मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
ग्रहणस्नानाविषयीं तीर्थैं

प्रथम परिच्छेद - ग्रहणस्नानाविषयीं तीर्थैं

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


तत्रतीर्थविशेषोभारते गंगास्नानंप्रकुर्वीतग्रहणेचंद्रसूर्ययोः महानदीषुवान्यासुस्नानंकुर्याद्यथाविधि महानदीष्वपिमासविशेषेकाश्चिच्छ्रेष्ठाः प्रयागंदेविकारेवासन्निहत्याचवारणम् सरस्वतीचंद्रभागाकौशिकीतापिका तथा सिंधुर्गंडकिकाचैवसरयूः कार्तिकादितः मूलंहेमाद्रौस्पष्टम् ।

ग्रहणस्नानाविषयीं विशेष तीर्थैं सांगतो - भारतांत - “ चंद्रसूर्यग्रहणीं गंगास्नान करावें. किंवा इतर महानदीचे ठायीं यथाविधि स्नान करावें. ” महानद्यांपैकीं कोणत्या नदींत कोणत्या मासीं स्नान करावें तें सांगतो - “ प्रयाग, देविका, रेवा, संनिहत्या, वारण, सरस्वती, चंद्रभागा, कौशिकी, तापिका, सिंधु, गंडकी, सरयू, ह्या महानदी क्रमेंकरुन कार्तिकादिक मासक्रमानें होत. त्या ग्रहणाचे ठायीं स्नानाविषयीं प्रशस्त जाणाव्या. ” याविषयींचीं मूलवचनें हेमाद्रींत स्पष्ट सांगितलीं आहेत.

व्यासः इंदोर्लक्षगुणंपुण्यंरवेर्दशगुणंततः गंगातोयेतुसंप्राप्तइंदोः कोटीरवेर्दश गवांकोटिसहस्त्रस्ययत्फलंलभतेनरः तत्फलंलभतेमर्त्योग्रहणेचंद्रसूर्ययोः असंभवेतुमाधवीयेशंखःवापीकूपतडागेषुगिरिप्रस्त्रवणेषुच नद्यांनदेदेवखातेसरसीषूद्धृतांबुनि उष्णोदकेनवास्नायाद्ग्रहणेचंद्रसूर्ययोः अत्रतारतम्यमाहमार्कंडेयः शीतमुष्णोदकात्पुण्यमपारक्यंपरोदकात्‍ भूमिष्ठमुद्धृतात्पुण्यंततःप्रस्त्रवणोदकम् ततोपिसारसंपुण्यंततः पुण्यंनदीजलम् तीर्थतोयंततः पुण्यंमहानद्यंबुपावनम् ततस्ततोपिगंगांबुपुण्यंपुण्यस्ततोंबुधिरिति उष्णोदकमातुरविषयम् तथा गोदावरीमहापुण्याचंद्रेराहुसमन्विते सूर्येचराहुणाग्रस्तेतमोभूतेमहामुने नर्मदातोयसंस्पर्शेकृतकृत्याभवंतिहि ।

व्यास - “ चंद्रग्रहणीं स्नान केलें असतां लक्षगुणित पुण्य, सूर्यग्रहणीं त्याच्या दशगुणित पुण्य, गंगोदक प्राप्त असतां चंद्रग्रहणीं कोटिगुणित, सूर्यग्रहणीं दशकोटिगुणित पुण्य प्राप्त होतें. सहस्रकोटिसंख्याक गोदानें करुन जें फल पुरुष पावतो तें फल भागीरथीच्या उदकांत चंद्रसूर्यग्रहणीं स्नान केलें असतां पावतो, ” गंगेचा असंभव असतां सांगतो - माधवीयांत - शंख - “ चंद्रसूर्यग्रहणीं वापी, कूप, तडाग, गिरिप्रस्त्रवण ( झर्‍याचें उदक ), नदी, नद, देवखात, सरोवर, काढून आणलेलें उदक, यांतून कशानेंही स्नान करावें, अथवा उष्णोदकेंकरुन स्नान करावें. ” याविषयीं तर - तमभाव सांगतो - मार्केंडेय - “ उष्णोदकाहून शीतोदक श्रेष्ठ, परकीय उदकाहून स्वकीय उदक श्रेष्ठ, बाहेर काढलेल्याहून भूमींतील श्रेष्ठ, त्याहून प्रस्त्रवणोदक श्रेष्ठ, त्याहून सरोवरांतील उदक पुण्यकारक, त्याहून नदीचें उदक पुण्यकारक, त्याहून तीर्थोदक पुण्यकारक, त्याहून महानदीचें उदक पवित्र, त्याहून गंगोदक पवित्र, त्याहून समुद्रोदक पवित्र. ” उष्णोदकस्नान रोग्याविषयीं जाणावें. “ चंद्रग्रहणीं गोदावरी महापुण्यकारक होय. सूर्य राहूनें ग्रासून तमोमय झाला असतां नर्मदोदकाच्या स्पर्शानें कृतकृत्य होतात. ”

पृथ्वीचंद्रोदयेप्रभासखंडे गावोनागास्तिलाधान्यंरत्नानिकनकंमही संप्रदायकुरुक्षेत्रेयत्फलंलभते नरः तदिंदुग्रहणेंभोधौस्नानाद्भवतिषड्गुणम् तत्रैवसौरपुराणेंबुधिस्नानमुपक्रम्य दानानियानिलोकेषुविख्यातानिमनीषिभिः तेषांफलमवाप्नोतिग्रहणेचंद्रसूर्ययोः देवीपुराणे गंगाकनखलंपुण्यंप्रयागः पुष्करंतथा कुरुक्षेत्रंमहापुण्यंराहुग्रस्तेदिवाकरे स्नानासंभवेस्मरणंवाकार्यं स्मृत्वाशतक्रतुफलंदृष्ट्वासर्वाघनाशनं स्पृष्ट्वागोमेधपुण्यंतुपीत्वासौत्रामणेर्लभेत् स्नात्वावाजिमखंपुण्यंप्राप्नुयादविचारतः रविचंद्रोपरागेचअयनेचोत्तरेतथेति मार्कंडेयोक्तेः ।

पृथ्वीचंद्रोदयांत - प्रभासखंडांत - “ कुरुक्षेत्रीं गाई, हत्ती, तिल, धान्य, रत्नें, सुवर्ण, भूमि, यांचीं दानें करुन जे फल मनुष्य पावतो त्याच्या सहापट फल, चंद्रग्रहणीं समुद्रस्नान केलें असतां पावतो. ” पृथ्वीचंद्रोदयांतच सौरपुराणीं समुद्रस्नानाचा उपक्रम करुन सांगतो - “ लोकांत ऋषींनीं जीं प्रख्यात दानें सांगितलीं, त्या सर्व दानांचें फल चंद्रसूर्यग्रहणीं समुद्रस्नान केलें असतां प्राप्त होतें. ” देवीपुराणांत - ‘‘ सूर्यग्रहणीं गंगा, कनखल तीर्थ, प्रयाग, पुष्कर, कुरुक्षेत्र, हीं महापुण्यकारक होत. ” यांच्या स्नानाचा असंभव असतां त्याचें स्मरण करावें; कारण, “ चंद्रसूर्यग्रहणीं व उत्तरायण संक्रांतीचे ठायीं यांचें स्मरण केल्यानें शतक्रतुफल, दर्शन केल्यानें सर्व पातकांचा नाश, स्पर्श केल्यानें गोमेधयज्ञाचें पुण्य, उदकपान केल्यानें सौत्रामणि यज्ञाचें फल, स्नान केल्यानें अश्वमेधाचें पुण्य प्राप्त होतें ” असें
मार्केंडेयवचन आहे.

अत्रश्राद्धमाहऋष्यश्रृंगः चंद्रसूर्यग्रहेयस्तुश्राद्धंविधिवदाचरेत् तेनैवसकलापृथ्वीदत्ताविप्रस्यवैकरे भारते सर्वस्वेनापिकर्तव्यंश्राद्धंवैराहुदर्शने अकुर्वाणस्तुनास्तिक्यात्पंकेगौरिवसीदति विष्णुः राहुदर्शनदत्तंहिश्राद्धमाचंद्रतारकम् ।

ग्रहणाचे ठायीं श्राद्ध करण्याविषयीं सांगतो - ऋष्यश्रृंग - “ जो चंद्रसूर्यग्रहणीं यथाविधि श्राद्ध करितां त्याला सर्व पृथ्वीचें दान ब्राह्मणाचे हातावर केल्यासारखें फल होतें. ” भारतांत - “ ग्रहणकालीं अवश्य श्राद्ध करावें, नास्तिकपणानें न करणारा, जशी चिखलांत गाय रुतल्यानें कष्ट पावते, तसा तो कष्ट पावतो. ” विष्णु - “ ग्रहणांत केलेलें श्राद्ध चंद्रतारका आहेत तोंपर्यंत राहातें.

इदंचामान्नेनहेम्नावाकार्यंनत्वन्नेन आपद्यनग्नौतीर्थेचचंद्रसूर्यग्रहेतथा आमश्राद्धंप्रकुर्वीतहेमश्राद्धमथापिवेति शातातपोक्तेरितिहेमाद्रिमाधवादयः ।

हें ग्रहणसंबंधी श्राद्ध आमान्नानें किंवा हिरण्यानें करावें, अन्नानें करुं नये; कारण, “ आपत्कालीं, अग्नि नसतां ( भार्या नसतां ) तीर्थाचे ठायीं, तसेंच चंद्रसूर्यग्रहणांत आमान्नानें किंवा हिरण्यानें श्राद्ध करावें. ” असें शातातपवचन आहे, असें हेमाद्रि - माधवादिक सांगतात.

अपरार्कस्तु एतद्दिजातीनांपाकाभावेद्रष्टव्यंतीर्थश्राद्धवत् पाकाभावेद्विजातीनामामश्राद्धंविधीयतेइति सुमंतूक्तेः सैंहिकेयोयदासूर्यंग्रसतेपर्वसंधिषु गजच्छायातुसाप्रोक्तातस्याश्राद्धंप्रकल्पयेत् घृतेनभोजयेद्विप्रान्घृतंभूमौसमुत्सृजेदितिवायवीयोक्तेश्चेत्याह विज्ञानेश्वरोप्याह ग्रहणश्राद्धेभोक्तुर्दोषोदातुस्त्वभ्युदय इति सूतकेमृतकेभुंक्तेगृहीतेशशिभास्करे छायायांहस्तिनश्चैवनभूयः पुरुषोभवेदित्यापस्तंबेनभोजनानिषेधाच्च अयंचनिषेधः श्राद्धभोक्तुर्हस्तिच्छायासाहचर्यात् अत्रग्रहणनिमित्तकश्राद्धेनैवामासंक्रांत्यादिनैमित्तिकानांसिद्धिः दार्शिकालभ्ययोरपीतिकालादर्शोक्तेः ।

अपरार्क तर - हें शातातपवचन, द्विजांना पाकश्राद्धाच्या अभावीं समजावें, जसें पाकाच्या अभावीं तीर्थश्राद्ध आमादिकानें करावें तद्वत्‍; कारण, “ पाकाच्या अभावीं द्विजातींना आमश्राद्ध विहित आहे. ” असें सुमंतुवचन आहे; आणि “ ज्या पर्वकालीं राहु सूर्याला ग्रस्त करितो ती गजच्छाया पर्वणी होय, त्या पर्वणीचे ठायीं श्राद्ध करावें, ब्राह्मणांस घृतयुक्त भोजन द्यावें, भूमीवर घृत पाडवावें ” असें वायुपुराणांतही वचन आहे, असें सांगतो. विज्ञानेश्वरही सांगतो - ग्रहणश्राद्धीं भोजन करणार्‍या ब्राह्मणांस दोष, व श्राद्धकर्त्यास पुण्य होतें. आणि “ जननाशौच, मृताशौच, चंद्रसूर्यग्रहण, गजच्छाया, यांचे ठायीं भोजन करणारा पुनः पुरुष होत नाहीं ” असा आपस्तंबानेंही भोजननिषेध केला आहे. हा निषेध श्राद्धभोक्त्यास आहे; कारण, वचनांत गजच्छाया बरोबर सांगितली आहे. येथें ग्रहणनिमित्तक श्राद्ध केल्यानेंच दर्श, संक्रांति इत्यादिक नैमित्तिक श्राद्धांची सिद्धि होते; कारण, “ दर्शश्राद्ध व अलभ्ययोगप्रयुक्त श्राद्ध हीं दोन एकदिवशीं प्राप्त असतां अलभ्ययोगप्रयुक्त श्राद्ध केल्यानें दर्शश्राद्धाची सिद्धि होते ” असें कालादर्शांत वचन आहे. “

अत्राशौचमध्येपिस्नानश्राद्धादिकार्यमेव सूतकेमृतकेचैवनदोषोराहुदर्शने तावदेवभवेच्छुद्धिर्यावन्मुक्तिर्नदृश्यत इतिमाधवीयेवृद्धवसिष्ठोक्तेः स्मार्तकर्मपरित्यागोराहोरन्यत्रसूतक इतिव्याघ्रपादोक्तेश्च कालादर्शेअंगिराः सर्वेवर्णाः सूतकेपिमृतकेराहुदर्शने स्नात्वाश्राद्धंप्रकुर्वीरन् दानंशाठ्यविवर्जितम् मदनपारिजातेप्येवम् तेन स्नानमात्रंप्रकुर्वीतदानश्राद्धविवर्जितमितिनिर्मूलंवदंतोगौडाः परास्ताः इयंचशुद्धिरविशेषात् मंत्रदीक्षापुरश्चरणादिसर्वस्मार्तकर्मविषया मदनरत्नेप्येवम् ।

येथें ( ग्रहणांत ) आशौचामध्येंही स्नान, श्राद्ध इत्यादि करावें; कारण, “ ग्रहणांत जरी मृताशौच किंवा जननाशौच असलें तथापि दोष नाहीं. मुक्तिपर्यंत शुद्धता आहे ” असें माधवीयांत वृद्धवसिष्ठवचन आहे; आणि सूतकांत स्मार्तकर्माचा जो निषेध आहे तो ग्रहण नसेल त्या वेळीं समजावा. ” असें व्याघ्रपादवचनही आहे. कालादर्शांत अंगिरा - “ मृताशौच, जननाशौच असतांही सर्व वर्णांनीं ग्रहणांत स्नान करुन श्राद्ध करावें, व कार्पण्य सोडून दान करावें. ” मदनपारिजातांतही असेंच सांगितलें आहे. यावरुन, “ आशौचांत ग्रहणसमयीं स्नान मात्र करावें, दान व श्राद्ध करुं नये ” हें वचन निर्मूल असल्यामुळें स्नानही करुं नये असें म्हणणारे गौड खंडित झाले. ही शुद्धि सामान्यतः सांगितली असल्यामुळें मंत्रदीक्षा, पुरश्चरण इत्यादि सर्व स्मार्तकर्मांविषयीं जाणावी. मदनरत्नांतही असेंच आहे.

रजस्वलायास्तुभार्गवार्चनदीपिकायाम् सूर्योदयनिबंधे नसूतकादिदोषोस्तिग्रहेहोमजपादिषु ग्रस्तेस्नायादुदक्यापितीर्थादुद्धृतवारिणेति अत्रच स्नानेनैमित्तिकेप्राप्तेनारीयदिरजस्वला पात्रांतरिततोयेन स्नानंकृत्वाव्रतंचरेदित्यादिर्मिताक्षरोक्तोविधिर्ज्ञेयः ।

रजस्वलास्त्रीविषयीं तर भार्गवार्चनदीपिकेंत सूर्योदयनिबंधांत - “ ग्रहणांत होम, जप, इत्यादि करण्याविषयीं सूतकादि दोष नाहीं; रजस्वलास्त्रियेनेंही ग्रहण लागल्यानंतर तीर्थांतून पात्रांत उदक घेऊन स्नान करावें. ” ह्या स्थलीं “ स्त्री रजस्वला असून नैमित्तिक स्नान प्राप्त होईल तर भांड्यांत उदक घेऊन स्नान करुन व्रत करावें ” इत्यादिक, मिताक्षरेंत सांगितलेला विधि जाणावा.

तथाग्रहणेरात्रावपिश्राद्धादिकार्यम् ग्रहणोद्वाहसंक्रांतियात्रार्तिप्रसवेषुच दानंनैमित्तिकंज्ञेयंरात्रावपितदिष्यत इत्यपरार्केव्यासोक्तेः चंद्रग्रहेतथारात्रौस्नानंदानंप्रशस्यत इतिदेवलोक्तेश्च यदातुज्योतिः शास्त्रगम्योदिनेचंद्रग्रहोरात्रौचसूर्यग्रहस्तदास्नानादिनकार्यं सूर्यग्रहोयदारात्रौदिवाचंद्रग्रहस्तथा तत्रस्नानंनकुर्वीतदद्याद्दानंनचक्कचिदिति षट्‍त्रिंशन्मतात् ।

तसेंच ग्रहणांत रात्रींही श्राद्धादिक करावें; कारण, “ ग्रहण, विवाह, संक्रांति, यात्रा, आर्ति ( संकटप्रसंग ), व पुत्रजनन यांतून कोणतेंही निमित्त प्राप्त असतां तन्निमित्तक दान रात्रींही करावें ” असें अपरार्कांत व्यासवचन आहे; आणि “ चंद्रग्रहणांत रात्रींही स्नान व दान प्रशस्त होय ” असें देवलवचनही आहे. जेव्हां दिवसा चंद्रग्रहण आहे व रात्रौ सूर्यग्रहण आहे, हें केवळ ज्योतिःशास्त्रावरुन मात्र समजतें तेव्हां स्नानादिक करुं नये; कारण, “ जेव्हां रात्रीं सूर्यग्रहण व दिवसा चंद्रग्रहण असेल तेव्हां तन्निमित्तक स्नान व दान हें कधींही करुं नये ” असें षट्‍ त्रिंशन्मतवचन आहे.

ग्रहणदिनेवार्षिकश्राद्धप्राप्तौतुप्रयोगपारिजातेगोभिलः दर्शेरविग्रहेपित्रोःप्रत्याब्दिकमुपस्थितम् अन्नेनासंभवेहेम्नाकुर्यादामेनवासुत इति अत्रदर्शरविपितृसुतशब्दाः प्रदर्शनार्थाः न्यायसाम्यात् तेनचंद्रग्रहेपि सपिंडादिवार्षिकमन्नादिनातद्दिनएवकार्यमितिमदनपारिजातेव्याख्यातम् पृथ्वीचंद्रोदयेप्येवम् तेनयानि आमश्राद्धंप्रकुर्वीतमाससंवत्सरादृत इति अन्नेनैवाब्दिकंकुर्याद्धेम्नावामेननक्कचिदितिमरीचिलौगाक्ष्यादिवचनानि तानिग्रहणदिनातिरिक्तविषयाणि निर्णयामृतेप्येवम् ।

ग्रहणदिवशीं वार्षिक श्राद्ध प्राप्त असेल तर प्रयोगपारिजातांत गोभिल - “ अमावास्येस सूर्यग्रहण असून त्या दिवशीं मातापितरांचें प्रतिसांवत्सरिक श्राद्ध प्राप्त होईल तर पुत्रानें तें श्राद्ध अन्नानें करावें; अन्नाच्या असंभवीं आमान्नानें किंवा हिरण्यानें करावें. ” ह्या वाक्यांत अमावास्या, सूर्यग्रहण, मातापितर, पुत्र हे जे शब्द आहेत ते प्रदर्शनार्थ आहेत; कारण, इतर श्राद्धाविषयींही तोच न्याय आहे. म्हणून पौर्णिमेस चंद्रग्रहण असतांही सपिंडादिकांचें वार्षिक श्राद्ध प्राप्त असतां तें अन्नादिकानें त्याच दिवशीं करावें, असें मदनपारिजातांत ह्या वचनाचें व्याख्यान केलें आहे. पृथ्वीचंद्रोदयांतही असेंच आहे. यावरुन जीं “ मासिक, सांवत्सरिक यांवांचून इतर श्राद्धें आमान्नानें करावीं ” “ सांवत्सरिक श्राद्ध पक्कान्नानेंच करावें, हिरण्यानें किंवा आमान्नानें कदापि करुं नये ” अशीं मरीचि, लौगाक्षि इत्यादिकांचीं वचनें तीं ग्रहणदिवसातिरिक्तविषयक होत. निर्णयामृतांतही असेंच आहे.

यानितु ग्रहणात्तुद्वितीयेऽह्निरजोदोषात्तुपंचमे तथा ग्रस्तोदयेयदाचंद्रेप्रत्यब्दंसमुपस्थितं तद्दिनेचोपवासः स्यात्‍ प्रत्यब्दंतुपरेहनि तथा ग्रस्तावेवास्तमानंतुरवींदूप्राप्नुतोयदि प्रत्यब्दंतुतदाकार्यंपरेहन्येवसर्वदा चंद्रसूर्योपरागेचतथाश्राद्धंपरेहनीत्यादीनिवचनानितानि महानिबंधेषुक्काप्यनुपलंभान्निर्मूलानि प्रत्युतपूर्वोक्तनिबंधेषुतद्दिनएवश्राद्धमुक्तमित्यलम् ।

आतां जी “ ग्रहण असतां दुसर्‍या दिवशीं, स्त्री रजस्वला असतां पांचव्या दिवशीं श्राद्ध करावें ” तसेंच - “ चंद्र ग्रस्त सून उदय होईल आणि त्या दिवशीं प्रतिसांवत्सरिक श्राद्ध प्राप्त असेल तर त्या दिवशीं उपवास करुन दुसर्‍या दिवशीं सांवत्सरिक श्राद्ध करावें. ” तसेंच “ जेव्हां सूर्य व चंद्र हे ग्रस्त असून अस्तंगत होतील त्या दिवशीं प्राप्त झालेलें सांवत्सरिक श्राद्ध सर्वदा दुसर्‍या दिवशीं करावें, ” “ चंद्रसूर्यांला ग्रहण असतां श्राद्ध दुसर्‍या दिवशीं करावें ” इत्यादिक वचनें, तीं मोठ्या निबंधग्रंथांत कोठें मिळत नसल्यामुळें तीं निर्मूल होत. याच्या उलट पूर्वोक्त ( मदनपारिजात, पृथ्वीचंद्रोदय, निर्णयामृत इत्यादि ) निबंधांत ग्रहणदिवशींच श्राद्ध करावें असें सांगितलें आहे. इतका निर्णय पुरे आहे.

ग्रहणादिसप्तदिनपर्यंतंरामगोपालाद्यागमदीक्षोक्ताशिवार्चनचंद्रिकायांज्ञानार्णवे मंत्राद्यारंभणं कुर्याद्गहणेचंद्रसूर्ययोः ग्रहणाद्वापिदेवेशिकालः सप्तदिनावधीति रत्नसागरे सत्तीर्थेऽर्कविधुग्रासेतंतुदामनपर्वणि मंत्रदीक्षांप्रकुर्वाणोमासर्क्षादीन्नशोधयेत् अत्रसूर्यग्रहणमेवमुख्यम् सूर्यग्रहणकालेतुनान्यदन्वेषितंभवेत् सूर्यग्रहणकालेनसमोनान्यः कदाचन नमासतिथिवारादिशोधनंसूर्यपर्वणीतितत्रैवकालोत्तरवचनात् चंद्रग्रहेतुयादीक्षायादीक्षाव्रतचारिणाम् वनस्थस्यचयादीक्षादारिद्यंसप्तजन्मस्वितितत्रैवयोगिनीतंत्रेनिषेधाच्च ।

मंत्रदीक्षा - ग्रहणदिवसापासून सात दिवसपर्यंत राम, गोपाल इत्यादिकांचे आगममंत्राची दीक्षा सांगतो - शिवार्चनचंद्रिकेंत - ज्ञानार्णवांत - “ हे देवेशि ! चंद्रसूर्यांचे ग्रहणकालीं मंत्रादि आरंभ करावा, अथवा ग्रहणदिवसापासून सात दिवसपर्यंत आरंभाचा काल समजावा. ” रत्नसागरांत - “ उत्तमतीर्थ, चंद्रसूर्यग्रहण, तंतुदामनपर्व, यांचे ठायीं मंत्राची दीक्षा ( उपदेश ) घेणें असतां मास, नक्षत्र इत्यादिक शोधूं नयेत. ” मंत्रदीक्षेविषयीं सूर्यग्रहणच मुख्य होय; कारण, “ सूर्यग्रहणकालीं दुसरें कांहीं पाहूं नये; कारण, सूर्यग्रहणकालासारखा दुसरा काल नाहीं. सूर्यग्रहणपर्व असतां मास, तिथि, वार इत्यादिकांचे शुद्धीची अपेक्षा नाहीं ” असें तेथेंच कालोत्तरवचन आहे; आणि “ चंद्रग्रहणीं घेतलेली दीक्षा, व्रतस्थाची घेतलेली दीक्षा, वानप्रस्थाची घेतलेली दीक्षा, यांपासून सात जन्म दरिद्र प्राप्त होतें ” असा तेथेंच योगिनीतंत्रांत चंद्रग्रहणीं दीक्षेचा निषेधही केला आहे.
===================

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP