पौर्णमास्यांविशेषमाह कात्यायनः संधिश्चेत्संगवादूर्ध्वं प्राक् पर्यावर्तनाद्रवेः सापौर्णमासीविज्ञेयासद्यस्कालविधौनरैः अमायांविशेषमाह बौधायनः द्वितीयात्रिमुहूर्ताचेत् प्रतिपद्यापराह्णिकी अन्वाधानंचतुर्दश्यांपरतः सोमदर्शनात् कात्यायनश्च यजनीयेऽह्निसोमश्चेद्वारुण्यांदिशिदृश्यते तत्रव्याह्रतिभिर्हुत्वादंडंदद्याद्दूजातयइति एतच्चबौधायनवाजसनेयिविषयं तैत्तिरीयश्रुतौतुचंद्रदर्शनेऽपियागउक्तः एषावैसुमनानामेष्टिर्यमद्यजानन् पश्चाच्चंद्रमाअभ्युदेत्यस्मिन्नेवास्मैलोकेऽर्धुकंभवतीति श्रुत्यंतरेऽपि यदहःपश्चाच्चंद्रमाअभ्युदेतितदहर्यजन्निमाँल्लोकानभ्युदेतीति इदंबह्वृचापस्तंबविषयं मदनरत्नेप्येवं आपस्तंबभाष्यार्थसंग्रहेप्येवम् अतः पक्षद्वयस्यस्वस्वसूत्राव्द्यवस्थेतितत्त्वम् दूषयंत्याश्वलायना इतितुपूर्वाह्णसंधिविषय मिति माधवः ।
पौर्णमासीविषयीं विशेष सांगतो - कात्यायन - " संगवकालानंतर अर्ध्या दिवसाच्यापूर्वी संधि असेल तर ती पौर्णमासी सद्यस्काला होय , म्हणजे पौर्णिमेंत संधिदिवशींच अन्वाधान करुन तत्कालींच याग करावा . " अमावास्येविषयीं विशेष सांगतो - बौधायन - " प्रतिपदेचे दिवशीं अपराह्णकालीं त्रिमुहूर्तपरिमित द्वितीया असेल तर चतुर्दशीस अन्वाधान करुन अमावास्येस याग करावा . कारण , दुसर्या दिवशीं चंद्रदर्शन आहे . " कात्यायनही " ज्या दिवशी याग केला असेल त्या दिवशीं पश्चिमेस चंद्रदर्शन होईल तर चंद्रदर्शनप्रयुक्त दोषपरिहारार्थ व्याह्रतिमंत्रांनीं प्रायश्चित्तहोमकरुन ब्राह्मणाला दंड द्यावा . " हें वचन बौधायन व वाजसनेयी एतद्विषयक होय . तैत्तिरीयश्रुतींत तर चंद्रदर्शनयुक्त प्रतिपदेचे दिवशींही याग सांगितला आहे . तो असाः - " चंद्रदर्शनयुक्त दिवशीं जी इष्टि केली जाते ती सुमनानामक इष्टि जाणावी , तशी इष्टि करणार्या यजमानास अभिलक्षून त्याच दिवशीं पश्चिमदिशेस चंद्र दृष्टिगोचर होतो , व तो यागकर्त्या यजमानास समृद्धिकारक होतो . " दुसर्या श्रुतींतही - " ज्या दिवशीं पश्चिमेस चंद्रोदय होतो त्या दिवशीं याग केला असतां यागकर्त्याच्या अभ्युदय होतो . " हें श्रुतिवचन बह्वृच व आपस्तंब यांविषयीं आहे . मदनरत्नांतही असेंच सांगितलें आहे . आपस्तंबभाष्यार्थसंग्रहांतही असेंच आहे , म्हणून ह्या दोन पक्षांची आपापल्या सूत्राप्रमाणें व्यवस्था जाणावी , हें तत्त्व होय . " आश्वलायन , द्वितीयासहित याग दूषित आहे असें म्हणतात " असें जें पूर्वोक्त वचन तें तर पूर्वाह्णसंधिविषयक आहे असें माधव सांगतो .