सर्वासुसंक्रांतिषुदानविशेषोहेमाद्रौदानकांडेउक्तः विश्वामित्रः मेषसंक्रमणेभानोर्मेषदानंमहाफलं वृषसंक्रमणेदानंगवांप्रोक्तंतथैवच वस्त्रान्नपानदानानिमिथुनेविहितानितु घृतधेनुप्रदानंचकर्कटेपिविशिष्यते ससुवर्णंछत्रदानंसिंहेपिविहितंसदा कन्याप्रवेशेवस्त्राणांवेश्मनांदानमेवच तुलाप्रवेशेतिलानांगोरसानामपीष्टदं अन्नकीचलितेभानौदीपदानंमहाफलं अन्नकीवृश्चिकः धनुः प्रवेशेवस्त्राणांयानानांचमहाफलं झषप्रवेशेदारुणांदानमग्नेस्तथैवच कुंभप्रवेशेदानंतुगवामंबुतृणस्यच मीनप्रवेशेस्थानानांमालानामपिचोत्तममिति ।
यानंतर मेषादिसंक्रांतींचे ठायीं दानें सांगतो.
हेमाद्रींत-दानकांडांत-विश्वामित्र-मेषसंक्रांतीचे ठायीं भानूच्या मेंढ्याचें दान करावें. वृषभसंक्रांतीचे ठायीं गोप्रदान सांगितलें आहे. मिथुनसंक्रांतीचे ठायीं वस्त्र, अन्न, पान इत्यादि दानें सांगितलीं आहेत. कर्कसंक्रांतीचे ठायीं घृतधेनूचें दान; सिंहसंक्रांतीचे ठायीं सुवर्ण व छत्र यांचें दान सदा विहित आहे. कन्यासंक्रांतीचे ठायीं वस्त्र, गृह यांचें दान; तुलासंक्रांतीचे ठायीं तिल, गोरस यांचें दान; वृश्चिकसंक्रांतीचे ठायीं दीपदान महाफल देणारें आहे. धनुःसंक्रांतीचे ठायीं वस्त्रें व वाहनें यांचें दान महाफल देणारें आहे. मकरसंक्रांतीचे ठायीं काष्ठें, अग्नि यांचें दान करावें. कुंभसंक्रांतीचे ठायीं गाई, उदक, तृण यांचें दान विहित आहे. मीनसंक्रांतीचे ठायीं राहण्याचीं स्थानें, पुष्पमाला यांचें दान उत्तम आहे.
अत्रोपवासमाहहेमाद्रावापस्तंबः अयनेविषुवेचैवत्रिरात्रोपोषितोनरः स्नात्वायस्त्वर्चयेद्भानुंसर्वकामफलंलभेत् अशक्तौतुवृद्धवसिष्ठः अयनेसंक्रमेचैवग्रहणेचंद्रसूर्ययोः अहोरात्रोषितःस्नात्वासर्वपापैःप्रमुच्यते अत्रोपवासःसंक्रमदिने दानादितुपुण्यकालदिन इत्याचार्यचूडामणिः विधिलाघवात् पुण्यकालदिनएवोभयमितिवृद्धाः इदंचपुत्रिगृहस्थातिरिक्तविषयं आदित्येहनिसंक्रांतौग्रहणेचंद्रसूर्ययोः उपवासोनकर्तव्यः पुत्रिणागृहिणातथेतिजैमिनिवचनात् ।
संक्रांतीचे ठायीं उपोषण सांगतो-हेमाद्रींत-आपस्तंब-" अयन ( कर्क व मकर ) संक्रांति आणि विषुव ( मेष, तुला ) संक्रांति यांचे ठायीं जो मनुष्य त्रिरात्र उपोषण करुन स्नान करुन सूर्याची पूजा करील त्याला सर्व कामफल प्राप्त होईल. " त्रिरात्र उपोषणाविषयीं शक्ति नसेल तर -वृद्धवसिष्ठ म्हणतो - " अयनसंक्रांति आणि चंद्रसूर्यांचें ग्रहण यांचे ठायीं अहोरात्र उपोषण करुन स्नान करावें, म्हणजे सर्व पापांपासून मुक्त होतो. " संक्रांतिनिमित्तानें उपवास करणें तो संक्रांतिदिवशीं करावा, आणि दानादिक करणें तीं पुण्यकालदिवशीं करावीं, असें आचार्यचूडामणि सांगतो. दोघांचा मिळून एक विधि केला असतां लाघव येतें, म्हणून पुण्यकालदिवशींच उपोषण व दानादिक करावें असें वृद्ध सांगतात. हें उपोषण पुत्रवान् गृहस्थाश्रमी यानें करुं नये; इतरांनीं करावें. कारण, " रविवार, संक्रांति, चंद्रसूर्यग्रहण, यांचे ठायीं पुत्रवान् गृहस्थाश्रम्यानें उपोषण करुं नये " असें जैमिनीचें वचन आहे.
अत्रश्राद्धमुक्तंहेमाद्रौविष्णुधर्मे श्राद्धंसंक्रमणेभानोः प्रशस्तंपृथिवीपते अपरार्केपिविष्णुः आदित्यसंक्रमणंविशेषेणायनद्वयंजन्मभमभ्युदयश्च एतांस्तुश्राद्धकालान्वैकाम्यानाहप्रजापतिरिति द्वादशादिदिनैरर्वागयनांशप्रवृत्तावपिपुण्यंवक्तुमयनग्रहणम् अन्यथासंक्रमेणसिद्धेरयनग्रहणंव्यर्थंस्यादित्यपरार्कः हेमाद्रावपिगालवः अयनांशकतुल्येनकालेनैवस्फुटंभवेत् मृगकर्कादिगेसूर्येयाम्योदगयनेसति तदासंक्रांतिकालेस्युरुक्ताविष्णुपदादयइति अयनांशच्युतिरुपेसंक्रांतिकालेपिविष्णुपदादयः प्रवर्तंते तेनतत्प्रयुक्तंपुण्यकालादितत्रापिज्ञेयमितिसएवव्याचख्यौ तच्चमेषायनंवृषायनमित्यादिसर्वत्रज्ञेयं माधवीयेपिजाबालिः संक्रांतिषुयथाकालस्तदीयेप्ययनेतथा अयनेविंशतिः पूर्वामकरे विंशतिः परेति मकरायणेपूर्वा विंशतिघटिकाःपुण्याः मकरसंक्रांतौतुपश्चाद्विंशतिपुण्याः अन्यत्रायनेतत्संक्रांतिवदित्यर्थः ।
संक्रांतीचे ठायीं श्राद्ध करावें, असें सांगितलें आहे. हेमाद्रींत-विष्णुधर्मात- " सूर्यसंक्रांतीचेठायीं श्राद्ध करणें प्रशस्त होय. " अपरार्कातही -विष्णु म्हणतो - " सूर्यसंक्रमण, विशेषेंकरुन दोन अयनें, जन्मनक्षत्र, अभ्युदय ( मांगलिक कर्म ) हे श्राद्धकाल काम्य ( मनोरथ पूर्ण करणारे ) होत असें प्रजापति सांगतो. " संक्रांतिप्रवेशापेक्षां बारा इत्यादि दिवस पूर्वी अयनांशप्रवृत्ति झाली असतांही त्या अयनांशप्रवृत्तीचे ठायीं पुण्य सांगण्यासाठीं वरील वचनांत अयनशब्दाचें ग्रहण केलें आहे. असें नसेल तर संक्रमशब्दानेंच संक्रांतीचें ग्रहण झालें असतां अयनग्रहण व्यर्थ होईल, असें अपरार्क सांगतो. हेमाद्रींतही-गालव म्हणतो - मृग म्हणजे मकर राशीच्या आद्यक्षणीं व कर्क राशीच्या आद्यक्षणीं सूर्य गेला असतां जें उत्तरायण व दक्षिणायन होतें, त्यांत अयनांश वजा केले म्हणजे तें उत्तरायण व दक्षिणायन स्पष्ट होतें, त्या स्पष्ट केलेल्या अयनसंक्रांतीलाही ( जे अयनांश असतील ते भोगण्याच्या पूर्वी अयनसंक्रांति होते, तेथें देखील ) ( संक्रांतीस असलेल्या ) विष्णुपदादिक संज्ञा प्रवृत्त होतात, त्या विष्णुपदादिक संज्ञा असल्यामुळें जें पुण्यकालादि तें तेथेंही जाणावें, अशी " अयनांशक० " ह्या वचनाची व्याख्या त्यानेंच ( हेमाद्रीनेंच ) केली आहे. तीं अयनें मेषायन, वृषायन, इत्यादि सर्व जाणावीं. माधवीयांतही-जाबालि म्हणतो - " जसा संक्रांतीचे ठायीं पुण्यकाळ तसाच संक्रांतीच्या अयनकालींही पुण्यकाळ जाणावा. मकरायणाचेठायीं पूर्वीच्या वीस घटिका पुण्यकाळ. आणि मकर संक्रांतीच्या पुढच्या वीस घटिका पुण्यकाळ इतका विशेष. इतर अयन पर्वकाल घटिका त्या त्या संक्रांतीप्रमाणें जाणाव्या.