मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
ग्रहणाचा निर्णय

प्रथम परिच्छेद - ग्रहणाचा निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अथग्रहणंनिर्णीयते तत्रचंद्रग्रहणेयस्मिन्‍ यामेग्रहणंतस्मात्पूर्वंप्रहरत्रयंनभुंजीत सूर्यग्रहेतुप्रहरचतुष्टयंनभुंजीत सूर्यग्रहेतुनाश्नीयात्पूर्वंयामचतुष्ट्यं चंद्रग्रहेतुयामांस्त्रीन्बालवृद्धातुरैर्विनेति माधवीयेवृद्धगौतमोक्तेः ग्रहणंतुभवेदिंदोः प्रथमादधियामतः भुंजीतावर्तनात्पूर्वंप्रथमेप्रथमादध इतिमार्कंडेयोक्तेश्च अधिऊर्ध्वं ननुचंद्रग्रहेयामचतुष्टयनिषेध उचितोनतुसूर्यग्रहेसूर्योदयात्प्राक्‍ भोजनप्राप्तेः मैवं वचनस्यप्रथमयामेसूर्यग्रहेसतिपूर्वेद्युः पूर्वरात्रेभोजननिषेधपरत्वात्‍ चंद्रग्रहे विशेषमाह माधवीयेवृद्धवसिष्ठः ग्रस्तोदयेविधोः पूर्वंनाहर्भोजनमाचरेदिति ।

यानंतर ग्रहणाचा निर्णय सांगतो.
चंद्रग्रहण असेल तर ज्या प्रहरीं ग्रहण लागतें त्या प्रहरापासून पूर्वी तीन प्रहर भोजन करुं नये. सूर्यग्रहण असेल तर ज्या प्रहरीं ग्रहण, त्यापासून पूर्वी चार प्रहर भोजन करुं नये; कारण, “ सूर्यग्रहणीं पूर्वी चार प्रहर भोजन करुं नये, व चंद्रग्रहणीं पूर्वी तीन प्रहर भोजन करुं नये, व हा निषेध बाल, वृद्ध, रोगी एतव्द्यतिरिक्त जाणावा ” असें माधवीयांत वृद्धगौतमवचन आहे. “ रात्रीं पहिल्या प्रहरानंतर चंद्रग्रहण असेल तर मध्याह्नाच्या पूर्वीं भोजन करावें, आणि रात्रीच्या प्रथम प्रहरीं चंद्रग्रहण असतां दिवसाच्या प्रथम प्रहराच्या आंत भोजन करावें ” असें मार्केडेयवचनही आहे. शंका चार प्रहरपर्यंत भोजनाचा जो निषेध तो चंद्रग्रहणीं योग्य आहे, सूर्यग्रहणीं चार प्रहर भोजननिषेध योग्य नाहीं, कारण, सूर्योदयाचे पूर्वी भोजनाची प्राप्ति नाहीं. समाधान - दिवसाच्या प्रथम प्रहरीं सूर्यग्रहण असेल तर पूर्व दिवशीं पूर्व रात्रीं भोजनाचा निषेध करणारें तें वचन आहे. चंद्रग्रहणाविषयीं विशेष सांगतो - माधवीयांत - वृद्धवसिष्ठ - “ ग्रहण लागून चंद्राचा उदय होईल तर चार प्रहर दिवसा भोजन करुं नये. ”

द्वयोर्ग्रस्तास्तेतुमाधवीयेव्यासः अमुक्तयोरस्तगयोरद्याद्दृष्ट्वापरेहनीति विष्णुधर्मेपि अहोरात्रंनभोक्तव्यंचंद्रसूर्यग्रहोयदा मुक्तिंदृष्ट्वातुभोक्तव्यंस्नानंकृत्वाततः परं अहोरात्रनिषेधः सूर्यग्रस्तास्ते मदनरत्नेगार्ग्यः संध्याकालेयदाराहुर्ग्रसतेशशिभास्करौ तदहर्नैवभुंजीतरात्रावपिकदाचन सायंसंध्यायांसूर्यग्रस्तास्ते पूर्वेह्निरात्रौचनभोक्तव्यं प्रातःसंध्यायांचंद्रस्यग्रस्तास्तेपूर्वरात्रावुत्तरेह्निचनभोक्तव्यमित्यर्थः चंद्रग्रस्तास्तेउत्तरदिनेसंध्याहोमादौनदोषः तदाहोशनाः ग्रस्तेचास्तंगतेत्विंदौज्ञात्वामुक्त्यवधारणं स्नानहोमादिकंकार्यंभुंजीतेंदूदयेपुनः एतदनाहिताग्निविषयं अपराह्णेव्रतोपायनीयमश्नीतेतिकात्यायनोक्तेर्व्रतस्यश्रौतत्वेनविहितत्वेनचप्रबलत्वात्‍ अद्भिर्व्रतंकुर्यादितिनिर्णयदीपः रागप्राप्तभोजनेकालनियमोयं तेनज्वरादाविवनभोजनमिति कर्कानुसारिणः ।

चंद्र व सूर्य यांचें ग्रस्तास्त होईल तर माधवीयांत - व्यास - सांगतो - “ ग्रहणाचा मोक्ष झाल्यावांचून चंद्र व सूर्य अस्त पावतील तर दुसर्‍या दिवशीं शुद्ध बिंब पाहून भोजन करावें. ” विष्णुधर्मांतही - चंद्रसूर्यग्रहण असतां अहोरात्र भोजन करुं नये, तर मोक्ष झालेला पाहून नंतर स्नान करुन भोजन करावें. ” अहोरात्रीं भोजनाचा निषेध सूर्याचें ग्रस्तास्त असतां समजावा. मदनरत्नांत - गार्ग्य - “ ज्या दिवशीं संध्याकालीं सूर्याला किंवा चंद्राला राहु ग्राशील त्या दिवशीं व त्या रात्रींही कदापि भोजन करुं नये. ” या वचनाचा अर्थ - सायंसंध्याकालीं सूर्याचें ग्रस्तास्त झालें असतां त्या दिवशीं व त्या रात्रीं भोजन करुं नये; प्रातःसंध्याकालीं चंद्राचें ग्रस्तास्त झालें असतां पूर्व रात्रीं व उत्तर दिवशीं भोजन करुं नये, असा समजावा. चंद्राचें ग्रस्तास्त झालें असतां दुसर्‍या दिवशीं संध्यावंदन, होम इत्यादि कर्माविषयीं दोष नाहीं. तेंच उशना सांगतो - “ चंद्रग्रस्त असून अस्तंगत होईल तर मुक्तिनिश्चय शास्त्रावरुन जाणून स्नानहोमादिक करावें, आणि भोजन उदयोत्तर करावें. ” हें वचन अनाहिताग्निविषयक होय. कारण, “ व्रती यांनीं अपराह्णकालीं व्रतोपायनीय ( व्रतविहित पदार्थ ) भक्षण करावे ” असें कात्यायनवचन आहे, यास्तव व्रत हें श्रौतकर्म व विहित असल्यामुळें प्रबल आहे. उदक प्राशन करुन व्रत करावें, असें निर्णयदीप सांगतो. रागप्राप्त भोजनाविषयीं हा कालनियम सांगितला, यावरुन ज्वरादिक अवस्थेंत जसा भोजननिषेध तद्वत्‍ हा निषेध असें कर्कानुसारी म्हणतात.

बालवृद्धातुराणांतुग्रहणयामात्पूर्वमेकयामोनिषिद्धः सायाह्नेग्रहणंचेत्स्यादपराह्णेनभोजनं अपराह्णेनमध्याह्नेमध्याह्नेनतुसंगवे भुंजीतसंगवेचेत्स्यान्नपूर्वंभोजनक्रियेतिमार्कंडेयोक्तेः इदंचबालादिविषयं बालवृद्धातुरैर्विनेतिपूर्वोक्तेः ।

बाल, वृद्ध व आतुर यांविषयीं तर, ज्या प्रहरीं ग्रहण असेल त्या प्रहरापूर्वी एक प्रहर निषिद्ध आहे; कारण, “ सायंकालीं ग्रहण असेल तर अपराह्णकालीं भोजन करुं नये; अपराह्णकालीं ग्रहण असेल तर मध्याह्नीं भोजन करुं नये; मध्याह्नीं ग्रहण असेल तर संगवकालीं भोजन करुं नये; संगवकालीं ग्रहण असेल तर तत्पूर्वी भोजन करुं नये ” असें मार्कंडेयवचन आहे. हें वचन बालादिविषयक जाणावें; कारण, “ बाल, वृद्ध व आतुर यांवांचून तीन चार प्रहर निषेध असें पूर्वीं सांगितलें आहे.

वेधकालेग्रहणेवापक्कमन्नंत्याज्यं सर्वेषामेववर्णानांसूतकंराहुदर्शने स्नात्वाकर्माणिकुर्वीतश्रृतमन्नंविवर्जयेदिति हेमाद्रौषट्‍ त्रिंशन्मतात्‍ श्रुतमितितदंतरितस्योपलक्षणं नवश्राद्धेषुयच्छिष्टंग्रहपर्युषितंचयदितिमिताक्षरायांवचनात्‍ भार्गवार्चनदीपिकायांज्योतिर्निबंधेमेधातिथिः आरनालंपयस्तक्रंदधिस्नेहाज्यपाचितं मणिकस्थोदकंचैवनदुष्येद्राहुसूतके मन्वर्थमुक्तावल्याम्‍ अन्नंपक्कमिहत्याज्यंस्नानंसवसनंग्रहे वारितक्रारनालादितिलदर्भैर्नदुष्यति जलेत्वदोषोगांगविषयः ग्रहोषितंजलंपीत्वापदकृच्छ्रंसमाचरेदितितत्रैवचतुर्विंशतिमतेऽन्यजलस्यदोषोक्तेः ।

वेधकालीं किंवा ग्रहणकालीं शिजवलेलें अन्न टाकावें. पूर्वी शिजवलेल्या अन्नावरुन ग्रहण गेलें असतां तें टाकावें; कारण, “ सर्व वर्णांना ग्रहणाचें सूतक आहे, यास्तव स्नान करुन संध्या - देवपूजादिक कर्मै करावीं आणि शिजलेलें अन्न टाकावें ” असें हेमाद्रींत षट्‍ त्रिंशन्मतवचन आहे. ‘ शिजवलेलें अन्न टाकावें ’ असें जें वचनांत आहे तें ग्रहणांतरिताचें उपलक्षण होय, म्हणजे शिजवलेल्या अन्नावरुन ग्रहण गेलें असतां तेंही अन्न टाकावें असा अर्थ. कारण, “ नवश्राद्धाचें अवशिष्ट, आणि ज्यावरुन ग्रहण गेलें तें अन्न टाकावें ” असें मिताक्षरेंत वचन आहे. भार्गवार्चनदीपिकेंत - ज्योतिर्निबंधांत - मेधातिथि - “ आरनाल ( कांजिक ), दूध, ताक, दहीं, तेल व तूप यांत तळलेले वटकादिक, माठांतलें उदक, यांवरुन जरी ग्रहण गेलें तरी ते दृष्ट होत नाहींत. ” मन्वर्थमुक्तावलींत - “ ग्रहणांत शिजवलेलें अन्न टाकावें; सचैल स्नान करावें; उदक, तक्र, कांजिक, ह्यांवर तिल दर्भ टाकून ठेवावे म्हणजे ते घेण्यास दोष नाहीं. ”
जलाविषयीं दोष नाहीं असें जें सांगितलें तें गंगाजलाविषयीं जाणावें; कारण, “ आणलेल्या उदकावरुन ग्रहण गेल्यावर तें प्राशन केलें असतां पादकृच्छ्र प्रायश्चित्त करावें ” असा तेथेंच चतुर्विंशतिमतांत अन्यजलाविषयीं दोष सांगितला आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP