मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
इष्टिविषयीं

प्रथम परिच्छेद - इष्टिविषयीं

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


शेषपर्वणीष्टौविशेषमाह माधवीये गार्ग्यः प्रतिपद्यप्रविष्टायांयदिचेष्टिः समाप्यते पुनः प्रणीयकृत्स्नेष्टिः कर्तव्यायागवित्तमैः गृह्याग्नेर्नायंनियम इतिमदनपारिजातः एवंपर्वांत्यांशःप्रतिपदश्चत्रयोंऽशायागकाल उक्तः क्वचित् ‍ प्रतिपत्तुर्यांशेऽपियागः संधिर्यद्यपराह्णेस्याद्यागंप्रातःपरेऽहनि कुर्वाणःप्रतिपद्भागेचतुर्थेपिनदुष्यतीतिवृद्धशातातपोक्तेः एतत् ‍ पूर्णिमापरमितिमदनरत्ने पर्वणिप्रतिपदः क्षयस्यवृद्धेश्चार्धंप्रक्षिप्यसंधिर्ज्ञेयः तदाहमाधवः वृद्धिः प्रतिपदोयास्तितदर्धंपर्वणिक्षिपेत् ‍ क्षयस्यार्धंतथाक्षिप्त्वासंधिर्निर्णीयतांसदेति कात्यायनोपि परेह्निघटिकान्यूनास्तथैवात्यधिकाश्चयाः तदर्धक्लृप्त्यापूर्वस्मिन् ‍ ह्नासवृद्धीप्रकल्पयेदिति एवंस्मार्तस्थालीपाकेपिज्ञेयम् ‍ तत्रेष्टिस्थालीपाकावाधानगृहप्रवेशनीयहोमानंतरभाविन्यांपौर्णमास्यांप्रारंभणीयौनतुदर्शे यद्यारंभेमलमासपौषमासगुरुशुक्रास्तादिभवतितदाप्यारंभः कार्यः ।

शेष ( उर्वरित ) पर्वाचे ठायीं इष्टिविषयीं विशेष सांगतो - माधवीयांत - गार्ग्य - " प्रतिपदा तिथि प्रविष्ठ झाली नसतां पर्वाचेठायीं यागाची समाप्ती होईल तर यागवेत्त्यांनीं पुनः अग्निप्रणयन करुन सर्व इष्टि करावी . " हा पुनः इष्टि करण्याचा नियम गृह्याग्नीला नाहीं , असें मदनपारिजात सांगतो . याप्रमाणें पर्वाचा शेवटचा अंश आणि प्रतिपदेचे पहिले तीन अंश मिळून यागकाल विहित होय . क्कचिग्द्रंथांत प्रतिपदेच्या चतुर्थभागींही याग सांगितला आहे . कारण , " पौर्णिमेचा किंवा अमावास्येचा संधि जर अपराह्णकालीं असेल तर दुसर्‍या दिवशीं प्रातःकालीं प्रतिपदेच्या चतुर्थभागींही याग केला असतां दोष नाहीं " असें वृद्धशातातपाचें वचन आहे . हें वचन पूर्णिमाविषयीं होय असें मदनरत्नांत सांगितलें आहे . पर्व खंडित असेल तर पर्वापेक्षां प्रतिपदेच्या क्षयवृद्धींच्या घटिका मोजून निम्मे घटिका पर्वांत कमी जास्त करुन संधि जाणावा . तेंच सांगतो - माधव - " पर्वापेक्षां प्रतिपदेची वृद्धि असतां वृद्धीच्या ज्या घटिका त्यांच्या निम्मे घटिका पर्वांत मिळवाव्या ; आणि क्षय असतां जितक्या घटिका पर्वापेक्षां कमी असतील त्यांच्या निम्मे पर्वांत कमी कराव्या व त्यावरुन संधिकालाचा निर्णय करावा . " कात्यायनही - " दुसर्‍या दिवशीं प्रतिपदेच्या घटिका न्यून किंवा अधिक असतील त्यांतून अर्ध्या घटिका , क्षय असतां पर्वांत कमी कराव्या व वृद्धि असतां मिळवाव्या , याप्रमाणें पूर्वदिवशीं पर्वांत कमीज्यास्ती करुन संधि जाणावा . " स्मार्त स्थालीपाकाविषयींही याप्रमाणेंच संधिनिर्णय जाणावा . इष्टि आणि स्थालीपाक यांचा प्रथम आरंभ करणें तो आधान ( अग्न्याधान ) व विवाहांतील गृहप्रवेशनीयहोम हे झाल्यानंतर येणार्‍या पौर्णिमेचे ठायीं करावा , दर्शाचे ठायीं प्रारंभ करुं नये . प्रथमारंभ जर जवळचे पौर्णिमेस कर्तव्य असेल आणि मलमास , पौषमास , गुरुशुक्रांचे अस्तादिक प्राप्त असतील तरी देखील आरंभ करावा .

यानितु उपरागोधिमासश्चयदिप्रथमपर्वणि तथामलिम्लुचेपौषेनान्वारंभणमिष्यते गुरुभार्गवयोर्मौढ्येचंद्रसूर्यग्रहेतथेतिसंग्रहवचनानि तानिआलस्यादिनातिक्रांतशुद्धकालप्रारंभविषयाणि नामकर्मचदर्शेष्टिंयथाकालंसमाचरेत् ‍ अतिपातेसतितयोःप्रशस्तेमासिपुण्यभ इत्यपरार्केगर्गवचनादितिप्रयोगपारिजाते उक्तंचैतत् ‍ प्रयोगरत्नेभट्टैः कालादर्शेतु नामकर्मचजातेष्टिमितिपाठः याज्ञिकास्तु आधानानंतरापौर्णमासीचेन्मलमासगा तस्यामारंभणीयादीन्नकुर्वीतकदाचनेति त्रिकांडमंडनवचनाच्छुद्धकालएवविभ्रष्टेष्टिंकृत्वारंभंकुर्यादित्याहुः कालादर्शेस्मृतिसंग्रहेपि आरंभंदर्शपूर्णेष्ट्योरग्निहोत्रस्यचादिमं प्रतिष्ठाः पंचकूर्माद्यामलमासेविवर्जयेदिति ।

आतां जीं " ग्रहण , अधिकमास , मलिम्लुच ( क्षयमास ), पौष , गुरुशुक्रांचे अस्तादिक , चंद्रसूर्यांचीं ग्रहणें यांतून कोणतेंही प्रथम पौर्णिमेचे ठायीं असेल तर त्या दिवशीं आरंभ करुं नये " अशीं संग्रहवचनें , तीं आलस्यादिकानें प्राप्तकालाचा अतिक्रम होऊन इतर कालीं आरंभ करावयाचा असेल तद्विषयक होत . कारण , " नामकर्म , दर्शेष्टि , हीं प्राप्तकालीं करावीं ; त्या कालीं करावयाचीं राहतील तर प्रशस्तमासीं पुण्यनक्षत्रीं करावीं " असें अपरार्कांत गर्गवचन आहे , असें प्रयोगपारिजातांत सांगितलें आहे . हें नारायणभट्टांनींही प्रयोगरत्नांत सांगितलें आहे . कालदर्शांत तर - " नामकर्म च दर्शेष्टिं " एथें " जातेंष्टिं " असा पाठ आहे . याज्ञिक तर - " आधान केल्यानंतर जी सन्निहित पौर्णिमा ती मलमासगत असेल तर तिचे ठायीं आरंभणीय कर्मै ( ज्यांचा आरंभ पूर्वी केलेला नाहीं अशीं कर्मै ) कदापि करुं नयेत " ह्या त्रिकांडमंडनवचनावरुन शुद्धकालींच विभ्रेष्टेष्टि करुन आरंभ करावा , असें म्हणतात . कालादर्शांत - स्मृतिसंग्रहांतही

" दर्शपौर्णमासेष्टि व अग्निहोत्र यांचा प्रथमारंभ , कूर्मादिकांच्या पांच प्रतिष्ठा , हीं मलमासांत करुं नयेत . "

N/A

References : N/A
Last Updated : May 22, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP