० पद ४९४ वें
साधु म्हणावें तयासी । नाहीं विषमता ज्यापाशीं ॥ध्रु॥
शत्रुमित्र आणि बंधु । ऐसा त्रिविध नाहीं भेदु ॥१॥
कृपा करणें जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥२॥
कामक्रोध लोभ चिंता । जेथें नुपजेचि सर्वथा ॥३॥
ज्यासी समत्व संपूर्ण । सर्वभूतीं कृपा पूर्ण ॥४॥
गुरुकृपें केशवीं पाहो । अनाथावरी विशेष स्नेहो ॥५॥