श्रीकेशवस्वामी - भाग ६

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद ११५ वें

गांव भरला सांडुनि जाती ॥ ते परतोनि कैसे येती ॥ध्रु॥

येती क्षणभरी जरि ते गांवा ॥ तरी ब्रह्मींच त्यासि विसांवा ॥१॥

आले गेले म्हणती लोक ॥ ते कांहिच नेणति देख ॥२॥

म्हणे केशव याच्यापायीं ॥ गांव आम्ही नेणों कांही ॥३॥

० पद ११६ वें

मुळीं बंधतां न दिसे ॥ मुक्त म्हणावें ते कैसे ॥ध्रु॥

बद्धमुक्त कल्पित भावो ॥ त्यासि स्वरूपीं नाहीं ठावों ॥१॥

जन अवघें शुद्ध बुद्ध ॥ तेथ कैंचे मुक्त बंध ॥२॥

गुरुकृपे केशविं भावो ॥ बंधमुक्त दोन्ही वावो ॥३॥

० पद ११७ वें

ज्यासि नाठवे जन्मलेंपण ॥ स्वप्न्नि न देखे निजमरण ॥ध्रु॥

तोचि जीवन्मुक्त पाही ॥ ज्यासि कांहिंच उरलें नाही ॥१॥

नेणे साधक बाधक भेदु ॥ सहज निवान्त स्वबोधु ॥२॥

म्हणे केशव स्वयं ब्रह्मजाला ॥ देहविदेह वाटुनि प्याला ॥३॥

० पद ११८ वें

लाभलोभ अवघा देवो । ऐसा अखंड नुपजे भावो ॥धु्र॥

अति पामर तो नर पाहीं । भवसागर न तरे कांही ॥१॥

देव कर्ता देवचि भोक्ता । ऐसें नेणें देवाची सत्ता ॥२॥

देव चाळक पाळक एक । म्हणे केशव नाठवि देख ॥३॥

० पद ११९ वें

पिंड ब्रह्मांडावेगळें आहे । पिंड येकचि पाहे ॥ध्रु॥

ऐसे देखणें पूर्ण दशेचें । पूर्ण पुरुषाशीं बाणलें साचें ॥१॥

आदि मध्य अंत शून्य । शून्यसाक्षी हे चैतन्य ॥२॥

गुरुकृपें केशवीं पाहीं । तेथें केशवपणही नाहीं ॥३॥

० पद १२० वें

ज्याच्या दृष्टिस सृष्टीच नाहीं । पूर्ण देहींच तो विदेही ॥ध्रु॥

परब्रह्म तो आपण जाला । देव मस्तकीं वंदिती त्याला ॥१॥

होणें न होणें नेणेचि कांही । हाही आठव उरला नाहीं ॥२॥

ब्रह्म होउनि ब्रह्मींच खेळे । त्याच्या पायीं केशव लोळे ॥३॥

० पद १२१ वें

शिरीं ब्रह्मांड कोसळे जेंव्हा । निजस्वरूपीं निश्र्चळ तेंव्हा ॥ध्रु॥

हेंचि साधुचें लक्षण पाहीं । देही देहबुद्धी उरली नाहीं ॥१॥

काळें गिळली देखें काया । तरी शोकाची न पडे छाया ॥२॥

पूर्ण बोधें परिपूर्ण धाला । म्हणे केशवीं सहजीं निमाला ॥३॥

० पद १२२ वें

स्नान संध्या जप होम नेम । आत्मा नेणोनि अवघें आधर्म ॥ध्रु॥

यक आत्मा कळला नाहीं । तरी सर्वही व्यर्थचि पाहीं ॥१॥

क्रिया-कर्म-यम-नेम विधी । आत्मा नेणोनी सर्व उपाधी ॥२॥

गुरुकृपें केशवीं निष्ठा । तेथें राहिली या खटपटा ॥३॥

० पद १२३ वें

भेटोनियां भेद चोरोनि नेला । मीतूंपणाचा ठाव पुसीला ॥ध्रु॥

काय करूं याचें मी काय करूं । दृश्य नव्हे मा धांवोनि धरूं ॥१॥

जाणपणाचें फेडुनि कोडें । सर्वांग ग्रासुनि लाविलें वेडें ॥२॥

केशवस्वामी हा लाघवी मोठा । ब्रह्मांड विउनी जाला वांझोटा ॥३॥

० पद १२४ वें

सर्वांग देखणा होउनी ठाके । तयापुढें माया येउं धाके ॥ध्रु॥

गगनाचा अवकाश होउनी ठेला । दृश्य नव्हे तें स्वरूप जाला ॥१॥

बंधमोक्षाचा विटाळ कांही । केशव म्हणे त्यासी स्वप्नींही नाही ॥२॥

० पद १२५ वें

जनी जनार्दन जाणोनि वागे । ० पदो० पदीं त्यासी समाधी लागे ॥ध्रु॥

ज्याचा तोचि जाणे ज्याचा तोचि जाणे । जाणीव निमाली

त्यासी बाणे ॥१॥

स्वसुखसागरीं हरपे चित्त । ठाईंचा ठाईं पूर्ण निवान्त ॥२॥

सद्गुरुकृपें केशवां पाहीं । फावलीय उरी उरली नाहीं ॥३॥

० पद १२६ वें

व्युत्थानकाळीं समाधि जोडे । समाधि‘व्युत्थान अवघेंचि मोडे ॥ध्रु॥

ब्रह्मसुख तें या नांव पाहीं । मागावयातें तेथें दुसरें नाहीं ॥१॥

द्वैताद्वैत-भाव अभाव पावती । तेथ कैंची मग प्रवृत्ति निवृत्ती ॥२॥

गुरु-कृपें केशवीं यापरी जाणे । आपेआप मग तयासी बाणे ॥३॥

० पद १२७ वें

मीपण वेंचिलें ज्याचिया पायीं । रूपरेखा तयासी नाही ॥ध्रु॥

आहे कोठें मा धांवोनी धरूं । नाही कोठें मा वेगळा करूं ॥१॥

जेथें जावें तेथें लागला सवें । भेटी जावें त्सासी घेतला जीवें ॥२॥

आहे नाहीं तेथें कांहीच न साहे । कांही नाही परी संचलें आहे ॥३॥

सद्गुरु-कृपें केशवीं देखा । देखणेपणाचा राहिला लेखा ॥४॥

० पद १२८ वें

स्वरूप जाणोनी कांहीच नेणिजे । कांही नाहीं तेथें सर्वदा

राहिजे ॥ध्रु॥

त्या नांव ज्ञान या नांव सान । त्यासी म्हणिजे ब्रह्म समाधान ॥१॥

जे ठाईं राहिजे ते स्वयं होईजे । होणें न होणें अवघें वीसरो जे ॥२॥

वीसराचें स्मरण स्मरणाचा वीसरू । केशव म्हणे तोची इश्र्वरू ॥३॥

० पद १२९ वें

नवा खिडकियांचे औट हात गांव । त्यांमाजी दैव दाही प्रजा ॥ध्रु॥

चौघेही पाटील देसाई पांचवा । मोकाशी सहावा गुणातीत ॥

त्याचेनि चालतें बा । आवघे त्याचेनि चालते बा ॥

करूनि आकर्ता भोगुनी आभोक्ता । लक्षतां मीपण हरपे तत्वतां ॥१॥

प्राणाचाही प्राण सोयरा निजाचा । पोसना तयाचा गांव देखा ॥

असोनियां गांवी वेगळाची पाहीं । गांव तो तयासी ठाउकाचि

नाहीं ॥२॥

सत्संगे त्याचिया भेटीसी गेलों । चरणकमळीं स्थिर होउनी ठेलों ॥

केशवस्वामीनें आलिंगन देतां । चिदानंदघन तोचि मी जालों ॥३॥

० पद १३० वें

पुराणप्रसिद्ध श्रुती वाखाणीला । तो चोर पडिला आजि येथें ॥ध्रु॥

माझें चित्त नेलें माझें वित्त नेलें । निर्धुतची केलें घर येणें ॥१॥

अनंत जन्माचें अर्जित हें नेलें । उघडेंची केलें परोपरी ॥२॥

केशव म्हणे माझें मीपण हे नेलें । नाहींच तें केलें जगामाजी ॥३॥

० पद १३१ वें

गोविंद पहतां नयनीं गोविंद दिसे ध्यानीं ।

जन-वन-वीजनी गोविंद दीसे ॥ध्रु॥

गोविंदाचा वेधू वो नवल माय छंदू वो ।

अवघाचि गोविंद वो अखंड दीसे ॥१॥

गोविंद पाहे तेथें गोविंदच सांघातें ।

गोविंदावांंचुनि रितें उरलें नाहीं ॥२॥

गोविंदे लावलें पिसें काय मी साधों कैसें ।

केशवी सर्वांगी भासे गोविंद सदा ॥३॥

० पद १३२ वें

निजरंगें चोखडें । रंगनाथ रुपडें ।

दिसें मागें आणि पुढें । उघडें आम्हां ॥ध्रु॥

आतां मी वो करूं काय । सर्वदा दिसे ग माय ।

पाहतां विरोनि जाय । मीपण माझें ॥१॥

डोळे झांकीतां दिसे । डोळे उघडितां भासे ।

माझे सर्वांगी वसे । गिळुनीयां मज ॥२॥

गुरुकृपें अवलीळा । केशवीं पाहतां डोळा ।

सोहळा मूळ रंगी जाला । नवरंगांतीत ॥३॥

० पद १३३ वें

मुक्यानें साखर खादिली । गोडी सांगतां मिठी पडली ॥ध्रु॥

सांगवेना ते गोडी सांगवेना । सांगतां वेगडी पडली मना ॥१॥

सांगातं नये दावितां नये । स्वानुभवें ते जानिजे सोय ॥२॥

सद्गुरुकृपें केशवीं जाण । मुळींचे गोडी भोगिजे खूण ॥३॥

० पद १३४ वें

घे तूंचि या ० पदीं ठेवुनियां मन । विंधीले लोचन ० पद्मीनीचे ॥ध्रु॥

तोचि येकु बळी पुष्० पदीप कुळीं । साधूच्या मंडळीं पूज्य जाला ॥१॥

अश्र्वत्थाचें पुष्प काढुनी टाकिलें । मस्तकीं तुरंबिलें चंद्रबिंब ॥२॥

आगीचेनि तेजें रविबिंब उडवीलें । केशवीं घोटीलें गगन डोळा ॥३॥

० पद १३५ वें

मुक्तफळाचा जेउनी वोगरू । देउनी ढेंकरू तृप्त जाला ॥ध्रु॥

जीवन्मुक्त योगी तोचि येकु पाहीं । ठेवी त्याचे पाईं चित्तवृत्ती ॥१॥

गगनाचिये खोळे गगन होउनी खेळे । देहातीत सोहळे देहीं भोगी ॥२॥

जन्मोनियां कुळीं कुळक्षय केला । स्वप्न्नामाजी आला जागृतीसी ॥३॥

जितांचि मेला मरोनि सुखी जाला । केशवी राहिला अमर होउनी ॥४॥

० पद १३६ वें

विज्ञानसंपत्ती जोडुनी निश्र्चिती । संसारनिवृत्ती केली जेणें ॥ध्रु॥

मुक्त जाला तो मुक्त जाला । परतोनि जन्मासी नाहीं आला ॥१॥

विश्रांतिभुवनीं अढळ सिंहासनीं । सुखरूप होउनी नांदतु असे ॥२॥

बंध-मोक्ष दोन्ही खपुष्प जाणोनी । केशव म्हणे चिद्घनीं विरोनि गेला ॥३॥

० पद १३७ वें

मुक्तीचें साधन विश्रांतीचे धन । तें मुख्य चरण सद्गुरूचें ॥ध्रु॥

वोळगा रे तुम्ही वोळगारे । माया सीगासी छेदुनीयां ॥१॥

माया जेणें सर भगवंता यवों सरे । आठवीतां नुरे जन्ममरण ॥२॥

केशव म्हणे जीवीं चिंतीता सादरें । अनुभव दुसरें सहज नाहीं ॥३॥

० पद १३८ वें

प्रळय मेघोदकें उरलें नाहीं स्थळ । संसार-मंडळ तैसें ज्ञानें ॥ध्रु॥

नाहीं उरले नाही उरलें । जाणें त्याचें जन्ममरण सरलें ॥१॥

निद्राकाळीं लोपे देह कर्म सकळ । तैसें दृश्यजाळ ज्ञानयोगें ॥२॥

तमाचें स्वरूप दिवसा नाहीं जैसें । केशव म्हणे तैसें द्वैत ज्ञानें ॥३॥

० पद १३९ वें

आइतें ठेवणें सुखाचें ठेवणें । पायाळ होय तरी फुकाचें घेणें ॥ध्रु॥

पायाळ व्हा पायाळ व्हा वा । मुळींचा ठेवा तेणें लाभे ॥१॥

पायाळाचे डोळां सद्गुरु अंजन । केशवीं निजधन कहाडिलें येणें ॥२॥

० पद १४० वें

वडीलांची जोडी हाताशीं आली । पुरोनि उरेली तिही लोकीं ॥ध्रु॥

साठवूं कोठें ग कोठें । गगन टाचे ठेवन मोठें ॥१॥

जेथील ठेवणें सांठवीलें । केशव म्हणे तरी उमान्या आलें ॥२॥

० पद १४१ वें

वाउगे डोळे लावण काय । डोळ्याचा देखणा परतोनि पाहे ॥ध्रु॥

डोळ्याचा देखणा पाहतां दिठी । डोळां रिघाला देखण्या पोटीं ॥१॥

डोळ्याचा देखणा पाहीला डोळां । आपेआप तेथें झांकला डोळा ॥२॥

गुरु-कृपें केशवीं नवलाव जाला । देखणा पाहत डोळा विराला ॥३॥

० पद १४२ वें

गगन चुरुनी घडिला मांडा । सेवुं जाय त्याच्या गिळिलें तोंडा ॥ध्रु॥

ऐसें कांही सांग सजना । सोयरीया निज सगुणा ॥१॥

जुनाट कोहळें रांधिलें हांडी । कोहळ्यामध्यें विराली हांडी ॥२॥

मुक्तफळाचा वोगरू केला । केशव धनीवरी जेवुनी घाला ॥३॥

० पद १४३ वें

मज मी पाहूं गेलों मीपणा मुकलों । आतां पाहणेंचि केलें निजांग हें ॥ध्रु॥

त्रैलोक्य धवळलें माझेनि हे तेजें । पाहणें तें दुजें उरलें नाहीं ॥१॥

सद्गुरूकृपें मी वो मात वोवाळली । बोधाची दिवाळी नित्य आम्हां ॥२॥

मीमाजी पाहिलें पाहणें राहिलें । अक्षय लाधलें निजसुख ॥३॥

निजसुख गोडी घेतां आत्मलाभा । सर्वांगीं त्या जीभा रिघाल्या या ॥४॥

सर्वांगाच्या जिभा सर्वांगाचे नेत्र । सर्वांगाचा श्रोत्र करूनी ठेला ॥५॥

सर्वांगे भोगिता अनुभव-सोहळा । सद्गुरूकृपें पुरला डोहळे

केशवीं ॥६॥

० पद १४४ वें

कर्म-ब्रह्मा भेटी नव्हे, गेलिया काळ कोटी । पाहतां ब्रह्मदृष्टी कर्म कैचें ॥ध्रु॥

सहजीं सहज ब्रह्म तेथें कैचें कर्म । कर्माकर्म-भ्रम कल्पनीक ॥१॥

कर्म तें माईक कर्मसंग माईक । कर्म ते माईक जाणा तुम्ही ॥२॥

कल्पनेच्या संगी भ्रम पडला कर्मबंधी । आत्मत्वीं त्रिशुद्धी तेचि नाहीं ॥३॥

कल्पनाचि वावो तेथें कैंचा भ्रमा ठावो । येका घाई संदेहो पारुशिला ॥४॥

मृगजळाडोहीं बुडे विश्र्वलोक । तरी भेटी नाहीं देख कर्म-ब्रह्मा ॥५॥

सद्गुरुकृपें खूण केशवीं हें सांचे । देह नाहीं तेथें कैचें देहकर्म ॥६॥

० पद १४५ वें

श्रवणासी शब्द घ्राणासी हे गंध । रसनेसी स्वाद कळे हा जेणें ॥ध्रु॥

स्वतःसिद्ध तें पाहीं नांदतु ज्ञान देहीं । तूंच ते परि ठाईं न पडे तुज ॥

न कळे न कळे बापा न कळे तेथिच गुज । सद्गुरुविणें तुज तुजची बापा ॥१॥

चुंबकसन्निधानें जड लोहो चळे । तैसीं इंद्रियें सकळें चळती जेणें ॥

तें आहे नाही ऐसें पुसणें न लगे कांही । देह विदेही पाहीं अखंड वस्तु ॥२॥

मन बुद्धीसी द्योतक न कळे म्हणशी देख । तरी हे सकळीक कैसेंनि जाणें ॥

सहज शुद्ध-बुद्ध तें अनादिसिद्ध । केशवीं स्वतःसिद्ध पूर्ण रे या ॥३॥

० पद १४६ वें

आपल्यापा हटे देहकर्म राहटे । तंवचि गोमटे दिसता तो ॥ध्रु॥

निडारल्या दृष्टी परतोनि पहा हो । हरपली वृत्ती देहो कैंची काय ॥१॥

स्वरूपी सलज्ञ सैराट । बुडालें अवघे दाट जनवन ॥२॥

गुरुकृपें केशवीं उडालें प्रावर्ण । कैंचे हें आवर्ण अनावर ॥३॥

० पद १४७ वें

जें जें भासे योगियां । तें तें मिथ्या होत तयां ।

निजसुखें आपलीया । आपेआप क्रीडतसे ॥ध्रु॥

त्यासी कैसे देहकर्म । त्यासी नाही वर्ण-धर्म ।

निरुपाधिक निःसीम । येकही नेम त्या नाहीं ॥१॥

शून्य सर्व संकल्प । आंगे जाल चिद्रुप ।

विरहित पुण्यपाप । सहजास्थिती क्रीडतसे ॥२॥

बंधमोक्षावेगळा । सर्वांठायीं मोकळा ।

आंगे विशेष आगळा । केशव म्हणे सर्वत्र ॥३॥

० पद १४८ वें

अखंड श्रीहरिचे गुण गातो । हरिचे चरण ध्यातो ॥ध्रु॥

वाटे मज गातो हरि गातो । हर्षें निज० पद देतो ॥१॥

हरि० पदिं मन ठेवी हरि सेवी । न करि उठवाठेवी ॥२॥

हरिमय जन पाहे स्थिर राहे । केशव-प्रभु तो आहे ॥३॥

० पद १४९ वें

त्रैलोक्यजनिता तो भगवंत । तत्० पदीं ठेवुनि चित्त ॥ध्रु॥

निवान्त जालों मी निजबोधे । तारक वाक्यप्रसादें ॥१॥

सकळ सुखाचा जो निजराशी । सबाह्य लक्षुनि त्यासी ॥२॥

केशवस्वामीच्या निजभजनीं । ग्रासुनि माया-रजनी ॥३॥

० पद १५० वें

गतिदायक नायक आला वो गती ॥धु्र॥

दर्शनें देख सिंधु बुझाला । जिन विषयानंद जाला वो ॥१॥

काम कुनामक संग-निवारक । त्रिभुवनतारक राजा वो ॥२॥

संशयजाळ-निवारण-कारण । प्राणविसांवा माझा वो ॥३॥

सज्जनसंग भजनप्रयोगें । केवळ मंगळ योग वो ॥४॥

केशवस्वामी सबाह्य आम्ही । आलिंगिला अतिवेगे वो ॥५॥

० पद १५१ वें

ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण यति घरा । तरी उरी नुरे या संसारा हो ॥ध्रु॥

ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण तेंचि ब्रह्म । ब्रह्मनिष्ठां भजणें हाचि धर्म हो ॥१॥

ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण नित्य ध्यातां । चारी मुक्ती वंदिती पाय माथां हो ॥२॥

ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण मुख्य पाहीं । जाति-कुळ प्रमाण त्यांसी नाहीं हो ॥३॥

ब्रह्मनिष्ठां भजतां निजभावें । ब्रह्म केशवीं पडलें पूर्ण ठावें हो ॥४॥

० पद १५२ वें

नामरूपा वेगळें । परब्रह्म सगळें ॥

जैसें आहे तैसें बा । सांगुं आतां कैसें बा ॥१॥

देशकाळरहीत । निरामय निश्र्चींत ॥

केशव म्हणे सर्वत्र । परिपूर्ण चिन्मात्र ॥

० पद १५३ वें

विषयवासना सांडि रे मना । तजुनि कामना सेवि सज्जना ॥

नातळे धना सोडि अंगना । सद्गुरु खुणे वळख आपणा ॥१॥

विषयसंगती यातना किती । दुःख आपती पुनरावृती ॥

भोगिल्या क्षिती अजुनि निश्र्चिती । सद्गुरुमुखें वोळखे गोप ती ॥२॥

अंतर स्थिती लावि हे रती । ठेउनि प्रिती पाहा प्रचीती ॥

उन्मनी गती सुखसंभुती । अवस्था स्थिती मावळे वृत्ती ॥३॥

दुर्मदा मदा नातळे कदा । सद्गुरु० पदां सेवि तूं सदा ॥

चुकति आ० पदा सुखसं० पदा । होउनि सर्वदा पावशी ० पदा ॥४॥

सद्गुरुमुखें वस्तु वोळखे । आपुल्या सुखें राही कौतुकें ॥

हरती पातकें भंगती दुःखें । नाठवे तुला पारखे सखे ॥५॥

शोक मावळे द्वेष तो पळे । कामना गळे कल्पना जळे ॥

ब्रह्म आकळे अनमऊ कळे । मोक्ष तेधवां तुजला फळे ॥६॥

देखणें सरे देख ते नुरे । दरशन मुरे शब्द वोसरे ॥

अनभउ जिरे वृत्ति हे विरे । वृत्तिवीण ते मुक्ति वावरे ॥७॥

ध्यान तें बुडे ज्ञानही उडे । भेद वीघडे अभेद न घडे ॥

मोक्ष तो खुडे सुख वोसंडे । सहज केशवीं स्थिती मागिलें कडे ॥८॥

० पद १५४ वें

निरंजनी केलें घर ॥ बरवें चिद्रुप बिढार ॥ध्रु॥

तेथें अखंड आम्हा थारा ॥ जेथें नाहीं येरझारा ॥१॥

ज दृश्याहुनि परतें ॥ सर्व ० पदांहुनि वरुतें ॥२॥

म्हणे केशव अमुचें धाम ॥ जगविख्यात आत्माराम ॥३॥

० पद १५५ वें

जेथें येणें जाणें नाही ॥ तेथें आमची मिरासी पाही ॥ध्रु॥

बरवें निरंजनपूर ॥ तेथें बांधिले आम्ही घर ॥१॥

नित्यसुखाचा सुकाळ ॥ नाहीं कल्पांती दुकाळ ॥२॥

केशा म्हणे जया गांवीं ॥ असे एकलाचि गोसावी ॥३॥

० पद १५६ वें

स्वानंद सागरामाजी उडी म्यां घातली आजी ॥

म्हणोनी लोपली माझी मीपणमुद्रा ॥ध्रु॥

स्वानंदावांचुनि कांही दुसरें उरलें नाहीं ॥

सर्वही स्वानंदडोही विरोनि गेलें ॥१॥

स्वानंदे स्वानंद जोडी स्वानंदे स्वानंद प्रौढी ॥

स्वानंदे स्वानंदगोडी घेइजे सदा ॥२॥

स्वानंदे स्वानंद दाटे, स्वानंदे स्वानंद आटे ॥

स्वानंदा स्वानंद भेटे केशव म्हणे ॥३॥

० पद १५७ वें

निंदा आणि स्तुती दोन्ही ॥ न देखे नाईके कानीं ॥

अति मुक्त होउनी ॥ राहिला स्वानंदघनीं ॥१॥

तोचि ब्रह्मयोगी । ब्रह्मसुख तोचि भोगी ॥

परब्रह्म श्रुति जगीं ॥ म्हणती तया ॥ ध्रु

परा आणि पश्यंती ॥ मध्यमेसी भारती ॥

ग्रासुनी सहजस्थिती ॥ डुल्लतेस महामती ॥२॥

भोग्य-भोक्ता-भोग जाण ॥ जेथें जालें अप्रमाण ॥

तेंचि ० पद निर्वाण ॥ केशव म्हणे ॥३॥

० पद १५८ वें

हृदयदेवुळामाजी ॥ देव म्यां देखिला आजी ॥

म्हणवुनि मति माझी ॥ अतिगती पावली ॥ध्रु॥

देखिला देखिला देवो ॥ देवें हा ग्रासिला देहो ॥

याहि हेतुलागीं ठावो ॥ निजानंदीं न दीसे ॥१॥

गुणातीत निरंजन ॥ आदिनाथ सनातन ॥

तयाचे चरणीं मन ॥ सुलीन जालें हो ॥२॥

त्रिपुटी आटली जेथें ॥ विश्रांति पावलों तेथें ॥

संपूर्ण भेटला मातें ॥ केशव स्वामी ॥३॥

० पद १५९ वें

देहीं देव भरला ॥ हा अहंभाव सरला ॥

श्रम माझा हरला ॥ देवराव देखतां ॥ध्रु॥

काय सांगू नवलाव ॥ प्रत्यक्ष देखिला देव ॥

देवाचिया दाटनी ॥ देहा झाली आटनी ॥

देशकाळ-वांटणी ॥ कैंची आतां वो ॥२॥

केवळ निष्कळ जाणा ॥ परिपूर्ण देवराणा ॥

भेटला सद्गुरु खुणा ॥ केशव स्वामी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP