मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
व्रतपरिभाषा

प्रथम परिच्छेद - व्रतपरिभाषा

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


अथव्रतपरिभाषा तत्राधिकारिणोमदनरत्नेभविष्ये अनग्नयस्तुयेविप्रास्तेषांश्रेयोविधीयते व्रतोपवासनियमैर्नानादानैस्तथानृप अनग्निग्रहणमुपवासविषयम्‍ अतएवदेवलः आहिताग्निरनड्वांश्च ब्रह्मचारीचतेत्रयः अश्रतएवसिध्यंतिनैषांसिद्धिरनश्नतां एकादश्यादौतुवचनाद्भवतीतिवक्ष्यामः ।

आतां व्रतपरिभाषा सांगतो.
व्रताविषयीं अधिकारी सांगतो - मदनरत्नांत - भविष्यांत " अग्निरहित जे विप्र त्यांचें कल्याण व्रतें, उपवास, नियम, नानाविध दानें यांहींकरुन होतें " ‘ अग्निरहित ’ असें जें म्हटलें तें उपवासांविषयीं अधिकार सांगण्याकरितां आहे. म्हणूनच देवल म्हणतो - " आहिताग्नि ( अग्नियुक्त ब्राह्मण ), अनड्वान्‍ ( बैल ), आणि ब्रह्मचारी हे तिघे भोजन करतील तरच कार्यसिद्धि करितील, हे उपोषण करतील तर स्वकीय कार्यसिद्धि करणार नाहींत. " एकादशी इत्यादिक जीं नित्य उपवासव्रतें त्यांचेठायीं तर शास्त्रवचन आहे म्हणून उपवास होतो, असें पुढें सांगूं.

शूद्रस्याप्यधिकारः शूद्रोवर्णश्चतुर्थोपिवर्णत्वाद्धर्ममर्हति वेदमंत्रस्वधास्वाहावषट्‍कारादिभिर्विनेतिव्यासोक्तेः प्राच्यास्तुवैश्यशूद्रयोर्द्विरात्राधिकोपवासनिषेधः वैश्याः शूद्राश्चयेमोहादुपवासंप्रकुर्वते त्रिरात्रंपंचरात्रंवातेषांव्युष्टिर्नविद्यते चतुर्थभक्तक्षपणंवैश्येशूद्रोविधीयते त्रिरात्रंतुनधर्मज्ञैर्विहितंब्रह्मवादिभिरिति हेमाद्रौवचनादित्याहुः यावदुक्तनिषेध इत्यन्ये तत्त्वंतुप्रकरणान्महातपोविषय इतियुक्तम् ।

उपवासाविषयीं शूद्रासही अधिकार आहे; कारण, " शूद्र हा चवथा वर्ण आहे म्हणून तो धर्माविषयीं अधिकारी आहे. वेदमंत्र, स्वधाकार, स्वाहाकार, वषट्‍कार यांविषयीं मात्र त्याला अधिकार नाहीं " असें व्यासवचन आहे. प्राच्य ( पूर्वेकडील ) विद्वान्‍ तर, वैश्य व शूद्र यांला दोन दिवसांपेक्षां अधिक उपोषणाचा निषेध आहे. कारण, " वैश्य, शूद्र हे अज्ञानेंकरुन तीन दिवस किंवा पांच दिवस उपवास करतील तर त्यांला उपवासफल मिळणार नाहीं. वैश्य व शूद्र यांना दोन दिवसपर्यंत उपोषण विहित होय. त्रिरात्र ( तीन दिवस ) उपवास विहित नाहीं, असें धर्मज्ञ ब्रह्मवेत्त्यांनीं सांगितलें आहे " असें हेमाद्रींत वचन आहे, असें सांगतात. इतर ग्रंथकार तर, जितक्याविषयीं निषेधवाक्य असेल तितक्याविषयीं निषेध मानावा, असें सांगतात. खरा प्रकार म्हटला तर हा ( वरील ) उपवासनिषेध प्रकरणवशेंकरुन महातपोविषयक आहे, हें योग्य होय.

एवंस्त्रीणामपि यत्तुस्कांदे नास्तिस्त्रीणांपृथग्यज्ञोनव्रतंनाप्युपोषणम्‍ भर्तृशुश्रूषयैवैतालोकानिष्टान्‍ व्रजंतिहि यद्देवेभ्योयच्चपित्रादिकेभ्यः कुर्याद्भर्ताभ्यर्चनंसत्क्रियांच तस्यार्धंवैसाफलंनान्यचित्तानारीभुंक्तेभर्तृशुश्रूषयैव आदित्यपुराणे नारीखल्वननुज्ञाताभर्त्रावापिसुतेनवा विफलंतद्भवेत्तस्यायत्करोत्यौर्ध्वदेहिकमिति और्ध्वदेहिकंपारलौकिकं तद्भर्त्रननुज्ञाविषयं भार्यापत्युर्मतेनैवव्रतादीनाचरेत्सदेतिकात्यायनोक्तेः अत्रविशेषोहरिवंशे स्नानंचकार्यंशिरसस्ततः फलमवाप्नुयात्‍ स्नात्वास्त्रीप्रातरुत्थायपतिंविज्ञापयेत्सती तथा गृहीत्वौदुंबरंपात्रंसकुशंसाक्षतंतथा गोश्रृंगंदक्षिणंसिंच्यप्रगृह्णीयाच्चतज्जलं औदुंबरंताम्रमयं ततोभर्तुःसतीदद्यात्स्नातस्यप्रयतस्यच आत्मनश्चाभिषेक्तव्यंततःशिरसितज्जलं उपवासेषुकर्तव्यमेतद्धिव्रतकेषुचेति ।

याप्रमाणें स्त्रियांसही उपोषणाविषयीं अधिकार समजावा. आतां जें स्कांदांत - " स्त्रियांला वेगळा यज्ञ, व्रत, उपवास हीं नाहीं. भर्त्याची शुश्रूषा करुनच स्त्रियांला उत्तम लोक प्राप्त होतात. भर्ता देवाच्या व पितरांच्या उद्देशानें जें पूजन, व सत्कर्म करील त्या सत्कर्माचें अर्धफल, भर्त्याची एकनिष्ठेनें सेवा करणार्‍या स्त्रियेला प्राप्त होतें. " आदित्यपुराणांत - " पतीच्या किंवा पुत्राच्या आज्ञेवांचून स्त्री जें कांहीं पारलौकिक कर्म करील तें कर्म तिचें विफल होईल. " ह्या वरील वचनावरुन स्त्रियांला उपोषणादिकांविषयीं अधिकार नाहींच असें होतें, तें भर्त्याची अनुज्ञा नसतां समजावें. कारण, " स्त्रियेनें पतीच्या संमतीनेंच सर्वदा व्रतादिक आचरण करावें " असें कात्यायनवचन आहे. व्रताविषयीं विशेष - हरिवंशांत - " स्त्रियेनें डोक्यावरुन स्नान करावें म्हणजे तिला व्रताचें फळ मिळेल. स्त्रियेनें प्रातःकाळीं उठून स्नान करुन पतीची प्रार्थना करावी " तसेंच " उदकानें भरलेलें ताम्रपात्र घेऊन त्यांत कुश, अक्षता घालून त्यानें गाईचें उजवें शिंग सिंचन करुन तेंच उदक ग्रहण करावें. नंतर त्या स्त्रियेनें स्नान केलेला नियमपर अशा भर्त्याचे मस्तकीं व आपले मस्तकीं तें उदक सिंचन करावें. उपवासरुप व्रतें, व इतर व्रतें ह्या सर्वांचे ठायीं हा विधि करावा.

सर्वव्रतेषुसंकल्पविधिश्चभारते गृहीत्वौदुंबरंपात्रंवारिपूर्णमुदड्मुखः उपवासंतुगृह्णीयाद्यद्वासंकल्पयेद्बुधः हस्तेनैवेत्यर्थः ।

सर्व व्रतांचे ठायीं संकल्पविधि - भारतांत - " ज्ञात्यानें उकदकपूर्ण असें तांब्याचें पात्र हातांत घेऊन उत्तराभिमुख होऊन उपवास ग्रहण करावा; किंवा हातांत उदक घेऊनच संकल्प करावा. "

अथव्रतारंभकालः मदनरत्नेगार्ग्यः अस्तगेचगुरौशुक्रेबालेवृद्धेमलिम्लुचे उद्यापनमुपारंभंव्रतानांनैवकारयेत् रत्नमालायां सोमसौम्यगुरुशुक्रवासराः सर्वकर्मसुभवंतिसिद्धिदाः भानुभौमशनिवासरेषुच प्रोक्तमेवखलुकर्मसिद्ध्यति तथा विरुद्धसंज्ञाइहयेचयोगास्तेषामनिष्टः खलुपादआद्यः सवैधृतिस्तुव्यतिपातनामासर्वोप्यनिष्टः परिघस्यचार्धं तिस्त्रस्तुयोगेप्रथमेसवज्रेव्याघातसंज्ञेनवपंचशूले गंडेऽतिगंडेचषडेवनाड्यः शुभेषुकार्येषुविवर्जनीयाः ।

आतां व्रताचे आरंभाचा काल सांगतो - मदनरत्नांत गार्ग्य - " गुरुशुक्रांचें अस्त, बाल्य, वार्धक्य, मलमास, यांत व्रतांचा आरंभ व उद्यापन हीं करुं नयेत. " रत्नमालेंत - " सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे सर्व कर्मांविषयीं सिद्धि देणारे होत. रवि, भौम, आणि शनि ह्या वारीं सांगितलेलें जें कर्म तेंच सिद्ध होतें. " तसेंच - " विरुद्धसंज्ञक योगांचा ( म्हणजे विष्कंभ, अतिगंड, शूल, गंड, व्याघात, वज्र ह्या योगांचा ) प्रथम पाद अनिष्ट होय. वैधृति, व्यतीपात हे सर्व अनिष्ट. परिघाचें पूर्वीचें अर्ध अनिष्ट. " पक्षांतर सांगतो - " विष्कंभाच्या घटिका ३, वज्राच्या ३, व्याघाताच्या ९, शूलाच्या ५, गंडाच्या ६, अतिगंडाच्या ६, याप्रमाणें ह्या पहिल्या घटिका सर्व शुभकार्यांविषयीं वर्ज्य कराव्या.

संग्रहे कृष्णेग्निविशयोरुर्ध्वंसप्तमीभूतयोरधः शुक्लेवेदेशयोरुर्ध्वंभद्राप्राग्वसुपूर्णयोः श्रीपतिः न सिद्धिमायातिकृतंचविष्ट्यांविषारिघातादिकमत्रसिद्धं व्यवहारसमुच्चये दशम्यामष्टम्यांप्रथमघटिकापंचकपरंहरिद्युः सप्तम्यांद्विदशघटिकांतेत्रिघटिकं तृतीयाराकायांखयमघटिकाभ्यः परभवंशुभंविष्टेः पुच्छंशिवतिथिचतुर्थ्योस्तुविरमे तत्रैव सर्पिणीतुसितेपक्षेकृष्णेचैवतुवृश्चिकी सर्पिण्यास्तुमुखंत्याज्यंवृश्चिक्याःपुच्छमेवच माधवीये विष्टिर्यदाहनितिथेरपरार्धजातापूर्वार्धजानिशितदाशुभदाचपुच्छे ब्रह्मयामले दिनभद्रायदारात्रौरात्रिभद्रायदादिवा नत्याज्याशुभकार्येषुप्राहुरेवंपुरातनाः श्रीपतिः षट् पौष्णतोद्वादशशांकराच्चपौरंदराद्भानिनवक्रमेण पूर्वार्धमध्यापरभागयुंजिचिरंतनज्योतिषिकैः स्मृतानि ।

संग्रहांत - भद्रालक्षण - " कृष्णपक्षीं तृतीया व दशमी यांच्या उत्तरार्धीं भद्रा; सप्तमी व चतुर्दशी यांचे पूर्वार्धीं भद्रा; शुक्लपक्षीं चतुर्थी व एकादशी यांचे उत्तरार्धीं भद्रा; अष्टमी, पौर्णिमा यांचे पूर्वार्धीं भद्रा " ( हिलाच विष्टि व कल्याणी हीं नामांतरें आहेत. ) श्रीपति - " भद्रेचे ठायीं केलेलें कार्य सिद्ध होत नाहीं. विषप्रयोग, शत्रुघात, इत्यादिक कर्म भद्रेवर केलेलें सिद्ध होतें. " व्यवहारसमुच्चयांत - " दशमी व अष्टमी या तिथींचे ठायीं भद्रेच्या पहिल्या पांच घटिकांनंतर पुढच्या ३ घटिका भद्रापुच्छ; एकादशी व सप्तमी या भद्रेच्या बारा घटिकांच्या पुढें तीन घटिका भद्रापुच्छ; तृतीया व पौर्णिमा ह्यांच्या भद्रेच्या वीस घटिकांच्या पुढच्या तीन घटिका भद्रापुच्छ; आणि चतुर्दशी व चतुर्थी यांच्या भद्रेच्या शेवटच्या तीन घटिका भद्रापुच्छ होय. हें भद्रापुच्छ शुभ होय. " व्यवहारसमुच्चयांत - " शुक्लपक्षांतील भद्रा सर्पिणी, कृष्णपक्षांतील भद्रा वृश्चिकी म्हटली आहे, सर्पिणीचें मुख वर्ज्य करावें, आणि वृश्चिकीचें पुच्छ टाकावें. " माधवीयांत - " जेव्हां तिथीच्या पुढच्या अर्धांतली विष्टि दिवसा असते, आणि तिथीच्या पूर्वार्धांतली विष्टि रात्रीं असते तेव्हां ती शुभकारक आहे. आणि भद्रेचें पुच्छही शुभ आहे. " ब्रह्मयामलांत - " दिवसाची ( पूर्वार्धांतली ) भद्रा जेव्हां रात्रीं असेल व रात्रींची ( उत्तरार्धांतली ) भद्रा जेव्हां दिवसा असेल, तेव्हां ती शुभकार्यांविषयीं वर्ज्य करुं नये, असें प्राचीन विद्वान्‍ सांगतात. " श्रीपति - " ( कोणत्याही कर्माविषयीं ) रेवतीपासून सहा नक्षत्रांचा पूर्वार्ध घ्यावा, आर्द्रापासून बारा नक्षत्रांचा मध्यभाग घ्यावा, आणि ज्येष्ठानक्षत्रापासून नऊ नक्षत्रांचा उत्तरार्ध घ्यावा, असें प्राचीन ज्योतिष्यांनीं सांगितलें आहे. "

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP