मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
समुद्रस्नानाविषयीं निर्णय

प्रथम परिच्छेद - समुद्रस्नानाविषयीं निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


अथसमुद्रस्नानम् आश्वलायनः समुद्रेपर्वसुस्नायादमायांचविशेषतः पापैर्विमुच्यतेसर्वैरमायांस्नानमाचरन् भृगौभौमदिनेस्नानंनित्यमेवविवर्जयेत्‍ भारते अश्वत्थसागरौसेव्यौनस्प्रष्टव्यौकदाचन अश्वत्थंमंदवारेतुसागरंपर्वणिस्पृशेत्‍ पृथ्वीचंद्रोदयेस्कांदे पुनातिपर्वणिस्नानात्तर्पणैः सरितांपतिः कदाचिदपिनैवात्रस्नानंकुर्यादपर्वणि अस्यापवादस्तत्रैवप्रभासखंडे पर्वकालेचसंप्राप्तेनदीनांचसमागमे सेतुबंधेतथासिंधौतीर्थेष्वन्येषुसंयतः एवमादिषुसर्वेषुमेध्योऽन्येतुस्वकर्मणि तथा विनामंत्रंविनापर्वक्षुरकर्मविनानरैः कुशाग्रेणापिदेवेशिनस्प्रष्टव्योमहोदधिः तथा नकालनियमः सेतौसमुद्रस्नानकर्मणि ।

आतां समुद्रस्नानाविषयीं निर्णय सांगतो.
आश्वलायन - “ समुद्राचें स्नान करणें तें पर्वाचे ठायीं करावें. अमावास्यापर्वणीस तर अवश्य करावें. अमावास्येस समुद्रस्नान करणारा सर्वपापांपासून मुक्त होतो. शुक्रवार व मंगळवार या दिवशीं समुद्रस्नान सर्वदा वर्ज्य करावें. ” भारतांत - “ अश्वत्थ आणि सागर हे सेव्य होत, परंतु त्यांना स्पर्श कधींही करुं नये. शनिवारीं अश्वत्थाला स्पर्श करावा व पर्वणीचे दिवशीं समुद्राला स्पर्श करावा. ” पृथ्वीचंद्रोदयांत - स्कांदांत - “ पर्वाचे ठायीं समुद्रस्नान करुन तर्पण करावें, तेणेंकरुन समुद्र पवित्र करितो. पर्वावांचून अन्य कोणत्याही दिवशीं समुद्रस्नान करुं नये. ” याचा अपवाद पृथ्वीचंद्रोदयांत - प्रभासखंडांत - “ पर्वकाल प्राप्ति, नदींचा समागम, सेतुबंध, सिंधु, व अन्य तीर्थे यांचे ठिकाणीं असलेला समुद्र पवित्र आहे. इतर तीर्थे विशेष आप आपल्या कर्माविषयीं पवित्र आहेत. ” तसेंच “ मंत्रावांचून, पर्वणीवांचून व क्षुरकर्मावांचून कुशाग्रानेंही समुद्राला स्पर्श करुं नये. ” तसेंच - सेतुबंधीं समुद्रस्नानाविषयीं कोणताही कालनियम नाहीं, अर्थात्‍ सर्वकालीं स्नान करावें. ”

तद्विधिश्च तत्रैव पिप्पलादसमुत्पन्नेकृत्येलोकभयंकरे पाषाणस्तेमयादत्त आहारार्थेप्रकल्प्यतामितिपाषाणं प्रक्षिप्य विश्वाचीचघृताचीचविश्वयोनेविशांपते सान्निध्यंकुरुमेदेवसागरेलवणांभसि नमस्तेविश्वगुप्तायनमोविष्णोअपांपते नमोजलधिरुपायनदीनांपतयेनमः समस्तजगदाधारशंखचक्रगदाधर देवदेहिममानुज्ञांतवतीर्थनिषेवणे त्रितत्त्वात्मकमीशानंनमोविष्णुमुमापतिम् सान्निध्यंकुरुदेवेशसागरेलवणांभसि अग्निश्चयोनिरनिलश्चदेहोरेतोधाविष्णुरमृतस्यनाभिः एतद्ब्रुवन्पांडवसत्यवाक्यंततोऽवगाहेतपतिंनदीनामितिभारतोक्तमंत्रान्पठित्वाविधिवत्स्नात्वा सर्वरत्नोभवाञ्छ्रीमान्सर्वरत्नाकरोयतः सर्वरत्नप्रधानस्त्वंगृहाणार्घ्यंमहोदधे इत्यर्घ्यंदत्वातर्पयेत् यथोक्तंपृथ्वीचंद्रोदयेस्कांदे पिप्पलादंविकण्वंचकृतांतंजीवकेश्वरम् वसिष्ठंवामदेवंचपराशरमुमापतिं वाल्मीकिंनारदंचैववालखिल्यांस्तथैवच नलंनीलंगवाक्षंचगवयंगंधमादनम् जांबवंतंहनूमंतंसुग्रीवंचांगदंतथा मैदंचद्विविदंचैवऋषभंशरभंतथा रामंचलक्ष्मणंचैवसीतांचैवयशस्विनीम् एतांस्तुतर्पयेद्विद्वाञ्जलमध्येविशेषतः आब्रह्मस्तंबपर्यंतंयत्किंचित्सचराचरम् मयादत्तेनंतोयेनतृप्तिमेवाभिगच्छत्विति ॥ ॥ इतिश्रीमीमांसकनारायणभट्टसूरिसूनुरामकृष्णभट्टात्मजदिनकरभट्टानुजकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौप्रथमः परिच्छेदः समाप्तः ॥

समुद्रस्नानाचा विधि - तेथेंच सांगतो - “ पिप्पलादसमुत्पन्नेकृत्येलोकभयंकरे ॥ पाषाणस्तेमयादत्त आहारार्थेप्रकल्प्यताम् ” या मंत्रानें समुद्रांत पाषाण टाकून,  विश्वाचीचघृताचीचविश्वयोनेविशांपते ॥ सान्निध्यंकुरुमेदेवसागरेलवणांभसि ॥ नमस्तेविश्वगुप्तायनमोविष्णोअपांपते ॥ नमोजलधिरुपाय नदीनांपतयेनमः ॥ नमस्तेजगदाधारशंखचक्रगदाधर ॥ देवदेहिममानुज्ञांतवतीर्थनिषेवणे ॥ त्रितत्त्वात्मकमीशानंनमोविष्णुमुमापतिम् ॥ सान्निध्यंकुरुदेवेशसागरेलवणांभसि ॥ अग्निश्चयोनिरनिलश्चदेहोरेतोधाविष्णुरमृतस्यनाभिः ॥ एतद्ब्रुवन्‍ पांडवसत्यवाक्यंततोवगाहेतपतिंनदीनाम् ”  हे भारतोक्त मंत्र पठण करुन यथाविधि स्नान करुन “ सर्वरत्नोभवान् श्रीमान् सर्वरत्नाकरोयतः ॥ सर्वरत्नप्रधानस्त्वंगृहाणार्घ्येनमोस्तुते. ”  या मंत्रानें अर्घ्य देऊन तर्पण करावें. तें तर्पण असें :- पृथ्वीचंद्रोदयांत स्कंदपुराणांत - “ पिप्पलादं तर्पयामि, विकण्वंत०, कृतांतंत०, जीवकेश्वरंत०, वसिष्ठंत०, वामदेवंत०, पराशरंत०, उमापतिंत०, वाल्मीकिंत०, नारदंत०, वालखिल्यान्‍ त०, नलंत०, नीलंत०, गवाक्षंत०, गवयंत०, गन्धमादनंत०, जांबवंतंत०, हनूमन्तंत०, सुग्रीवंत०, अंगदंत०, मैंदंत०, द्विविदंत०, ऋषभंत०, शरभंत०, रामंत०, लक्ष्मणंत०, यशस्विनीं सीतांत० ह्या देवतांचें तर्पण उदकांत करावें; नंतर आब्रह्मस्तंबपर्यंतंयत्किंचित्सचराचरं ॥ मयादत्तेनतोयेनतृप्तिमेवाभिगच्छतु ॥ असें म्हणून पाणी सोडावें. ”  इति श्रीनिर्णयसिंधूच्या प्रथमपरिच्छेदाची महाराष्ट्रटीका समाप्त झाली.

इति प्रथमपरिच्छेदः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP