मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
काळाचे भेद

प्रथम परिच्छेद - काळाचे भेद

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


तत्रसंक्षेपतःकालःषोढा अब्दोयनमृतुर्मासःपक्षोदिवस इति तत्राब्दोमाधवमतेपंचधा सावनःसौरश्चांद्रो नाक्षत्रोबार्हस्पत्य इति गुरोर्मध्यमराशिभोगेनबार्हस्पत्यः सचज्योतिःशास्त्रेप्रसिद्धः हेमाद्रिस्त्वंत्ययोर्धर्मशास्त्रेऽनुपयोगात्तिस्त्रएवविधाआह तत्रवक्ष्यमाणैःसावनादिद्वादशमासैस्तत्तदब्दम्‍ मलमासेतुसतिषष्टिदिनात्मकएको मास इतिद्वादशमासत्वमविरुद्धम् तथाचव्यासः षष्ट्यातुदिवसैर्मासः कथितोबादरायणैरिति ।

यानंतर प्रथमतः काळाचे भेद सांगतो.
संक्षेपेंकरुन काल सहा प्रकारचा---तो असा-वर्ष, अयन, ऋतु, मास, पक्ष आणि दिवस. त्यामध्यें माधवमतीं वर्ष पांच प्रकारचें तें असें-सावन, सौर, चांद्र, नाक्षत्र आणि बार्हस्पत्य. बृहस्पतीच्या मध्यमराशिभोगानें ( मध्यमगतीनें ) जें वर्ष होतें तें बार्हस्पत्य. ( म्हणजे मेषादिक बारा राशींतून कोणताही एक राशि बृहस्पतीनें मध्यम गतीकरुन भुक्त असतां जें वर्ष होतें त्याला बार्हस्पत्य वर्ष म्हणतात. ) तें वर्ष ज्योतिःशास्त्रांत प्रसिद्ध आहे. हे जे वर वर्षाचे पांच प्रकार सांगितले त्यांपैकीं नाक्षत्र वर्ष व बार्हस्पत्य वर्ष ह्या दोहोंचा उपयोग धर्मशास्त्रांत फारसा नाहीं, यास्तव हेमाद्रि तर सावन, सौर व चांद्र हे तीनच प्रकार सांगतो. त्यांमध्यें एथें पुढें सांगावयाचे जे सावनादिक मास ते बारा बारा झाले म्हणजे तें तें वर्ष होतें. मलमास आला असतां साठ दिवसांचा एक मास होतो म्हणून बारा मास झाले असतांच वर्ष होतें, याला कोणताही विरोध नाहीं. तेंच व्यास सांगतो -" ( अधिक मास असतां ) साठ दिवसांचा एक मास बादरायणांनीं सांगितला आहे. "

तत्रचांद्रोब्दःषष्टिभेदःतदाहगार्ग्यः" प्रभवोविभवःशुक्लःप्रमोदोथप्रजापतिःअंगिराः श्रीमुखोभावोयुवाधातेश्वरस्तथा बहुधान्यःप्रमाथीचविक्रमोऽथवृषस्तथा चित्रभानुःसुभानुश्चतारणःपार्थिवोव्ययः सर्वजित्सर्वधारीचविरोधीविकृतिःखरः नंदनोविजयश्चैवजयोमन्मथदुर्मुखौ हेमलंबोविलंबोऽथविकारीशार्वरीप्लवः शुभकृच्छोभनःक्रोधीविश्वावसुपराभवौ प्लवंगःकीलकःसौम्यःसाधारणविरोधकृत्‍ परिधावीप्रमादीच आनंदोराक्षसोऽनलः पिंगलःकालयुक्तश्चसिद्धार्थीरौद्रदुर्मती दुंदुभीरुधिरोद्गारीरक्ताक्षीक्रोधनःक्षयं ’ इति ॥

त्यांमध्यें चांद्रवर्षाचे साठ भेद ( नामें ) आहेत. ते गार्ग्य सांगतो- " प्रभव, विभव, शुक्ल, प्रमोद, प्रजापति, अंगिरा, श्रीमुख, भाव, युवा, धाता, ईश्वर, बहुधान्य, प्रमाथी, विक्रम, वृष, चित्रभानु, सुभानु, तारण, पार्थिव, व्यय, सर्वजित्‍, सर्वधारी, विरोधी, विकृति, खर, नंदन, विजय, जय, मन्मथ, दुर्मुख, हेमलंब, विलंब, विकारी, शार्वरी, प्लव, शुभकृत्‍, शोभन, क्रोधी, विश्वावसु, पराभव, प्लवंग, कीलक, सौम्य, साधारण, विरोधकृत्‍, परिधावी, प्रमादी, आनंद, राक्षस, अनल, पिंगल, कालयुक्त, सिद्धार्थी, रौद्र, दुर्मति, दुंदुभि, रुधिरोद्गारी, रक्ताक्षी, क्रोधन, क्षय, ( याप्रमाणें संवत्सरांचीं नामें साठ जाणावीं ).

यद्यपिज्योतिषेगुरोर्मध्यमराशिभोगेनप्रभवादीनांमाघादौप्रवृत्तिरुक्ता तथापिप्रभवादीनांचांद्रत्वमप्यस्ति चांद्राणांप्रभवादीनांपंचकेपंचकेयुगेइतिमाधवोक्तेः तेनचांद्रप्रभवादिश्चैत्रसितेप्रवर्तते बार्हस्पत्यस्तुमाघादौ ।

जरी ज्योतिःशास्त्रांत बृहस्पतीच्या मध्यम राशिभोगेंकरुन ( मध्यम गतीकरुन ) प्रभवादि संवत्सरांची प्रवृत्ति ( आरंभ ) माघशुक्लप्रतिपदेपासून सांगितली आहे; तथापि प्रभव, विभव इत्यादिक जीं साठ संवत्सरनामें तीं चांद्रवर्षाचींही नामें आहेत. कारण, " प्रभव इत्यादिक जे चांद्र संवत्सर त्यांच्याच-संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर व इद्वत्सर अशा युग ( समूह ) संज्ञक पंचकापंचकाचे ठायीं " होतो असें माधवाचें वचन आहे. तेणेंकरुन प्रभव, विभव इत्यादिक चांद्रवर्षाची प्रवृत्ति ( आरंभ ) होणें ती चैत्रशुक्लप्रतिपदेस होते. बार्हस्पत्य वर्षाची प्रवृत्ति तर माघशुक्लपक्षांत होते.

तयोर्विनियोगोज्योतिर्निबंधेब्रह्मसिद्धांते व्यावहारिकसंज्ञोऽयंकालःस्मृत्यादिकर्मसु योज्यः सर्वत्र तत्रापिजैवोवानर्मदोत्तरे आर्ष्टिषेणः स्मरेत्सर्वत्रकर्मादौचांद्रंसंवत्सरंसदा नान्यंयस्माद्वत्सरादौप्रवृत्तिस्तस्यकीर्तितेति अयनंतुसौरर्तुत्रयात्मकं सौरर्तुत्रितयंप्रदिष्टमयनमितिदीपिकोक्तेः तद्दिविधम्‍ दक्षिणमुत्तरंचेति कर्कसंक्रांतिर्दक्षिणायनं मकरेंत्यम्‍ अनयोर्विनियोगमाहमदनरत्नेसत्यव्रतः देवतारामवाप्यादिप्रतिष्ठोदड्मुखेरवौ दक्षिणाशामुखेकुर्वन्नतत्फलमवाप्नुयात्‍ वैखानसः मातृभैरववाराहनारसिंहत्रिविक्रमाः महिषासुरहंत्र्यश्चस्थाप्यावैदक्षिणायने वैशद्बोप्यर्थे नतुदक्षिणायनएवेतिनियमः पूर्ववचनेदक्षिणायनेनिषिद्धायादेवप्रतिष्ठायादेवविशेषेप्रतिप्रसवमात्रात्‍ ।

चांद्र व बार्हस्पत्य वर्षांचा विनियोग ( उपयोग ) ज्योतिर्निबंधांत-ब्रह्मसिद्धांतांत सांगतो- " व्यावहारिक संज्ञक असा हा काल ( चांद्रवर्ष ) स्मृत्युक्तादि कर्मांचेठायीं संकल्पकालीं सर्वदेशांत योजावा; नर्मदेच्या उत्तरप्रदेशीं चांद्र अथवा बार्हस्पत्य योजावा. " आर्ष्टिषेण म्हणतो - " सर्वत्र ठिकाणीं कर्माच्या आरंभीं संकल्पांत चांद्र वर्षाचाच उच्चार करावा, इतर वर्षाचा करुं नये; कारण, चांद्रवर्षाची प्रवृत्ति चैत्रशुक्लप्रतिपदेस सांगितली आहे. " सौरऋतु तीन म्हणजे एक अयन होतें. कारण, ‘ सौरऋतु तीन तें अयन म्हटलें आहे ’ अशी दीपिकेची उक्ति आहे. तें अयन दोन प्रकारचें - एक दक्षिणायन आणि दुसरें उत्तरायण. कर्कसंक्रांतीपासून सहा संक्रांति ( म्हणजे ४-९ ) पर्यंत दक्षिणायन. मकरसंक्रांतीपासून मिथुनसंक्रांतीपर्यंत उत्तरायण. ह्या दोन अयनांचा उपयोग मदनरत्नांत-सत्यव्रत सांगतो - देवता, आराम, वापी, कूप, तलाव इत्यादिकांची प्रतिष्ठा ( अर्चा व उत्सर्ग हीं कर्में ) रवि उत्तरायणस्थ असतां करावीं. दक्षिणायनस्थ रवि असतां हीं पूर्वोक्त कर्में करणारास त्याचें फल लाभत नाहीं. " वैखानस म्हणतो - " मातृका, भैरव, वाराह, नारसिंह, त्रिविक्रम, देवी, ह्यांची ( उग्रदेवतांची ) दक्षिणायनांतही स्थापना करावी. "  ह्या वाक्यांत ‘ वै ’ शब्द आहे तो अप्यर्थी आहे, यावरुन दक्षिणायनांतच स्थापना करावी असा नियम नाहीं. कारण ‘ देवतारामवाप्यादि ’ ह्या पूर्ववचनेंकरुन दक्षिणायनांत निषिद्ध केलेल्या देवप्रतिष्ठेचा " मातृभैरववाराह " ह्या वाक्यानें प्रतिप्रसंव ( निषेधबाध ) मात्र सांगितला. म्हणजे माता, भैरव, वाराह इत्यादिकांची प्रतिष्ठा दक्षिणायनांतही करावी, व उत्तरायणांत करावीच इतकें सूचित केलें आहे.

रत्नमालायाम्‍ गृहप्रवेशत्रिदशप्रतिष्ठाविवाहचौलव्रतबंधपूर्वम्‍ सौम्यायनेकर्मशुभंविधेयंयद्गर्हितंतत्‍ खलुदक्षिणेचेति अस्यापवादः काशीखंडे सदाकृतयुगंचास्तुसदाचास्तूत्तरायणम्‍ सदामहोदयश्चास्तुकाश्यां निवसतांसतां इत्ययनम्‍ ।

रत्नमालेंत - " गृहप्रवेश, देवांची अर्चा, विवाह, चौल, उपनयन इत्यादिक शुभकर्मे उत्तरायणांत करावीं; आणि जीं अशुभ कर्में तीं दक्षिणायनांत करावीं. " याचा अपवाद काशीखंडांत सांगितला आहे - " काशीनिवासी लोकांना सदा कृतयुग असो, सदा उत्तरायण असो, आणि सदा महोदय पर्व असो. " याप्रमाणें अयननिर्णय जाणावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP