सकळ संतसमुच्चय मंडण । अखिळ संशयकारण खंडण ॥
अमळ बोध धनोदय भास्वता । नमो नमोजी नमो निजशाश्र्वता ॥१॥
सुखाचा विभागीच हा लोक पाही । तरी त्या विभागासी नेघेचि कांहीं ॥
महामुक्त होवोनि संसार भोगी । महाराज कैसा म्हणे मी अभागी ॥२॥
सुखें बैसला तो भ्रमे देश नाना । तसें आत्मयालागिं हे जन्म जाणा ॥
असे नेणती जन्म त्याचा वृथा कीं । वृथा दाविती व्युत्पतीची पृथा कीं ॥३॥
गुरु मीचि हें सर्वथा मानती हो । गुरु अद्वयानंद ते नेणती हो ॥४॥
असोनियां सर्व जनांत पाहीं । जनांत हा वास जयास नाहीं ॥
जनांत तो सर्व जनांत जाला । अनंत हे बोलति वेद त्याला ॥५॥
समागमें संग हरूनि नेतो । अपार हा आत्मप्रकाश देतो ॥
तो सद्गुरु-देव-हिरण्यरेता । विलोकितां भस्म भवादि चिंता ॥६॥
काळासि जो भस्म करूनि टाकी । सूर्यादिकां आत्मप्रभेंचि झांकी ॥
तो अंतरीं राम हिरण्य-रेता । म्यां झांकिला संतदया न होतां ॥७॥
देतील जे पूर्ण अनंतदीक्षा । त्याचे ० पदीं चित्त निवांत रक्षा ॥
घेवोनियां तत्त्वविचार-भिक्षा । अलक्ष मी केवळ हेंचि लक्षा ॥८॥
विश्रांति जो पूर्ण शुकादिकांची । जो माउली मुख्य चतुर्मुखाची ॥
हरी-हरा वंद्य विभूति ज्याची । मी लाधलों सर्व दया तयाची ॥९॥
श्रुतीं गायिला जो मुनीं ध्यायिला जो । बळी भूवनीं सर्वदा राहिला जो ॥
महासंकटीं द्रौ० पदी बाहिला जो । गुरुकृपेनें केशवीं पाहिला जो ॥१०॥
कळेना तपें जें व्रतें आकळेना । परातीत पैं साधनें वीवळेना ॥
महद्रूप तें दाविलें पूर्ण मातें । कसें वीसरावें तया सज्जनातें ॥११॥
भवांतका चित्सुख-दायकाची । उपासना सद्गुरु-नायकाची ॥
भावें तुम्ही सर्व भूतीं करा हो । अपार हे दुःख-नदी तरा हो ॥१२॥
मनमुळीं दृढ राघव संचला । जन करीं असतां दुरि वंचला ॥
कवण चालक हें न विचारिती । निगमवाक्य न मानुनि शीणती ॥१३॥
दया क्षमा वस्य जयासि होती । अवश्य ते मोक्ष० पदासि येती ॥
घेती सदा अक्षर सार गोडी । त्याचे करी पावनपाद जोडी ॥१४॥
रामचंद्र हृदयांबरवासी । प्रेमयुक्त भजशी तरि त्याशीं ॥
नित्य मुक्त० पद पावशि तेणें । गर्भवास न घडे मग घेणें ॥१५॥
रमाकांत येकांत साधूनि सेवा । ० पदीं चित्त निर्वात वेधूनि ठेवा ॥
अती शांत होउनि विश्रांति पावा । तुम्ही सर्वथा गर्भवेथा न पावा ॥१६॥
साधू-दया-पान सदा करा जा । ह१त्पंकजीं बोध-रवी धरा जा ॥
वेगीं वराजा निज-रामराजा । पादारविंदीं बरवे विराजा ॥१७॥
भवजाळिं पडलों मी गांजलों दुर्भरानें । त्रिगुण खळखळाटें लोटलों गोपुरानें ॥
सुखघन गुरु तेव्हां बाहिले आदरानें । धरुनि कर करानें तारिलें शंकरानें ॥१८॥
सुखघन गुरु मातें काय येउनि बोले । परम विमल ज्ञानें लोक म्यां मुक्त केले ॥
म्हणवुनि पद माझे वंदि सत्पुत्रराया । तरि तव ० पदवासी होय विश्रांति-जाया ॥
विषय-वमन त्यागी सर्वसंगी विरागी । कवळुनि हरिलागीं तो असे सानुरागी ॥
म्हणवुनि तनु भागा नातळे सर्वदा गा । करुनि त्रिविध यागा पावला चित्प्रयागा ।
करुनियां प्रेम-प्रदक्षिणा रे । अलक्ष तूं होय सुलक्षणा रे ॥२१॥
म्यां साधुचा आजि दुमाल केला । गळूनियां चित्त रुमाल गेला ॥
हे घातली माय उडीच तेथें । क्षरा-क्षरालागिं अभाव जेथें ॥२२॥
जेथें नसे भाव-अभाव कांहीं । जयासि हा नेमक ठाव नाही ॥
तया ० पदा संत बळेंचि गेले । अनंत हे वेद तयास बोले ॥२३॥
श्रुति म्हणे हरि तो परवाचा । लोक त्यासि म्हणती परवाचा ॥
याचिलागिं पडती भवजाळीं । शीघ्र त्यासि दुरि नेउनि जाळीं ॥२४॥
म्यां साधुचा केवळ संग केला । गळोनियां द्वैत-प्रसंग गेला ॥
जालों घनानंद मुकुंद वेगीं । बोले कवी केशवराज योगी ॥२५॥
सुखसागरीची लहरी असे मी । जगत्रयामाजि असतां नसे मी ॥
ममता न जाणे समता न जाणे । रमता स्वबोधें रमणीय नेणें ॥२६॥
नित्य संतचरणीं स्थिर राहों । तत्त्वबोध तरणीमय लाहो ॥
पूर्ण सर्व करणीं हरि पाहों । ब्रह्मभूत धरणीवरि आहों ॥२७॥
गुरुभक्तिचें प्रेम हें वीवळेना । महत्सौख्य तें सर्वदा आकळेना ॥
गुणातीत चिन्मात्र ऐसें कळेना । तया सर्वथा मोक्षवल्ली फळेना ॥२८॥
कर्मपाश हरुनी स्थिर होती । शास्त्रगर्भ धरुनी सुख घेती ॥
आत्मसंग धरुनी तरले ते । पूर्ण संत हृदयीं भरले ते ॥२९॥
क्षणभरी भजतां शिवराव रे । अणुभरी न दिसे तनुभाव रे ॥
मन गळे वितुळे भव-मंडळीं । निज० पदीं रमतो कवि तो बळी ॥३०॥
अमळ केपध्ह चिद्धन पाहतो । मतिविणा स्व० पदीं स्थिर राहतो ॥
नर नव्हे निज ईश्र्वर तो सये । किती वदूं महिमा वदतां न ये ॥३१॥
मृगमदतिलकाचा कोण हा चौभुजाचा । रतिपति मदनाचा नाथ लोकत्रयाचा ॥
मुकुटमणि सुरांचा सिंधु सर्वागुणांचा । हृदयहरुनिजांचा नेणवे अंत याचा ॥३२॥
गुरु० पदिं विनटाना कामसंगें विटाना । भवतरु निवटाना चित्त प्रेमें विटाना ॥
श्रुति मुळिं झगटाना राम आजी लुटाना । परतरि लिगटान कोटि जन्में।
सुटाना जरि कळे हरि केवळ माय । तरि लया ममता-मळ जाय ॥
मग गळै वितुळे भव-माया । सुखवधू मग होईल काया ॥३४॥
म्यां देखिले संत अपारकोटी । माझा सये स्वामि सुकाळ सेटी ॥
करूनियां वृष्टि सुखार्णवाची । केली सदा भेटि सदाशिवाची ॥३५॥
सत्संगतीं निर्द्वय पूर्ण जालों । ब्रह्मांड जाळूनि म्यां सर्व आलों ॥
माझीच म्यां केवळ राख केली । ते राखही आज उडोनि गेली ॥३६॥
संसार-दुःख हरणाप्रति शीघ्र आलों । वाक्यार्थ-चंद्र हृदयीं धरुनी निवालों ॥
जालों सदा परम निश्र्चळ आत्मयोगें । गेला लया त्रिविध मायिक शोक वेगें ।
संसार-ताप-शमना नमनार्थ आलों । वंदूनि पादकमळां तव दास जालों ॥
देउनि बोध बरवा निज देव दावी । ठेवुनि नित्य ० पदवी स्वसुखें बुझावी ॥३८॥
विलोकितां मूर्ति रमाधवाची । अरायणा वृत्ति कधीं जयाची ॥
पवित्र तो ज्ञानस्वरूप साधू । आराधितां सर्व भयासि बाधू ॥३९॥
प्रभाकराचा करही न पावे । न पावतां मारुतही स्थिरावे ॥
तया ० पदा संत समर्थ गेले । न बोलतां वेद विनोद बोले ॥४०॥
हा देह झाला नभ-चित्र ज्यासी । श्रुती म्हणे पूर्ण पवित्र त्यासी ॥
विचित्र हे सर्वही लोक पाहे । त्याची कथा ब्रह्मचरित्र आहे ॥४१॥
नारायणीं कां मन रंगवाना । पुनः पुन्हा काय भवासि वाना ॥
नाना-विद्या-दुःख हरावयासी । करा हरी मानस-क्षेत्रवासी ॥४२॥
घेऊनियां कृष्ण कडेसि वेगें । कडे पडे केवळ सानुरागें ॥
ते माउली गोकुळ नायकाची । विलोकितां प्राप्ति घडे सुखाची ॥४३॥
जो वाचवी सुस्वर बोध-पांवा । श्रुती म्हणे शीघ्र तयासि पावा ॥
तो कृष्णजी आजि बरा जपावां । तेणें तुम्ळी शोक कदां न पावा ॥४४॥
हटेंचि आम्हांसि प्रसन्न होशी । हटेंचि देशी निज-आठवाशी ॥
ऐसा हटी तूं गुरु देवराया । हटेंचि नेलें स्व० पदा वराया ॥४५॥
लेवूनियां चिन्मय-रत्न कानीं । मी बैसलों या ममता दुकानीं ॥
दिसे तरी रे सम ब्रह्म डोळा । होतों सुखी मी बहु वेळुवेळां ॥४६॥
उमापती आणि रमापती हो । निष्काम-योगें सम भासती हो ॥
यालागि नेणें अणु भेदभावा । जाला जगीं एक महेश ठावा ॥४७॥
शरण सकळभावें तूज आलों मुकुंदा । भवभय दुरि वारी सच्चिदानंद-कंदा ॥
कवळुनि भुजदंडीं पूंस माझें विखंडी । जवळुनि जगदीशा वेगळा तूं न सांडी ॥
निष्कामचक्र बरवें धरुनी करी रे । संसारचक्र श्रवणें, मननें हरी रे ॥
चिन्मात्रचंद्र हरि हा हृदयीं धरी रे । स्वाराज्य पूर्ण जगतीतळिं या करी रे ॥४९॥
साधूमुखें नित्य विचार केला । तेणें सये सर्व विकार गेला ॥
याकारणें पूर्ण आरोग्य जालों । वंदूं किती पाददळीं निवालों ॥५०॥
भवार्णवीं या सुखें तराया । मी लागलों सद्गुरुनाथ पायां ॥
तेणें सये वो बरवा निवालों । चिद्व्योमिचा मी निजचंद्र जालों ॥५१॥
जें पंचक्रोशाहुनिया निराळें । तें सर्व कर्णीं अति शीघ्र ल्यालें ॥
यालागि जाला निजलाभ मोठा । आला सये चिद्धनराम पोटा ॥५२॥
करूनियां सर्व विकार रक्षा । निज निर्विकारी असेचि लक्षा ॥
लक्षौंश मी केवळ हे परीक्षा । या घ्या तुम्ही केशवराज दीक्षा ॥५३॥
जगलोचनीं वेंचुनि लोचनासी । प्रकाशिलें पूर्ण भवलोचनासी ॥
विलोकितां त्या सम-लोचनासी । न पडे कदा हो जग लोचनासी ॥५४॥
चिदानंद गोविंद सेजेशि येना । अनिर्वाच्य कीं अंतरीं क्षेम दे ना ॥
परंधामिं आम्हांसि जितांचि ने ना । किती पालवूं शीणलों बोलवेना ॥५५॥
तुम्ही दयाळा मज वांचवा हो । विश्रांतिधामा नित सांठवा हो ॥
भवदुःखबाधा कदा न बाधी । घडे चिदानंद-० पदीं समाधी ॥५६॥
देहबुद्धि हरुनिया परता गे । सुखघना वरुनियां वरुता गे ॥५७॥
दया सद्गुरुची जया पूर्ण बाणे । मरीच्या जळा-सारखें विश्र्व जाणे ॥
म्हणोनी तया भेदक्रीया असेना । मनीं लक्षितां दृश्य डोळां दिसेना ॥५८॥
साधूमुखें राम निजआप्त केला । काळत्रयीं काम अतिदूर ठेला ॥
जीतां जीवीं भेद-भुजंग मेला । सच्चिद्धनीं पूर्ण कवी निजेला ॥५९॥
गुरुदया फळ जया अनयासी । शिवमय जगत्त्रय कळे त्यासी ॥
सुखघ्ज्ञनीं अति निश्र्चळ तो असे । क्षणभरी भजलियां अघ ना वसे ॥६०॥
अंगवात मुनिचा जरि लागे । चित्त आत्मश्रवणीं तरि जागे ॥
शून्य होय ममता मन रोधे । सर्व दुःख निरसे समबोधें ॥८६॥
प्रकाशुनी मंगळरूप वस्तू । करी सदा सर्व भयासि अस्तू ॥
ते सद्गुरु चिन्मय-चंद्रमा हो । क्षणाक्षणा आत्मसुखें नमा हो ॥८७॥
विशेष माया ममता लई हो । जे तिष्ठती सज्जन आलयीं हो ॥
ते ग्रासिती शोक क्षया-विरामा । विलोकिती मंगळधाम रामा ॥८८॥
शुभकथा करुनी हरीची सदा । कवळुनी असती हरिच्या ० पदा ॥
म्हणवुनी बरवी मुनिची सभा । निरखितां प्रगटे सम चित्प्रभा ॥८९॥
मन विरे जंव चिद्धनसागरीं । तंववरी अति मज्जन तूं करीं ॥
तरि सरे भवबंधन-यातना । निजसुखें निवशी मग सज्जना ॥९०॥
यथार्थ जे आत्म० पदासि गेले । ते संत म्यां प्राणसखेचि केले ॥
यालागिं मीं केवळ ब्रह्म जालों । क्षणाक्षणा तें गुज काय बोलों ॥९१॥
विलोकिता नंदकुमार-पायां । गेला सये सर्व कुमार वांया ॥
हें गर्जती सारश्रुती कुमारी । अथवा विबोधें तरणी कुमारी ॥९२॥
सोडुनि माया-मय गोमयासी । विचारिलें नित्य निरामयासी ॥
यालागिं मी शोकभयासि नेणें । जालें निजानंद० पदासि येणें ॥९३॥
ज्याहुनि तों आणिक जोडि नाहीं । तो जोडिला राघव नित्य पाही ॥
त्याची करी पावन पादजोडी । घेसी सदा अक्षर सार गोडी ॥९४॥
ज्याचें अतीपावन वाक्य मोठें । हृत्पंकजीं रंध्र करील नेटें ॥
त्याचे ० पदीं वास करूनि राहें । विश्रांतिचे होशिल धाम पाहें ॥९५॥
प्रभा करी बोधरवी जयासी । महाकवी वेद म्हणे तयासी ॥
भवार्णवीं तारक तोचि पाहीं । त्यावेगळा आणिक देव नाही ॥९६॥
आत्माचि हा मीचि विचार केला । याकारणें सर्व विकार गेला ॥
यालागिं मी पावनरूप जालों । सच्चित्सुखें हो बरवा निवालों ॥९७॥
कळोनि बोलोनि गळोनि डोले । तो भेटतां दोष जळोनि गेले ॥
असें तसें त्यासि कसें म्हणावें । आत्माचि तो पूर्ण असे स्वभावें ॥९८॥
नित्यसंग करुनी हरिचा हो । सर्व शोक त्यजिला करिचा हो ॥
लोक वोक घरिचा दुरि केला । आत्मरूप कवि हा हरिखेला ॥९९॥
दयार्णवाच्या निजसार बोलें । सच्चित्प्रयत्नासि मुहूर्त केलें ॥
आलों सदोदीत आनंदठाया । यालागिं जाली नभपुष्प माया ॥१००॥
भवदया वदिजे किति बोलें । भवजळीं बुडतां भव केलें ॥
म्हणवुनी वदतों भव वाचें । मम क्रिया भव होउनि नाचे ॥१०१॥
मुनि जनीं भजि जें भवपाहीं । म्हणवुनी भव तयाप्रत नाहीं ॥
भवनिधी म्हणती श्रुति त्यासी । भवनदी तरती ० पदवासी ॥१०२॥
हरूनियां सर्वहि वासनेला । अत्यादरें सर्वहि वास नेला ॥
जाला क्षरी-अक्षर-धामवासी । त्याची दया तारक वासवासी ॥१०३॥
जाणोनियां कल्पितरूप वाचा । वाच्यार्थ मी केवळ हेंचि वाचा ॥
तेणें गुणें भेद रिपूं न ज्यांची । अखंड संप्राप्ति घडे अजाची ॥१०४॥
हरिकथा करितां मति रोधली । हरि० पदीं रमतां अति वेधली ॥
हरिसुखें भरली तरली भवीं । मिसळली मग केवळ केशवीं ॥१०५॥
सदा चिद्घनीं वृत्तिचा लोप केला । म्हणोनी सये साधुचा कोप गेला ॥
निमाला स्वयं पावला सत्० पदाशीं । अती वंद्य तो मोक्ष कैलासवासी ॥१०६॥
अचळ वढण केलें शांतिचें निश्र्चयासी । कठिण नखशरांचें मार संपूर्ण सोशी ॥
परम-विमळ योगी वर्णिला तोचि वेदें । अखिळ० पदिं विराजे सच्चिदानंद बोधें ॥१०७॥
तिळांजळी देउनि देहभावा । सच्चिद्धनीं पूर्ण केला रिघावा ॥
मी बद्ध ना मुक्त यथार्थ ऐसें । सकौतुकें हो बहु आजि हासे ॥१०८॥
भजन पंथ विचारें चालतां गोड वाटे । त्रिभुवन जनकासी चिंतितां प्रेम दाटे ॥
म्हणवुनि मन-गंगे लोट आला सुखाचा । नयनकमळद्वारें चालला पाट साचा ॥१०९॥
जो चिंतितां पावन सर्व दोषी । नव्हेचि तो देशिक एकदेशी ॥
घेशी निकें मंगळ नाम त्याचें । होसी सुखें अक्षरधाम साचे ॥११०॥
विवेक-इंद्रा हरि देवराया । प्रबोध - रुद्रा हरि सर्व माया ।
सच्चित्समुद्रा मज भेटि आतां । अनंतचंद्रा कर ठेवि माथां ॥१११॥
देऊनियां चित्सुखमाणिकाला । मागोंचि नेदी मज आणिकाला त्या ।
सेवितां सत्यप्रमाणिकाला । प्रमाण नाहीं मनादिकांला ॥११२॥
राहोनियां ज्ञ नसरोवरीं हो । महत्सुखें हंस क्रीड करी हो ॥
घेतो सदा निर्मळ मुक्त-चारा । देतो दिनाला मुनि शेष सारा ॥११३॥
संतुष्ट केलें मजपूर्ण जेणें । उत्तीर्ण त्याला गुणि केंवि होणें ॥
माझ्या सुखें मी मजलागिं नेणें । अपार हें दीनदयाळ देणें ॥११४॥
प्रकाशला राघव सर्व ठाईं । ठेवावया पाउल ठाव नाहीं ॥
यालागिं मी राम० पदींच नांदे । बोले कवी बोधरवी-प्रसादें ॥११५॥
प्रेमयुक्त करुनी मज राजी । तत्त्वसार गुरु सादर पाजी ॥
सर्वकाळ प्रगटे मजमाजी । याचलागिं मज पांचक बाजी ॥११६॥
कुमंडळीं लोक समस्त आहे । त्यामाजिं हा सज्जन देह राहे ॥
तरी नव्हे साच कुमंडळी तो । कुमंडळां मुक्त करी बळी तो ॥११७॥
त्रिभुवन-जनकाची मूर्ति मी पूर्ण आहें । म्हणवुनि रुप माझें सर्वदा मीच पाहे ॥
मजविण मज कांही दूसरें गुह्य नाहीं । कवि म्हणे दृढ माझें प्रेम माझ्याच ठायीं ॥११८॥
हृत्पंकजीं ठेवुनि साधकाला । मातापिता पूर्ण स्वयंचि जाला ॥
तो सद्गुरू भेटत नित्य ज्याला । भेटोचिना देह असोनि त्याला ॥११९॥
स्वबोधें जया बाणली आत्मदीक्षा । तया योगियाचे सदा शेष भक्षा ॥
अहर्नीश त्याचे मनीं पाय लक्षा । कवीराज ऐसी करी रामरक्षा ॥१२०॥
सांडूनियां वृत्ति कलत्र वेगीं । परांगना निर्भयरूप भोगी ॥
महासुखें भेद गिळोनी डोले । तो मस्करी वेद समर्थ बोले ॥१२१॥
पुत्रत्व त्यागोनि पिताचि झाला । कळत्र मातेसि करूनि ठेला ॥
त्या योगभ्रष्टासि कसें भजावें । भजेल तेणें तैसेचि व्हावें ॥१२२॥
अहेतुक सर्वदा जो ब्रह्मचारी । तयाच्या घरीं तिष्ठती चारि नारी ॥
दया-शांति-विश्रांति-सद्भक्ति बाळा । तिहीं लाविला संग या निष्कळाला ॥
चुडाला तथा देहुती आणि गार्गी । मईत्री जगी कर्कटी चिद्विभागी ॥
जगत्पावना मदलसा गोपवामा । तयाचीं ० पदें चिंतितां मोक्ष आम्हां ॥१२४॥
हरा शोक सेवूनियां शास्त्रसारा । करा नाश वेगीं भवा दुर्निवारा ॥
धरा इंदिरानाथ-पादाब्ज माथा । तरा घोर मायार्णवामाजि आतां ॥१२५॥
भगभग करितांही प्राप्ति नाहीं भगाची । तगतग अति वाढे सौख्यहर्ती जगाची ॥
परम विकळ होती नेणती पूर्वदत्ता । निजगति अविचारें मानिती व्यर्थ चिंता ॥
सदा अच्युतानंत चिंत्तींच बांधे । जगीं अक्षयानंद होउनी नांदे ॥
न बाधी कदा त्यासि माया उपाधी । उपाधीक हा त्यासि जाली समाधी ॥१२७॥
सदा आठवीतां रतीनाथपीता । सदा सेवितां शास्त्र-सारार्थ गीता ॥
सदा सत्० पदां सेवितां त्रुप्त होती । सदा चिंतितां देव हातींच देती ॥१२८॥
मिळोनियां चित्सुख-संगमासी । जे त्यागिती स्थावर-जंगमासी ॥
त्या जंगमा लागुनियां भजावें । या संगमापासुनि मुक्त व्हावें ॥१२९॥
ज्याकारणें तिष्ठति नाकवासी । जो साधितां हा भवसंगनाशी ॥
त्या संगमीं संगमरूप होशी । या चूकशी स्थावर जंगमासी ॥१३०॥
हे हस्त कीं हस्त जया नव्हे ती । हे पाद कीं ज्यास अपाद होती ॥
हा देहही ज्यास विदेह झाला । अदेह तो देह धरूनि आला ॥१३१॥
आले जरि सज्जन देहगांवा । घेती तरी ब्रह्म० पदीं विसांवा ॥
जाले स्वयं-चित्सुख-सार ते कीं । केलें तया मानव मूढ लोकीं ॥१३२॥
साधूसि जो मानवरूप पाहे । श्रुती म्हणे दानव तोचि आहे ॥
भोगी भवीं गौरव शोककारी । नेणें हरी चित्सुख निर्विकारी ॥१३३॥
अमळ मन करावें प्रेम रामीं धरावें । अखिल भय हरावें संतसंगीं तरावें ॥
परम० पद वरावें तत्त्वसारीं विरावें । मितुंपण विसरावें चित्सुखें वीचरावें ॥१३४॥
नये प्रार्थितां इंदिरा मंदिरासी । हरीचिंतनीं सर्वदा प्रीति ज्यासी ॥
अधस्वीत ज्याच्या घरीं नित्य जाली । हरीपाद० पद्मांसि तेणें मिळाली ॥१३५॥
मती साधुच्या पाद० पद्मीं अधस्वी । करी तो जगामाजि मोठा तपस्वी ॥
यशस्वी तयासारखा आन नाहीं । अतिक्रांतता पावला याच देहीं ॥१३६॥
भुतीं भावना पावला ईश्र्वराची । गती राहिली त्रीविधा मंदिराची ॥
अतीमुक्त तो पावला तृप्त जाला । जनीं वर्ततां आत्मसद्मासि आला ॥१३७॥
निर्वाह तो पूर्ण असेचि नाकीं । याकारणें कष्टविती मना कीं ॥
होणार तें अल्प चुकोचि ना कीं । वृथाचि कां ठेविति प्राण नाकीं ॥१३८॥
ज्याच्या भयें काम दिगंत सेवी । ज्याच्या ० पदीं शांत समस्त गोवी ॥
समर्थ ते संत अनाथ-बंधू । विलोकतां आटत शोकसिंधू ॥१३९॥
जयालागिं हा संग कांही न साहे । असंगा तया सर्वसंगीचि पाहे ॥
न बाधी कदा त्यासि संसार-बाधा । सदा पावला चित्० पदा निर्विवादा ॥१४०॥
सदा संचला पूर्ण ब्रह्मावबोधें । करी राज्य हें सर्वभूतीं अभेदें ॥
परब्रह्म तो मानवांमाजि जाला । तया चिंतिता मोक्ष हातासि आला ॥१४१॥
विमुक्तता साधुनि कर्म जाळी । महासुखें नांदति सर्वकाळीं ॥
वर्णाश्रमीं आश्रम शून्यकिर्ती । श्रीपाद ते वंदिती ब्रह्ममूर्ती ॥१४२॥
वर्णाश्रमीं आश्रम शून्य जाले । ते आश्रमा लागुनि संत धाले ॥
जाळें स्वयं-व्यापक ब्रह्म तेणें । अपार हें संत० पदाब्ज देणें ॥१४३॥
अहंभाव ग्रासुनि विज्ञानयोगें । भजा जानकीचा पती राम वेगें ॥
नका कल्पना वाढवूं मोह सोडा । सखा सर्वदा अच्युतानंत जोडा ॥१४४॥
सदा सच्चिदानंद डोहीं बुडाला । स्वबोधें नसे नांवरूपासि आला ॥
जगत्पावन देहकर्में तयाचीं । मुखें वर्णितां प्राप्ति महासुखाची ॥१४५॥
फुटे कुपीका कल्पना नाममात्रें । तया सद्गुरुची निजानंद स्तोत्रें ॥
क्षणार्धें पढे तो चढे मोक्षधामा । गुरुभक्तीचा नेणवे पार आम्हां ॥१४६॥
जडाजडीं राम दिसे जयाला । हा नाथिला भेद नसे तयाला ॥
नयौनी तो नामरूपासि आला । स्वयं-प्रकाशी म्हणती तयाला ॥१४७॥
संसार हा सम्यक सार आहे । असार हे मानिति लोक पाहे ॥
याकारणें जन्म अपार घेती । हें जाणती ते श्रुतिसार होती ॥१४८॥
अनुग्रहो पूर्ण करूनि मातें । प्रकाशिलें तत्त्व अनाथ-नाथें ॥
तेणेंचि मी तत्त्वस्वरूप जालों । अनाथ होउनि निवांत ठेलों ॥१४९॥
अनाथ हें नाम जयासि साजे । अनंत ते सज्जन नाथ माझे ॥
निवांत मी होउनि त्यांसि सेवीं । तों हारपे मीच अनंत देवीं ॥१५०॥
संसार हा सर्व हरावयासी । संसारनिष्ठाप्रति शीघ्र येसी ॥
संसार निर्दाळुनि निश्र्चयेसी । संसार तूं केवळ पूर्ण होशी ॥१५१॥
हृत्पंकजीं मंगळ दीप लावी । समग्र हें मगळसार दावी ॥
तो सद्गुरु मंगळमूर्ति पाहे । त्याचे ० पदीं मंगळरूप राहे ॥१५२॥
लावूनियां मंगळ दीप देहीं । देहीं सदा दाखविला विदेही ॥
त्या मंगलानंद महेशदेवा । हृत्पंकजी भेद हरूनि ठेवा ॥१५३॥
सदा सादरें बैसती संतपंक्ती । सदा अंतरीं लक्षती संतमूर्ती ॥
सदा सत्० पदीं पावती नित्य तृप्ती । सदानंद कीं तेचि संपूर्ण होती ॥१५४॥
विस्ताराला राम समस्त लोकीं । हें जाणिजे पावनरूप लोकीं ॥
तें सर्व लोकांहुनि कां निराळें । नसेत हे लोक तया निराळे ॥१५५॥
संपादुनी भूतदया मनीं हो । जे सेविती भूतपती जनीं हो ॥
ते नेणती मायिक भूतवादा । त्यांच्या मुखें जाइल भूतबाधा ॥१५६॥
महाकल्प गेले तरी तो न मोडे । असा दीर्घ संसार ज्याचेनि मोडे ॥
तया देशिका देवरायासि भावें । विना देशकाळें सदा आठवावें ॥१५७॥
कपाळीस जो आवडे सर्वकाळीं । तयाचीं ० पदें वंदिलीं म्यां कपाळीं ॥
म्हणोनी स्वयं मीच जालों कपाळी । कपाळी असोनी नव्हे भूतपाळी ॥१५८॥
सच्चिद्धनीं नित्य निवांत होती । ० पदो० पदीं आत्मसुखासि घेती ॥
श्रुती म्हणे तारक संग त्यांचा । जितांच या भंग करी भवाचा ॥१५९॥
स्वबोधेंचि हा वासना-भंग केला । जनीं वर्ततां संग सांडूनि गेला ॥
नसे कल्पना-कामिनीचा समंधू । परिव्राज तो अद्वयानंद-सिंधू ॥१६०॥
देऊनिया तारक वाक्य दीक्षा । बोधे करी पातककोटि रक्षा ॥
दावी घनानंदस्वरूप डोळां । तो आठवी सद्गुरु वेळुवेळां ॥१६१॥
संसार-बंदीहुनि सोडवीलें । सच्चित्सुखें केवळ तृप्त केलें ॥
तो आठवा नाथ अनाथ-बंधू । वाचस्पती अद्वयबोध-सिंधू ॥१६२॥
अपार हें पुण्य फळासि आलें । साधूकरीं पिंडप्रदान जालें ॥
गेलें लया पातक पंचघा हो । जालों सुखी आत्म० पदीं सदा हो ॥१६३॥
गुरु० पदीं मन सादर वाहा । जिवदशा हरुनी शिव पाहा ॥
निजसुखें अति निश्र्चळ राहा । मग कदा नलगे भवदाहा ॥१६४॥
विलोकितां सद्गुरुपाद-० पद्मां । येती दया-शांति मिळोनि सद्मा ॥
० पद्मा शिरीं पादसरोज वाहे । तो ० पद्मनाभीस मिळोनि राहे ॥१६५॥
विलोकितां पाय अपाय गेले । उपाय ते सर्वहि दूरि ठेले ॥
हें पावलें चित्त अचिंत ठायां । गेली लया पादजळींच माया ॥१६६॥
अकस्मात हा मंदिरा राम आला । मनोवृत्ति हें बैसणें पूर्ण धाला ॥
नका वेळ लावूं उठा शीघ्र आतां । जगन्नायकाचें धरा पाय माथां ॥१६७॥
सदा भारतीं चित्त ठेऊनि राहे । जनीं एकला भारती कांत पाहे ॥
म्हणे भारथी नेणवे अंत त्याचा । महाभारतीं वर्णिला तोचि साचा ॥१६८॥
शोधूनियां सर्वहि आगमातें । जे साधिती आत्मसमागमातें ॥
तें भेटलें आगमीं आजि मातें । मी पावलों केवळ चित्सुखातें ॥१६९॥
अत्यंत जो आरुढ होय कामा । त्रैलोक्य हें भासत त्यासि वामा ॥
तैसाचि जो आरुढ बोधवृक्षीं । अलक्ष तो सर्वही एकलक्षी ॥१७०॥
बसोनियां केवळ बोधवृक्षीं । त्रिकाळ जो आम्रफळासि भक्षी ॥
तेणें फळें साधकवृंद रक्षी । श्रुती म्हणे तारक तोचि पक्षी ॥१७१॥
पक्षांतरापासुनि मुक्त जाला । विपक्ष पक्षें बरवा उडाला ॥
तो सद्गुरु अद्वय रामपक्षी । स्वपक्ष देऊनि दिनासि रक्षी ॥१७२॥
देऊनियां बोध महेश दावी । महेश दावोनि समाधि लावी ॥
समाधिचें सार करूनि ठेवी । सभाग्य त्याचे ० पदरेणु सेवी ॥१७३॥
महेशासि सेवूनियां भेद भंगी । नव्हे कर्म संगीचि तो कर्मसंगी ॥
असंगी अभंगी अनंगी असे तो । असे तो नसे तो असा तो नसे तो ॥१७४॥
बरी भाकरी अंतरीं सर्वदा हो । हरी कल्पना पावती सत्० पदा हो ॥
गुणातीत जो अद्वयानंददाता । मनीं चिंतितां तत्त्व आलेंचि हाता ॥१७५॥
सर्वकाळ भजती गुरुनाथा । त्यासि नम्र करि शंकर माथा ॥
पादपांसु अतिवंदित धाता । वेद वर्णित कथामृत-गाथा ॥१७६॥
सर्वकाळ जपतां हरिनामा । सर्वकाळ फळला हरि आम्हा ॥
सर्वकाळ हरिचे ० पद लाहो । सर्वकाळ हरि होउनि आहों ॥१७७॥
सर्वकाळ रमतां हरिसंगीं । रंगमूर्ति भरला हरि अंगीं ॥
अंगभेद सरला हरिसंगीं । संगभाग हरला मतिभंगी ॥१७८॥
दयासागराची दया ज्यासि जाली । स्वबोधें प्रवृत्ती तयाची निमाली ॥
महत्प्राप्ति तो पावला मुक्त जाला । स्वरूपार्णवीं सर्वकाळीं विराला ॥१७९॥
धरीना कधीं प्रीति जो क्रोधकामीं । करी वास विश्रांति घेउनि रामीं ॥
घड्या औठ तेणेंचि पैशून्य केल्या । तयाच्या मती मोक्षसद्मासि गेल्या ॥१८०॥
भजे ० पद्मनेत्रासी सोडुनि सद्मा । सुखालागिं त्याचा करी संग ० पद्मा ॥
अती वंद्य तो ० पद्मजालागिं जाला । धरी ० पद्मनाभी शिरीं नित्य त्याला ॥१८१॥
तोडुनि मायामय पाश नाना । करी सदा अमृत सार पान्हा ॥
ते माउली घालित ज्यासि पान्हा । या गोपुरीं केवळ तोचि कान्हा ॥१८२॥
ठेवुनियां हात शिरावरी हो । दावी हरी येक निरंतरीं हो ॥
एकांत हा नित्य करूनि त्यासी । म्यां साधिली आत्म० पदीं मिरासी ॥१८३॥
० पद ६६५ वें गोपी गीतेची चाली
निकट अंतरीं चिंतितां हरी । विकट शोक हा नासला तरी ॥
द्वैत-दैन्य तें पळतसे दुरी । कल्पवृक्ष हा फळतसे घरीं ॥१॥
० पद्मनेत्र जो नंदपुत्र जो । काम-शत्रुचा पूर्ण मित्र जो ॥
भक्तामानसा दानपात्र जो । आठवा हरी सौख्यमात्र तो ॥२॥
चिंतितां हरी शोक संव्हरी । चिंतितां हरीदास उद्धरी ॥
चिंतितां हरी मुक्त तो करी । चिंतितां हरी सर्वही करी ॥३॥
चिंतितां हरी वासना सरे । चिंतितां हरी कल्पना हरे ॥
चिंतितां हरी द्वैत वोसरे । चिंतितां हरी चीत तें नुरे ॥४॥
चिंतितां हरी पाप भंगलें । चिंतितां हरी कर्म खंगलें ॥
चिंतितां हरी चित्त रंगले । चिंतितां हरी ध्यान लागलें ॥५॥
रक्षिली धरा घेउनी सिरीं । तोचि गोकुळीं नांदतो हरी ॥
चित्त चोरुनी ध्यान तूं करीं । स्वामि तो नसे सर्वथा दुरी ॥६॥
संतसंगतीं मोक्ष साधला । संतसंगतीं राम लाधला ॥
संतसंगतीं भेद भस्मला । संतसंगतीं हेचि चित्कळा ॥७॥
संतसंगतीं संग सांडिला । संतसंगतीं रंग मांडिला ॥
संतसंगतीं काम राडला । संतसंगतीं राम भेटला ॥८॥
संतमानसीं इंदिरा वसे । इंदिरापती सर्वदा असे ॥
संगभंग ज्या सत्० पदीं नसे । त्यासि तो हरी अंतरीं दिसे ॥९॥
संतसंगतीं इंदिरापती । पाविजे असें वेद गर्जती ॥
शास्त्र० पद्धती हेच बोलती । सत्० पदीं घडे माधवीं गती ॥१०॥
बंध-सोडते संत भेटले । तत्कृपाबळें दोष आटले ॥
दाटला हरी अंतरीं सदा । चित्त पावलें अक्षया ० पदा ॥११॥
संतवीर ते तत्त्वधीर ते । ज्ञानचंद्र ते आठवा मनीं ॥
शास्त्रसार ते माक्षद्वार ते । निर्विकार ते वर्तती जनीं ॥१२॥
आर्त-बंधु ते प्रेमसिंधु ते । विश्र्ववंद्य ते लीन चिद्घनीं ॥
संगहीन ते भेदशून्य ते । ब्रह्मपूर्ण तें संचले मुनी ॥१३॥
संतसंगतीं पारधी करूं । चित्त-पांखरूं चित्सुख धरू ॥
कर्म-काननीं राहिला कसा । शीघ्र तो हरूं वासना-ससा ॥१४॥
गर्वशोर हा मातला सदा । सैर धावतां नावरे कदा ॥
नीट हात हा त्यावरी करूं । धीट होउनी त्यासि संव्हरूं ॥१५॥
भेद-पर्वतीं शोक-कंदरीं । अहंव्याघ्र तो गर्जना करी ॥
बोण-बाण हा वोढुनि विधी । त्यासि निर्दळूं हेचि पारधी ॥१६॥
काम वेणु हा रंक बापुडा । चंचळ मति अंतरीं कुडा ॥
तत्त्व गोळिचा मार चोखडा । देउनी हरूं प्राण रोकडा ॥१७॥
तत्त्व आकळे तत्वता जया । तत्त्व वेगळें नाढळे तया ॥
तत्त्वरूप तें वेद बोलती । चिंतितां ० पदें देव डोलती ॥१८॥
इंदिरापती राम भेटला । कामसिंधु हा सर्व आटला ॥
दाटला मनीं प्रेम वारधी । द्वैतभावना नाठवे कधीं ॥१९॥
याज्ञवल्किचा प्राण जो हरी । त्यासि जनकही अंतरीं धरी ॥
सेविजे जया तारकें सुखें । तत्० पदीं करा वास कौतुकें ॥२०॥
श्रेष्ठ जे बहु वंद्य या जनीं । व्यास-वाल्मिकादीक हे मुनीं ॥
चिंतिती जया चित्त सारुनी । तोचि आठवा आठवा मनीं ॥२१॥
नित्य मुक्त जो संचला हरी । तोचि राज्य या गोकुळीं करी ॥
आठवेविना आठवा तया । सर्वथा तुम्ही गोकुळा नया ॥२२॥
साधुचा तुम्हीं संग सांडिला । तऱ्हिच गोकुळीं भजा गोकुळातिता ॥२३॥
सर्व गोकुळें जेथ आटती । त्यास गोकुळीं संत भेटती ॥
सांगतां जगीं चोज हे बहू । पूर्णिमा पळे घेउनी कुहुं ॥२४॥
संतसंगतीं रातला सदा । द्वैतभावना नाठवे कदा ॥
पावला ० पदा अक्षया तया । सेवितां निवे नित्य चिन्मया ॥२५॥
ज्यासि आवडे नित्य इंदिरा । इंदिरा नये त्याचिया घरा ॥
ज्यासि आवडे इंदिरापती । त्यासि वोळगे इंदिरा सती ॥२६॥
इंदिरा घरीं राज्य हें करी । हेंचि अंतरीं भावना धरी ॥
इंदिरापती आठवा तरी । इंदिरा तुम्हा मस्तकीं धरी ॥२७॥
सर्व रूप जो संचला असे । त्याचिया ० पदीं सर्व हें नसे ॥
त्यासि गोकुळीं गोपिकामिनी । भोगिती सदा तृप्त होउनी ॥२८॥
त्याग भोग हा राहिला जऱ्ही । भोगिती हरी अंतरीं तऱ्ही ॥
धन्य काळ हा बोलती मुखें । मज्ञ होउनी डोलती सुखें ॥२९॥
जोडिला सखा इंदिरापती । त्या सुखापुढें इंदिरा किती ॥
भोगिती सदा अक्षया ० पदा । लाधली तया कृष्ण सं० पदा ॥३०॥
भाग्य आमुचें माय केव्हडें । लाधलें फुका ब्रह्म येव्हडें ॥
सांगतां जगीं सांकडें दिसे । अर्थ पाहतां वांकडें नसे ॥३१॥
ज्यासि वर्णिती ० पद्मजें शिवें । त्याचियां ० पदीं वेंचिल्या जिवें ॥
धन्य गोपिका विश्र्वतारका । पार हा नसे त्यांचिया सुखा ॥३२॥
ज्याचिया ० पदीं आटली परा । त्यासि भेटतां राहिली त्वरा ॥
भोगिती तया इंदिरावरा । धन्य या जनीं गोपसुंदरा ॥३३॥
मार मारुनी चिंतिती सदा । त्यासि जो हरी नातुडे कदा ॥
त्यासि भोगिती गोपिकामिनी । पादरेणु हे वंदिती मुनी ॥३४॥
ज्यासि लक्षितां दृश्य आटलें । तेंचि या जनीं पूर्ण दाटलें ॥
भेटले सदा संतसंतती । रंगता पदीं पांगळे मती ॥३५॥
॥गोपीगीतमस्तु॥