अथाष्टौमहाद्वादश्यः तत्रशुद्धाधिकैकादशीयुताद्वादशीउन्मीलिनीसंज्ञा द्वादश्येवशुद्धाधिकावर्धतेचेत्सावंजुली वासरत्रयस्पर्शिनीत्रिस्पृशा अग्रेपर्वणः संपूर्णाधिकत्वेपक्षवर्धिनी पुष्यर्क्षयुताजया श्रवणयुताविजया पुनर्वसुयुताजयंती रोहिणीयुतापापनाशिनी एताःपापक्षयमुक्तिकाम उपवसेत् अत्रमूलंहेमाद्रौज्ञेयं ।
आतां आठ महाद्वादशी सांगतो.
१ शुद्धाधिक एकादशीनें शुक्त जी द्वादशी ती उन्मीलिनीसंज्ञक. २ द्वादशीच शुद्धाधिका वाढती असेल तर ती वंजुली. ३ सूर्योदयाच्या पूर्वी असून दुसर्या दिवशीं सूर्योदयोत्तर असलेली द्वादशी तीन दिवसांचा स्पर्श असल्यामुळें ती त्रिस्पृशा. ४ पक्षपर्यंत पुढच्या तिथि वाढत्या असतात तेव्हां पक्षवर्धिनी. ५ पुष्यनक्षत्रानें युक्त ती जया. ६ श्रवणयुक्त ती विजया. ७ पुनर्वसूनें युक्त ती जयंती. ८ रोहिणीयुक्त ती पापनाशिनी. पापक्षय आणि मुक्ति यांची इच्छा करणारानें ह्या आठ द्वादशींचे ठायीं उपोषण करावें. याविषयींचीं मूलवचनें हेमाद्रींत पाहावीं.
एकादशीद्वादश्योरेकत्वेतंत्रेणोपवासः पार्थक्येतुशक्तस्योपवासद्वयं एकादशीमुपोष्यैवद्वादशींसमुपोषयेदिति विष्णुरहस्यात् अशक्तौतुद्वादश्यामेव एवमेकादशींत्यक्त्वाद्वादशींसमुपोषयेत् पूर्ववासरजंपुण्यं सर्वप्राप्रोत्यसंशयमितितत्रैवोक्तेः यदात्वल्पाद्वादशीतदोक्तंमात्स्ये यदाभवतिअल्पापिद्वादशीपारणादिने उषः कालेद्वयंकुर्यात्प्रातर्माध्याह्निकंतदा नारदीयेपि अल्पायामथविप्रेंद्रद्वादश्यामरुणोदये स्नानार्चनक्रियाः कार्यादानहोमादिसंयुताइतिइ संकटेतुमाधवीयेदेवलः संकटेविषमेप्राप्तेद्वादश्यांपारयेत् कथं अद्भिस्तुपारणांकुर्यात् पुनर्भुक्तंनदोषकृदिति संकटेत्रयोदशीश्राद्धप्रदोषादौ ।
ह्या आठ द्वादशींतून द्वादशी व एकादशी ह्या दोन एक दिवशीं प्राप्त असतां एकतंत्रानें उपवास करावा. निरनिराळ्या दोन दिवशीं असतील तर सशक्तानें दोन उपोषणें करावीं; कारण, “ एकादशीचें उपोषण करुनच द्वादशीचें उपोषण करावें ” असें विष्णुरहस्यवचन आहे. दोन उपोषणें करण्यास शक्ति नसेल तर द्वादशीचेंच उपोषण करावें; कारण, “ अशक्तानें एकादशी टाकून द्वादशीचे ठायीं उपोषण केल्यानें एकादशीव्रताचें सर्व पुण्य प्राप्त होतें ” असें त्याच ठिकाणीं वचन आहे. जेव्हां द्वादशी अल्प असेल तेव्हां त्याविषयीं सांगतो -
मत्स्यपुराणांत - “ जेव्हां द्वादशी पारणादिवशीं अल्प असेल तेव्हां प्रातःकालीन व माध्याह्निक सर्व कर्मै उषःकालींच करावीं. ” नारदीयांतही - “ हे विप्रेंद्र, द्वादशी अल्प असेल तेव्हां स्नान, संध्या, दान, पूजा, होम, इत्यादिक सर्व क्रिया अरुणोदयकालीं कराव्या. ”
संकटविषयीं सांगतो - माधवीयांत देवल - “ संकट ( त्रयोदशीश्राद्ध, प्रदोषव्रत इत्यादि ) असतां द्वादशींत पारणेचा असंभव असेल तर उदकेंकरुन पारणा करावी; म्हणजे पुनर्भोजन केलें असतां दोष नाहीं.
अत्रकेचिदाहुः अपकर्षवाक्यान्यनाहिताग्निविषयाणि अग्निहोत्रादीनांश्रौतत्वेनापकर्षायोगादिति द्वादश्यांचप्रथमपादमतिक्रम्यपारणंकार्यं द्वादश्याः प्रथमः पादोहरिवासरसंज्ञितः तमतिक्रम्यकुर्वीतपारणंविष्णुतत्पर इतिनिर्णयामृतेमदनरत्नेचविष्णुधर्मोक्तेः अत्रकेचित्संगिरंते यदाभूयसीद्वादशीतदापिप्रातर्मुहूर्तत्रयेपारणंकार्यं सर्वेषामुपवासानांप्रातरेवहिपारणमितिवचनादिति अस्मद्गुरवस्तु बहूनांकर्मकालानांविनाकारणंबाधापत्तेः प्रागुक्तवचनैश्च अल्पद्वादश्यामेवापकर्षविधानादपराह्णएवकार्यम् प्रातःशब्दस्तु सायंप्रातर्द्विजातीनामशनंश्रुतिचोदितमितिवदपराह्णवाचित्वेप्युपपन्नः नचवाक्यवैयर्थ्यं पुनर्भोजनसायंपारणानिवृत्त्यर्थत्वात्तस्येत्याहुः ।
याविषयीं केचित् असें म्हणतात - अपकर्षैकरुन कर्मै करण्याविषयीं जीं वाक्यें, तीं अनाहिताग्निविषयक होत; कारण, अग्निहोत्रादिक हीं श्रौतकर्मै असल्यामुळें त्यांचा अपकर्ष होणार नाहीं. द्वादशीचा प्रथम पाद टाकून पारणा करावी. कारण, “ द्वादशीचा प्रथम पाद तो हरिवासर होय, तो प्रथम पाद टाकून वैष्णवानें पारणा करावी ” असें निर्णयामृतांत व मदनरत्नांत विष्णुधर्मवचन आहे. याविषयीं केचित् म्हणतात - जेव्हां पुष्कळ द्वादशी असेल तेव्हांही प्रातःकालीं सहा घटिकांमध्यें पारणा करावी; कारण, “ सर्व उपवासांची पारणा प्रातःकालींच करावी ” असें वचन आहे. आमचे गुरु ( रामकृष्णभट्ट ) तर, बहुतकर्मकालांचा कारणावांचून बाध होईल म्हणून, आणि पूर्वोक्त वचनांनीं अल्पद्वादशी असेल तरच कर्माला अपकर्ष करण्याचें सांगितल्यांवरुन पुष्कळ द्वादशी असेल तेव्हां अपराह्णकालींच पारणा करावी. “ सर्व उपवासाची पारणा प्रातःकालींच करावी ” ह्या वचनांत जो प्रातःशब्द आहे, तो तर, “ द्विजातींनीं सायंकालीं व प्रातःकालीं भोजन करणें, हें श्रुतिप्रणीत आहे ” ह्या वचनांतील प्रातःशब्दासारखा अपराह्णकालवाची मानला असतांही उपपत्ति होते. आतां असें म्हटलें तर प्रातः कालींच पारणा करावी, हें वाक्य व्यर्थ होईल असें म्हणूं नये. कारण, पुनर्भोजन व सायंकालीं पारणा यांची निवृत्ति होण्यासाठीं तें वचन सार्थक आहे असें म्हणतात.
प्रमादेनएकादश्युपवासातिक्रमे अपरार्केवाराहे एकादशीविप्लुताचेद्द्वादशीपरतः स्थिता उपोष्याद्वादशीतत्रयदीच्छेत्परमंपदमिति कैश्चित्तुविंष्णुनाचेदितिपठितम् अत्राविरोधिनोनियमाः सर्वव्रतेषुबोद्धव्याः अन्येचनवरात्रेवक्ष्यंतेइतिदिक् इतिश्रीरामकृष्णभट्टात्मजकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौएकादशीनिर्णयः ।
प्रमादेंकरुन एकादशीचें उपोषण घडलें नसतां सांगतो - अपरार्कांत वाराहपुराणांत - “ जर एकादशीस उपोषण झालें नाहीं आणि दुसर्या दिवशीं द्वादशी आहे तर द्वादशीस उपोषण करावें. ” कित्येकांनीं तर - “ एकादशी विप्लुताचेत् ” ह्या ठिकाणीं “ एकादशी विष्णुनाचेत् ” असा पाठ केलेला आहे. ह्या एकादशीव्रताचे ठायीं सांगितलेले नियम अविरुद्ध असतील ते सर्व व्रतांचे ठायीं जाणावे. इतर नियम नवरात्रप्रकरणीं पुढें सांगूं. ही दिशा दाखविली आहे. इति श्रीएकादशीनिर्णयाची महाराष्ट्रटीका समाप्त झाली ॥
द्वादशीतुपूर्वैव युग्मवाक्यात् द्वादशीतुप्रकर्तव्याएकादश्यायुताप्रभो इतिस्कांदाच्च त्रयोदशीतु सर्वमतेशुक्लापूर्वाकृष्णोत्तरा त्रयोदशतिथिः पूर्वः सितोथाऽसितः पश्चादितिदीपिकोक्तेः शुक्लात्रयोदशीपूर्वापराकृष्णत्रयोदशीतिमाधवाच्च चतुर्दशीसर्वमतेकृष्णापूर्वाशुक्लोत्तरा उपवासेतुद्वय्यपिपरेतिमदनरत्ने ।
द्वादशीचा निर्णय - सामान्य कर्मांविषयीं द्वादशी पूर्वा ( एकादशीयुक्त ) घ्यावी; कारण, एकादशी व द्वादशी यांचें युग्म आहे; आणि “ एकादशीयुक्त द्वादशी करावी ” असें स्कंदपुराणवचनही आहे. त्रयोदशीचा निर्णय - सर्वांचे मतीं शुक्लपक्षींची त्रयोदशी पूर्वा करावी; कृष्णपक्षींची उत्तरा करावी; कारण, “ शुक्लपक्षींची त्रयोदशी तिथि पूर्वा आणि कृष्णपक्षींची त्रयोदशी तिथि परा करावी ” असें दीपिकावचन आहे, व “ शुक्ल त्रयोदशी पूर्वा आणि कृष्ण त्रयोदशी परा करावी ” असें माधववचनही आहे. चतुर्दशीचा निर्णय - सर्वमतीं कृष्णचतुर्दशी पूर्वा व शुक्लचतुर्दशी परा करावी. उपवासाविषयीं तर शुक्ल व कृष्ण दोनही चतुर्दशी परा कराव्या असें मदनरत्नांत सांगितलें आहे.