अथमलमासेकार्याकार्यंनिरुप्यते तत्रजाबालिः नित्यनैमित्तिकेकुर्याच्छ्राद्धंकुर्यान्मलिम्लुचे तिथिनक्षत्रवारोक्तंकाम्यंनैवकदाचन अयंचकाम्यनिषेधः आरंभसमाप्तिविषयः असूर्यानामयेमासानतेषुमम संमतः व्रतानांचैवयज्ञानामारंभश्चसमापनमितितेनैवोक्तत्वात् असूर्याअधिकमासाइत्यर्थः तत्रमंडलंतपतेरविरितिवचनात् कारीर्यादेःकाम्यस्यत्वारंभसमाप्तीभवतएवेत्यादिरित्यन्यत्रविस्तरः काठकगृह्येपि मलेऽनन्यगतिंकुर्यान्नित्यांनैमित्तिकींक्रियामिति तानिनैमित्तिकानिदीपिकायामुक्तानि यन्नैमित्तिकमग्निनष्टयनुगताग्न्याधानमर्चापुवासंस्कारा दिविलोपनेसतिपुनःप्रोक्तंप्रतिष्ठादिकमिति गत्यंतरयुतंतुसोमादिहेयमेव ।
आतां मलमासांत करण्याचीं व न करण्याचीं कर्मैं सांगतो.
जाबालि - " मलमासांत नित्य, नैमित्यिक कर्मैं करावीं; श्राद्ध करावें; तिथि, नक्षत्र, वार यांच्यावर सांगितलेलें काम्य कर्म कदापि करुं नये. " हा जो काम्य कर्माचा निषेध सांगितला तो आरंभसमाप्तिविषयक जाणावा, ( म्हणजे काम्य कर्माचा आरंभ किंवा समाप्ति मलमासांत करुं नये ), कारण " असूर्य ( सूर्यसंक्रांतिरहित ) जे मास त्यांत व्रतें, यज्ञ यांचा आरंभ अथवा समाप्ति करुं नये. " असें त्यानेंच ( जाबालीनेंच ) सांगितलें आहे. कारीरी ( वृष्टिनिमित्तक करावयाचा याग ) राक्षोध्न, अभिचार, प्रत्यभिचार, रोग, ग्रहदौस्थ्य इत्यादिनिमित्तक जीं काम्य कर्मैं त्यांचा आरंभ व समाप्ति हीं करावींच; याविषयीं इतर ग्रंथीं विस्तार सांगितला आहे. काठकगृह्यांतही सांगतो: - " अनन्यगतिक ( जें केल्यावांचून गति नाहीं तें ) कर्म, नित्य कर्मै व नैमित्तिक कर्मै हीं मलमासांत करावीं. ” तीं नैमित्तिक कर्मै सांगतो - दीपिका - " अग्नि नष्ट झाला असतां अग्न्याधान, देवाला चांडालादिकांचा स्पर्श झाला असतां अवश्य कर्तव्य पुनःप्रतिष्ठादिक हीं एथें नैमित्तिक कर्मै जाणावीं. " ज्या कर्माला दुसरा काल आहे असीं सोमयाग इत्यादिक कर्मै तर करुं नयेच.
तत्रकर्तव्यान्युक्तानिकालादर्शे द्वादशाहसपिंडांतंकर्मग्रहणजन्मनोः सीमांतेपुंसवेश्राद्धंद्वावेतौ जातकर्मच रोगेशांतिरलभ्येचयोगेश्राद्धव्रतानिच प्रायश्चित्तनिमित्तस्यवशात्पूर्वेपरत्रच अब्दोदकुंभमन्वादिमहालययुगादिषु श्राद्धंदर्शेप्यहरहः श्राद्धमूनादिमासिकं मलिम्लुचान्यमासेषुमृतानांश्राद्धमाब्दिकं श्राद्धंतुपूर्वद्दष्टेषुतीर्थेष्वेवयुगादिषु मन्वादिषुचयद्दानंदानंदैनंदिनंचयत् तिलगोभूहिरण्यानांसंध्योपासनयोः क्रिया पर्वहोमश्चाग्रयणंसाग्नेरिष्टिश्चपर्वणि नित्याग्निहोत्रहोमश्चदेवतातिथिपूजनं स्नानंचस्नानविधिनाप्यभक्ष्यापेयवर्जनं तर्पणंवानिमित्तस्यनित्यत्वादुभयत्रचेति एतौपुंसवनसीमंतौ एतच्चगर्भाधानाद्यन्नप्राशनांतसंस्कारोपलक्षणं तदुक्तंदीपिकायां गर्भाधानमुखंचचौलविधितः प्राग्जातयागंविनाकृच्छ्रेष्वाग्रयणंगजेंद्रपुरतश्छायामघानंगयोः तीर्थेंदुक्षययोश्चपित्र्यमधिकेमास्येवमाद्याचरेदिति अलभ्ययोगेर्धोदयपद्मकादौकाम्यान्यपिव्रतादीनिकार्याणीत्यर्थः पूर्वेपरत्रच मलेशुद्धेचेत्यर्थः महालयशब्देनमघात्रयोदश्युच्यत इतिमाधवः दर्शश्राद्धंमलेपिकार्यं ।
मलमासांत कर्तव्यकर्मै सांगतो- कालादर्शांत म्हणतो - " प्रथम दिवसापासून सपिंडीकरणापर्यंत सर्व अंत्यकर्म, ग्रहणश्राद्ध, पुत्रजन्मनिमित्तक श्राद्ध, सीमंत व पुंसवन यांसंबंधी वृद्धिश्राद्ध, पुंसवन सीमंतसंस्कार, रोग असतां शांति अर्धोदय पद्मकादि अलभ्य योग असतां तन्निमित्तक श्राद्ध, काम्य व्रतें, निमित्तवशानें प्रायश्चित्त, वर्षपर्यंत कर्तव्य उदकुंभश्राद्ध, मन्वादिश्राद्धें, महालय ( मघात्रयोदशी ) श्राद्ध, युगादिश्राद्ध, दर्शश्राद्ध, दूररोजचें श्राद्ध, ऊनादि मासिकश्राद्ध, मलमासाहून अन्य मासांत मृत झाले त्यांचें प्रथमाब्दिकश्राद्ध, पूर्वदृष्ट तीर्थश्राद्ध, युगादि व मन्वादि तिथिसंबंधी दान, तिल, गाई, भूमि, सुवर्ण यांचें प्रतिदिवशीं ( नित्य ) कर्तव्य दान, स्नान संध्या, पर्वहोम ( दर्शपौर्णमासस्थालीपाक ), आग्रयण, साग्निकाची पर्वेष्टि, नित्याग्निहोत्रहोम, देवता व अतिथि यांची पूजा, स्नानविधिपूर्वक स्नान, अभक्ष्य व अपेय पदार्थवर्जन, तर्पण, ह्यांचें निमित्त नित्य असल्यामुळें हीं सर्व नित्य कर्मै होत; यास्तव तीं दोनही ( अधिक व शुद्ध ) मासांत करावीं. वरील वचनांत पुंसवन व सीमंत सांगितले ते गर्भाधानादि अन्नप्राशनांत संस्कारांचें उपलक्षण होय. तेंच दीपिकेंतही सांगतो - " जातकर्मावांचून गर्भाधानापासून चौलाच्या पूर्वीचे संस्कार, संकटकाळीं आग्रयण, गजच्छायाश्राद्ध, मघात्रयोदशीश्राद्ध, तीर्थश्रौद्ध, दर्शश्राद्ध इत्यादि हीं अधिक मासांत करावीं. अलभ्ययोग म्हणजे अर्धोदय, पद्मक, कपिलाषष्ठी इत्यादियोग असतां काम्यही व्रतादिक करावीं. महालय शब्दानें मघात्रयोदशी घ्यावी असें माधव सांगतो. दर्शश्राद्ध मलमासांतही करावें.
यत्तुऋष्यश्रृंगः संवत्सरातिरेकेणमासोयः स्यान्मलिम्लुचः तस्मिंस्त्रयोदशेश्राद्धंनकुर्यादिंदुसंक्षयैति तत्काम्यदर्शश्राद्धविषयं काम्यंनैवकदाचनेतिवचनात् दर्शेचकाम्यंश्राद्धं कन्यांकन्यावेदिनश्चेत्यादिनायाज्ञवल्क्येनोक्तं नित्यंतुमलेपिभवत्येव दर्शेप्यहरहः श्राद्धंदानंचप्रतिवासरं गोभूतिलहिरण्यानांमासेपिस्यान्मलिम्लुचेइतिमात्स्योक्ते रितिहेमाद्यादयः दिवोदासीयेपि अनिंदुरिंदुपूर्णाचहरिवारोबुधाष्टमी नाधिमासेपरित्याज्याः सीमंतान्नाशनेशिशोरिति अनिंदुर्दर्शः द्विविधमप्यमाश्राद्धंनकार्यमितिअपरार्कः अत्र यद्विहितंकर्म उत्तरेमासिकारयेदित्युक्तेः षष्ट्यातुदिवसैर्मास इतिशुद्धमासकरणेपिशास्त्रार्थोपपत्तेर्दर्शश्राद्धंमलेनकार्यमितिप्राचीनगौडाःशूलपाणिश्च संवत्सरप्रदीपेपि एकराशिस्थितेसूर्येयदादर्शद्वयंभवेत् दर्शश्राद्धंतदादौस्यान्नपरत्रमलिम्लुचे अत्रापिप्राग्वद्यवस्था ।
आतां जें ऋष्यशृंग सांगतो - " संवत्सरामध्यें अधिक जो मलमास होतो त्या तेराव्या मासांत दर्शश्राद्ध करुं नये " असें वचन तें काम्य दर्शश्राद्धविषयक होय; कारण, काम्यकर्म कदापि करुं नये, असें निषेधवचन आहे. " कन्यां कन्यावेदिनश्च " इत्यादि वचनेंकरुन याज्ञवल्क्यानें दर्शाचे ठिकाणीं काम्यश्राद्ध सांगितलें आहे. नित्यश्राद्ध तर मलमासांतही करावें. कारण " दर्शश्राद्ध, नित्यश्राद्ध, गो, भूमि, तिल, सुवर्ण यांचें नित्यदान हीं मलमासांतही करावीं " असें मत्स्यपुराणवचन आहे, असें हेमाद्रि इत्यादिक ग्रंथकार सांगतात. दिवोदासीयांतही - " दर्श, पौर्णिमा, द्वादशी, बुधाष्टमी, ह्या तिथि मलमासांत वर्ज्य करुं नयेत, म्हणजे ह्या तिथिसंबंधी श्राद्ध, दानादिक कृत्यें मलमासांतही करावीं; मुलांचे सीमंत व अन्नप्राशन संस्कारही करावे. " काम्य व नित्य असें दोनही प्रकारचें दर्शश्राद्ध करुं नये, असें अपरार्क सांगतो. कारण, " मलमासांत जें विहित कर्म तें उत्तर मासांत करावें " असें वचन आहे. अधिकमास असतां साठ दिवसांचा एक मास होतो, असें आहे म्हणून शुद्ध मासांत केलें असतांही शास्त्रार्थाची उपपत्ति होते, यास्तव दर्शश्राद्ध मलमासांत करुं नये; " असें प्राचीनगौड व शूलपाणि सांगतात. संवत्सरप्रदीपांतही - " एकराशिगत सूर्य असतां जेव्हां दोन दर्श प्राप्त होतात तेव्हां दर्शश्राद्ध पूर्व मासांत करावें, पुढच्या मलमासांत करुं नये; " असें जें वचन आहे, त्याविषयींही पूर्वीप्रमाणेंच ( वर सांगितल्याप्रमाणेंच ) व्यवस्था जाणावी.
यद्यपिकालादर्शेसर्वंवार्षिकंमासद्वयेकार्यमित्युक्तं तथापिहेमाद्रिमाधवापरार्कादिमतात्प्रथमाब्दिकंत्रयोदशेमलमासेद्वितीयाद्याब्दिकंतुशुद्धमासएवकार्यं असंक्रांतेपिकर्तव्यमाब्दिकंप्रथमंद्विजैः तथैवमासिकंश्राद्धंसपिडीकरणंतथेतिहारीतोक्तेः आब्दिकंप्रथमंयत्स्यात्तत्कुर्वीतमलिम्लुचे चतुर्दशेतुसंप्राप्तेकुर्वीत पुनराब्दिकमितिस्मृत्यंतरोक्तेश्च पुनराब्दिकंद्वितीयादिवार्षिकंत्रयोदशेमासेऽतीतेचतुर्दशाद्यदिनेकुर्यादित्यर्थः यत्तुसत्यव्रतः वर्षेवर्षेतुयच्छ्राद्धंमातापित्रोर्मृतेहनि मलमासेनतत्कार्यंव्याघ्रस्यवचनंयथेति तद्वितीयादिवार्षिकविषयम् आब्दिकंप्रथमंयत्स्यात्तत्कुर्वीतमलिम्लुचे इतिपूर्वोक्तवचनात् ।
जरी सर्व वार्षिक श्राद्ध दोन मासांत करावें, असें कालादर्शात सांगितलें आहे, तथापि हेमाद्रि, माधव, अपरार्क इत्यादिकांचे मतीं प्रथमाब्दिकश्राद्ध, तेरावा जो मलमास त्यांत करावें, आणि द्वितीयाब्दिक शुद्धमासांतच करावें; कारण, " द्विजांनीं असंक्रांत मासांत ( मलमासांत ) ही प्रथमाब्दिकश्राद्ध, मासिकश्राद्ध आणि सपिंडीकरण हीं करावीं " असें हारीतवचन आहे; आणि " प्रथमाब्दिक जें श्राद्ध तें मलमासांत करावें, व चवदाव्या मासांत पुनराब्दिक करावें " असें स्मृत्यंतरवचनही आहे. पुनराब्दिक म्हणजे द्वितीयादि वार्षिक, तें तेरावा महिना गेल्यावर चवदाव्या महिन्याच्या प्रथम दिवशीं करावें, असा वरील वचनाचा अर्थ आहे. आतां जें सत्यव्रत सांगतो - " प्रतिवर्षी मातापितरांच्या मृतदिवशीं कर्तव्य जें श्राद्ध तें मलमासांत करुं नये, असें व्याघ्रऋषीचें वचन आहे " तें द्वितीयादि वार्षिकाचा निषेध करितें, प्रथमाब्दिकाचा निषेध करीत नाहीं. कारण, " प्रथमाब्दिकश्राद्ध मलमासांत करावें " असें पूर्वीं ( वर ) वचन सांगितलें आहे.
यत्रद्वादशंमासिकंशुद्धमासेभवति तत्रत्रयोदशेधिकएवाद्याब्दिकंकार्यम् यत्रत्वधिकमध्येद्वादशंमासिकंतत्रतस्यद्विरावृत्तिंकृत्वाचतुर्दशेशुद्धएवप्रथमाब्दिकमितिनिष्कर्षः तेनद्वितीयादिशुद्धमासएव पृथ्वीचंद्रोदयेदिवोदासीयेमदनपारिजातेचैवं मलमासमृतानांतुयदासएवाधिकः स्यात्तदातत्रैवप्रतिसांवत्सरिकं कार्यं यथापैठीनसिः मलमासेमृतानांतुश्राद्धंयत्प्रतिवत्सरं मलमासेपिकर्तव्यंनान्येषांतुकथंचनेति हेमाद्रौव्यासोपि मलमासमृतानांतुसौरंमानंसमाश्रयेत् सएवदिवसस्तस्यश्राद्धपिंडोदकादिषु अत्राधिकमृतस्यनद्वितीयाद्यब्देपिसौरविधिः द्वितीयादावन्याधिकेवापूर्वनियमविधिवैरुप्यात्किंतुप्रथमाब्दिकस्यमलेनियमात्सत्यव्रतेन तद्भिन्नस्यसर्वस्याधिकेनिषेधेप्राप्तेप्रतिप्रसवमात्रंलाघवात् अतोनद्वितीयादौसौरमासप्रसंगः चांद्रमिष्टंतदाब्दिके मासपक्षतिथिस्पष्टेइत्यादिविरोधाच्च ।
जेथें बारावें मासिकश्राद्ध शुद्ध मासांत होतें तेथें तेराव्या अधिक मासांतच प्रथमाब्दिक करावें, आणि जेथें अधिक मासांत बारावें मासिक होईल तेथें अधिक व शुद्ध या दोन मासांत त्याची द्विरावृत्ति करुन ( व ऊनाब्दकालीं ऊनाब्दिक करुन ) चवदाव्या शुद्ध मासांतच प्रथमाब्दिक करावें असा फलितार्थ आहे. म्हणून द्वितीयाब्दिक वगैरे शुद्ध मासांतच करावें. पृथ्वीचंद्रोदय, दिवोदासीय व मदनपारिजात या ग्रंथांतही असेंच सांगितलें आहे. मलमासांत मृत झाले व कांहीं दिवसांनीं तोच मलमास प्राप्त झाला तर त्या अधिक मासांतच त्यांचें प्रतिसांवत्सरिक श्राद्ध करावें. पैठीनसि - " मलमासांत मृत झालेल्यांचें प्रतिसांवत्सरिक श्राद्ध मलमासांतही करावें, इतरांचें ( शुद्ध मासांत मृत झालेल्यांचें ) कधींही करुं नये. " हेमाद्रींत - व्यासही - " मलमासांत जे मृत होतात त्यांच्याविषयीं सौरमान घ्यावें, म्हणजे त्यांचें श्राद्ध, पिंड, उदकदान यांविषयीं ज्या दिवशीं मृत असेल तोच दिवस घ्यावा. " ह्या वचनानें अधिकमासांत मृतांच्या द्वितीयांदि आब्दिकांविषयीं देखील सौरमान घ्यावयाचें नाहीं; कारण, द्वितीयादि आब्दिकाविषयीं जर सौरमान घेतलें तर कांहीं दिवसांनीं, ज्या मासांत मृत असेल त्याच्या पूर्वीचा महिना अधिक आला असतां त्या अधिकाच्या शुद्धमासांत सौरमानानें प्राप्त होत असल्यामुळें पूर्वोक्त जो नियमविधि ( द्वितीयादिवार्षिक श्राद्ध तेरावा महिना गेल्यावर चवदाव्या मासाच्या आद्य दिवशीं करावें इत्यादि ) तो असंगत होईल; तर प्रथमाब्दिकाविषयींच मलमास सांगितला आहे, म्हणून सत्यव्रतवचनानें प्रथमाब्दिकव्यतिरिक्त सर्व श्राद्धांचा अधिकांत निषेध प्राप्त असतां, मलमासमृताविषयीं तो मास प्राप्त असेल तर त्या निषेधाचा बाध, ह्या वचनानें केला आहे. असें केलें असतां लाघव येतें. तो मास प्राप्त असल्यावेळीं निषेधबाध केला आहे, म्हणूनच द्वितीयादि आब्दिकाविषयीं सौरमासाचा प्रसंग येत नाहीं. आणि सौरमान घेतलें तर " आब्दिकाविषयीं चांद्रमान इष्ट आहे. " शिवाय " मास, पक्ष, तिथि यांनीं स्पष्ट काळीं करावें " इत्यादि वचनाचा विरोधही येईल.
यत्तुवृद्धवसिष्ठः श्राद्धीयाहनिसंप्राप्तेअधिमासोभवेद्यदि मासद्वयेपिकुर्वीतश्राद्धमेवंनमुह्यति यच्चव्यासः उत्तरेदेवकार्याणिपितृकार्याणिचोभयोरिति तन्मासिकादिविषयं यौगादिकंमासिकंचश्राद्धंचापरपक्षिकं मन्वादिकंतैर्थिकंचकुर्यान्मासद्वयेपिचेतिस्मृतिचंद्रिकोक्तेः तैर्थिकंतीर्थश्राद्धं तच्चमासद्वयेपिकार्यमितित्रिस्थलीसेतौभट्टाः ।
आतां जें वृद्धवसिष्ठ म्हणतो - " अधिक मास प्राप्त असेल व त्यांत श्राद्धदिवस प्राप्त होईल तर दोनही मासांत श्राद्ध करावें, " आणि जें व्यास म्हणतो " उत्तर मासांत देवकार्यै, व पूर्व, उत्तर अशा दोनही मासांत पितृकार्यै करावीं ’ अशीं वचनें तीं मासिकादि श्राद्धविषयक होत; कारण, " युगादितिथिनिमित्तश्राद्ध, मासिकश्राद्ध, अपरपक्षिकश्राद्ध ( प्रतिकृष्णपक्षविहित ), मन्वादितिथिनिमित्तक श्राद्ध आणि तीर्थश्राद्ध हीं दोनही मासांत करावीं " असें स्मृतिचंद्रिकेंत वचन आहे. तीर्थश्राद्ध दोनही मासांत करावें असें त्रिस्थलीसेतूंत भट्ट ( नारायणभट्ट ) सांगतात.
केचित्तु प्रतिमांसमृताहेचश्राद्धंयत्प्रतिवत्सरं मन्वादौचयुगादौचतन्मासोरुभयोरपीतिमरीचिवचनात् वर्षेवर्षेतुयच्छ्राद्धंमातापित्रोर्मृतेहनि मासद्वयेपितत्कुर्याद्याघ्रस्यवचनंयथेतिगालवोक्तेश्च प्रत्याब्दिकंमासद्वयेकार्यमित्याहुस्तत्तुच्छं प्रतिमासंमृताहेक्रियमाणंमासिकं प्रतिसंवत्सरंक्रियमाणंकल्पादिश्राद्धमितिमरीचिवचसोमदनरत्नेनव्याख्यानात् गालवीयस्यचमासद्वयात्मकेक्षयमास इतिमाधवेनव्याख्यानात् ।
कांहीं ग्रंथकार तर " मासिकश्राद्ध, प्रतिसांवत्सरिकश्राद्ध, मन्वादिश्राद्ध, आणि युगादिश्राद्ध हीं दोनही मासांत करावीं " असें मरीचिवचन आहे म्हणून; आणि " प्रतिवर्षी मातापितरांच्या मृतदिवशीं कर्तव्य जें श्राद्ध तें दोन्ही मासांत करावें, असे व्याघ्रऋषी सांगतो " असें गालवाचेंही वचन आहे, म्हणून प्रत्याब्दिक श्राद्ध दोन मासांत करावें असें सांगतात; परंतु तें केचिन्मत तुच्छ आहे; कारण, ’ प्रतिमासं मृताहे च श्राद्धं यत्प्रतिवत्सरं ह्या मरीचिवचनांतील ‘ प्रतिमासं ’ व ‘ प्रतिसंवत्सरं ’ ह्या दोन पदांची व्याख्या क्रमानें, प्रतिमासांत मृतदिवशीं करावयाचें मासिक, व प्रतिवर्षी करावयाचें कल्पादि श्राद्ध अशी मदनरत्नानें केली आहे आणि गालववचनांतील ‘ मासद्वये ’ या पदाची व्याख्या मासद्वयात्मक क्षयमासांत, अशी माधवानें केली आहे.
यच्चकैश्चिदुक्तम् प्रथमाद्बिकंमासद्वयेकार्यं आब्दिकंप्रथमंयत्स्यात्तत्कुर्वीतमलिम्लुचे त्रयोदशेचसंप्राप्तेकुर्वीतपुनराब्दिकमितियमोक्तेरिति तदपिचिंत्यं पुनराब्दिकंद्वितीयादिवार्षिकंत्रयोदशेऽतीतेचतुर्दशेकुर्यात् अन्यथा सांवत्सरंनवर्धेतश्राद्धंतत्रमृतेहनीतिपैठीनसि विरोधः स्यादितिहेमाद्रौपृथ्वीचंद्रोदयेच एतेननवर्धेतनछिंद्याच्छुद्धेपिकुर्यादेवेत्यनंतभट्टव्याख्यामानाभावात्परास्ता पूर्वव्याख्यायांतुहारीतीयेप्रथमग्रहणमेवमानम् ।
आणि जें कांहीं ग्रंथकार, प्रथमाब्दिक श्राद्ध दोन मासांत करावें; कारण , जें " प्रथमाब्दिक श्राद्ध तें मलमासांत करावें, तेरावा मास प्राप्त असतां पुनः आब्दिक करावें " असें यमाचें वचन आहे असें म्हणतात, परंतु तेंही केचिन्मत चिंत्य ( प्रमाणशून्य ) होय. कारण, पुनराब्दिक म्हणजे द्वितीयादिवार्षिक श्राद्ध, तें तेरावा मास गत झाल्यानंतर चवदाव्या मासाच्या प्रथमदिवशीं करावें, असा त्या वचनाचा अर्थ आहे. तसा अर्थ न मानल्यास ‘ मृतदिवशीं कर्तव्य जें सांवत्सरिक श्राद्ध त्याची वृद्धि ( द्विरावृत्ति ) करुं नये ’ ह्या पैठीनसिवचनाशीं विरोध येईल, असें हेमाद्रींत व पृथ्वीचंद्रोदयांतही सांगितलें आहे. यावरुन " श्राद्धाची वृद्धि करुं नये, ह्नासही करुं नये, परंतु शुद्ध मासांतही करावेंच " अशी जी अनंतभट्टाची व्याख्या ती प्रमाणरहित असल्यामुळें खंडित झाली. प्रथमाब्दिक तेराव्या मलमासांत करावें, अशी जी पूर्वी केलेली व्याख्या तिच्याविषयीं, ‘ असंक्रांतेऽपि० ’ ह्या हारीतवचनांतील ‘ प्रथम ’ ग्रहणच प्रमाण आहे.
यदपिनिर्णयामृतेपूर्वोक्तकालादर्शवचनात् मलमासेश्राद्धदिनस्यवंध्यत्वनिरासार्थंपित्रुद्देशेनब्राह्मणान् भोजयित्वाशुद्धमासेसपिंडकंश्राद्धंकुर्यात् पिंडवर्जमसंक्रांतौ पिंडसंयुतंप्रतिसंवत्सरंश्राद्धमेवंमासद्वयेपिचेति वृद्धपराशरोक्तेरिति तदपिचिंत्यम् पूर्वोक्तवचनस्यक्षयपूर्वभाव्यधिकमासविषयत्वात् तत्रहि मासद्वयेश्राद्धमुक्तं तदाहसत्यतपाः एकएवयदामासः संक्रांतिद्वयसंयुतः मासद्वयगतंश्राद्धंमलमासेपिशस्यत इति मासद्वयगतंपूर्वासंक्रांतिगतंक्षयगतंच मलमासेक्षयमासे अपिशब्दात्पूर्वाधिमासेचेतिहेमाद्रिः दीपिकायामपि तत्प्राक्संग्यधिमासकोयदिभवेत्तत्रत्यसांवत्सर्म्तस्मिञ्छुद्धतयाक्षयेचवचनात्कुर्याद्दूयोः कोविद इति कालादर्शोप्येतद्विषयएवेत्यलंबहुना ।
आतां जें निर्णयामृतांत - पूर्वोक्त कालादर्शवचनावरुन मलमासांतील श्राद्धदिवस व्यर्थ जाऊं देऊं नये, म्हणून पितृद्देशानें ब्राह्मणाला नुस्तएं भोजन घालून शुद्धमासांत सपिंडक श्राद्ध करावें; कारण, " असंक्रांत मासांत पिंडवर्ज्य श्राद्ध व संक्रांतियुक्तमासांत सपिंडक श्राद्ध, याप्रमाणें प्रतिसांवत्सरिकश्राद्ध दोनही मासांत करावें " असें वृद्धपराशराचें वचन निर्णयामृतग्रंथांत सांगितलें आहे, तेंही चिंत्य होय. कारण, तें वृद्धपराशरवचन क्षयमासाच्या पूर्वी होणारा जो अधिकमास तद्विषयक आहे. क्षयमास व तत्पूर्वभावी अधिकमास ह्या दोन मासांत श्राद्ध करावें. असेम सांगितलें आहे. तें सत्यतपा सांगतो - " ज्या वर्षी एकच मास दोन संक्रांतींनीं युक्त असा प्राप्त होतो त्यावर्षी मासद्वयगत ( पूर्वीच्या संक्रांतिरहित मासांतील व क्षयमासांतील अशीं दोन ) श्राद्धें मलमासांत ( क्षयमासांत ) करावीं. वरील सत्यतपोवचनांत ‘ मलमासेऽपि शस्यते ’ येथें ‘ अपि ’ शब्द आहे म्हणून पूर्व अधिकमासांतही करावें, असें हेमाद्रि सांगतो. दीपिकेंत असेंच सांगतो - " क्षयमास प्राप्त असतां, त्याच्या पूर्वीच्या अधिकमासांतील सांवत्सरिक श्राद्ध तो शुद्ध असल्यामुळें त्यांत आणि शास्त्रानें सांगितल्यामुळें क्षयमासांत, असें दोनही मासांत ज्ञात्या पुरुषानें श्राद्ध करावें. " कालादर्शही एतद्विषयकच आहे. इतका निर्णय पुरे. आतां याहून अधिक विचार नको.