मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
प्रतिपदादिक तिथींचा निर्णय

प्रथम परिच्छेद - प्रतिपदादिक तिथींचा निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


अथप्रतिपदादिनिर्णयः शुक्लप्रतिपदपराह्णव्यापित्वेपूर्वाग्राह्या युग्मवाक्यात् प्रतिपत्संमुखी कार्यायाभवेंदापराह्णिकीतिस्कांदोक्तेः शुक्लास्यात्प्रतिपत्तिथिः प्रथमतश्चेत्सापराह्णेभवेदितिदीपिकोक्तेश्च अपराह्णश्चपंचधाभक्तेदिनेचतुर्थोभागः तदभावेसायाह्नव्यापिनीग्राह्या तदभावेतुसायाह्नव्यापिनीपरिगृह्यतामिति माधवोक्तेः कृष्णातुपरा कृष्णातूत्तरतोखिलेतिदीपिकोक्तेः कृष्णापिपूर्वैवेत्यनंतभट्टाः ।

आतां प्रतिपदादिक तिथींचा निर्णय सांगतो.
शुक्लप्रतिपदा ( पूजा व्रतादिकांविषयीं ) अपराह्णकालव्यापिनी असतां पूर्वा ( पूर्वतिथीनें विद्धा ) घ्यावी. कारण, प्रतिपदा व अमावास्या यांचें युग्म असें पूर्वी युग्मवाक्य सांगितलें आहे. “ जी शुक्ल प्रतिपदा अपारह्णकालव्यापिनी असेल ती करावी ” असें स्कंदपुराणवचन आहे, व “ शुक्लप्रतिपदा अपराह्णव्यापिनी असतां ती पूर्वविद्धा घ्यावी ” असें दीपिका वचनही आहे. अपराह्णकाल म्हणजे दिवसाचे पांच भाग करुन चवथा जो भाग तो. अपराह्णकालव्यापिनी नसेल तर सायंकालव्यापिनी घ्यावी. कारण, “ अपराह्णव्यापिनी नसेल तर सायंकालव्यापिनी घ्यावी ” असें माधवाचें वचन आहे. कृष्णप्रतिपदा तर परा ( द्वितीयायुक्ता ) घ्यावी. कारण, “ सर्व कृष्णपक्षप्रतिपदा उत्तरा ( परा ) घ्यावी ” असें दीपिका वचन आहे, कृष्णप्रतिपदाही पूर्वाच घ्यावी असें अनंतभट्ट म्हणतात.

सर्वतिथिषुवर्ज्यान्युक्तानिमुहूर्तदीपिकायां कूष्मांडंबृहतीफलानिलवणंवर्ज्यंतिलाम्लंतथातैलं चामलकंदिवंप्रवसताशीर्षंकपालांत्रकम् निष्पावांश्चमसूरिकान्फलमथोवृंताकसंज्ञंमधुद्यूतंस्त्रीगमनंक्रमात्प्रतिपदादिष्वेवमाषोडश शीर्षंनारिकेलम्‍ कपालंअलाबु अंत्रंपटोलकं भूपालः कूष्मांडंबृहतीक्षारंमूलकंपनसंफलम्‍ धात्रीशिरः कपालांत्रंनखचर्मतिलानिच क्षुरकर्मांगनासेवांप्रतित्प्रभृतिपत्यजेत् नखंशिंबी चर्ममसूरिका ।

प्रतिपदादि सर्वतिथींचे ठायीं क्रमानें वर्ज्य पदार्थ सांगतो - मुहूर्तदीपिकेंत - “ कूष्माण्ड ( कोहळा ), डोरली ( वांगी ), लवण, तिल, आंबटपदार्थ, तेल, आंवळा, नारळ, भोपळा, पडवळ, निष्पाव ( पावटा, पांढरा पावटा, चवळी, काळा वाल, घेवडा इत्यादिक ), मसुरा, वृंताक ( वांगें ), मध, द्यूत, स्त्रीगमन हीं क्रमेंकरुन प्रतिपदादि सोळातिथींचे ठायीं वर्ज्य करावीं. ” भूपाल - “ कोहळा, डोरली ( वांगी ), क्षार, मुळा, फणस, फळ, आंवळा, नारळ, भोपळा, पडवळ, पावटे इत्यादिक, मसूरा, तिल, क्षौर, मैथुन हीं क्रमानें प्रतिपदादि तिथींस वर्ज्य करावीं. ”

द्वितीयातुकृष्णापूर्वाशुक्लोत्तरेतिहेमाद्रिः कृष्णाद्वितीयादिमा पूर्वाह्णेयदिसासितातुपरतः सर्वेतिदीपिकोक्तेः माधवानंतभट्टमतेतुसर्वापिद्वितीयापरा तथाचमाधावः पूर्वेद्युरसतीप्रातः परेद्युस्त्रिमुहूर्तगा साद्वितीयापरोपोष्यापूर्वविद्धाततोन्यथेति ।

द्वितीयानिर्णय - कृष्णपक्षांतील द्वितीया पूर्वा ( पूर्वविद्धा ) घ्यावी, शुक्लपक्षांतील द्वितीया उत्तरा ( परविद्धा ) घ्यावी; असें हेमाद्रि म्हणतो. कारण, “ कृष्णद्वितीया जर पूर्वाह्णकालव्यापिनी असेल तर पूर्वा घ्यावी, व सर्व शुक्लद्वितीया परविद्धा घ्यावी ” असें दीपिकावचन आहे. माधव, अनंतभट्ट यांच्या मतीं तर - शुक्ल - कृष्ण पक्षांतील सर्व द्वितीया तिथि परा ( उत्तरविद्धा ) घ्यावी. तेंच माधव सांगतो - “ पूर्व दिवशीं प्रातःकालीं नसून दुसर्‍या दिवशीं त्रिमुहूर्तव्यापिनी किंवा त्रिमुहूर्ताहूनही अधिकव्यापिनी असेल तर द्वितीया उपोषणाविषयीं दुसर्‍या दिवसाची घ्यावी तशी नसेल तर पूर्वविद्धा घ्यावी. ”

तृतीयातुसर्वमतेरंभाव्यतिरिक्तापरैव तेनयुग्मवाक्यंरंभाव्रतविषयं रंभाख्यांवर्जयित्वातुतृतीयांद्विजसत्तम अन्येषुसर्वकार्येषुगणयुक्ताप्रशस्यत इतिब्रह्मवैवर्तात्‍ गौरीव्रतेतुविशेषमाहमाधवः मुहूर्तमात्रसत्त्वेपिदिनेगौरीव्रतंपरे शुद्धाधिकायामप्येवंगणयोगप्रशंसनादिति ।

तृतीयानिर्णय - सर्वमतीं तृतीया, रंभाव्रत व्यतिरिक्त करुन अन्य व्रतांविषयीं पराच घ्यावी. तेणेंकरुन, “ तृतीया द्वितीयाविद्धा घ्यावी व द्वितीया तृतीयाविद्धा घ्यावी ” असें जें युग्मवाक्य तें रंभाव्रतविषयक आहे; कारण, “ रंभाख्यतृतीया वर्ज्य करुन अन्य सर्व कार्यांविषयीं तृतीया चतुर्थीयुक्त घ्यावी ” असें ब्रह्मवैवर्तवचन आहे, गौरीव्रताविषयीं तर माधव विशेष सांगतो - “ एक मुहूर्तमात्र जरी दुसर्‍या दिवशीं तृतीया असेल तथापि तीच ( चतुर्थीयुक्त ) गौरीव्रताविषयीं घ्यावी. दिनवृद्धिवशेंकरुन पूर्वदिवशीं साठ घटिका तृतीया असून दुसर्‍या दिवशीं शेष उरलेली दोन घटिका असेल त्या वेळीं देखील चतुर्थीयुक्त असेल तीच घ्यावी; कारण, चतुर्थीयोग प्रशस्त आहे. ”

चतुर्थ्यपिसर्वमतेगणेशव्रतातिरिक्तापरैव युग्मवाक्यात् एकादशीतथाषष्ठीअमावास्याचतुर्थिका उपोष्याः परसंयुक्ताः पराः पूर्वेणसंयुताः इतिमाधवीये बृहद्वसिष्ठोक्तेश्च नागचतुर्थीतुमध्याह्नव्यापिनीपंचमीयुताचग्राह्येतिनिर्णयामृतेमाधवीयेचोक्तं युगंमध्यंदिनेयत्रतत्रोपोष्यफणीश्वरान् क्षीरेणाप्याय्यपंचम्यांपूजयेत्प्रयतोनरः विषाणितस्यनश्यंतिनतान्हिंसंतिपन्नगाइतिमाधवीयेदेवलोक्तेः युगंचतुर्थी पूर्वत्रमध्याह्नव्याप्तौपूर्वा अन्यपक्षेषुपरैव पंचम्यांपूजोक्तेः ।

चतुर्थीनिर्णय - सर्व ग्रंथांच्या मतीं चतुर्थी, गणेशव्रत वर्ज्य करुन अन्य सर्व व्रतांविषयीं पराच ( पंचमीयुक्त ) घ्यावी; कारण, चतुर्थी व पंचमी यांचें युग्म आहे. आणि “ एकादशी, षष्ठी, अमावास्या, चतुर्थी ह्या तिथि उपोषणाविषयीं उत्तरतिथीनें विद्ध घ्याव्या, व ह्यांच्या पुढच्या तिथि पूर्व तिथीनें विद्ध घ्याव्या ” असें माधवीयांत बृहद्वसिष्ठ वचनही आहे. नागचतुर्थी तर मध्याह्नव्यापिनी अशी पंचमीयुक्त घ्यावी, असें निर्णयामृतांत व माधवीयांत सांगितलें आहे; कारण, “ ज्या दिवशीं चतुर्थी मध्याह्नीं असेल त्या दिवशीं मनुष्यानें उपोषण करुन नागांना दूध पाजून पंचमीस त्यांची पूजा करावी. असें व्रत केल्यानें विषबाधा होत नाहीं व नाग त्या मनुष्यास दंश करीत नाहींत ” असें माधवीयांत देवलवचन आहे. पूर्वदिवशीं मध्याह्नकालव्यापिनी असेल तर पूर्वा घ्यावी; परदिवशीं मध्याह्नव्याप्ति, दोन दिवशीं मध्याह्नव्याप्ति, दोनही दिवशीं मध्याह्नव्याप्ति नसणें, दोनही दिवशीं सारखी अथवा कमी ज्यास्ती एकदेशव्याप्ति असेल तर पंचमीयुक्तच घ्यावी; कारण, पंचमीस पूजा करण्याविषयीं वचन आहे.

गणेशव्रतेतृतीयायुतैवचतुर्थी चतुर्थीतुतृतीयायांमहापुण्यफलप्रदा कर्तव्याव्रतिभिर्वत्सगणनाथसुतोषिणीति हेमाद्रौब्रह्मवैवर्तात्‍ माधवीयेतुगणेशव्रते मध्याह्नव्यापिनीमुख्या चतुर्थीगणनाथस्यमातृविद्धाप्रशस्यते मध्याह्नव्यापिनीचेत्स्यात्परतश्चेत्परेहनीति बृहस्पतिवचनात् प्रातःशुक्लतिलैःस्नात्वामध्याह्ने पूजयेन्नृपेतितत्कल्पेभिधानाच्च तेनपरदिनेतत्त्वेपरा अन्यथापूर्वेत्युक्तं वस्तुतस्तु यत्रभाद्रशुक्लचतुर्थ्यादौगणेशव्रतविशेषे मध्याह्नपूजोक्तातद्विषयाण्येवप्रागुक्तवचनानि नतुसार्वत्रिकाणि संकष्टचतुर्थ्यादौबहूनां कर्मकालनांबाधापत्तेः तेनसर्वत्रगणेशव्रतेपूर्वैवेतिसिद्धं संकष्टचतुर्थीतुचंद्रोदयव्यापिनीग्राह्या दिनद्वयेतत्त्वे मातृयोगस्यसत्त्वात्पूर्वेतिकेचित् अन्येतुदिनेमुहूर्तत्रयादिरुपस्यतृतीयायोगस्याभावात् परदिनेमाधवोक्तमध्याह्नव्यापिसत्त्वात्संपूर्णत्वाच्चपरेत्याचक्षते दिनद्वयेतदभावेतुपरैव गौरीव्रतेतुपूर्वैव गणेशगौरीबहुलाव्यतिरिक्ताः प्रकीर्तिताः चतुर्थ्यः पंचमीविद्धादेवतांतरयोगत इतिमदनरत्नेब्रह्मवैवर्तात् ।

गणेशव्रताविषयीं चतुर्थी, तृतीयायुक्तच घ्यावी; कारण, “ तृतीयायुक्त चतुर्थी महापुण्यफलप्रदा असून गणनाथाचा सुसंतोष करणारी आहे. यास्तव व्रती यांनीं तीच ( तृतीयायुक्त ) करावी ” असें हेमाद्रींत ब्रह्मवैवर्तवचन आहे. माधवीयांत तर गणेशव्रताविषयीं चतुर्थी मध्याह्नकालव्यापिनी मुख्य होय. कारण, गणनाथचतुर्थी पूर्वदिवशीं मध्याह्नकालव्यापिनी असेल तर तृतीयायुक्त ती प्रशस्त होय, दुसर्‍या दिवशीं मध्याह्नकालव्यापिनी असेल तर दुसर्‍या दिवसाची करावी ” असें बृहस्पति वचन आहे; आणि “ प्रातःकालीं शुक्ल तिल अंगास लावून स्नान करुन मध्याह्नकालीं पूजा करावी ” असें गणपतिकल्पांतही वचन आहे, तेणेंकरुन दुसर्‍या दिवशीं मध्याह्नकालव्याप्ति असेल तर परा करावी; दुसर्‍या दिवशीं मध्याह्नकालव्याप्ति नसतां पूर्वा करावी, असें सांगितलें आहे. वास्तविक म्हटलें तर - ज्या भाद्रपदशुक्ल चतुर्थी इत्यादि विशेष व्रताचेठायीं मध्याह्नकालीं पूजा विहित आहे तद्विषयकच पूर्वोक्त वचनें आहेत. सर्वचतुर्थीव्रतविषयक नाहींत; कारण, सर्वत्र पंचमीयुक्त घेतली तर संकष्टचतुर्थी इत्यादि व्रतांच्या बहुत कर्मकालाचा बाध होईल; यास्तव सर्वत्र ठिकाणीं गणेशव्रताविषयीं चतुर्थी पूर्वाच घ्यावी, असें सिद्ध झालें. संकष्टचतुर्थी तर चंद्रोदयव्यापिनी घ्यावी. दोन दिवशीं चंद्रोदयव्यापिनी असेल तर, तृतीयायुक्त ती प्रशस्त असल्यामुळें पूर्वा घ्यावी, असें केचित्‍ म्हणतात. इतर ग्रंथकार तर, दिवसा मुहूर्तत्रयादिरुप जो तृतीयायोग तो नसल्याकारणानें परदिवशीं माधवानें सांगितलेली मध्याह्नव्याप्ति असल्यामुळें व तिथि संपूर्ण असल्यामुळें दुसर्‍या दिवसाची घ्यावी, असें म्हणतात. दोन दिवशीं चंद्रोदयव्यापिनी नसेल तर दुसर्‍या दिवसाचीच घ्यावी. गौरीव्रताविषयीं तर पूर्वदिवसाचीच घ्यावी; कारण, “ गणेशव्रत, गौरीव्रत ( श्रावण कृष्णचतुर्थी बहुला अशी प्रसिद्ध ती ) यांवाचून अन्य व्रताविषयीं चतुर्थी पंचमीविद्धा घ्याव्या; कारण, अन्यदेवतायोग आहे ” असें मदनरत्नांत ब्रह्मवैवर्तवचन आहे.

पंचमीतुमाधवमतेसर्वांपिपूर्वा चतुर्थीसंयुताकार्यापंचमीपरयानतु दैवेकर्मणिपित्र्येचशुक्लपक्षेतथासितेतिहारीतोक्तेः हेमाद्रिमतेतुकृष्णापूर्वासितापरा कृष्णापूर्वयुतासितापरयुतास्यात्पंचमीतिदीपिकोक्तेः वस्तुतस्तुहारीतोक्तिरुपवासविषया प्रतिपत्पंचमीचैवसावित्रीभूतपूर्णिमा नवमीदशमीचैवनोपोध्याः परसंयुताइतिब्रह्मवैवर्तात् यत्तु पंचमीतुप्रकर्तव्याषष्ठ्यायुक्तातुनारदेत्यापस्तंबीयंतत्‍ स्कंदव्रतपरम् स्कंदोपवासेस्वीकार्यापंचमीपरसंयुतेतिवाक्यशेषादितिमाधवः तन्नागपूजाविषयमित्यनंतभट्टनिर्णयामृतादयः चमत्कारचिंतामणौच पंचमीनागपूजायांकार्याषष्ठीसमन्विता तस्यांतुतुषितानागाइतरासचतुर्थिकेति तेननागपूजादौपरैव यत्तुमदनरत्नदिवोदासीययोः श्रावणपंचम्यतिरिक्तापूर्वेत्युक्तं श्रावणे पंचमीशुक्लासंप्रोक्तानागपंचमी तांपरित्यज्यपंचम्यश्चतुर्थीसहिताहिताइतिसंग्रहोक्तेः गणेशस्कंदयोगाभ्यां क्रमान्नागः शुभाशुभः मित्रामित्रेतयोः पत्रेनागानामाखुबर्हिणावितिषट्‍ त्रिंशन्मताच्च श्रावणपंचम्यतिरिक्तायानागपंचम्याश्चतुर्थीयुतत्वमुक्तंतदुपवासादिविषयं पत्रेवाहने ।

पंचमीनिर्णय - माधवाच्या मतीं शुक्ल व कृष्ण या दोनही पक्षांतील पंचमी चतुर्थीविद्ध घ्यावी; कारण, “ दैवकर्म व पित्र्यकर्म या दोनही कर्मांविषयीं शुक्ल व कृष्ण पक्षांतील पंचमी तिथि चतुर्थीविद्ध घ्यावी, परतिथीनें विद्ध ( षष्ठीविद्ध ) घेऊं नये ” असें हारीताचें वचन आहे. हेमाद्रीच्या मतीं तर कृष्णपंचमी पूर्वा, आणि शुक्लपंचमी परा घ्यावी; कारण, “ कृष्णपंचमी पूर्वविद्धा व शुक्लपंचमी परविद्धा घ्यावी ” असें दीपिकावचन आहे. वास्तविक म्हटलें तर हारीतवचन उपवासविषयक आहे; कारण, “ प्रतिपदा, पंचमी, वटपूर्णिमा, नवमी, दशमी, ह्या तिथि उपवासाविषयीं परतिथीनें विद्ध घेऊं नयेत ” असें ब्रह्मवैवर्तवचन आहे. आतां जें “ हे नारद, पंचमी तिथि षष्ठीयुक्त करावी ” असें आपस्तंबवचन आहे, तें स्कंदव्रतविषयक होय; कारण, स्कंदोपवासाविषयीं पंचमी परतिथीनें युक्त घ्यावी, असा वाक्यशेष आहे, असें माधव सांगतो. आपस्तंबवचन नागपूजाविषयक होय, असें अनंतभट्ट - निर्णयामृतादिक म्हणतात.  चमत्कारचिंतामणींतही “ नागपूजेविषयीं पंचमी षष्ठीयुक्त घ्यावी; कारण, षष्ठीयुक्त पंचमीचे ठायीं नाग संतुष्ट झाले आहेत. इतर पंचमी चतुर्थीयुक्त घ्यावी ” तेणेंकरुन नागपूजा इत्यादिकांविषयीं दुसर्‍या दिवसाचीच घ्यावी. आतां जें मदनरत्नांत व दिवोदासीयांत - श्रावणपंचमीहून अन्य पंचमी पूर्वा, असें सांगितलें आहे; कारण, “ श्रावणशुक्लपंचमी ती नागपंचमी होय, ती वर्ज्य करुन इतर सर्व पंचमीतिथि चतुर्थींसहित कराव्या, त्या हितकारक होत ” ह्या संग्रहवचनावरुन; आणि “ गणेश व स्कंद यांचा योग असतां क्रमेंकरुन नाग शुभ व अशुभ होतो, गणेशाचें वाहन आखु ( उंदीर ) व स्कंदाचें वाहन मयुर आहे, ते नागांचे मित्र व शत्रु होत ” ह्या षट्‍ त्रिंशन्मत वचनावरुनही श्रावणपंचमीवांचून अन्य नागपंचमी चतुर्थीयुक्त घ्यावी, असें सांगितलें तें उपवासादिविषयक होय.

षष्ठीसर्वमतेस्कंदव्रतातिरिक्तापरैव युग्मवाक्यात् नागविद्धानकर्तव्याषष्ठीचैवकदाचनेतिस्कांदाच्च निर्णयामृते षष्ठीचसप्तमीचैववारश्चेदंशुमालिनः योगोयंपद्मकोनामसूर्यकोटिग्रहैः समः ।

षष्ठीनिर्णय - सर्वांच्या मतीं षष्ठी, स्कंदव्रत वर्ज्य करुन अन्य व्रतांविषयीं पराच घ्यावी. कारण षष्ठी व सप्तमी यांचें युग्म आहे; आणि ‘ षष्ठी तिथि पंचमीयुक्त कदापि करुं नये ” असें स्कांदवचनही आहे. निर्णयामृतांत - “ षष्ठी, सप्तमी व रविवार यांचा योग आला असतां तो पद्मकयोग होतो, हा योग कोटिसूर्यग्रहणांशीं तुल्य आहे ” असें सांगितलें आहे.

सप्तमीपूर्वैव युग्मवाक्यात् षष्ठ्यायुतासप्तमीचकर्तव्यातातसर्वदेतिस्कांदाच्च ।

सप्तमीनिर्णय -  सप्तमी षष्ठीयुक्तच करावी; कारण षष्ठी व सप्तमी यांचें युग्म आहे. ( जेव्हां पूर्व दिवशीं सूर्यास्तापर्यंत षष्ठी असल्यामुळें दिवसा षष्ठीविद्ध सप्तमी नसेल व दुसर्‍या दिवशीं अष्टमीविद्ध असेल तेव्हां अष्टमीविद्धच करावी. याप्रमाणें इतर तिथींच्या निर्णयाविषयींही समजावें. ) आणि “ सर्वदा सप्तमी षष्ठीयुक्त करावी ” असें स्कांदवचनही आहे.

अष्टमीतुसर्वमतेकृष्णापूर्वासितापरा व्रतमात्रेष्टमीकृष्णापूर्वाशुक्लाष्टमीपरेति माधवोक्तेः परयुक् शुक्लाष्टमीपूर्वयुक्‍ कृष्णेतिदीपिकोक्तेश्च शिवशक्त्युत्सवेचकृष्णाप्युत्तरा पक्षद्वयेप्युत्तरैवशिवशक्तिमहोत्सव इति माधवोक्तेः दिवोदासीयेभविष्ये यदायदासिताष्टम्यांबुधवारोभवेत्क्कचित् तदातदाहिसाग्राह्याएक भक्ताशनेनृप संध्याकालेतथाचैत्रेप्रसुप्तेचजनार्दने बुधाष्टमीनकर्तव्याहंतिपुण्यंपुरातनं अंत्यंपद्यंहेमाद्रौनधृतं ।

अष्टमीनिर्णय - सर्वांच्या मतीं कृष्णाष्टमी पूर्वा करावी; शुक्लाष्टमी परा करावी; कारण, “ सर्व व्रतांविषयीं कृष्णाष्टमी पूर्वा आणि शुक्लाष्टमी परा करावी ” असें माधव सांगतो; आणि शुक्लाष्टमी उत्तरविद्धा करावी, आणि कृष्णाष्टमी पूर्वविद्धा करावी ” असें दीपिकावचनही आहे. शिवशक्तीच्या उत्सवाविषयीं, कृष्णपक्षांतील असली तथापि दुसर्‍या दिवसाचीच अष्टमी घ्यावी; कारण, “ दोनही पक्षांतील अष्टमी शिवशक्तीच्या उत्सवाविषयीं दुसर्‍या दिवसाचीच घ्यावी ” असें माधव सांगतो. दिवोदासीयांत भविष्यांत - “ ज्या ज्या वेळीं शुक्लपक्षांतील अष्टमीचे ठायीं बुधवारयोग येईल ती ती बुधाष्टमी एकभक्तव्रताविषयीं ग्रहण करावी ” सायाह्नकालीं, चैत्रमासीं आणि चातुर्मास्यांत, बुधाष्टमी असेल ती घेऊं नये; कारण, ती पुरातन पुण्याचा नाश करिते. ” “ संध्याकाले तथा चैत्रे प्रसुप्ते च जनार्दने ॥ बुधाष्टमी न कर्तव्यां हंति पुण्यं पुरातनं ”  हा शेवटचा श्लोक हेमाद्रींत मिळत नाहीं.

नवमीतुसर्वमतेपूर्वा युग्मवाक्यात् नकुर्यान्नवमींतातदशम्यातुकदाचनेतिस्कांदाच्च ।

नवमीनिर्णय - नवमी तिथि सर्वांच्या मतीं पूर्वा ( अष्टमीविद्धा ) करावीं; कारण, अष्टमी व नवमी यांचें युग्म आहे. आणि “ नवमी दशमीयुक्त कदापि करुं नये ” असें स्कांदवचनही आहे.

दशमीतुपूर्वापरावेतिहेमाद्रिः कृष्णापूर्वोत्तराशुक्लादशम्येवंव्यवस्थितेतिमाधवः वस्तुतस्तुमुख्यानवमीयुतैवग्राह्या दशमीतुप्रकर्तव्यासदुर्गाद्विजसत्तमेत्यापस्तंबोक्तेः यत्तु संपूर्णादशमीकार्यापूर्वयापरयाथवेत्यंगिरसोक्तं तन्नवमीयुक्तालाभेऔदयिकीग्राह्येत्येवंनेयम् ।

दशमीनिर्णय - उपवासादिकांविषयीं दशमी पूर्वा ( नवमीयुक्ता ) किंवा परा ( उत्तरविद्धा ) करावी, असें हेमाद्रि म्हणतो. “ कृष्णदशमी पूर्वा आणि शुक्लदशमी उत्तरा याप्रमाणें दशमीनिर्णय समजावा ” असें माधव म्हणतो. वास्तविक म्हटलें तर - मुख्य दशमी नवमीयुक्तच घ्यावी; कारण, “ दशमी नवमीयुक्त करावी ” असें आपस्तंबवचन आहे. आतां जें “ सर्व दशमी पूर्वविद्धा किंवा परविद्धा करावी ” असें आंगिरसंवचन आहे, तें नवमीयुक्त दशमी न मिळेल तर सूर्योदयव्यापिनी घ्यावी, एतद्विषयक जाणावें.

अथैकादशी तत्रैकादश्युपवासोद्वेधा निषेधपरिपालनात्मकोव्रतरुपश्च तत्राद्यः नशंखेनपिबेत्तोयंनखादेत्कूर्मसूकरौ एकादश्यांनभुंजीतपक्षयोरुभयोरपीतिकौर्मदेवलाद्युक्तेः अग्निपुराणेपि गृहस्थोब्रह्मचारीच आहिताग्निस्तथैवच एकादश्यांनभुंजीतपक्षयोरुभयोरपीति नचात्रपर्युदासेनव्रतविधिस्तद्धेतुव्रतादिशब्दाभावात् व्रतरुपस्तुब्रह्मवैवर्ते प्राप्तेहरिदिनेसम्यग्विधायनियमंनिशि दशम्यामुपवासस्यप्रकुर्याद्वैष्णवव्रतमिति इदंचशिवभक्तादिभिरपिकार्यं वैष्णवोवाथशैवोवाकुर्यादेकादशीव्रतमितिशिवधर्मोक्तेः वैष्णवोवाथशैवोवासौरोप्येतत्समाचरेदितिसौरपुराणाच्च ।

आतां एकादशीनिर्णय - एकादशीचा उपवास दोन प्रकारचा - एक भोजननिषेधपरिपालनात्मक, व दुसरा व्रतरुप. त्यांमध्यें पहिला प्रकार - “ शंखानें उदकपान करुं नये, आणि कूर्म ( कणगरें ), सूकर ( कोन ) भक्षण करुं नयेत; व शुक्ल, कृष्ण या दोनही पक्षांतील एकादशीस भोजन करुं नये ” याप्रमाणें कुर्मपुराण व देवलादिकांनीं सांगितला आहे तो. अग्निपुराणांतही - “ गृहस्थाश्रमी, ब्रह्मचारी, व अग्निहोत्री, यांनीं शुक्ल व कृष्ण या दोनही पक्षांतील एकादशीस भोजन करुं नये. ” शंका - ‘ एकादश्यां न भुंजीत ’ ह्या वाक्यांतील ‘ न ’ चा अर्थ पर्युदास करावा. म्हणजे - सिद्धांतीं ‘ भोजन करुं नये ’ असा निषेध केला आहे; येथें ‘ भोजनविरुद्ध संकल्प करावा ’ असा पर्युदास केला असतां ह्या वचनांनीं उक्त जो उपवास तो व्रतरुपच आहे ? समाधान - तसा पर्युदास करण्याला व्रत, नियम इत्यादि शब्द किंवा दुसरें कांहींतरी प्रमाण असलें पाहिजे, तें येथें कांहीं नाहीं म्हणून पर्युदास होत नाहीं. व्रतरुप हा दुसरा प्रकार सांगतों - ब्रह्मवैवर्तोत - “ दशमीचे रात्रीं उपवासाचा नियम करुन एकादशीचे दिवशीं एकादशीव्रत यथाविधि करावें. ” हें एकादशीव्रत शैव, गाणपत्य इत्यादिकांनींहीं करावें; कारण, “ वैष्णव, अथवा शैव, या सर्वांनीं एकादशीव्रत करावें ” असें शिवधर्मवचन आहे; आणि वैष्णव अथवा शैव, सौर या सर्वांनींही हें एकादशीव्रत करावें ” असें सौरपुराणवचनही आहे.

सेपिद्वेधा नित्यः काम्यश्च उपोष्यैकादशींनित्यंपक्षयोरुभयोरपीतिगारुडोक्तेः पक्षेपक्षेचकर्तव्यमेकादश्यामुपोषणमितिनारदोक्तेश्चनित्यता यदीच्छेद्विष्णुसायुज्यंश्रियंसंततिमात्मनः एकादश्यांनभुंजीतपक्षयोरुभयोरपीतिकौर्मादिषुफलश्रुतेश्चकाम्यता ।

तो व्रतरुप उपवासही दोन प्रकारचा, नित्य व काम्य; कारण, “ दोनही पक्षांतील एकादशीस नित्य उपोषण करावें ” असें गरुडपुराणवचन आहे. आणि “ प्रत्येक पक्षाच्या एकादशीस उपोषण करावें ” असें नारदवचनही आहे, म्हणून हें नित्य आहे. विष्णूचें सायुज्य, संपत्ति, संतति हीं आपणांस प्राप्त व्हावीं अशी जर इच्छा असेल तर दोनही पक्षांच्या एकादशीस भोजन करुं नये ” अशी कूर्मादि पुराणांत फलश्रुति आहे, म्हणून हें व्रत काम्यही आहे.

उभयैकादशीव्रतंगृहस्थातिरिक्तानामेवनित्यं गृहस्थस्यतुशुक्लायामेवव्रतंनित्यंनकृष्णायाम्‍ एकादश्यांनभुंजीतपक्षयोरुभयोरपि वनस्थयतिधर्मोयंशुक्लामेवसदागृहीतिदेवलोक्तेः नचानेननिषेधपालनमेववनस्थयतिविषयेउपसंह्नियतेनतुव्रतमितिवाच्यं अस्यपर्युदासेनव्रतविधिपरत्वात् अन्यथापूर्वोक्ताग्निपुराणवचने निषेधपालनेगृहस्थस्याधिकारोक्त्याविरोधः स्यात् निषेधस्यनिवृत्तिमात्रफलत्वेनविशेषानपेक्षणादुपसंहारायोगात् अभावस्यधर्मत्वाभावाच्च तस्मादनेनसर्वेषामेकादशीव्रतविधायिनांसामान्यवाक्यानांवनस्थयतिविषयेउपसंहारान्नगृहस्थस्यकृष्णायांनित्यव्रतप्राप्तिः कथंतर्हि संक्रांत्यामुपवासंचकृष्णैकादशिवासरे चंद्रसूर्यग्रहेचैवनकुर्यात्पुत्रवान् गृहीतिनारदादिवचनेषुकृष्णानिषेधः प्राप्त्यभावादितिचेत्‍ श्रूयतां शयनीबोधिनीमध्येयाकृष्णैकादशीभवेत्‍ सैवोपोष्यागृहस्थेननान्याकृष्णाकदाचनेतिपाद्मे गृहस्थस्य आषाढीकार्तिकीमध्यस्थायाकृष्णाविहितासा पुत्रवतोनिषिध्यते अन्यकृष्णायांतुनविधिः सर्वविधीनांवनस्थयतिषूपसंहारात् ननिषेधः प्राप्त्यभावात् शयन्यादिवाक्यंत्वपुत्रगृहिगोचरमित्यनंत भट्टहेमाद्यादिग्रंथाः दीपिकापि असितातुशयनीबोधांतरस्थाप्यथोनस्यात्सात्मवतोपीति ।

शुक्ल व कृष्ण पक्षांतील दोन्ही एकादशींचें व्रत गृहस्थव्यतिरिक्तांसच नित्य आहे; गृहस्थाला तर शुक्ल एकादशीव्रत मात्र नित्य, कृष्णैएकादशीव्रत नित्य नाहीं; कारण, “ दोनही पक्षांतल्या एकादशीस भोजन करुं नये, हा वानप्रस्थ व संन्यासी यांचा धर्म आहे. गृहस्थाश्रमी यानें तर शुक्लैकादशीच करावी ” असें देवलवचन आहे. आतां पूर्वीं देवलादिवचनांनीं उक्त जो निषेधपालनरुप उपवास तो सर्वांना प्राप्त झाला असतां, हें ( वनस्थयतिधर्मो० ) देवलवचन वानप्रस्थ व संन्यासी ह्यां विषयीं त्या उपवासाचा उपसंहार ( संकोच ) करणारें आहे; व्रताचा बोध करणारें नाहीं, असें म्हणूं नये; कारण, ह्या वचनां तील ‘ न भुंजीत ’ या ठिकाणीं पर्युदास ( भोजनविरुद्ध संकल्प करावा ’ असा अर्थ ) करुन हें वचन व्रतविधिरुप उपवास बोधक आहे; असें न मानिलें तर पूर्वोक्त जें अग्निपुराणस्थ वचन त्यांत निषेधपालनाविषयीं गृहस्थाला अधिकार सांगितला आहे, त्याच्याशीं विरोध येईल ! दुसरें असें कीं, निषेधपालनाचा उपसंहार ( संकोच ) करणारें हें वचन आहे, असेंही म्हणतां येत नाहीं; कारण, निषेधानें भोजनाची निवृत्ति ( अभाव ) च केवळ होत असल्यामुळें विशेष कांहीं कर्तव्य नाहीं. म्हणून त्याचा उपसंहार ( संकोच ) करितां येत नाहीं; उपसंहार हा धर्माचा होत असतो, भोजनाभाव हा धर्म नव्हे म्हणून उपसंहार होत नाहीं. तस्मात्‍ ह्या देवलवचनानें एकादशीव्रतविधायक सामान्य सर्व वाक्यांचा वानप्रस्थ व यति ह्यांविषयीं उपसंहार ( संकोच ) होत असल्यामुळें गृहस्थाश्रम्याला कृष्णैकादशीस नित्यव्रताची प्राप्ति होत नाहीं. शंका - जर गृहस्थाश्रम्यास कृष्णै दशीव्रत नित्य नाहीं तर “ संक्रांति, कृष्णैकादशी, चंद्रसूर्यग्रहण, यांचे ठायीं पुत्रवान्‍ गृहस्थाश्रम्यानें उपवास करुं नये ” असा नारदादिवचनांत कृष्णैकादशीव्रताचा निषेध कसा केला ? कारण, जें प्राप्त नाहीं त्याचा निषेध असंभवनीय आहे असें ह्मणाल तर ऐका ! समाधान - “ शयनीपासून बोधिनीपर्यंत ज्या कृष्णैकादशी त्यांचे ठायींच गृहस्थाश्रम्यानें उपोषण करावें. इतर कृष्णैकादशीस कदापि उपोषण करुं नये ” ह्या पद्मपुराणवचनांत आषाढीकार्तिकीमध्यवर्ती ज्या कृष्णैकादशी त्यांचें उपोषण गृहस्थाला जें प्राप्त झालें त्याचा पुत्रवंत गृहस्थाला निषेध केला आहे, इतर कृष्णैकादशीस तर व्रताचा विधि नाहीं; कारण, सर्व विधींचा वानप्रस्थ व यति यांविषयीं उपसंहार केला आहे, निषेधही नाहीं; कारण, प्राप्ति असल्यावांचून निषेध होत नाहीं. शयनी इत्यादि जें वाक्य तें तर अपुत्र गृहस्थाश्रमीविषयक होय, असें अनंतभट्ट व हेमाद्रि, इत्यादि ग्रंथ सांगतात. पिकाही - “ शयनी व बोधिनी यांच्या मध्यवर्ती जी कृष्णैकादशी ती पुत्रवान्‍ गृहस्थाश्रम्यानें करुं नये ” असें म्हणते.  

मदनरत्नेभविष्ये यथाशुक्लातथाकृष्णाद्वादशीमेसदाप्रिया शुक्लागृहस्थैः कर्तव्याभोगसंतानवर्धिनी मुमुक्षुभिस्तथाकृष्णानतेतेनोपदर्शितेइति निषेधपालनंकाम्यव्रतंचसर्वकृष्णायांसर्वगृहिणांभवत्येव पुत्रवांश्चसभार्यश्चबंधुयुक्तस्तथैवच उभयोःपक्षयोःकाम्यव्रतंकुर्यात्तुवैष्णवमिति नारदोक्तेः एतच्चसर्वंकालादर्शेउक्तं विधवायावनस्थस्ययतेश्चैकादशीद्वये उपवासोगृहस्थस्यशुक्लायामेवपुत्रिणः भुजेर्निषेधः कृष्णायांसिद्धिस्तस्यततोव्रतेइति प्राच्यास्तुवैष्णवगृहस्थानांकृष्णापिनित्या नित्यंभक्तिसमायुक्तैर्नरर्विष्णुपरायणैः पक्षेपक्षेचकर्तव्यमेकादश्यामुपोषणं सपुत्रश्चसभार्यश्चसुजनोभक्तिसंयुतः एकादश्यामुपवसेत्पक्षयोरुभयोरपीतिनारदोक्तेरित्याहुः पुत्रशब्दश्चापत्यमात्रवचनः नारायणवृतौ पुमांसएवमेपुत्राजायेरन्नित्यत्रापत्यमात्रवाचित्वोक्तेः जनयद्बहुपुत्राणीतिलिंगात् पौत्रीमातामहस्तेनेतिमनूक्तेः पुत्र्याअपत्यमित्यर्थेतुस्त्रीभ्योढगितिपौत्रेय इत्यापत्तेः पुमान्पुत्रोजायतेइतिच ।

मदनरत्नांत - भविष्यांत - “ जशी शुक्लद्वादशी मला प्रिय आहे, तशी कृष्णद्वादशी सदा मला प्रिय आहे, त्यामध्यें भोग, संतति यांची वृद्धि करणारी शुक्लद्वादशी गृहस्थाश्रमी यांनीं करावी. मुमुक्षु जे त्यांनीं कृष्णा करावी. ” निषेधपालन आणि काम्यव्रत हें सर्व कृष्णैकादशीस सर्व गृहस्थाश्रम्यांना होतच आहे; कारण, “ पुत्रवान्‍, सपत्नीक, सभ्रातृक, यांनीं दोनही पक्षांचे ठायीं विष्णुदेवताक काम्यव्रत करावें ” असें नारदवचन आहे. हा सर्व प्रकार कालादर्शग्रंथांत सांगितला आहे. तो असाः - “ विधवा, वानप्रस्थ, यति यांना दोनही एकादशींस उपवास आहे. पुत्रवान्‍ गृहस्थाश्रम्याला शुक्लैकादशी सच उपवास आहे, कृष्णैकादशीस भोजननिषेध आहे, यावरुन त्याला व्रतसिद्धि होते. ” प्राच्य ( पूर्वदेशाकडील ) ग्रंथकार तर - वैष्णव गृहस्थाश्रम्याला कृष्णैकादशीही नित्य आहे; कारण, “ विष्णुपरायण ( वैष्णव ) अशा भक्तिमान्‍ पुरुषांनीं दोनही पक्षांचे ठायीं एकादशीचें उपोषण करावें; सपुत्र, सपत्नीक, सजन भक्तियुक्त अशा पुरुषानें दोनही पक्षांचे ठायीं एकादशीचें उपोषण करावें ” असें नारदवचन आहे, असें म्हणतात. वरील वचनांत ‘ पुत्र ’ शब्द आहे तो सामान्य अपत्याचा ( कन्यापुत्रांचा ) वाचक आहे; कारण, “ अगुष्ठमेव गृह्णीयाद्यदि कामयीत पुमांस एव मे पुत्रा जायेरन्‍ ” ह्या गृह्यसूत्रावरील नारायणवृत्तींत - विवाहांत पाणिग्रहणसमयीं जर वराला ‘ पुरुषरुपच पुत्र व्हावे ’ अशी इच्छा असेल तर त्यानें स्त्रियेचा अंगुष्ठ ग्रहण करावा असें सांगितलें आहे. त्या ठिकाणीं पुत्रशब्द सामान्य अपत्याचा ( कन्यापुत्रांचा ) वाचक आहे. म्हणूनच त्याला ‘ पुमांसः ’ हें विशेषण सार्थक आहे. आणि ‘ जनयद्बहुपुत्राणि ’ ह्या श्रुतींत पुत्रशब्द अपत्यवाचक आहे म्हणून नपुंसक आहे. “ पौत्री मातामहस्तेन दद्यात्पिंडं हरेद्धनम्‍ ” ह्या मनूच्या वचनाचा अर्थ - त्या कन्येच्या पुत्रानें मातामह ‘ पौत्री ’ होतो, येथें पुत्राचें ( कन्येचें ) अपत्य तो पौत्र, पौत्र आहे तो पौत्री असा अर्थ केला पाहिजे. पुत्रीचें अपत्य असा अर्थ केला तर ‘ स्त्रीभ्यो ढक्‍ ’ या पाणिनीच्या सूत्रानें अपत्यार्थी स्त्रीप्रत्ययांत शब्दाहून ढक्‍ प्रत्यय होऊन ‘ पौत्रेय ’ असें रुप होऊन, तो पौत्रेय आहे ज्यास तो मातामह ‘ पौत्रेयी ’ असें होईल. म्हणून येथें पुत्रशब्द कन्यावाचक आहे. दुसर्‍या ठिकाणींही ‘ पुरुष पुत्र होतो ’ असें आहे.  

उपवासनिषेधेविशेषोवायवीयेउक्तः उपवासनिषेधेतुभक्ष्यंकिंचित्प्रकल्पयेत् नदुष्यत्युपवासेन उपवासफलंलभेत् भक्ष्यंचतत्रैवोक्तं नक्तंहविष्यान्नमनोदनंवाफलंतिलाः क्षीरमथांबुचाज्यं यत्पंच गव्यंयदिवापिवायुः प्रशस्तमत्रोत्तरमुत्तरंचेत्यलं ।

उपवासाच्या निषेधाविषयीं विशेष सांगतो - वायुपुराणांत - “ उपवासाचा निषेध ( संक्रांति, कृष्ण एकादशी इत्य दिकांस केलेला ) असतांही कांहीं अल्प भक्ष्य योजावें, तसें केलें असतां उपवास केल्यामुळें दोष न लागतां उपवासाचें फल मिळतें. ” भक्ष्याचे प्रकार - त्याच ठिकाणीं सांगतो - “ नक्त, हविष्यान्न, अनोदन, भातावांचून इतर फल, तिल, दूध, उदक, घृत, पंचगव्य, वायु हीं एकाहून दुसरें प्रशस्त याप्रमाणें उत्तरोत्तर प्रशस्त होत. ” आतां हा विचार पुरे.

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP