श्री केशवस्वामींबद्दल बर्याच संतकवींनी आदरार्थी उद्रार काढले आहेत;
त्यापैकीं श्रीसमर्थ रामदासांचा एक श्र्लोक व शहाबेग यांचे एक पद देत आहे.
वर पृ. २७१ यांत श्रीकेशवस्वामींनी श्रीसमर्थांस पत्र लिहिलें त्याच्या उत्तरांत श्रीसमर्थ म्हणतात.
पदातीत वाक्यार्थ शोधी समाधी ।
स्वरूपींच जो निर्विकल्पाव बोधीं ॥
जय ऊगमी जन्म नाहीं जिवासी ।
मिळे दास त्या संगमीं केशवासी ॥
० पद ८५७ वें
कां बा बैसलें अति निसुर । भजना होतसे अति उशिर ॥
अति गर्वे निद्रिस्त जालें नर । घरोघरीं मांडलें करकर जी जी
जी जी ॥ध्रु॥
मी दंडी गाना सांगतों जागा । नाहीं तरी होइल फार नागा ॥
पहा बहुतीं खादलें येथ दगा । हित सांगतों शरण संतां जागा जी जी जी जी ॥१॥
काळ पसरुनि मुख विशेष । आला खात त्रैलोक्य केलें वोस ॥
उठा पळा जंव आहे अवकाश । नाही तरी करील एक ग्रास जी जी
जी जी ॥२॥
काळापासुनि सोडवी पाहे । तोचि सखा बंधु बाप माय ॥
ब्रह्मादिकां दुर्लभ ज्याचे पाय । पायीं राहिल्या मग भय काय जी ॥३॥
केशवस्वामी केवळ सौख्यराशी । मनोभावें शरण रिघा त्यासी ॥
पदो पदीं सहज जोडे काशी । म्हणे शाबेग समाधी अनयासी ॥४॥