श्रीकेशवस्वामी - भाग २७

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


श्लोक

तूं तात माझा निजनाथ माझा । तूं देव माझा गुरुदेवराजा ॥

राजाधिराजा निजप्राप्तिकाजा । बोधें ० पदें वंदिन नित्य वोजा ॥१॥

सुरवरा भवहरा करि रे दया । श्रुतिपरा हरिहरा गुरुराजया ॥

निज० पदीं बसवुनी करि रे सुखी । म्हणवुनी सम० पदें धरिं मस्तकीं ॥२॥

० पद ६६३ वें - सवाया

हडयों लाविला देवकी कान्हयानें । कशी घेतली पाठिं ग कान्हयानें ॥

मला आणिलें वाजंग (?) फार यानें । असा थोट हा यासि मीं काय जाणें ॥

हा कपटी बहु यादव-राणा । अंतरिं मजला भोगितु जाणा ॥

बाहेर दाखवी बापुडवाणा । कळला कळला हा मज कान्हा ॥२॥

जरिं मीं याचें वदन न पाहें । तरि हा मजकडे दाटुनि पाहे ॥

एकलें देखुनि झोंबत आहे । नाव रे मजला करूं मी काय ॥३॥

भक्ति-विभागें निज अनुरागें । संत० पदीं मन ठेवुनि जागे ॥

मन्मथत्यागें अति वितरागें । केवळ मोक्ष० पदाप्रति लागे ॥

जाणिव मागें टाकुनि वेगें । बंधन छेदन साद्य न योगें ॥

सर्वहि योगें सर्व वियोगें । भोगि निरंजन अक्रिययोगें ॥४॥

जगभासक केवळ पाहतसे । जगभास कीं केवळ राहतसे ॥

जगभासक होउनि स्थीर असे । जगभासक हें जग त्यासि दिसे ॥५॥

मोक्षसुखामृत पान करी । हृत्पंकजिं अक्षय राम धरीं ॥

भवसागरतारक तोचि खरा । म्हणे केशव तत्० पदिं वास करा ॥६॥

भवतोय दिसे मृगतोय जया । कविराज म्हणे नसे देह तया ॥

अति नागर ते सुखसागर ते । मुनि शोभति सर्व ० पदांवरते ॥७॥

सोडुनि माइक सर्वहि कामा । आठविती भवतारक रामा ॥

सेविति चित्सुख मंगळधामा । केवळ ते नर शंकर आम्हां ॥८॥

तव चिंतन सांडुनि काय करूं । तुजवांचुनि अंतरिं काय धरूं ॥

तुजसारिखें आणिक सार नसे । हें नेणति पामर लोक कसें ॥९॥

हें मन प्रेमपरायण होउनि । संत घराप्रति धांवुनि आलें ॥

पाद-कमळजळ सेउनि निर्मळ । पावन होउनि नित्य निवालें ॥

पूर्ण-० पदीं अतितन्मय होउनि । नित्यनिरामय चिन्मय जालें ॥

केशव म्हणे विधिरहित विराजित । पूर्ण सदोदित म्हणुन निमालें ॥१७॥

निजप्राणसखा हरिराम कळे । भवताप तरी अति शीघ्र पळे ॥

मति शेष्ज्ञ अशेषहि सर्व गळे । कवि पूर्णपणें परिपूर्ण फळे ॥११॥

अतिचंडपणें नको बंड धरूं । नको चित्ततररू शतखंड करूं ॥

भवखंडळ मंडळ बोधनिधी । हें अठवी सज्जन प्रेमविधी ॥१२॥

अति धीटपणें किती बोलसि तूं । सुखवुतिवांचुनि डोलासि तूं ॥

जन मूर्ख बहु म्हणे वेद तूं तें । हरिवांचुनि ठेविती चित रितें ॥१३॥

धन-पुत्रमदें मुढ हांसतसे । परि काळ शिरावरि नाचतसे ॥

खळ ग्रासिल हा मग काय करी । मनिं आठविना दिनबंधु हरी ॥१४॥

कळिकाळ सदा शिरिं पाय धरी । हरि येउनि अंतरि राज्य करी ॥

तरि सद्गुरुसेवन पूर्ण करा । शिरिं लावुनि अक्षय बोधतुरा ॥१५॥

उन्मत्त भवगज मर्दि तरी जो । पंचानन गुरुराज बळी ॥

भेद-अभेद कृतर्क पशू हे । मांडिती त्यापुढें केंवि फळी ॥

शरणागत जग पाठिशीं घालुनि । जो सगळा कळिकाळ गिळी ॥

केशव म्हणे तो निजगुरु भजतां । विघ्न तया मग कोणी छळी ॥१६॥

पूर्ण स्थितीचा पूर्ण प्रकाशक । हृदयांबर गुरु बोधशशी ॥

उगवुनियां भवताप निवारित । असतूचि ग्रासित भेदनिशी ॥

अर्थ-चकोरा ज्ञानसुधारस । देउनियां करि तृप्त कशी ।

केशव म्हणे तो मनेंविण पहातां । सर्व ० पदांचा ठाव पुशी ॥१७॥

शास्त्र निकें दृढ शोधुनियां जिहीं । साधियलें निजतत्त्व जनीं ॥

जन-वन-वीजन सर्वहि कल्पित । पूर्णपणें जे प्रज्ञ मुनी ॥

त्रि० पदातित ० पद आपण होउनि । नित्य विराजित चिद्भगनीं ॥

कविराज म्हणे महाराज जगीं ते । बोधपरायण धन्य मुनि ॥१८॥

धन्य जनीं महाराज मुनी जे । निरखिति लोचनिं राम सदा ॥

शास्त्रमुखें निजबोधसुखें अणु । नेणति मानसिं भेद कदा ॥

ब्रह्मामदें अति उन्मत होउनि । डुल्लति नेणुनि देहमदा ॥

केशव म्हणे ते सद्गुरु आपण । यापरि पावले पूर्ण० पदा ॥१९॥

गुरुपणें गुरु गुरु करितील पाही । ते गुरु आपण न होतिल कांही ॥

गुरु केवळ ते निज निर्वाहीं । ज्यांमध्यें कांहिच गुरु गुरु नाहीं ॥२० पद॥

गुरुपण सांडुनि सहज निमाला । परमानंदीं परिपूर्ण निमाला ॥

तो गुरु आपण सहजचि जाला । हरिहर मस्तकिं वंदिति त्याला ॥२१॥

माइक हें अति दुःखरुपीं हो । फार कठिण निज शोक-द्रुमाचें ॥

जन्मलयाप्रति कारण केवळ । दारुण मंदिर मोह-भ्रमाचें ॥

जाळुनियां दृढ सर्वभुतीं तूं । पाहे मना रुप सर्व समाचें ॥

पावशि अक्षय सुख सर्व मग । खंडुनि मंडळ द्वैत श्रमांचें ॥२२॥

जाणिवेचें बळ सोडुनि केवळ । निष्कळ राघव चिंति मनीं ॥

दुस्तर हा भवसागर प्राशुनि । पूर्ण जनार्दन पाहे जनीं ॥

जन-वन-वीजन सर्वहि कल्पित । बोलति हा श्रुति अर्थ मुनी ॥

तोचि तूं साधुनि तन्मय होशिल । वंदिती तरि तुज देव तिन्ही ॥२३॥

बोधमहागज उन्मत देखुनि । पामर हे जड जीव पळाले ॥

आत्मसुखाप्रति होउनि उदाशिन । त्रिगुण झोंपडीमाजिं दडालें ॥

न येति पुढें अति कांपति चळचळ । या मोहमतीं बहु व्याकुळ झालें ॥

केशव म्हणे निजरूप न जाणोनि । व्यर्थचि या भवडोहिं बुडालें ॥२४॥

पामर हा जन हिरिहरि न म्हणे । व्यर्थ बुडे संसारजळीं ॥

धन-सुत-कामिनि दुःख न जाणोनि । सांपडला मुढ कामगळीं ॥

दुर्मातिचें बळ घेउनियां खळ । धांवोनियां पडे शोकशुळीं ॥

आत्मसुखा-प्रति अंतरला मग । नागवला हो तो समुळीं ॥२५॥

रति येक घडि धरि संत० पदीं ते । तोडुनि टाकिति पाश भवाचा ॥

वाक्य सुधारस श्रवण बिळीं दृढ । घालुनि नाशिति शोक जिवाचा ॥

मोक्ष० पदीं तुज बैसवुनी तो । भेटवती निजनाथ जगाचा ॥

चित्त विरे, मग तें सुख देतिल । संग धरीं अतिसादर त्यांचा ॥२६॥

सकळ सुखाचें सार सखे गुण । वर्णुं तयाचे कोण शके ॥

विधिहर भूधर पार न । पावति थकीत मुनिवर ते असके ॥

नामरुपातित ब्रह्म सदोदित । वर्णित निगमहि ते लटके ।

जाणुनि असें अंतरिं मौन्य धरि म्हणे । केशव हा तरि जन्म चुके ॥२७॥

भवभय-मोचन, ब्रम्ह सनातन । देखुनियां मन उन्मन होतें ॥

मंगळमय निजसार निरंतर । चित्त विरे रति पावोनि तेथें ॥

अद्भुतगति किति वदिजे तयाची । अंतरिं रिघोनियां जिव घेतें ॥

मीपण हरितें सुखरूप करितें । अपुलें आपण दर्शन देतें ॥२८॥

सज्जन नांदति जे भूमिवरी हो । ते भुमि देखुनि भ्रांति पळाली ॥

सज्जन सेउनियां जळ उरलें तें । जळ सेवुनि वृत्ति विराली ॥

सज्ज्नसंगति ज्या घडली ते । अवघीच मंडळी पावन जाली ॥

सज्जन तो हरि जाणुनि अंतरिं । चरणकमळीं मिठि धांवुनि घालीं ॥२९॥

मंगळधाम जे चिंतिति राम तयां । प्रति काम कदापि न बाधी ॥

पूर्ण सनातन तें ० पद पावोनि । भोगिति केवळ नित्यसमाधी ॥

जनन-मरण-भय कैंचें तयांप्रति । निर्दळिला तिहीं हा भवव्याधी ॥

आत्मसुखें सुखरूप निरंतर । तोचि समागम केशव साधी ॥३७॥

हें भवमंडळ खंडुनि सांडुनि । मुकुनि टाकि तूं चित्त मळाळा ॥

दंडुनि त्या मन राम सनातन । चिंतुनि साधिं तूं कामखळाला ॥

शोक विदारुनि मारुनिया मोहो । सेविं सदा निज साधुजनांला ॥

चित्सुख केवळ भोगिशी तूं मग । कवि म्हणे पावशि आत्म० पदाला ॥३१॥

धनसुत कामिनिची रति सांडुनि । सकळ जनांप्रति मंडण जाला ॥

ताडुनिया मद-मत्सरवारण । आशा मुंडण करुनि निवाला ॥

पंचानन हा भेद महाबळि । मर्दुनि आत्म० पदाप्रति आला ॥

केशव म्हणे सुखसागर तो गुरु । किंकर होउनि सेवि तयाला ॥३२॥

संतजनांप्रति देउनियां मन । चिन्मयधन जिंहीं साधियलें ॥

साधन बंधन रूप हें जाणुनि । सहजचि मग तें त्यागियलें ॥

त्यागणें भोगणें जें ० पदीं माइक । केवळ तें सुख भोगियलें ॥

वाच्य नसे परिपूर्ण निरामय । द्वैतदशाविण जाणवलें ॥३३॥

विश्र्व-गुरु-हरि चिंतुनि अंतरिं । सांडि मना तूं शोकभया ॥

राम० पदीं मति ठेवुनि सादर । साधिं निरंतर द्वैत जया ॥

जयविजयाचा नाथ रमापति । तत्० पदिं नेउनि चित्तलया ॥

लय-विलयातित सेवुनियां सुख । सर्व भुतीं करी तेचि दया ॥३४॥

जारण, मरण, स्तंभन, मोहन । उच्चाटन, वशिकरण तथा ॥

बंधनरूप हें सर्वही मायिक । कळलें लया निज बोधरता ॥

म्हणवुनि तें मन कोठें न घालुनि । सेवि निरंतरिं सर्वगता ॥

चित्सुख सागरिं हारपला हें । जाळुनिया भवशोकलता ॥३५॥

शांतिदया तुम्हि सत्वर साधा । संत० पदीं मन निश्र्चळ बांधा ॥

अद्भुत निजसुख होइल तेणें । न घडे कदा मग जन्मचि घेणें ॥३६॥

भस्म करी हरिनाम भवाप्रति । आठवितां निजभावबळें ॥

म्हणवुनि या जीविं सांठविजे हें । धोवुनि मानस प्रेमजळें ॥

ज्ञानसुधारस प्राप्त करी अंतरिं । चित्सुख तें सगळें ॥

केशव म्हणे तें वदतां नये मज । तन्मय करणें हें सकळें ॥३७॥

सद्गुरुनाथ ० पदांबुज मस्तक । वंदुनि हा भवताप पळाला ॥

काम तथा मद-मत्सर दारुण । घेउनियां अभिमान-मळाला ॥

कल्पनेचें बळ अनुभवि र्दुर्बळ । निर्णय-क्षणिं हा भेद जळाला ॥

चित्सुखसागर पूर्ण परात्पर । तेथचि तो निजभक्त मिळाला ॥३८॥

धनसुतदारा सकळ पसारा । सांडुनि करि तूं निज० पदिं थारा ॥

सेविं निरंतर चिन्मयसारा । कवि म्हणे पावशि रे परपारा ॥३९॥

सुखसागर केवळ संत पहा । ० पदपंकज सेवुनि स्थीर रहा ॥

भवसागर हा तरि शुष्क पडे । म्हणे केशव तत्० पदिं ऐक्य घडे ॥४७॥

दिनबांधव केवळ संत खरे । मनिं आठवितां भवताप हरे ॥

सुखसागरिं अंतरिं राम भरे । म्हणे केशव आणिक भान नुरे ॥४१॥

हरिनाम निरंतर बोलतसे । हरि सेवुनि अंतरिं डोलतसे ॥

हरि होउनियां करि वास जनीं । जन ग्रासुनि तो हरिरूप मुनी ॥४२॥

जगजीवन सेवुनि तृप्त असे । जग सर्व तया मृगतोय दिसे ॥

जगतारक केवळ तोचि जनीं । अति निश्र्चळ अद्वय रातमुनी ॥४३॥

हरिनाम निरंतरिं आठवती । हरिरूपहि अंतरिं सांठविती ॥

हरिनामविना दुजाभाव नसे । श्रुति सांगत तत्० पदिं मोक्ष असे ॥४४॥

हरिनाम निरंतर पाठ करा । मग संत० पदांप्रति वाट धरा ॥

सुखदायक तें पदिं मिळे । मनेंविण मनोरथ सर्व फळे ॥४५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP