अथनक्तं तच्चादिनानशनपूर्वंरात्रिभोजनं तत्रप्रदोषव्यापिनीग्राह्या प्रदोषव्यापिनीग्राह्यातिथिर्नक्तव्रतेसदेतिवत्सोक्तेः प्रदोषस्तु त्रिमुहूर्तंप्रदोषः स्याद्भानावस्तंगतेसति नक्तंतत्रतुकर्तव्यमितिशास्त्रविनिश्चय इतिमदनरत्नेव्यासोक्तः तत्रापित्रिदंडोत्तरंकार्यं सायंसंध्यात्रिघटिकाअस्तादुपरिभास्वत् इतिस्कांदोक्तेर्दंडत्रयस्यसंध्यात्वात्तत्र चत्वारीमानिकर्माणिसंध्यायांपरिवर्जयेत् आहारमैथुनंनिद्रांस्वाध्यायंचचतुर्थकमितिमार्कंडेयेन भोजननिषेधात् मुहूर्तोनंदिनंनक्तंप्रवदंतिमनीषिणः नक्षत्रदर्शनान्नक्तमहंमन्येगणाधिपेतिमाधवीये भविष्योक्तेश्च ।
आतां नक्तव्रताचा निर्णय सांगतो.
नक्त म्हणजे दिवसा उपोषण करुन रात्रीं भोजन करणें तें. त्या नक्तव्रताविषयीं प्रदोषकालव्यापिनी तिथि घ्यावी. कारण, " नक्तव्रताविषयीं तिथि प्रदोषव्यापिनी सदा घ्यावी " असें वत्सवचन आहे. प्रदोषकाल - " सूर्य अस्तंगत झाल्यानंतर त्रिमुहूर्त ( सहा घटिका ) जो काल तो प्रदोष होय, त्या कालीं नक्त करावें, असा शास्त्रनिश्चय आहे. " असा मदनरत्नांत व्यासोक्त निर्णय समजावा. त्या प्रदोषकालाच्या पहिल्या तीन घटिका टाकून नंतर भोजन करावें. कारण, " सूर्यास्तानंतर तीन घटिका सायंसंध्या " ह्या स्कंदपुराणवचनावरुन तीन घटिका हा संध्याकाळ आहे; म्हणून त्या कालीं " भोजन, निद्रा, मैथुन, अध्ययन हीं चार कर्मै संध्याकाळीं वर्ज्य करावीं " ह्या मार्केडेयवचनानें भोजनाचा निषेध केला आहे. " सायंकाळीं मुहूर्तापेक्षां कमी दिवस राहिला म्हणजे तो नक्ताचा काल, असें विद्वान् सांगतात; ( शिव म्हणतो ) हे गणाधिप ! नक्षत्रदर्शनीं नक्त काल, असें मी मानितों " असें माधवाच्या ग्रंथांत भविष्यपुराण वचनही आहे.
गौडास्तु प्रदोषोस्तमयादूर्ध्वंघटिकाद्वयमिष्यत इति वत्सोक्तःप्रदोषः संध्याच दिनरात्र्योःसंधौमुहूर्तः अर्धास्तमयात्संध्याव्यक्तीभूतानतारकायावत् तेजःपरिहानिवशाद्भानोरर्धोदयंयावदितिवराहोक्तेरित्याहुः तन्न अस्यसंध्यावंदनानध्यायादिपरत्वात् अतएवतत्रखंडमंडलस्यसंध्यात्वमुक्तंविज्ञानेश्वरेण यच्चमदनरत्ने नक्तस्यवैधत्वाद्रागप्राप्तभोजनगोचरोनिषेध इत्युक्तं तन्न विधेर्निषेधाविरोधात् अन्यथाकपिंजलानित्यत्र त्रिभ्योधिकानांहिंसनंस्यात् ।
गौडग्रंथकार तर - " सूर्यास्तानंतर दोन घटिका प्रदोषकाल म्हटला आहे " असा वत्सानें सांगितलेला प्रदोष होय. संध्या म्हणजे दिवस व रात्रि यांच्या संधीचा मुहूर्त होय; कारण, " सूर्याच्या अर्धास्तानंतर जोंपर्यंत सूर्याचें तेज कमी होऊन तारका स्पष्ट दृष्तिगोचर झाल्या नाहींत तो संध्याकाल होय, उदयकालींही असाच संध्यानिर्णय आहे " असें वराहवचन आहे, असें सांगतात. तें बरोबर नाहीं; कारण, हें वाक्य संध्यावंदन, अनध्याय इत्यादिविषयक आहे. म्हणूनच खंडमंडल ( अर्धमंडल ) काल तो संध्याकाल, असें विज्ञानेश्वरानें सांगितलें आहे. आतां जें मदनरत्नांत - नक्त विधिप्राप्त असल्यामुळें त्याला हा वरील ( " आहारं मैथुनं ० " ह्या मार्कंडेयवचनोक्त ) भोजननिषेध नाहीं, तर इच्छेनें प्राप्त जें भोजन त्याला तो निषेध आहे. असें सांगितलें; तें बरोबर नाहीं; कारण, एथें निषेधकाल सोडून भोजनविधीला सार्थक्य येत असल्यामुळें विधीला ( भोजनाला ) निषेधाचा विरोध येत नाहीं, म्हणून तो निषेध विधिप्राप्त नक्ताविषयींही आहे. असें न मानिलें तर - अश्वमेघ यज्ञांत असें सांगितलें आहे कीं, वसंत देवतेला कपिंजल पक्ष्यांचें आलभन ( याग ) करावें, त्या ठिकाणीं बहुवचन असल्यामुळें तिहींपेक्षां अधिकही पक्ष्यांचें आलभन ( हिंसा ) होईल, याकरितां त्या ठिकाणीं तीन पक्ष्यांची हिंसा करुन शास्त्रार्थाची ( विधीची ) उपपत्ति झाली असतां अधिक हिंसा होईल तर दोषी होईल असें सांगितलें आहे - त्याप्रमाणें एथें निषेधकालाचें उल्लंघन करुन भोजन करावें, असा भावार्थ.
सायंकालेनक्तंतुदिनद्वयेप्रदोषास्पर्शेज्ञेयं अतथात्वेपरत्रस्यादस्तादर्वांग्यतोहिसेतिजाबालिवचनात् प्रदोषव्यापिनीनस्याद्दिवानक्तंविधीयते आत्मनोद्विगुणाछायामंदीभवतिभास्करे तन्नक्तंनक्तमित्याहुर्ननक्तंनिशिभोजनमितिस्कांदाच्च यत्यादीनामपिसायाह्ने नक्तंनिशायांकुर्वीतगृहस्थोविधिसंयुतः यतिश्चविधवाचैवकुर्यात्तत्सदिवाकरमिति तत्रैवस्मृत्यंतरात् इदमपुत्रविधुरोपलक्षणं पुत्रवतस्तुरात्रावेव अनाश्रमोप्याश्रमीस्यादपत्नीकोपिपुत्रवानितिसंग्रहोक्तेः ।
सायंकालीं नक्त करणें तें दोन दिवशीं प्रदोषकालीं तिथीचा स्पर्श नसेल तर करावें, कारण, " उभयदिनीं प्रदोषकालव्याप्ति नसेल तर परदिवशीं नक्त करावें, कारण, परदिवशीं सूर्यास्ताच्या पूर्वीं व्याप्ति आहे " असें जाबालिवचन आहे; आणि " प्रदोषव्यापिनी नसेल तर दिवसा नक्त करावें. सूर्य मंद झाला असतां आपली छाया दुप्पट झाली म्हणजे त्या वेळीं जें नक्त करणें तें नक्त होय, रात्रीं भोजन करणें तें नक्त नव्हे, असें विद्वान् सांगतात " असें स्कांदवचनही आहे. यति, विधवा यांनींही नक्तभोजन सायंकालीं ( सूर्यास्तापूर्वीं ) करावें. कारण, " विधियुक्त गृहस्थाश्रमी यानें रात्रीं नक्त करावें, यति व विधवा यांनीं नक्त सूर्य आहे तों करावें ’ असें तेथेंच स्मृत्यंतरवचन आहे. हें वचन अपुत्र जो विधुर त्याचें उपलक्षण आहे, पुत्रवंतानें रात्रींच नक्त करावें. कारण, " पत्नीरहित असून जर पुत्रवान् असेल तर तो अनाश्रमी असून आश्रमी आहे " असें संग्रहवचन आहे. अर्थात् पुत्ररहित विधुर तो अनाश्रमी होय.
सौरनक्तंतुदिवैव त्रिमुहूर्तस्पृगेवाह्निनिशिचैतावतीतिथिः तस्यांसौरंभवेन्नक्तमहन्येवतुभोजनमितिसुमंतूक्तेः ।
सौर ( सूर्यदेवताक ) नक्त तर दिवसासच करावें; कारण, दिवसा त्रिमुहूर्त ( ६ घटिका ) व रात्रीं सहा घटिका असलेल्या तिथीचे ठायीं सौरनक्त करावें, व भोजन दिवसासच करावें " असें सुमंतूचें वचन आहे.