मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
चांद्रमास

प्रथम परिच्छेद - चांद्रमास

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


पक्षयुगजश्चांद्रोमासः सद्वेधा शुक्लादिरमांतः कृष्णादिः पूर्णिमांतश्चेति तथाच त्रिकांडमंडनः चांद्रोपि शुक्लपक्षादिः कृष्णादिर्वेतिचद्विधेत्युक्त्वा देशभेदेनतद्यवस्थामह कृष्णपक्षादिकंमासंनांगीकुर्वंतिकेचन येपीच्छंतिनतेषामपीष्टोविंध्यस्यदक्षिणे इति विंध्यस्यदक्षिणेकृष्णादिनिषेधादुत्तरतोद्वयोरभ्यनुज्ञागम्यते तत्रापिशुक्लादिर्मुख्यः कृष्णादिर्गौणः शास्त्रेषुचैत्रशुक्लप्रतिपद्येवचांद्रसंवत्सरारंभोक्तेः तदुक्तंदीपिकायां चांद्रोब्दोमधुशुक्लगप्रतिपदारंभ इति नहियेकृष्णादिंमन्यंतेतेषांवत्सरारंभोभिद्यते अतःशुक्लादिर्मुख्यः कृष्णादिनामलमासासंभवाच्च चंद्रस्यसर्वनक्षत्रभोगेननाक्षत्रोमासः सावनादीनांव्यवस्थोक्ता हेमाद्रौब्रह्मसिद्धांते अमावास्यापरिच्छिन्नोमासः स्याद्ब्राह्मणस्यतु संक्रांतिपौर्णमासीभ्यांतथैवनृपवैश्ययोः अत्रब्राह्मणादीनांयत्रकर्मविशेषेवचनांतरेणवसंतेब्राह्मणोग्नीनादधीतेत्यादिवन्मास उक्तस्तत्रदर्शांतत्वमात्रंनियम्यते नतुसर्वकर्मसुदर्शांतएवेति वृष्ट्याद्यर्थसौभरेहीषादिनिधननियमवद्विधिलाघवात् त्रैवर्णिकानांसर्वकर्मसुमासविशेषविधेः सावनादीनांशूद्रानुलोमादिपरत्वापत्तेश्चेतिगुरुचरणाः ।

चांद्रमास- दोन पक्ष मिळून एक चांद्रमास होतो. तो चांद्रमास दोन प्रकारचा-शुक्लप्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत किंवा कृष्णप्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत जो मास तो चांद्रमास. तेंच त्रिकांडमंडन सांगतो - " शुक्लपक्षप्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत, अथवा कृष्णपक्षप्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत जो मास तो चांद्रमास होय, " -याप्रमाणें चांद्रमास सांगून देशभेदानें त्याची व्यवस्था सांगतो. ती अशी- " कृष्णपक्षप्रतिपदेपासून पौर्णिमांत जो चांद्रमास त्याचें ग्रहण कोणी करीत नाहींत, जे कोणी ग्रहण करितात त्यांच्या मतेंही तो विंध्याद्रीच्या दक्षिणप्रदेशीं इष्ट नाहीं. " विंध्याद्रीच्या दक्षिणप्रदेशीं कृष्णपक्षादि चांद्रमासाचा निषेध सांगितल्यावरुन विंध्याद्रीच्या उत्तरप्रदेशीं ( नर्मदेच्या उत्तरप्रदेशीं ) दोनही प्रकारचा चांद्रमास घेण्याविषयीं शास्त्रसंमति मिळते, त्यांतही शुक्लप्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत जो चांद्रमास तो मुख्य; कृष्णप्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत जो चांद्रमास तो गौण हौय, कारण, चैत्रशुक्लप्रतिपदेचेठायींच चांद्रवर्षाचा आरंभ होतो असें धर्मशास्त्रांत सांगितलें आहे. तेंच दीपिकेंत सांगतो - " चांद्रवर्षाचा आरंभ चैत्रशुक्लप्रतिपदेस होतो. " जे कोणी कृष्णादि चांद्रमास मानितात त्यांच्या वर्षाचा आरंभ भिन्न आहे काय ? तर भिन्न नाहीं. यास्तव शुक्लादि चांद्रमास हाच मुख्य आहे, आणि दुसरें कारण, कृष्णादि चांद्रमासेंकरुन मलमासाचा असंभव आहे. नाक्षत्रमास- अश्विनीपासून रेवतीपर्यंत सत्तावीस नक्षत्रें चंद्रानें भुक्त असतां जो मास तो नाक्षत्रमास. सावन, सौर, चांद्र, नाक्षत्र हे जे चार प्रकारचे मास, त्यांची व्यवस्था हेमाद्रींत ब्रह्मसिद्धांत सांगतो - " ब्राह्मणास अमांत मास प्रशस्त, क्षत्रियांस संक्रांतिमास ( सौरमास ) व वैश्यांस पौर्णिमांत मास प्रशस्त आहे. एथें असें समजावें कीं, ब्राह्मणानें अग्नीचें आधान वसंत ऋतूंत करावें, याप्रमाणें जेथें ब्राह्मणादिकांना ज्या विशेष कर्माविषयीं इतर वचनांनीं जो विशेष मास विहित आहे तेथें तो मास दर्शांतच घ्यावा, असा ह्या ( " अमावास्या० " ) वचनानें नियम केला आहे. सर्व कर्माविषयीं दर्शांतच घ्यावा, असें नाहीं. जसें-जो वृष्टिकाम, जो अन्नाद्यकाम, जो स्वर्गकाम, त्यानें सौभरसामानें स्तुति करावी, असें श्रौतांत सांगितलें आहे, त्यांमध्यें वृष्टिकामासाठीं ‘ हीष्‍ ’ असें निधन करावें. निधन म्हणजे सामाचे पांच किंवा सात भाग असतात त्यांतील अंतिमभाग होय. अन्नाद्यकामासाठीं ‘ ऊर्क ’ असें निधन करावें, आणि स्वर्गकामासाठीं ‘ ऊ ’ असें निधन करावें. त्या ठिकाणीं इतर वचनांनीं ‘ हीष्‍ ’ इत्यादि निधनें प्राप्त असतां ह्या वचनानें जीं निधनें सांगितलीं, तीं विशेष कामासाठीं नियमित आहेत, म्हणजे वृष्टिकामाला ‘ हीष्‍ ’ असेंच निधन करावें, दुसरें करुं नये, हा नियमविधि आहे; त्याप्रमाणें प्रकृतस्थलींही ब्राह्मणाला सर्व कर्मांविषयीं दर्शांतच मास घ्यावा, असा अपूर्व नियम करण्यापेक्षां पूर्वी इतर वचनांनीं प्राप्त जो मास तो दर्शांतच घ्यावा, असा नियम केला असतां लाघव येतें. आणि असा नियम न करितां, सर्व कर्माविषयीं दर्शांतच घ्यावा, असा नियम केला तर ब्राह्मणादि तीन वर्णांला सर्व कर्मांविषयीं विशेष मास ( सावनादिकही ) सांगितले आहेत, त्यांचा विरोध येईल. तसेंच वर सांगितलेल्या नियमवचनांनीं ब्राह्मणांला दर्शांतच, क्षत्रियांला संक्रांत्यंतच; आणि वैश्यांला पौर्णमास्यंतच, असे नियमित झाल्यामुळें उर्वरित सावन व नाक्षत्र हे मास शूद्र, अनुलोमजाति इत्यादिकांनाच प्राप्त होतील, इतरांना प्राप्त होणार नाहींत. असें गुरुचरण ( रामकृष्णभट्ट ) म्हणतात.

ज्योतिर्गर्गः सौरोमासोविवाहादौयज्ञादौसावनःस्मृतः आब्दिकेपितृकार्येचचांद्रोमासःप्रशस्यते ऋष्यश्रृंगः विवाहव्रतयज्ञेषुसौरंमानंप्रशस्यते पार्वणेत्वष्टकाश्राद्धेचांद्रमिष्टंतथाब्दिके स्मृत्यंतरे एकोद्दिष्टविवाहादावृणादौसौरसावनौ ज्योतिर्गर्गः आयुर्दायविभागश्चप्रायश्चित्तक्रियातथा सावनेनैवकर्तव्या शत्रूणांचाप्युपासना विष्णुधर्मे नक्षत्रसत्राण्ययनानिचेंदोर्मासेनकुर्याद्भगणात्मकेनेति ब्राह्मे तिथिकृत्येच कृष्णादिंव्रतेशुक्लादिमेवच विवाहादौचसौरादिंमासंकृत्येविनिर्दिशेत् ।

ज्योतिर्गर्ग - " विवाह, उपनयन, चूडा, व्रत, नियम, प्रतिष्ठा, गृहकरण, महाषष्ठी, महासप्तमी, दशहरा इत्यादिकांविषयीं सौरमास विहित; यज्ञ, इत्यादिकांविषयीं सावन मास विहित होय. आब्दिक वर्षवृद्धिकर्म, ( वाढदिवस ) व पितृकार्यें यांविषयीं चांद्रमास प्रशस्त होय. " ऋष्यशृंग - " विवाह, व्रत, यज्ञ, यांविषयीं सौरमास प्रशस्त आहे. पार्वणश्राद्ध, अष्टकाश्राद्ध आणि आब्दिक ( सांवत्सरिक ) श्राद्ध यांविषयीं चांद्रमास प्रशस्त होय. " स्मृत्यंतरांत - " एकोद्दिष्टश्राद्ध, विवाहादिक, यांविषयीं व ऋण घेणें व देणें यांविषयीं सौरमास व सावनमास प्रशस्त होत. " ज्योतिर्गर्ग - " आयुर्दायविभाग, प्रायश्चित्तक्रिया आणि शत्रूंची उपासना ( समयप्रतीक्षा ) हीं कर्में सावनमासेंकरुनच करावीं. " विष्णुधर्मांत - " नक्षत्रसत्रें, अयनकृत्यें हीं नाक्षत्रमासेंकरुन करावीं. ( अश्विनीपासून रेवतीपर्यंत सत्तावीस नक्षत्रें चंद्रानें भुक्त असतां जो मास तो नाक्षत्रमास ) ब्रह्मपुराणांत - तिथिसंबंधी कृत्यांविषयीं कृष्णादि, व्रताविषयीं शुक्लादिक मास घ्यावा. विवाहादि कार्याविषयीं सौरादिक मास घ्यावा. "

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP