन्मोदतेब्रह्मणासहेतिहेमाद्रौलैंगोक्तेः इदंचपुत्र्यतिरिक्तविषयं आदित्येहनिसंक्रांतौग्रहणेचंद्रसूर्ययोः पारणंचोपवासंचनकुर्यात्पुत्रवान्गृहीतिजैमिनिवचनात् ।
वेधकालीं किंवा ग्रहणांत भोजन केलें असतां प्रायश्चित्त सांगतो - माधवीयांत - कात्यायन - “ चंद्र सूर्यांच्या ग्रहणकालीं भोजन केलें असतां प्राजापत्य कृच्छ्र ( बारा दिवस करावयाचें तें ) प्रायश्चित्त करावें म्हणजे शुद्ध होतो. वेधकालीं भोजन केलें असतां त्रिरात्र उपोषण करुन शुद्ध होतो. ” कल्याणेच्छूनें ग्रहणाचे ठायीं त्रिरात्र किंवा एकरात्र उपवास करावा; कारण, ‘‘ एकरात्र उपोषण करुन स्नान करुन यथाशक्ति दान केलें असतां, सर्प जसा आपली मेंग टाकून देदीप्यमान होतो तद्वत् पापापासून मुक्त होतो. चंद्रसूर्यांच्या ग्रहणाचे ठायीं त्रिरात्र उपोषण करुन स्नान करुन यथाशक्ति दान दिलें असतां ब्रह्मदेवासह आनंद पावतो ” असें हेमाद्रींत लिंगपुराणवचन आहे. हें वचन, पुत्रवंताहून इतरविषयक जाणावें; कारण, “ रविवार, संक्रांति व चंद्रसूर्यग्रहण यांचे ठायीं पुत्रवान् गृहस्थानें पारणा व उपवास करुं नये ” असें जैमिनिवचन आहे.
यदातुरवेर्ग्रस्तास्तस्तदापुत्रिणः प्रहरद्वयंहित्वाबालादिवद्भोजनंनतूपवासः सायाह्नेग्रहणंचेत्स्यादितिपूर्वोक्तमार्कंडेयवचनात सायाह्नेसंगवेश्नीयाच्छारदेसंगवादधः मध्याह्नेपरतोश्नीयान्नोपवासोरविग्रह इतिस्मृतेश्चेतिहेमाद्रिः शारदोऽपराह्णः माधवमतेतु पुत्रिणोपितत्रोपवासएव अहोरात्रंनभोक्तव्यमितिपूर्वोक्तनिषेधस्यतेनापिपालनीयत्वात् उपवासनिषेधस्तुव्रतरुपोपवासपरः कृष्णैकादशीनिषेधवदिति मदनरत्नेप्येवम् इदमेवचयुक्तम् ।
ज्या कालीं सूर्याचा ग्रस्तास्त असेल त्या कालीं पुत्रवंत गृहस्थाश्रम्यानें बालाप्रमाणें ग्रहणाच्या पूर्वी दोन प्रहर टाकून भोजन करावें, उपोषण करुं नये; कारण, “ सायंकालीं ग्रहण असेल तर अपराह्णकालीं भोजन करुं नये ” इत्यादिक पूर्वी मार्कंडेयवचन सांगितलें आहे. आणि “ सायाह्नकालीं ग्रहण होईल तर संगवकालीं भोजन करावें, अपराह्णकालीं ग्रहण होईल तर संगवकालाच्या पूर्वी भोजन करावें, मध्याह्नीं ग्रहण होईल तर ग्रहणोत्तर भोजन करावें, सूर्यग्रहणीं उपवास करुं नये ” असें स्मृतिवचनही आहे असें हेमाद्रि सांगतो. माधवमतीं तर पुत्रवंतानेंही सूर्यग्रहणीं उपोषणच करावें; कारण, “ चंद्रसूर्यग्रहणीं अहोरात्र भोजन करुं नये ” हा जो भोजननिषेध सांगितला तो पुत्रवंतासही पाळणें अवश्य आहे. “ पुत्रवंतानें उपवास करुं नये ” असा जो निषेध तो कृष्णैकादशीनिषेधासारखा व्रतरुप उपवासविषयक आहे. मदनरत्नांतही असेंच सांगितलें आहे. पुत्रवंतानेंही निषेधपालनरुप उपवास करावा हेंच योग्य होय.
वर्धमानस्तु अहोरात्रंनभोक्तव्यमितिशातातपीयाग्रे सूर्याचंद्रमसोर्लोकानक्षयान् यातिमानव इतिफलश्रुतेर्मुक्त्यदर्शनेउपवासः काम्यः नत्वयंनिषेध इत्याह तन्न अत्रव्रतत्वेपिप्रागुक्तविष्णुधर्मेनिषेधावश्यंभावात् तथाव्यासः रविग्रहः सूर्यवारेसोमेसोमग्रहस्तथा चूडामणिरितिख्यातस्तत्रदत्तमनंतकम् वारेष्वन्येषुयत्पुण्यंग्रहणेचंद्रसूर्ययोः तत्पुण्यंकोटिगुणितंयोगेचूडामणौस्मृतम् ।
वर्धमान तर “ अहोरात्रांत भोजन करुं नये ” ह्या शातातपवचनाच्या पुढें ‘ तो मनुष्य चंद्रसूर्यांच्या अक्षय लोकांप्रत जातो ’ अशी फलश्रुति आहे, याकरितां ग्रहणमोक्ष न दिसल्यामुळें जो उपवास सांगितला तो कामनिक आहे. हा भोजननिषेध आहे असें नाहीं, असें सांगतो. तें वर्धमानाचें म्हणणें बरोबर नाहीं. कारण, उपवास हा व्रतरुप जरी आहे, तथापि पूर्वोक्त विष्णुधर्मस्थवचनांत भोजननिषेध सांगितला तो अवश्य आहे. चूडामणियोग सांगतो - व्यास - “ रविवारीं सूर्यग्रहण व सोमवारीं चंद्रग्रहण असें असेल तर चूडामणि योग होतो. त्या योगावर दानादिक केलें असतां अनंतफल होतें. इतर वारीं चंद्रसूर्यग्रहण असतां जें पुण्य सांगितलें त्याच्या कोटिगुणित पुण्य चूडामणियोगावर प्राप्त होतें. ”
अत्रचाद्यंतयोःस्नानंकुर्यात् ग्रस्यमानेभवेत्स्नानंग्रस्तेहोमोविधीयते मुच्यमानेभवेद्दानंमुक्तेस्नानंविधीयत इतिहेमाद्रौवचनात् स्नानंस्यादुपरागादौमध्येहोमः सुरार्चनमितिब्रह्मवैवर्ताच्च सर्वेषामेववर्णानांसूतकंराहुदर्शने सचैलंतुभवेत्स्नानंसूतकान्नंचवर्जयेदितिवृद्धवसिष्ठोक्तेश्च सचैलंमुक्तिस्नानपरमितिमदनरत्नेउक्तम् भार्गवार्चनदीपिकायांचतुर्विंशतिमते मुक्तौयस्तुनकुर्वीतस्नानंग्रहणसूतके ससूतकीभवेत्तावद्यवत्स्यादपरोग्रहः इदंचस्नानममंत्रकंकार्यमितिस्मृतिरत्नावल्याम् ।
ग्रहणाच्या स्पर्शकालीं व ग्रहण सुटल्यानंतर स्नान करावें; कारण, “ ग्रहणाच्या स्पर्शकालीं स्नान, मध्यें होम, सुटण्यास आरंभ झाल्यावर दान, निःशेष सुटल्यावर स्नान करावे. ” असें हेमाद्रींत वचन आहे; व “ ग्रहणाच्या आरंभीं स्नान, मध्यें होम व देवपूजा करावी ” असें ब्रह्मवैवर्तवचनही आहे. “ राहुदर्शन झालें असतां सर्व वर्णांस अशौच आहे यास्तव सचैल स्नान करावें, आणि सूतकान्न वर्ज्य करावें ” असें वृद्धवसिष्ठाचेंही वचन आहे. सचैल स्नान करावें असें जें सांगितलें तें मुक्तिस्नानाविषयीं होय, असें मदनरत्नांत सांगितलें आहे. भार्गवार्चनदीपिकेंत - चतुर्विंशतिमतग्रंथांत “ ग्रहण सुटल्यानंतर जो मनुष्य मुक्तिस्नान करीत नाहीं तो दुसर्या ग्रहणापर्यंत सुतकी होतो असें जाणावे. ” हें ग्रहणसंबंधी स्नान अमंत्रक करावें, असें स्मृतिरत्नावलींत सांगितलें आहे.