० पद ६६६ वें
भेदबुद्धी सांडुनियां देइं रे । सद्गुरु वाक्यें आपणासि पाही रे ॥ध्रु॥
देव तूंचि सच्चिदानंदघन रे । असद्जड-दुःख ० पदें शून्य रे ॥१॥
सर्व तूंची हा अपवाद कोणा रे । तुजवीण दुसरेची असेना रे ॥२॥
आहे नाही शब्द न साहे तुज रे । शब्दातीत सत् केशव सहज रे ॥३॥
० पद ६६७ वें
तीही लोकांचा चालक विष्णु जाणा वो । तोचि जाला देवकिचा तान्हा वो ।
नवल बाई सांगुं मी आतां काई वो । विश्र्वजनिता देवकीस म्हणतो आई वो ॥१॥
ब्रह्मादीकां न कळे ज्याची लीला वो । तयाभोंवता गोपाळांचा पाळा वो ॥२॥
आत्माराम नातळे रूप नामा वो । तोची पुरवी गोपीकांच्या कामा वो ॥३॥
भक्तजन्म न दिसे परी तारी वो । संत केशव म्हणे यव्हडी थोरी वो ॥४॥
० पद ६६८ वें (धाटी - आन)
कळंबावरूनि ठाईं । उडी घातली यमुनाडोहीं । बुडाला म्हणती कृष्ण पाही ॥ध्रु॥
या गोपाळाचा महिमा कैसा कोण वाणी ॥१॥
कृष्णासी डंकावया । धाविन्नला काळिया । सांवळी तनु वेढी लवलाह्या ॥२॥
न वाढोनि वाढला कृष्ण । वेढा उकलिला जाण । मस्तक चेपीला पाईं पूर्ण ॥३॥
काळ्या-फणीवरी । सावळा श्रीहरी । आनंदें उल्हासें ।नृत्य करी ॥४॥
काळ्या-सुंदरा पाही । लागती कृष्णाच्या पाईं आहेवपण आम्हां देईं ॥५॥
पुंस धरूनि वाम फरीं । मध्यभागीं श्रीहरी । काळ्यासहीत आला वरी ॥६॥
पाहतां कृष्णाचें वदन । हरपलें मीतूंपण । संत केशव म्हणे ।हेंची खूण ॥७॥
० पद ६६९ वें
नंद यशोदा रोहिणी । आलिंगिला चक्रपाणी । स्वानंद सबाह्य निवोनि मनीं ॥१॥
या आनंदाचा महिमा कैसा कोण जाणे ॥ध्रु॥
गोपी-गोपाळा-मेळा । पडले कृष्णाच्या गळा । म्हणती जीवाचा जीव आला ॥२॥
गाईवत्सासहित । कृष्णचरण चाटीत । सुमनांचा वरुषाव देव करीत ॥३॥
दुंदुभी त्राहटील्या भ्ज्ञेरी । आनंद चराचरीं । घालती हुमली नानापरी ॥४॥
कृष्णाचें मुखकमळ । पाहतांची त्रिकाळ । संत केशव निश्र्चळ ॥५॥
० पद ६७० वें (कडके)
चेटपट चेटपट करता है । खटपटमें झटझट मरता है लटपटमें लपेट ज्यावेगा । तो बखत् तुज कौन छुडावेगा ॥ध्रु॥
इस बदल अंदेशकर अंदेशकर । दिल् मियाकुं दिल्में धर । जिकीर सुं सब फिकीर बीसर ॥ध्रु॥
खबर धर खबर धर मे रे भाई । ईस खबरमें मष्कुलसो जनकराजके जेवाई ॥२॥
संतनके दरबार प्रेमके महालमें । बोधके घ्ज्ञमघमटासुं तमतमाट
करतार हो तो सुख दुख बीसर ज्यावेगा । आनंदमें समावेगा । ईता भीस्त पावेगा ॥३॥
य स्वीनके हालमें । बंदगीके ख्यालमें । भेदकु छयांडदे । धनीकादि दारले ॥
कहत केशवराजकबी कबीका सीर ताज रबी । उस रबीकू पाया तो सहज के घर आया ॥३॥
० पद ६७१ वें
गुरुवाक्यें उर्ध शून्यीं घातली । मोतियांची वृष्टी तेव्हां डोळां देखिली ॥१॥
काय सांगुं बाइय वो नवल वीतलें । पाहतां पाहतां चित्त वीगुंतलें ॥ध्रु॥
आनंदाचा सडा अवघा होतसे जनीं । लोपलें आकाश गेली विरोनि मेदनी ।
सद्गुरुकृपें केशवीं पाहतां माय । सद्गुरु देखणा जालें करूं मी काय ॥३॥
० पद ६७२ वें
आजि दिन बाइ सोनयाचा भला । स्वामी माझा हृदय सेजीं आला वो ॥ध्रु॥
बाई, पुरले मनीचे मनोरथ । धनीवरी भेटला भगवंतवो ॥१॥
रूप पाहतां मानस माझें धालें । क्षेम देतां सर्वांग सुखी केलें वो ॥२॥
सद्गुरुकृपें केशवीं जाली भेटी । माहाराजीं पडली कसी मिठी वो ॥३॥
० पद ६७३ वें
आज मोरे घर आयो गोविंदराजा ॥ध्रु॥
शामसुंदर कमलापति गिरिधर । बाजत धीम धीम नामका बाजा ॥१॥
चंदनबिलेपित आंग सुहावत । भाल कस्तुरी माथा मुगुट बिराजीत ॥२॥
पीत पटधारी गोकुलविहारी । मदनमुरती प्राणनाथ मुरारी ॥३॥
भवदुःख-वारण कौंस-बिदारण । पतीत-तारण केशव नारायण ॥४॥
० पद ६७४ वें
मी काय जाणें ऐसें, होईल म्हणउनि बाई ॥ध्रु॥
मीपण निःशेष गेलें । तूंपण ग्रासुनि ठेले । माणुसपण तेंही नेलें वो ॥१॥
करूं नये तें केलें । नये त्या ठाया नेलें । निर्मूळ सौंसार येणें केलें वो ॥२॥
केशवाचा स्वामी हा वो । सर्वस्वें देवाधिदेवो । समुळ हरपला देहभाव वो ॥३॥
० पद ६७५ वें
आला आला गुरुराज माझा आला । आला आला त्रिभुवनपालक आला ।
आला आला निजसुखदायक आला । आला मजलागीं धांवत आला ॥ध्रु॥
हातीं बोधाचा भाला । प्रेमाची शील्ले ल्याला । स्वानंदें सज्जित पूर्ण जाला वो ॥१॥
शांतीचा मंदील शिरीं । धैर्याचा तुरा वरी । परिवार सुभक्त निज वीरी वो ॥२॥
नामाची फीरंग धरी । भक्तीची कठार बरी । वरुषत विज्ञान शरधारी वो ॥३॥
सायोज्यातुरंगीं चढे सत्त्वाचा रुमाल उडे ।अष्टभाव सेवक तयापुढें वो ॥४॥
कीर्तीचा दमामा वाजे । आनंदें ब्रह्मांड गाजे । मनेरथ पुरविल निज पैजें वो ॥५॥
तन्मयाची छत्र ढळे । स्वानंदें नीज मद गळे स्वानुभवें गर्जत निज बळें वो ॥६॥
काळाचा जबडा फोडी । सौंसाराचा मुळ तोडी । चरणस्पर्श सोडी बंधकोडी वो ॥७॥
भेदातें मारीला ठाइ । प्रपंच झोडीला घाई । शरणागत रक्षिता निजपाईं वो ॥८॥
दीनांचा पाठीराखा । भक्तांचा सारथी देखा । केशव म्हणे माझा निजसखा वो ॥९॥
० पद ६७६ वें
आरती कृष्णाची
सद्भाव निजभक्ती । आरती तुज गोपती । वोवाळु निजप्रेमें । इंद्रिय साक्षत्व मूर्ती ॥
नीरसे ताप तेणें । पावे विश्रांतिवृत्ती । विवळे आपेआप । होय स्वरूपप्राप्ती ॥ध्रु॥
आरती गोपती हे । तुज गोपाळराया । उजळितां निजप्रेमें । जाली तन्मय काया ॥१॥
स्वरूप शुद्ध तुझें । नीज नित्य निर्मळ । निश्र्चळ निष्कलंक । तेजोमय अखिळ । अंतर्बाह्य संचलेंसें ।
आपेआप केवळ । पाहतां दृष्टी निवे । मन होय पांगुळ ॥२॥
आरती निजतेजें । पूर्ण प्रकाश जाला । उजळितां आत्मदीप । देहभाव निमाला ॥
मीपण नुरे तेथें । शब्दब्रह्मीं विराला । केशविं गुरुकृपें । निःशब्द विसर्जिला ॥३॥
० पद ६७७ वें (श्र्लोक)
अहेतुक जो सर्वदा ब्रह्मचारी । तयाचे घरीं तिष्ठती च्यारी नारी ॥
दया-शांति-विश्रांति-सद्भक्ति बाळा । तीहीं लाविला संग या निष्कळाला ॥१॥
० पद ६७८ वें
संतांपुढे घालितां पिंगा । हाकुं नको ज्ञान डिंगा ॥ध्रु॥
घालितां पिंगा वो । देव येईल रंगा वो ॥१॥
निजबोधें निश्र्चळ राही । घाली पिंगा साधुसंगीं ॥३॥
गुरुकृपें केशवीं घालितां पिंगा । भेटि जाली आत्मलिंगा ॥४॥
० पद ६७९ वें
कर्माचें स्फुरण तेंचि ब्रह्मार्पण । अलंकारीं सुवर्ण जयापरी ॥ध्रु॥
ब्रह्म जाणोनियां सांडूं म्हणती कर्म । त्यांच्या आंगी जडलें अधिकचि कर्म ॥१॥
ब्रह्मेंसि कर्म वेगळें नाहीं । सांडी मांडी अवघी कल्पनेच्या ठायीं ॥२॥
सूर्येसीं मिरवे प्रभा, कीं प्रभेसी सूर्य उभा । तैसी ब्रह्मेंकर्में शोभा ब्रह्मासी ॥३॥
तेथें कर्मभ्रम हा कैंचा जाय । ब्रह्मचि सबाह्य उघडें नांदे ॥४॥
कर्माचें निजवर्म तेंचि निश्र्चल ब्रह्म । नेणोनि वाटे श्रम सज्ञानासी ॥५॥
गुरुकृपें केशवीं निजबोधाचें वर्म । सर्व ब्रह्म तेथें कैंचे वेगळें कर्म ॥६॥
० पद ६८० वें
त्यांसी ब्रह्मप्राप्ती दूरि झाली जाण । प्रमाणीं अप्रमाण गवसे कैसें ॥ध्रु॥
कर्मयोगें ब्रह्म पावों म्हणति एक । नित्य नैमित्तिक आचरती ॥१॥
सवप्रकाश वस्तु कर्में केंविं कळे । तमारी उजळे तमें कैसा ॥२॥
देहाचिये माथां गुणकर्मावस्था । तें देहचि मिथ्या स्वरूपीं झालें ॥३॥
मिथ्या देहिंचें कर्म तेणें आकळ ब्रह्म । तो स्वप्निचा भ्रम जागृती भोगी ॥४॥
ज्ञानाग्निदग्ध कर्माणि ऐसें बोले चक्रपाणी । कर्मासी ब्रह्मार्पणीं ठाव कैंचा ॥५॥
गुककृपें केशवीं आश्रमवर्णधर्मं । मिथ्या जाणोनि पाळी विहिताविहेत कर्म ॥६॥
० पद ६८१ वें
साधू तोचि ओळखावा । देव तेथेंचि पाहावा ॥ध्रु॥
जे कां रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले ॥१॥
ज्याशि आपंगिता नाहीं । त्यांसी धरी जो हृदयीं ॥२॥
जो कां अनथाचा बाप । दीन दयाळ सकृप ॥३॥
मृदु सबाह्य नवनीत । जैसें सज्जनाचें चित्त ॥४॥
म्हणे केशव सांगों किती । तोचि ईश्र्वराची मूर्ति
० पद ६८२ वें
व्यर्थ जन्मा आला तो । भूमिभार झाला तो ॥ध्रु॥
हरिचें नाम बोलेना । प्रेमसुखें डोलेना ॥१॥
भक्तिपंथें वागेना । संतचरणीं लागेना ॥२॥
विषयसंग भंगेना । केशविं मानस रंगेना ॥३॥
० पद ६८३ वें
तो मी लाभ सांगों काय । सांगों जातां वाचा राहे ॥ध्रु॥
माहेरासि धांवुनि आलें । मायबापें सुखी केलें ॥१॥
आलें सासुऱ्याच्या घरा । तंव बापचि भेटे खरा ॥२॥
म्हणे केशव दोहीं ठायीं । एक माहेर झालें पाहीं ॥३॥
० पद ६८४ वें
ऐसें बरवें कळलें पाहीं । देव-भक्तासी भेदचि नाहीं ॥ध्रु॥
देव चिंती तो देवासि पावे । देव पावे तो जन्म न पावे ॥१॥
देव संगीं तो देवासी भोगी । देव भोगी तो केवळ जोगी ॥२॥
म्हणे केशव त्याची गोडी भवबंधन अवघें तोडी ॥३॥
० पद ६८५ वें
संत जाती हरिजागरा । त्यांचे माचे माथां धरा ॥ध्रु॥
तरीच सार्थक जन्माचें । आणिक सांगावें कैचें ॥१॥
संतचरणीच्या पायतणीं । महापापा होय धुणी ॥२॥
संत बैसती निज छंदें । पुढे नाचावें आनंदें ॥३॥
केशव म्हणे मंगळधामा । संत सेवूं आत्मारामा ॥४॥
० पद ६८६ वें
लाडकि केली मज आवडती । मजवरी बाची बहु प्रीती ॥ध्रु॥
प्राप्ती-चुडो लेवविला । प्रबोध घडिघडि सेवविला ॥१॥
तन्मय-साडी नेसविली । चिन्मय-चोळी लेवविली ॥२॥
पूर्णानंदें गृहिं नांदें । केशव गुरु० पदिं निजछंदें ॥३॥
० पद ६८७ वें
आम्ही परीट बा चोखट । खुद्ध केले खटनट ॥ध्रु॥
बोण-साबण लाविला ठायीं । भेद-डागाचि उडविला पाहीं ॥१॥
देहबुद्धीचा काढूनि मळ । केलें सबाह्य निर्मळ ॥२॥
शांति-शिळेवरी धूतलें । ज्ञान-गंगेसी निर्मळ केलें ॥३॥
नामीं केशव चोखट झाला । पूर्ण ब्रह्मचि होऊनि ठेला ॥४॥
० पद ६८८ वें
आत्माराम सच्चिदानंदघन । जेथें तेथें भरला परिपूर्ण ॥ध्रु॥
अबब हें रूप मोठें । तिन्ही लोक गिळिले याच्या पोटें ॥१॥
तळींवरी स्वयंभ उगवला । उदय अस्तु कांहींच नाहीं त्याला ॥२॥
ज्ञान-मार्तंड स्वयें प्रकाशला । अंतर्बाह्य केशव देखियला ॥३॥
० पद ६८९ वें
निजानंदी जन रे । निजानंदघन रे ॥ध्रु॥
जीवनीं लिहिलीं मासोळी । नाहीं जीवनावेगळी ॥१॥
प्रळयानळीं तरू उगवला । तरी तोचि संचला ॥२॥
गगनपुष्पें झालीं पुष्कळ । तरी गगनची केवळ ॥३॥
घरभरी संतति निपली । तरी वंध्या एकली ॥४॥
आहे नाहीं शब्द न साहे । केशव स्वामिच आहे ॥५॥
० पद ६९० वें
बाई नवल मी सांगों आतां कैसें । निज पाहातां लागलें निज पिसें ॥ध्रु॥
निजरूप पाहातां डोळां माय । मन माझें भुललें करुं काय ॥१॥
जनीं वनीं विजनीं निज दिसे । त्रिभुवनी निज हें कोंदलेंसे ॥२॥
गुरुकृपें केशवीं निजभेटी । निज अववें कोंदलें पाठिपोटीं ॥३॥
० पद ६९१ वें
देहत्याग होतां त्यांचा । मग सगुण लाभ कैचा ॥ध्रु॥
चिदानंद-डोहीं । जे विरोनि गेले पाहीं ॥१॥
अवघें मायेसकट । हें ब्रह्मांड केलें गट्ट ॥२॥
म्हणुनि केशव म्हणे नयनीं । ते पाहा क्षणोक्षणीं ॥३॥
० पद ६९२ वें
गुरुभजन करितां आवडी । निजवस्तु तूं पावसि रोकडी ॥ध्रु॥
गुरुभजनें मावळे मीपण । मग आपुला गुरु आपण ॥१॥
म्हणे केशव सद्गुरुभजनीं । बुडी यालागिं द्यावि हो सज्जनीं ॥२॥
० पद ६९३ वें
काम नाहीं जेथें । श्रीराम नांदे तेथें ॥ध्रु॥
ऐसें पूर्ण कळे ज्यासी । तोचि माझी काशी ॥१॥
समूळ काम नासे । तैं सकळ राम भासे ॥२॥
केशव म्हणे राम । विण निरोप नाहीं कामा ॥३॥
० पद ६९४ वें
मोठा भाग्याचा मी पाहीं । मज ऐसा कोणी नाहीं ॥ध्रु॥
कोटी ब्रह्मांडाहुनि मोठा । राम आला माझ्या पोटा ॥१॥
अंग भरूनि राघव ल्यालों । सुखसागर शंकर झालों ॥२॥
म्हणे केशव केशवसंगें । संग निःसंग ग्रासुनि रंगे ॥३॥
० पद ६९५ वें
मेरा कान फुकाया बे । मुजे पेट में रखाया बे ॥ध्रु॥
निजानंद दिया बे । जनम सफल किया बे ॥१॥
प्याला बोधका पिलाया बे । केशवस्वामी मिलाया बे ॥२॥
० पद ६९६ वें
असतांही जीणें नाहीं साचपण । अंतींहि मरण नाहीं आम्हा ॥ध्रु॥
बोलतांहि जाण नाहीं बोलकेपण । न बोलता मौन्य नाहीं आम्हा ॥१॥
येतांही पूर्ण येणें नाहीं कोठुन । गेलियाहि गमन नाहीं आम्हा ॥२॥
बैसतांहि आम्हा बैसणें नसे कांहीं । ऊठल्या उठणेंहि नाहीं आम्हा ॥४॥
हालीचालीवीण आम्ही परिपूर्ण । केशवीं सौजन्य आमुचें आम्हा ॥४॥
० पद ६९७ वें
नवल ऐसें सांगों मी कैसें । सांगतां अपूर्व आपुलें पिसें ॥ध्रु॥
बाप ना माय, हात ना पाय । रूप ना रेख सांगों काय ? ॥१॥
असोनि न दिसे नसोनि असे । दिसतें परि कोठें न स्पर्शे ॥२॥
सकळां ठायीं भरलें पाहीं । केशवराजीं कांही नाहीं ॥३॥
० पद ६९८ वें
करूं देवाची स्थापना । स्थीर येथेंचि करूं मना ॥ध्रु॥
करा पौर्णिमा ये गांवीं । स्थापूं येथेंचि गोसावी ॥१॥
अधिष्ठानीं रंग भरूं । स्वयें तरोनि जग उद्धारूं ॥२॥
स्वयंभाचें स्वरूप पाहूं । म्हणे केशव येथेंचि राहूं ॥३॥
० पद ६९९ वें
दृश्य वैभव जाइल वायां । केला नरदेह येवढा ज या ॥ध्रु॥
किती गडबड करिसी वायां । लाग रमापतिच्या पायां ॥१॥
तुज निर्जर म्हणिजे वेदें । हें जाणसि ना निजबोधें ॥२॥
म्हणे केशव आनंदडोहीं । उडी घालुनि सुखरूप राहीं ॥३॥
० पद ७०० वें
संत केवढे कृपाळ । हातीं दीधला गोपाळ ॥ध्रु॥
पायीं ठेवितां कपाळ । केला चिद्रूप सुकाळ ॥१॥
निगमा न कळे महिमा ज्याची । मनेंविण भेटी केली त्याची ॥२॥
केशवस्वामी त्रिभुवनसार । पूर्णप्रकाश साचार ॥३॥
० पद ७०१ वें
ऐसें साचचि वाटेना । काय वेड लागलें मना ॥ध्रु॥
देह भाडियाचें घर । हें नेणती थोर थोर ॥१॥
हें नाशिवंत अंतीं । जाणुनिया त्याजिलें संतीं ॥२॥
केशविं गुरुकृपें पाहीं । हें आहे तैसें नाही ॥३॥
० पद ७०२ वें
वायां भगवी केली काया । देह विटंबिलें कासया ॥ध्रु॥
नेणोनिया तत्त्वसार । कां हा विटंबिला हा संसार ॥१॥
स्वरूपाचें नेणसि वर्म । कां हा वाढविला भ्रम ॥२॥
केशव म्हणे सोय धरीं । पाहें परतोनि अंतरीं ॥३॥
० पद ७०३ वें
तीर्था जाउनि हित काय केलें । तेथें मनहि चावरें झालें ॥ध्रु॥
जेथें जेथें धोंडापाणी । काय सांगसि तिर्थकहाणी ॥१॥
देई जाउनि तीर्थीं बुडे । मन धांवे विषयाकडे ॥२॥
भावें केशव चरण धरीं । सर्व तीर्थें राबति घरीं ॥३॥
० पद ७०४ वें
नको तयांशीं संबंध । ज्यांसि नाहीं आत्मबोध ॥ध्रु॥
घरीं पुस्तकांचे भार । शब्दज्ञानाचा व्यवहार ॥१॥
शब्दज्ञानें वाचक गोष्टी । नाहीं साचार स्वरूपीं भेटी ॥२॥
केशव म्हणे अहो देवा । ज्यासि नावडे साधु-सेवा ॥३॥
० पद ७०५ वें
तो मी दाखवुं तुज कैसा । जेथें नाहीं रूप ठसा ॥ध्रु॥
आत्मा दावा मज म्हणसी । तरि नामरूप नाहीं त्यासी ॥१॥
ज्यासि पाहुं जातां निकरें । पाहातें पाहणें कांहिच नुरे ॥२॥
जेथें मनाचें मनपण सरे । तेथें देखणें कैंचे उरे ॥३॥
ज्याचे स्वरूपाचे ठायीं । हेतु मात नुरे कांहीं ॥४॥
गुरुकृपें केशवीं पाहीं । तिथें केशवपणही नाहीं ॥५॥
० पद ७०६ वें
म्हणवुनि तरले तरले ते कीं । एक आकळिला अनेकीं ॥ध्रु॥
हातीं घेउनियां देव । संतीं झुगारिला देह ॥१॥
झाले अद्वय० पदिंचे वासी । फटी लाविली तयांसी ॥२॥
केशव सांगे जिविंची खूण । धणी सांपडला निर्गुण ॥३॥
० पद ७०७ वें
ज्यांचे हृदयीं जपतां पाय । मीपण विलया गेलें माय ॥ध्रु॥
संत सोयरे निजाचे । त्यांचें नांव जप का वाचें ॥१॥
ज्यांचा अखंड धरितां संग । संगें होइजे निःसंग ॥२॥
ज्यासि हृदयीं धरितां पाहीं । केशविं जीवपण उरलें नाहीं ॥३॥
० पद ७०८ वें
नवल वितलें गे माय । फळले सद्गुरुचे पाय ॥ध्रु॥
जेथें हारपे भूगोल । तेथें घालूं गदारोळ ॥१॥
मीपण वंध्यानंदन जेथें । नांदों अहळें बहळें तेथें ॥२॥
जेथें केशवपणही नाहीं । तेथें केशव निश्र्चळ पाहीं ॥३॥
० पद ७०९ वें
आम्ही देवाचे पुजारे । संतापाशीं सांगा जा रे ॥१॥
नाहीं पूज्यपूजकभाव । तेथें पूजेसि कैंचा ठाव ? ॥२॥
मिथ्या देवभक्त दोन्ही । तऱ्ही सावध पूजनीं ॥३॥
सद्गुरुकृपें केशविं पूजा । पूज्य-पूजक नाहीं दुजा ॥४॥
० पद ७१० वें
म्हणवुनि भक्तीपंथें लागा । प्रेम राघोबाचें मागा ॥ध्रु॥
भक्तिवेगळें जें ज्ञान । तेथें नसे समाधान ॥१॥
भक्ति ज्ञानाची माउली । भक्तीपासुनी मुक्ती झाली ॥२॥
भक्ति सर्वांगी प्रकटे । तरी केशवस्वामी भेटे ॥३॥
० पद ७११ वें
दहत्रयाचा निरास जे ठायीं । योगी तेथें पाहीं मग्न झाले ॥१॥
त्रैलोक्याचें भान बुडालें जे ठायीं । योगी तेथें पाही मग्न झाले ॥२॥
प्रकृति पुरुष भान बुडालें जे ठायीं । योगी तेथें पाही मग्न झाले ॥३॥
सच्चिदानंद ० पद विरालें जे ठायीं । योगी तेथें पाही मग्न झाले ॥४॥
केशव म्हणे सर्व मावळलें जे ठायीं । योगी तेथें पाही मग्न झाले ॥५॥
० पद ७१२ वें
सर्व देव यावरुनी । सांडियेले वोवाळुनी ॥ध्रु॥
हा रे देवाचा निजदेव जाणा । आदिपुरुष पंढरिराणा ॥१॥
बंदी पडिले देव कोडी । त्यांचा बंद हा रे सोडी ॥२॥
केशव म्हणे पाहतां काय । या रे धरूं याचे पाय ॥३॥
० पद ७१३ वें
मोलेविण भाडेकरी । भार अवघा हरिचे शिरीं ॥ध्रु॥
भाडेंतोडें अवघा राम । वोझें वाहे मेघश्याम ॥१॥
भार अवघा हरिचे माथां । काय केशविं चिंता आतां ॥२॥
० पद ७१४ वें
पीक झालें पीक झालें । तयामाजीं गगन लोपलें ॥ध्रु॥
निजबोधाची होतसे वृष्टी । ब्रह्मानंदें पिकली सृष्टी ॥१॥
चहूंमेरां पिकलें समान । आपेंआप समाधान ॥२॥
सद्गुरुकृपें केशविं देख । एकपणेंविण पिकला एक ॥३॥
० पद ७१५ वें
सद्गुरुवचनें एकला झाला । आपुलें एकपण पाहूं लागला ॥धु्र॥
एकला मागें एकला पुढें । एकल्याचें वेड एकल्यासी ॥१॥
सहज केशवीं एकला पाहीं । एकल्यासवें दुसरें नाहीं ॥२॥
० पद ७१६ वें
एकाची लागली गोडी । एकेविण न गमे घडी ।
म्हणवुनि एकत्वीं बुडी । दिधली आम्ही ॥ध्रु॥
एकचि निश्र्चया आलें । एकचि प्रत्यक्ष झालें ॥
एक पाहातां एक गेलें । विरोनि एकीं ॥१॥
एकाचा धरितां संग । एकचि कोंदला चांग ॥
एकत्वीं अवघें जग । बुडोनि ठेलें ॥२॥
एकचि अंतरीं भासे । एकचि बाहेरी दिसे ॥
केशवीं एकचि असे । एकलें सदा ॥३॥
० पद ७१७ वें
ऐसें सद्गुरुनाथें केलें । आपुलेपण दुजें नेलें ॥ध्रु॥
आपुली पुजा आपण करितों । आपुली मूर्ति आपण ध्यातों ॥१॥
आपुलें सुख आपण घेतों । आप आपणा भेटतों ॥२॥
आपणपणें आपणां मुकलों । केशवि आपुलेपण झालों ॥३॥
० पद ७१८ वें
किती सांगावें तुम्हासी । जावें संतपायांपाशीं ॥ध्रु॥
पाय ऐसियाचे धरा । जेणें राम येइल घरा ॥१॥
संतकृपेनें तात्काळ । बहुतां भेटला गोपाळ ॥२॥
केशव म्हणे संत सेवा । त्यांच्या संगें वोळखा देवा ॥३॥
० पद ७१९ वें
चौकाळ उदीम फळला निका । अमूप मिळे काय ते लेखा ॥ध्रु॥
हरिचें नाम भांडवल घरीं । उदीम फळला वरिच्या वरी ॥१॥
मुळिंच्या उदिम वाढे । तेणेंसि मागुती भांडवल घडे ॥२॥
जुनाट मुद्रा लाधलें नाणें । केशव म्हणे न माय ठेवणें ॥३॥
० पद ७२० वें
आमुचे आम्ही देव । आमुचे आम्ही भक्त ।
आमुचे ठायीं नित्य । निरंतर आम्ही ॥ध्रु॥
असोनि सर्वां आंत सर्वांसी अलिप्त । आमुचा सांगात केला आम्ही ॥ध्रु॥
आमुचें आम्ही मूळ आमुचें आम्ही कूळ । आमुचें वसतिस्थळ आमुचे ठायीं ॥२॥
आमुचें आम्ही कर्म आमुचा आम्ही धर्म । आमुचा वर्णाश्रम झालों आम्ही ॥३॥
कांही न हों न देखों सहजीं येक । केशवीं निस्तोष आमुचे आम्ही ॥४॥
० पद ७२१ वें
तेचि धन्य त्रिजगतीं । ज्यांचे अंगीं अढळ शांती ॥ध्रु॥
परदार परधन । तेथें नातळे ज्यांचे मन ॥१॥
ज्यांसि ब्रह्मत्वें ब्राह्मणभक्ती । भजे अनन्यभावें भूतीं ॥२॥
जो सांडुनि मानाभिमान । करी हरिरंगीं कीर्तन ॥३॥
जो भगवद्भावें पूर्ण । घाली सर्वांसी लोटांगण ॥४॥
केशव म्हणे भक्तिमुक्ती । त्यांच्या पायासी लागती ॥५॥
० पद ७२२ वें
करणी करूनि दावावी । मूर्ति रामाची सेवावी ॥ध्रु॥
ज्ञान वरिवरि कां बोलावें । व्यर्थ वरिवरि कां डोलावें ॥१॥
व्यर्थ घरदार कां सोडावें । व्यर्थ डोकें कां बोडावें ॥२॥
केशवस्वामिसी भेटावें । भजन-भांडार लुटावें ॥३॥
० पद ७२३ वें
रामनाम न घेसी कां बा । गोष्टी सांगे लांबलांबा ॥ध्रु॥
जाणपणें तोंडागळी । किती विषय... ॥१॥
मूळ येईल यमाचें । तेंव्हां सोडवी नाम साचें ॥२॥
राम न.... केशविं भाव । त्याचा पाठीराखा देव ॥३॥
० पद ७२४ वें
आतां काय जी आम्हीं करावें । ...तितुकें ब्रह्म स्वभावें ॥ध्रु॥
... प्रथककारें अनेक । पाहतां आत्माचि भासे (एक) ॥१॥
कर्ता, कारण, आणी कर्म । कैसें अवघेंचि परब्रह्म ॥२॥
... पें केशविं कैसें । भिन्न कांहीच न दिसे ॥३॥
० पद ७२५ वें
येथें गुणदोष पाहाणें काये । जेथें भिन्न भे...साहे ॥ध्रु॥
...र्में जग विषम । आत्मदृष्टीं अवघें सम ॥१॥
पाहतां गुणदोष-कोटी । आत्मरूपीं निर्दोष सृष्टी ॥२॥
केशव म्हणे आ...ती । पाहातां आत्माचि निश्र्चिती ॥३॥
० पद ७२६ वें
तैसें सांगतां ब्रह्मज्ञान बा । ब्रह्मसुख ना कळे जाण बा ॥ध्रु॥
ऊंस म्हणतां हातासि न चडे । रस वर्णितां गोडी नातुडे ॥१॥
मिष्ट पक्कान्न वर्णितां वचनीं । काय येउनि पडती वदनीं ॥२॥
मुखें सांगतां गर्भसोहाळे । काय वंध्येचे पुरती डोहाळे ॥३॥
स्वयें वर्णितां राज्य० पदवी । काय करंटा होइल वैभवी ॥४॥
सर्व ० पदार्थ गर्भांध वर्णित । म्हणे केशव यापरी असत ॥५॥
० पद ७२७ वें
बद्ध, मुक्त कल्पित भाव । त्यासी स्वरूपीं नाहीं ठाव ॥ध्रु॥
पशुपक्षी नाना याती । जग नांदे आत्मस्थिती ॥१॥
जन अवघे शुद्धबुद्ध । तेथें कैचे मुक्त, बद्ध ॥२॥
गुरुकृपें केशविं भाव । बद्ध मुक्त दोन्ही वाव ॥३॥
० पद ७२८ वें
दावि नाथिले कुचाळे । हातीं जाणिवेचे वाळे ॥ध्रु॥
चित्तीं वासना खडतर । ज्ञान बोले कां खडतर ॥१॥
जीवीं वासनेचें जाळ । तेणें वाढलें जंजाळ ॥२॥
ज्ञान सांगुनि भुलवी लोक । हृदयवासी केला शोक ॥३॥
वेदशास्त्र हाता आलें । पोटासाठीं गारूड जालें ॥४॥
केशवस्वामी अंतर्मुख । त्याच्या पायांसी विन्मुख ॥५॥
० पद ७२९ वें
गुरुरायाच्या प्रसादें । नांदों वैकुंठीं स्वानंदें ॥ध्रु॥
पूर्वीं मनुष्यलोकीं होतों । आतां वैकुंठी नांदतों ॥१॥
जिता वैकुंठासी आलों । मरूनि वैकुंठवासी झालों ॥२॥
केशव कौतुके सांगे देख । सबरा भरित वैकुंठ येक ॥३॥
० पद ७३० वें
तरिच पावन जन्मा यावें । अखंड वैकुंठवासी व्हावें ॥ध्रु॥
याचि देहीं येथें असतां । वैकुंठ भोगावें तत्वता ॥१॥
पुत्र-जाया-गृह द्वारेशीं । व्हावें वैकुंठींचे वासी ॥२॥
केशवस्वामीचे निजदास । त्यांसि अखंड वैकुंठवास ॥३॥
० पद ७३१ वें
मज सद्गुरु तोचि तो वाटतो । त्यासि आठवितां कंठ दाटतो ॥ध्रु॥
गुरुस्मरणें त्रैलोक्य गर्जवी । गुरुमूर्ति जो अखंड अर्जवी ॥१॥
गुरुभक्तिचें घेतलें ठरणें । सर्व सोडिलें सद्गुरुकारणें ॥२॥
गुरुभजनीं सावध नेटका । गुरुघरींचा वांछितो कुटका ॥३॥
गुरुमूर्तिस सर्वस्व दिधलें । गुरुचरणीं घरचि बांधिलें ॥४॥
गुरुवेगळें कांहीच नाठवी । त्यासि केशव हृदयीं सांठवी ॥५॥
० पद ७३२ वें
आधीं जिविंची जाणीव सांडी तूं । सद्गुरुभजन मांडी तूं ॥ध्रु॥
गुरुभजन करितां रे आवडी । नित्य वस्तु तूं पावसी रोखडी ॥१॥
गुरुभजनें मावळे मीपण । मग आपलाचि गुरु आपण ॥२॥
म्हणे केशव सद्गुरुभजनीं । बुडी यालागीं दिधली सज्जनीं ॥३॥
० पद ७३३ वें
आणिक दैवत मी नेणें । एक सद्गुरुचरण जाणे ॥ध्रु॥
एक पूजिती अष्टमातृका । एक पूजिती गुरुपादुका ॥१॥
एक पूजिती बनशंकरी । आम्ही सद्गुरुचे पुजारी ॥२॥
एक भैरव पूजिती जाणा । आम्ही पुजूं सद्गुरुराणा ॥३॥
एक पूजिती खंडेराव । आम्हा सद्गुरुचरणीं भाव ॥४॥
एक तुळसीपूजनिं नेम । आम्हां सद्गुरुचरणीं प्रेम ॥५॥
एक पूजिति शालिग्राम । केशविं पूजन आत्माराम ॥६॥
० पद ७३४ वें
राम दिसे जनीं राम दिसे वनीं । ध्यानीं मनीं नयनीं राम दिसे ॥१॥
एकांतीं लोकांतीं रामचि निश्र्चिती । आदि अंतीं स्थिती राम
दिसे ॥२॥
कर्माकर्म तंत्र रामचि सर्वत्र । संसार विचित्र राम दीसे ॥३॥
श्रवणाचा उद्बोध रामेशीं प्रबोध । घ्राण सुमनगंध राम दिसे ॥४॥
शब्दांचे स्फुरण रामचि आपण । रसनेचें गोडपण राम दिसे ॥५॥
मनाचिये गती श्रीरामप्रचिती । बुद्धिबोधक स्थिति राम दीसे ॥६॥
स्थूल आणी सूक्ष्म दिसे आत्माराम । स्थूलं स्थूल परम राम
दिसे ॥७॥
सगुण निर्गुण दिसे राम पूर्ण । केशवीं दर्शन अखंड दिसे ॥८॥
० पद ७३५ वें
राम आला रंगा । मी काय करूं सांगा ॥ध्रु॥
अखंड भेटी देतो । मजमाजी रंगा येतो ॥१॥
स्वानंदेवीण कांहीं । राहोंचि नेदी कांहीं ॥२॥
केशव म्हणे माये । आतां मीपण कोठें आहे ॥३॥
० पद ७३६ वें
दर्शनाची चाड वाहसी जरी जीवीं । तरी तूं पाय सेवीं वैष्णवांचे ॥१॥
वैष्णवांचे संगें अखंड राम दिसे । महावाक्य ऐसें गर्जतसे ॥२॥
साधुचेनि संगें श्रीरामीं एकांत । घ्यावया ऊसंतवारी नाहीं ॥३॥
साधनीं शीणतां रामप्राप्ती नोहे । संतसंगें फावे राम देखा ॥४॥
होय संतकृपा तरिच राम सोपा । अनुभवें पाहे पा विचारुनी ॥५॥
अनुभवाचे डोळे लावुनी पाहासी । तरि राम देखसी नित्य नवा ॥६॥
नित्य नवा राम नांदे अपरोक्ष । परि नव्हे प्रत्यक्ष गुरुविणें ॥७॥
गुरुविणें राम प्रत्यक्ष न पाविजे । म्हणुनी दास्य कीजे नीजभावें ॥८॥
केशव म्हणे आम्हा फळले गुरुपाय । देखिला गे माय आत्माराम ॥९॥
० पद ७३७ वें
साधूच्या देहाचा मानी जो विटाळ । तोचि पै चांडाळ भुवनत्रयीं ॥१॥
संतसाधूनिंदा करील जो मुखें । खतेला पातकें तोचि जाणा ॥२॥
संतसाधुद्वेष करील जो पाहीं । तोचि निरयडोहीं पचे जाणा ॥३॥
साधूचा सन्मान न करी जो देखोन । दुर्जन दुर्जन तोचि जाणा ॥४॥
केशव म्हणे न भजे संतचरणकमळा । दुःखाचा पूतळा तोचि जाणा ॥५॥
० पद ७३८ वें (सडा)
निजभाव सडा घालितां रंगणीं । गोपिकांचे मनीं कृष्णछंद ॥१॥
संमार्जनविधी सारितां सकळ । गोपिका निश्र्चळ कृष्णरूपीं ॥२॥
अंतर्बाह्य सडा घालितां रोकडा । श्रीकृष्ण चोखडा धरूनि चित्तीं ॥३॥
कृष्णरूपीं गोपी सर्वदा तद्रूप । हेंचि सुखरूप सारवण ॥४॥
गुरुकृपें केशविं संमार्जन झालें । सर्व शुद्ध केलें एका कृष्णें ॥५॥
० पद ७३९ वें (सारवण)
कृष्णरंगें नाम हृदय सारवूं । अखंड गौरवूं कृष्णनाम ॥१॥
सबाह्य श्रीरंगें रंग बैसे पूर्ण । तैसें सारवण घालूं माय ॥२॥
त्रैलोक्य सारवूं श्रीकृष्णरूपें । अवघें चित्स्वरूपें शुद्ध करूं ॥३॥
अवघें शुद्ध करूं आंगीं कृष्ण भरूं । रंग मनोहर कृष्णरूप ॥४॥
गुरुकृपें केशवीं नवल कैसें झालें । सर्व सारविलें कृष्णरूपें ॥५॥
० पद ७४० वें (झाडण)
कृष्णछंदें गोपी झाडिती संसार । अविद्येचा केर निपटूनिया ॥१॥
कृष्णरूपीं गोपी सर्वदा निश्र्चळ । तेणें मायाजाळ झाडियेलें ॥२॥
झाडिलें मीपण झाडिलें तूंपण । कृष्णरूप पूर्ण आठवुनी ॥३॥
झाडिती ज्ञेय ज्ञान झाडिती ध्येय ध्यान । कृष्ण सनातन
आठवुनी ॥४॥
झाडिती कर्माकर्म झाडिती धर्माधर्म । कृष्ण पुरुषोत्तम आठवुनी ॥५॥
गुरुकृपें केशवीं झाडिलें सकळ । गोपीका निर्मळ कृष्णसंगें ॥६॥
० पद ७४१ वें
नाम घेतां त्याचें । काळासि जीणें कैचें ? ॥ध्रु॥
वैराग्य सिले ल्याला । बोध-अश्र्वारूढ झाला ॥१॥
ज्ञान-शास्त्र हातीं । तें झळके दिवस-रातीं ॥२॥
अलक्ष बाण सोडी । भवचक्र अवघें तोडी ॥३॥
संमूख रणा आले । ते समूळ जिवें गेले ॥४॥
केशव म्हणे माझा । तो स्वामी गुरुराजा ॥५॥
० पद ७४२ वें
भाव सखा करा । तरि देव येईल घरा ॥ध्रु॥
भाव नसे जेथें । मग देव कैंचा तेथें ॥१॥
भाव भेटे जेव्हां । मग देव घरींच तेव्हां ॥२॥
केशव म्हणे पाहीं । भावेवीण देव नाहीं ॥३॥
० पद ७४३ वें
मीं सुख पावेन तेणं । खुंटलें येणें जाणें ॥ध्रु॥
अभेद भक्तीयोगें । तुझें नाम गाइन वेगें ॥१॥
तुझे पाय हृदयकोशीं । मी धरीन अहर्निशीं ॥२॥
म्हणे केशव रामा । इतुकेंचि पुरे आम्हा ॥३॥
० पद ७४४ वें
तोचि संत पाहीं । संसार त्यासी नाहीं ॥ध्रु॥
चिन्मात्र सर्व पाहे । नीवांत होउनि राहे ॥१॥
विवेक-दीप लावी । सबाह्य राम दावी ॥२॥
सहज सुखें धाला । म्हणे केशव झाला ॥३॥
० पद ७४५ वें
त्रिभुवनींचा राजा । तो प्राणसखा माझा ॥ध्रु॥
भजनें भव जाळी । तो भजा वनमाळी ॥१॥
सुखघन अविनाशी । मुनिराज हृदयवासी ॥२॥
कवळुनि मनिं ठेवा । केशव० पद सेवा ॥३॥
० पद ७४६ वें
बोल याचे फोल । मायीक त्याचे डौल ॥ध्रु॥
शब्दें ब्रह्म बोले । बहु जाणिवेनें डोले ॥१॥
सबळ प्रीति कामीं । आणि मुक्त म्हणे आम्ही ॥२॥
वरिवरि डोळे लावी । लटिकेंचि सोंग दावी ॥३॥
धनसुत पशु जाया । सदृढ त्यांची माया ॥४॥
केशव म्हणे त्यांचें । ध्यान बुडवी साचें ॥५॥
० पद ७४७ वें
आतां विसरूं नको आम्हा । निजसखया गुरुरामा ॥ध्रु॥
गुरु गुरु गुरु करितों । पाय झोंबुनि धरितों ॥१॥
भक्ति थारोळ बसतों । उच्छिष्ट मार्ग पाहातों ॥२॥
मी यातिहीन जाणा । केशव म्हणे तुझा सूणा ॥३॥
० पद ७४८ वें
पाप गेलें तेणें । संताप कांही नेणें ॥ध्रु॥
ज्ञानगंगेमाजी । सुस्नात झालों आजी ॥१॥
देव हृदयवासी । म्यां पूजियलें त्यासी ॥२॥
केशव म्हणे आम्ही । मिरासी केली रामीं ॥३॥
० पद ७४९ वें
कोण काडिल आम्हा । त्वां बूडविलें रामा ॥ध्रु॥
ज्ञानगंगेमाजी । बुडोनि गेलों आजी ॥१॥
ब्रह्मांड विरे जेथें । बुडोनि गेलों तेथें ॥२॥
केशव म्हणे पाही । ऐसें बुडणें कोठें नाहीं ॥३॥
० पद ७५० वें
कैसी विजय सेवुनि धालो । त्रैलोक्यांत विजयी झालों ॥ध्रु॥
पूर्ण कुंडला स्वानंदाचा । आंत घोटा शुद्ध सत्त्वाचा ॥१॥
विवेकवस्त्रांत शेधूनि पाणी । भक्ति रामरस प्यालों भरुनी ॥२॥
स्वानुभवेंचि भाजुनि खातों । मना नये तेंचि गातों ॥३॥
प्रपंचविषयीं भुली आली । द्वैत वि विसर्जुनि निद्रा केली ॥४॥
गुरुनामाची धुमारी आली । केशवीं विजया सेविली ॥५॥
० पद ७५१ वें
तें स्वरूप श्रीगुरुरायाचें । ध्यान करिन त्या पायांचें ॥ध्रु॥
दुजेपण जेथें साहेचिना । एकपण ज्या ० पदिं राहेचिना ॥१॥
बोधाची जेथें बोळवण । विश्रांतीची उजवण ॥२॥
जेथें अखंडित तूं रमसी । पाहे केशव निवारुनि सर्वांसी ॥३॥
० पद ७५२ वें
चरणकमळ त्यांचें । संसारहरण साचे ॥ध्रु॥
विज्ञान-सदनवासी । जीताचि मोक्ष त्यांसी ॥१॥
गिळुनि समुळ शोका । निष्काम रमति देखा ॥२॥
सहज सुखें धालें । म्हणे केशव केशव झाले ॥३॥
० पद ७५३ वें
हा लाभ मोठा पाहीं । सौख्यासि उणें नाहीं ॥ध्रु॥
सत्संग सफल झाला । श्रीराम हातां आला ॥१॥
मग्न झालों रामीं । संसार नेणों आम्ही ॥२॥
केशवस्वामी भेटे । तेथें नामरूप आटे ॥३॥
० पद ७५४ वें
काय भय आतां श्रीराम माझे माथां ॥ध्रु॥
राम धणी केला । कळिकाळ पळोनि गेला ॥१॥
रामबळें आम्ही । अजित क्रोधकामीं ॥२॥
केशव म्हणे देवा । बहु गोड तुझी सेवा ॥३॥
० पद ७५५ वें
आम्ही आणिक न करूं धंदा । गीतीं गाऊं गोविंदा ॥ध्रु॥
संत० पदीं राहूं । भगवंत नयनीं पाहूं ॥१॥
कामधाम सकळ सोडूं । अहेतुक राम जोडूं ॥२॥
म्हणे केशव कवळूं रामा । आतां हेंचि करणें आम्हा ॥३॥
० पद ७५६ वें
आतां काय म्यां करावें । रामें वेधिलें स्वभावें ॥ध्रु॥
उभड हृदयांतुनी येतो । राजा राम आठवतो ॥१॥
राम भरला जनीं वनीं । गेला देहभाव विरोनी ॥२॥
केशव म्हणे झाला वेध । वेधें सरला भेदाभेद ॥३॥
० पद ७५७ वें
माझा सोयरा विठोबा । त्यासि केला म्यां घरोबा ॥ध्रु॥
इष्टमित्र सोयरे लोक । आम्हा अवघेचि पिसूण देख ॥१॥
तिहीं लोकीं येतो कामा । परलोकीं तारक आम्हा ॥२॥
चित्त ठेविलें पायांशी । पाहिजे तें मागेन त्यासी ॥३॥
केशव म्हणे मायबाप । यासि विसरणें हेंचि पाप ॥४॥
० पद ७५८ वें
तरी त्याहुनि दूरि जावें । सुखें एकांतीं बैसावें ॥ध्रु॥
संतपायांसी विमुख झाला । तो संगति मागें आला ॥१॥
आत्मचर्चा नाहीं जेथें । आगी लावुनि द्यावी तेथें ॥२॥
सर्व असोनि सत्संग नाहीं । म्हणे केशव तें स्मशान पाहीं ॥३॥
० पद ७५९ वें
त्याचें काय करावें गाणें । मन अंतरिं केविलवाणें ॥ध्रु॥
घे बहुरूपी उत्तम सोंगें । तैसा हरिदास म्हणवी अंगें ॥१॥
वर्म चुकूनि लावी डोळा । प्रेम नसतां आंगीं लोळे ॥२॥
देह ठेवुनि भजनापाशीं । चित्त केवळ विषयविलासीं ॥३॥
केशव स्वामिसि झाला चोर । भोगी अनंत दुःखें घोर ॥४॥
० पद ७६० वें
कळतां साधन कां साधन कां । काय म्हणावें लोकां ॥ध्रु॥
घृत जें कां विघुरलें । थिजोनी तेंचि कणिका जालें ॥१॥
पट पाहातां तो तंतू । तंतू पाहतां सर्व पटा आंतू ॥२॥
घटची पृथिवि जाला । निमोनी पृथिवीरूपा आला ॥३॥
केशवीं जग हें दिसे । जग तें अवघें केशव असे ॥४॥
० पद ७६१ वें
प्रबोध-सूर्याच्या निज उदरीं । रघुपति दिसतो हृदयीं ॥ध्रु॥
अंतरि श्रीहरि हा घन दाटे । भजतां भवनदि आटे ॥१॥
सबाह्य स्थिरचर हा हरि जाला । हाही हेतु निमाला ॥२॥
केशवस्वामिचें रूप कळलें । कळलें म्हणणें वो गळलें ॥३॥
० पद ७६२ वें
नित्य मस्तकिं असतां भगवंत । बाई ! आमुतें कायशी आतां चिंता ॥ध्रु॥
सदा जवळी असतां नारायण । बाई ! कासया करूं मी व्यर्थ शीण ॥१॥
कामनिष्काम आमुचा तोचि झाला । निजभाव हृदयीं प्रकटला ॥२॥
बाई ! केशवस्वामी जगन्नाथ । पाहातां पुरले सकळ मनोरथ ॥३॥
० पद ७६३ वें
माझ्या जिविंच्या जीवना गुरुराया । पायां लागतां बिनसली माझी माया ॥ध्रु॥
केला तुझ्या चरणाचा आम्ही थारा रे । तेणें आमुच्या चुकल्या येरझारा ॥१॥
तुझे पाय पाहतां आम्ही स्वामी । तुझी ० पदवी पावलों आजी आम्ही ॥२॥
म्हणे केशव सद्गुरु मायबापा । कृपामात्रें दाविलें आत्मस्वरूपा रे ॥३॥
० पद ७६४ वें
तेणें पालवीं धरिलें मज माय । जिवीं जडला न सुचे करूं काय? ॥ध्रु॥
रासक्रीडे गेलें हो वृंदावना । तेथें देखियला यशोदेचा कान्हा ॥१॥
स्वयें अकुळी गोवळ अवगुणाचा । पूर्वदत्तें घडला संग याचा ॥२॥
लाज सर्वहि हरिली माझी येणें । उरी कांही ठेविली नाहीं कृष्णें ॥३॥
द्वैतपणा मुकलें याच्या संगें । संसारासि पडलें पाणी मागें ॥४॥
गुरुकृपें केशवीं याची भेटी । येण्याजाण्याच्या खुंटल्या गोष्टी ॥५॥
० पद ७६५ वें
देवाचिचे पायीं सुख झालें केवढें । ब्रह्मांड येवढें हरपलें ॥ध्रु॥
सद्गुरुरायें माझ्या ज्ञानदीप लाविला । देव जो दाविला परात्पर ॥१॥
नाहीं रूपरेखा स्वयंभु तो देखा । ऐसिया व्यापका नित्य भेटों ॥२॥
देवासि भेटतां भक्त तो आटला । देवीं देव दाटला केशव म्हणे ॥३॥
० पद ७६६ वें
जे जे वस्तु पाहें देवा । ते ते तूंचि आघवा ।
तुज तूंचि माधवा देऊं मी कसें? ॥ध्रु॥
उतराई काय व्हावें । तुज आतां काय द्यावें ॥१॥
रूप तुझें आघवें होउनी ठेलें ॥२॥
तुजविण दुजें आतां । नाहिं बा रे ! अनंता ।
देता घेता भगवंता तूंचि येक ॥३॥
तुजमाजी समरसों । तुझ्यासंगें बरवें दिसों ।
उत्तीर्ण तेणेंचि असों । केशव म्हणे ॥४॥
० पद ७६७ वें
नवल गुरुकृपेचा सौरस । अंतर्बाह्य कोंदला परेश ॥ध्रु॥
बाप रे गुरुरायाचे संगती । अविनाश० पद सर्वदा भोगिती ॥१॥
श्रुतिशास्त्र धुंडितां नातळे । गुरुवाक्यें तें रूप आकळे ॥२॥
सद्गुरुकृपें स्वरूप अनुभव । बोले आत्मप्रतीति केशव ॥३॥
० पद ७६८ वें
हृदयमंदिरों पालखां । बैसवुनी रामसखा ॥ध्रु॥
कैसा डोलतो डोल्हारा । प्रेमें शितळ येतसे वारा ॥१॥
भक्तिभाव लावुनि दोरा । हालवितों रामचंद्रा ॥२॥
गीतीं गातां नामावळी । तेणें संतोषे वनमाळी ॥३॥
केशवनाथ कांहिच नेणे । राम डोल्हारा हलवूं जाणे ॥४॥
० पद ७६९ वें
गुरुरायें कौतुक ऐसें केलें । आत्मबोधें मीपण माझें नेलें ॥ध्रु॥
भगवद्भक्तांची भेटी झाली पाहीं । जन्म मरणासि ठाव आतां नाहीं ॥१॥
गेला मोह आटला शोकसिंधु । मनीं नयनीं कोंदला निजानंदू ॥२॥
गुरुकृपें केशवीं प्राप्ती साची । नाहीं बद्धमुक्तता तेथें कैंची ॥३॥
० पद ७७० वें
काय सांगों हें चोज आतां कैसें । राम पाहातां लागलें प्रेमपीसें ॥ध्रु॥
रामरूप पाहतां डोळां माय । मन माझें भूललें सांगों काय ॥१॥
जनीं वनीं राम अवघा दीसे । त्रिभुवनीं राम कोंदलासे ॥२॥
गुरुकृपें केशवीं रामभेटी । राम अवघा कोंदला पाठींपोटीं ॥३॥
० पद ७७१ वें
तरि तूं पावसि पूर्ण समाधान । सर्व काळीं देखसी अधिष्ठान ॥ध्रु॥
ज्ञानध्यानाचें फळ साधुजन । त्याचे चरणीं अखंड ठेवीं मन ॥१॥
संत केवळ-आनंद-बोध निधी । त्यांचे चरणीं बांधोनि घाली बुद्धी ॥२॥
गुरुकृपें केशविं गुह्य पाहीं । संतसंग न सोडी सर्वदाही ॥३॥
० पद ७७२ वें
मिस गोरसाचे मथुरेसी जाऊं । धणी पुरेतों गोपाळासी पाहूं ॥ध्रु॥
चला जाउं गे मथुरेच्या हाटा । नयनीं पाहूं श्रीकुष्ण बरवंटा ॥१॥
सर्व कर्मेंसारुनी जाऊं तेथें । आत्मारामाची होईल भेटी जेथें ॥२॥
प्रेमें गोपिका मथुरेसी आल्या । केशवराज्यीं मिळतां सुखी जाल्या ॥३॥
० पद ७७३ वें
तोंवरी व्यर्थ सांगणें ज्ञानगोष्टी । आत्मसुखाची जोंवरी नाहीं
दृष्टी ॥ध्रु॥
परब्रह्म जितांचि झालों पाही । ऐसी अखंड पूर्ण प्रतीति नाहीं ॥१॥
ब्रह्मानंदें सुखरूप नाहीं बुद्धी । तया कैंची निर्वाण योगसिद्धी ॥२॥
गुरुकृपें केशवीं बोध साचा । ठाव पुसला नाहींच संसाराचा ॥३॥
० पद ७७४ वें
तेचि परम पावन संत पाहीं । जन्म मृत्यूचें भय त्यांसी नाहीं ॥ध्रु॥
काया कैकट सोडुनी बहु दुरी । पूण्यभूमी सेविली पंढरपुरी ॥१॥
ज्ञान-चंद्रभागेसी स्नान केलें । सहजीं विठ्ठलदर्शन पूर्ण झालें ॥२॥
गुरुकृपें केशव क्षेत्रवासी ।क्षेत्र क्षेत्रज्ञ एकचि झाला त्यासी ॥३॥
० पद ७७५ वें
निरंजनीं बैसला निजयोगी । महाराज तो गुरुराज योगी ॥ध्रु॥
ज्ञानविभूति चर्चिली अंगीं पाही । आंगेवीण सहज नग्न ठायीं ॥१॥
शब्दातीत निःशब्द मौनधारी । कामकामातीत ब्रह्मचारी ॥२॥
निजबोधें सर्वदा निराहारी । निर्विकार अलक्ष वेषधारी ॥३॥
समाधी व्युत्थानासहित समाधानी । पूर्ण टाळी लागली अधिष्टानीं ॥४॥
कलाकला वेगळी ज्याची कळा । केशवस्वामीची अकळ नकळे लीला ॥५॥
० पद ७७६ वें
ज्याच्या पायां लागतां नासे माया । ज्याचें स्वरूप चिंतितां ग्रासे काया ॥ध्रु॥
निरालंबदेशिंचा गुरुराव । त्याचे चरणकमळीं धरूं भाव ॥१॥
भावाभावारहितरूप ज्याचें । ऐसें जाणती ते तेचि होति साचे ॥२॥
एकछत्री अविनाश० पदराजा । म्हणे केशव तो मायबाप माझा ॥३॥
० पद ७७७ वें
ऐसें कांही बोल सजणा । सोयरिया निजसगुणा ॥ध्रु॥
गाईच्या वाडां वाघ बांधला । गाईनें वाघ फाडुनी खादला ॥१॥
जुनाट कोहळें रांधीलें हांडी । हांडीच विराली कोहळ्यामाजी ॥२॥
मुक्ताफळाचा वोगर केला । धणीवरी जेऊनि केशव मेला ॥३॥
० पद ७७८ वें
घालिं पिंगा बाळे । तूं सांडीं विषय-चाळे ॥ध्रु॥
सद्गुरुच्या बोलीं । लावोनि पिंगा घाली ॥१॥
तूं काम सोडीं गे । बरा माज मोडीं गे ॥२॥
नाहीं समाधान । तूं हलवुं नको मान ॥३॥
शहाणी सगुण नारी गे । तिशीं खेळें कारी (?) गे ॥४॥
नित्य निर्द्वंदें । केशवीं ब्रह्मानंदें ॥५॥
० पद ७७९ वें
मन माझें निवालें दर्शनें । लोचनांचें फिटलें पारणें ॥ध्रु॥
शेषाचळवासी म्यां सेविला । स्वानंदाचा राशि म्यां देखिला ॥१॥
त्रैलोक्याचा नाथ तो श्रीपती । पाहातां मज जाली वो विश्रांती ॥२॥
केशवप्रभु मानसमोहना । मूर्ति तुझी बैसली नयना ॥३॥
० पद ७८० वें
अतिशुद्ध सवरूप आपलें । जें कां सहजीं सहज संचलें ॥ध्रु॥
मलें नव्हे अमळ सर्वथा । जें कां निजनिर्मळ तत्वतां ॥१॥
निर्मळा अतिनिर्मळ केवळ । गुणकर्मरहित निर्मळ ॥२॥
गुरुकृपें केशवीं परम । सर्व शून्यरहित निःसीम ॥३॥
० पद ७८१ वें
पाहातां तयासि मन उन्मन झालें ।
मजमाजीं देहबुद्धि देखणें निमालें ॥ध्रु॥
जनीं वनीं अवघा जनार्दन पूर्ण ।
सभरांभरित सर्वां ठयीं व्यापक पाहातां संपूर्ण ॥१॥
एकीं अनेक अनेकीं एक अवघा संचला ।
एकाएकीं.......नकळे मला ॥२॥
गुरुकृपें केशविं नवल यापरी पाहीं ।
आप आपणां पाहतां हेतु विराला ठायीं ॥३॥
० पद ७८२ वें
राम जवळि आहे । परतोनी डोळां पाहे ॥ध्रु॥
भेद सांडिं मनिंचा । तूं राम पाहें धणिचा ॥१॥
राम आहे तुजपाशीं । परी नोळखसी त्यासी ॥२॥
सांडुनि सकळ काम । तूं हृदयीं कवळीं राम ॥३॥
केशव म्हणे पाहीं । रामीं राम होउनि राहीं. ॥४॥
० पद ७८३ वें
बरवें जाणुनि रे सुजाणा । झडकरि करि हरिभजना ॥ध्रु॥
लक्ष चौऱ्यायशीं हिंडतां । नरदेह दुर्लभता ॥१॥
काळ येउनिया घडिघडी । येउनि फोडिल नरडी ॥२॥
केशवस्वामीसी सुख मोठें । भजतां भवनदि आटे ॥३॥
० पद ७८४ वें
ते दास तुझे पाही । देहभाव त्यांस नाहीं ॥ध्रु॥
सत्कीर्ति तुझी गाती । निजमूर्ति मनीं ध्याती ॥१॥
प्रेमरसें धाले । अपार सुखी झाले ॥२॥
केशव म्हणे रामा । जिहीं तुज दिलें आम्हा ॥३॥
० पद ७८५ वें
आनंद झाला मोठा । भगवंत आला पोटा ॥ध्रु॥
गुरुनें दया केली । संसारव्यथा गेली ॥१॥
निजसुख हातां आलें । कल्याण माझें झालें ॥२॥
केशव म्हणे पाहीं । भेटीसी तुटी नाहीं ॥३॥
० पद ७८६ वें
तो अभाग्याचा रावो । सिद्धांतबोध हा हो ॥ध्रु॥
विषयसंगीं जागे । कीर्तनीं निद्रा लागे ॥१॥
ज्ञानगर्वें माजे । संतभजनीं लाजे ॥२॥
त्यासीं व्यर्थ माय व्याली । विवुनी वांझ जाली ॥३॥
वरिवरि माळ फिरवी । लटिकेंचि सोंग मिरवी ॥४॥
केशव म्हणे त्याचा । संसर्ग नको साचा ॥५॥
० पद ७८७ वें
आतां काय वानूं त्यासी । त्याचे पाय माझी काशी ॥ध्रु॥
भवताप नाहीं जेथें । मज बोलविलें तेथें ॥१॥
मन हरुनी येणें नेलें । मज आनंदघन केलें ॥२॥
निजानंद कुळिचा राजा । म्हणे केशव स्वामी माझा ॥३॥
० पद ७८८ वें
कां रे व्यर्थचि गर्वें जातां । हरिचे पाय वंदा माथा ॥ध्रु॥
ब्रह्म लोळे ज्याचे पायीं । त्याचा महिमा वर्णूं कायीं ? ॥१॥
शिव घाली लोटांगण । तेथें इतरांचा पाड कोण ॥२॥
रमेसारिखी सुंदरी । जाली पायांची किंकरी ॥३॥
शुकसनकादिक योगी । अवघे पायीं जडले वेगीं ॥४॥
केशव म्हणे याचे पायी । जडले तेची तरले पाहीं ॥५॥
० पद ७८९ वें
पाय तारक केवढे । पायीं जडे तो वैकुंठ चढे ॥ध्रु॥
पाय आठवितां मनीं । गणिका चढली विमानीं ॥१॥
पाय अवचट पडतां माथा । मुक्त झाली गौतमकांता ॥२॥
सृष्टिकर्ता जो ब्रह्मदेव । तोही पायीं इच्छी ठाव ॥३॥
रमा रमणीय सर्वांसी । झाली पायांची पै दासी ॥४॥
पायापासुनि गंगा झाली । शिवें मस्तकीं वंदिली ॥५॥
पाय आठवितां केशवें । पायीं ठावचि दिधला देवें ॥६॥
० पद ७९० वें
आम्ही पुण्यवंत मोठे । आतां संसार न भेटे ॥ध्रु॥
पायिं ठेवितांचि शिर । झालें पावन शरीर ॥१॥
बरवे हाता आले पाय । गेले सर्वहि अपाय ॥२॥
म्हणे केशव सांगों काय । पायें रामचि केले माय ॥३॥
० पद ७९१ वें
एैसें आम्हां केलें याणें । मायबापें नारायणें ॥ध्रु॥
चित्त स्वरूपीं विसावें । मन कोठेंची न धावे ॥१॥
उपकार थोर केला । देहभाव हिरोनि नेला ॥२॥
केशव म्हणे देउनी भेटी । मज सामाविलें पोटीं ॥३॥
० पद ७९२ वें
त्याचे पाय वंदिन माथां । क्षण विसंबेना आतां ॥ध्रु॥
बाप माझा नारायण । आहे त्याविण मजला कोण ॥१॥
नित्य तयासी पाहिन दृष्टीं । त्याचे पायीं घालिन मिठी ॥२॥
म्हणे केशव त्याची गोडी । जीव गेलिया न सोडीं ॥३॥
० पद ७९३ वें
त्याचें मुखाचि डोळां पाहूं । आम्ही सुखीच होउनि राहूं ॥ध्रु॥
नोहे बोलायासारिखें । ऐसें कळलें ज्याचे मुखें ॥१॥
निजसुखाचें तें मुख । ज्याचे मुखींच सोलीव सुख ॥२॥
म्हणे केशव मुखचंद्रमा । वर्षे अमृतवृष्टी आम्हा ॥३॥
० पद ७९४ वें
म्हणवुनि भवभय मजला नाहीं । झालों ब्रह्मपरायण पाहीं ॥ध्रु॥
साधु स्थिरावले जे ठायीं । तें म्यां देखियलें लवलाहीं ॥१॥
द्वैत अवघें सरलें जेथें । केलें अढळ मिरासी तेथें ॥२॥
सुख सेवुनि बरवा धालों । म्हणे केशव केशव झालों ॥३॥
० पद ७९५ वें
कानावाटे दाविलें ज्ञान । ज्ञानें केलें समाधान ॥ध्रु॥
प्रेम देउनि वेधिलें मन । मन वेधुनि फुंकिला कान ॥१॥
ज्ञानस्वरूप तो मी देव । मज दाउनि हरिला देह ॥२॥
देव केलें तो निजदेव माझा । म्हणे केशव सद्गुरुराजा ॥३॥
० पद ७९६ वें
काय बोलावें कोणासी । सहज अबोला जनासी ॥ध्रु॥
योगी ब्रह्मानंदें खेळे । अविनाश भूमिके लोळे ॥१॥
लोण उतरूनि गेली माया । क्रियेसहित हरली काया ॥२॥
आत्मलाभें पूर्ण उत्साहें । फुटे ब्रह्मांड ऐसें हांसे ॥३॥
केशव म्हणे त्याचिये भेटी । जीव ईश्र्वर दोन्ही घोंटी ॥४॥
० पद ७९७ वें
योगियांचे देखणें कैसें । जग देखती आपणां ऐसें ॥ध्रु॥
स्नेह सूत्र दीपक भिन्न । प्रभा सूत्रेंसी अभिन्न ॥१॥
काळा पुंडास धर कांठा । हर्षासी नाहीं ताठा ॥२॥
घट पृथक् दिसती नाना । परि केवळ मातिच जाणा ॥३॥
तंतु पटत्वें प्रकाशे । मुळीं पाहातां तंतुच असे ॥४॥
अळंकार दिसती कोटी । परि सोनेंचि भासे दृष्टी ॥५॥
लहरी तरंग बुदबुद जाणा । परी जळचि भासे नयना ॥६॥
गुरुकृपें केशवीं ऐसा । पूर्ण ओघ्ज्ञीं पूर्ण बसा ॥७॥
० पद ७९८ वें
तैसे संतांसन्मुख होतां । आम्ही निर्भय होऊं आतां ॥ध्रु॥
वाघिणीच्या पिलिया । कासे रिघतां भयचि नाहीं ॥१॥
राजपत्नीचे पयोधर सुखें । निजबाळक चोखी मुखें ॥२॥
मत्स्य यागरीं देउनि बुडी । म्हणे केशव घेताति गोडी ॥३॥
० पद ७९९ वें
परि तें कोणासी नकळे देख । श्रमें श्रमचि वाटे अधिक ॥ध्रु॥
तत्त्व जाणावयालागीं । नाना साधनें साधिती योगी ॥१॥
एक झाले मौनधारी । एक केवळ निराहारी ॥२॥
एक प्राणापानयोगें । योगी निघाले योगमार्गें ॥३॥
एक कर्मनिष्ठ झाले । एक वाममार्गें आले ॥४॥
एक हृदयकमळीं जाण । ध्याती अंगुष्ठप्रमाण ॥५॥
गुरुकृपें केशविं कृपा । होय तरिच कळे बापा ॥६॥
० पद ८०० वें
त्यासी कैसेनि भेटे देव । संतभजनीं नाहीं भाव ॥ध्रु॥
संतभजनीं नाहीं गोडी । नित्य विषयाची आवडी ॥१॥
जो विमुख संतभजनीं । तो पातकी या जनीं ॥२॥
संतसेवे अंग चोरी । दृष्टी न पडो तयावरी ॥३॥
पाहे गुणदोष संतांचे । जळो काळें तोंड त्याचें ॥४॥
केशव म्हणे संतसेवा । आमच्या पूर्वजांचा ठेवा ॥५॥
० पद ८०१ वें
तुम्ही अजुन सावध कां व्हाना । हरी अंतरीं आठवाना ॥ध्रु॥
चित्त विषयालागुनि देता । कां हो दाटुनि वेडे होता ? ॥१॥
तिहीं लोकांसी ग्रासी एक । त्या महाकाळें पसरिलें मुख ॥२॥
म्हणे केशव तांतडी करा । हरी सेवुनि भवनदी तरा ॥३॥
० पद ८०२ वें
हेंचि नवल मोठें पाहीं । तुझे तुजचि न पडे ठायीं ॥ध्रु॥
जें का मनाचें चाळक । तें तूं न कळे म्हणसी देख ॥१॥
जेणें सर्वहि ० पदार्थ चळे । तें तूं म्हणसी मज न कळे ॥२॥
म्हणे केशव न कळे तुज । तरी सद्गुरुवचनें बुझ ॥३॥
० पद ८०३ वें
सांडी नाथिली टवाळी । करी भक्तीची दिवाळी ॥ध्रु॥
किती संसाराच्या गोष्टी । राजा राम पाहा दृष्टी ॥१॥
किती भोगिलें भोगिसी । भोगीं आत्मा हृषीकेशी ॥२॥
म्हणे केशव स्वानंद-डोहीं । बुडी देऊनि निश्र्चळ राहीं ॥३॥
० पद ८०४ वें
आन साधन न करा कांही । रामनामें भवदुःख नाहीं ॥ध्रु॥
रामनामाचा प्रताप गाढा । भवकर्माचा रगाडा ॥१॥
नाम घेती आणि ऐकती । श्रोते वक्ते रामचि होती ॥२॥
म्हणे केशव स्वहित झालें । रामनामें चित्त निमालें ॥३॥
० पद ८०५ वें
त्याची संगति नको देवा । ज्यासी नावडे साधुसेवा ॥ध्रु॥
मनीं भावाचा लेश नाहीं । बुडे अखंड कामडोहीं ॥१॥
कामसंगचिं रातला निका । मूर्ख सेविचना ब्रह्मसुखा ॥२॥
म्हणे केशव दुर्मति नष्ट । न विचारी इष्टानिष्ट ॥३॥
० पद ८०६ वें
याची संगती नको रामा । जो कांहींच नयेचि कामा ॥ध्रु॥
राम वरि वरि बोले वाचें । काम कडिये घेउनि नाचे ॥१॥
प्रतीतीची नाहीं सोय । वरी श्रृंगारिला देह ॥२॥
काम घरिचा राजा केला । त्याचा परिवार आपण झाला ॥३॥
कामीं निष्काम मी हें नेणें । म्हणे केशव देह मी म्हणे ॥४॥
० पद ८०७ वें
तेथें लाभ मोठा आहे । जोडी राम, सगळा लाहे ॥ध्रु॥
येउनी नरदेहाच्या हाटा । लागा गुरुभक्तीच्या वाटा ॥१॥
सांडा देहबुद्धीचा ताठा । वायां बडवूं नका खाटा ॥२॥
काळ-तस्कर दुर्धर गांठा । म्हणे केशव भजनें लाटा ॥३॥
० पद ८०८ वें
त्याची अखंड सेवा करूं । दीनबंधु तो हृदयीं धरूं ॥ध्रु॥
ज्ञानगंगातिरिंचे वासी । संत परमानंद राशी ॥१॥
त्याचें पाऊल वोळगावें । तेणें ब्रह्मानंद फावे ॥२॥
आपण ब्रह्मचि झाले साचे । नाम त्रिभुवनपाळक त्याचें ॥३॥
केशव म्हणे दयाब्धि पाहीं । त्याच्या दर्शनें भवभय नाहीं ॥४॥
० पद ८०९ वें
तो म्यां देखिला गे माय । झालें तन्मय सांगों काय ॥ध्रु॥
पतितपावन मेघःश्याम । मुनिमानस विश्राम ॥१॥
सर्वप्रकाशक सर्वाधार । सर्वनिवासी सर्वाकार ॥२॥
केशवप्रभु परमानंद । स्तवितां छंदहि झाला मंद ॥३॥
० पद ८१० वें
मजला म्हणती हाडी हाडी । परि मी वाहणा न सोडी ॥ध्रु॥
कुतरा सद्गुरुच्या घरीं । संत-वाहणा दांतीं धरीं ॥१॥
जुनाट सांपडलें जुतें । न करीं जिवाहुनि परतें ॥२॥
केशव म्हणे संत-वाहाणा । तेंचि माझें भूषण जाणा ॥३॥
० पद ८११
ते हे प्रसन्न झाली आतां । संती ठेवियला कर माथां ॥ध्रु॥
कोटीब्रह्मांडांची माता । गाती शतपथ मंगळ गाथा ॥१॥
जेथें तर्क मीमांसा आटे । तो तों अद्वैतबोधचि भेटे ॥२॥
जेथें कुंठित भूधरवाणी । म्हणे केशव चित्सुख-खाणी ॥३॥
० पद ८१२ वें
देखीला श्रीराम संशय तूटला । पांग हा फीटला संसारींचा ॥ध्रु॥
संतसंगें बरा राम ओळखीला । श्रीराम देखिला आजि माय ॥१॥
संसारबीरडें क्षणांत तूटलें । महावाक्य बोलें सद्गुरुच्या ॥२॥
सद्गुरुचे कृपें धन्य माझा जन्म । सर्व कामीं राम देखतसें ॥३॥
केशव म्हणे आम्हा अनुभव प्रतीति । जागृति सुषुप्ती राम जाला ॥४॥
० पद ८१३ वें
संत तेचि जाण सुखाचे सागर । सत्य हा निर्धार वेदवाक्य ॥ध्रु॥
संतसंगेवीण सुख जे बोलती । ते कांहीं नेणती पापरूपी ॥१॥
संतवेषें ब्रह्म साकारलें जाण । वाहतों त्याचीच आण दुजें नाहीं ॥२॥
केशव म्हणे किती सांगिजे या लोकां । संतरूपें देखा परब्रह्म ॥३॥
० पद ८१४ वें
काय सांगों मी कवणा । अनुभवी खुणा जाणती हो ॥ध्रु॥
डोळियांचें देखणे पाहिजे श्रवणें । तैसें निर्गुण या मनें जाणीजे हो ॥१॥
तमारीचा दिवा लाविजे रातीं । तैं वस्तुप्राप्ती इंद्रियासी ॥२॥
जाणीव नेणीव वस्तुची प्राप्ती । केशवीं हरे ख्याती अनुभवाची ॥३॥
० पद ८१५ वें
प्रकाश सांडुनि दीप जाय वेगीं । तरी प्रभा आंगीं जेथें तेथें ॥१॥
तैसें सांडुनी ब्रह्म मन जाय पुढें । तंव तेथें रोकडें आपणचि ॥२॥
सांडुनिया तंतु पट जाय वेगळा । तरी तो सगळा तंतू असे ॥३॥
सांडुनिया गोडी गूळ भिन्न झाला । तरी तो घडला गोडियेचा ॥४॥
सांडुनी जीवन तरंग जाय दूरी । तरी बाह्यांतरीं जीवन जया ॥५॥
केशव म्हणे लेणें सोन्यावेगळें गेलें । तरी तें संचलें सोनेंपणें ॥६॥
० पद ८१६ वें
ब्रह्मींची ब्राह्मणें आलों भिक्षेलागीं । अलक्ष भिक्षा वेगीं द्यावीं आम्हां ॥ध्रु॥
शुद्ध स्वयंपाक केला नाहीं जींहीं । त्यांची भिक्षा नाहीं घेणें आम्हा ॥१॥
कर्मकांडींचे ब्राह्मण ज्यांसी न सोडी कर्मठपण । त्यांची भिक्षा जाण नेघों आम्ही
भेदबुद्धी-पाक असे ज्याचे घरीं । भिक्षा त्याची करीं घेणें नाहीं ॥३॥
शब्दब्रह्मवादी शुष्क भिक्षा केवळ । तेणें एक चूळ न भरूं आम्ही ॥४॥
ध्यान धारणा योग लय लक्ष्य दीक्षा । ते अपूर्ण भिक्षा नेघों आम्ही ॥५॥
संकल्प विकल्प गेले नाहीं ज्याचे । भिक्षादान त्यांचें नेघों आम्ही ॥६॥
ऐसिया भिक्षेलागीं फिरतां आपण । गुरुककृपें केशवीं पूर्ण प्राप्ती झाली ॥७॥
० पद ८१७ वें
मजकडे अंगुली कां वो दावितो । नंदनंदन बाइये खुणावितो ॥ध्रु॥
निशिदिनीं पाठी माझी घेतली येणें । कोणापाशीं सांगों माझी मीच मी जाणे ॥१॥
सद्गुरुकृपें केशवराजीं नित्य खुणावी । हरूनि मानस चाळा आपुला लावी ॥२॥
० पद ८१८ वें
प्रेमभावें साधुसि लजिजे । मग साधुचि होउनि राहिजे ॥ध्रु॥
पूर्णसाधुसि अखंड भजणें । निज स्मरणीं अखंड राहाणें ॥१॥
साधुस्थिति जयासि कळली । तेणें साधुची मूर्ति देखिली ॥२॥
नित्य-केशव साधुसि पाहे । तो स्वयेंचि साधू आहे ॥३॥
० पद ८१९ वें
मोक्ष रोकडाची व्हावा । तरीं अभिमान सांडावा ॥१॥
संग साधूचा करावा । आत्माराम ओळखावा ॥२॥
योगयागें न घडे मोक्ष । तो हा सत्संगीं प्रत्यक्ष ॥३॥
केशव सत्संग लाधला । मोक्ष घरिंचा पाइक झाला ॥४॥
० पद ८२० वें
मोक्ष आहे आपणाजवळी । करितां देहबुद्धीची होळी ॥ध्रु॥
मोक्षालागुनि कां दुरि जावें । गिरीकंदरीं बैसावें ॥१॥
मोक्ष साधनीं आतुडे । मूर्ख मानिती बापुडे ॥२॥
सहज केशविं मोक्ष पाहीं । बद्ध मुक्त तेथें नाहीं ॥३॥
० पद ८२१ वें
जें कां खालतें ना वरुतें । आंत बाहेर पूरतें ॥ध्रु॥
तें म्यां सांगावें तुज कैसें । सांगूं जातां मीच नसे ॥१॥
जें का स्वदेशीं विदेशीं । सर्व देशीं समरसीं ॥२॥
केशव म्हणे मुखचंद्रमा । अमृतवृष्टी झाली आम्हा ॥३॥
० पद ८२२ वें
ऐसें पूर्ण कळे ज्यासी । तोचि माझी काशी ॥ध्रु॥
काम नाहीं जेथें । श्रीराम नांदे तेथें ॥१॥
समूळ काम नासे । तै सकळ राम भासे ॥२॥
केशव म्हणे रामा-। विण निरोप नाहीं कामा ॥३॥
० पद ८२३ वें
मानासाठीं शिके ज्ञान । तेथें कैचे समाधान ॥१॥
शेखीं देवा तैसें झालें । बोले तितकें वाया गेलें ॥२॥
सुखसागरीं न करीं वस्ती । अंगीं ज्ञातेपणाची मस्ती ॥३॥
स्वयें केवळ आपण रिता । नडे पुढलिया हिता ॥४॥
बुद्धी असोनि जाहला वेडा । पडे दुःखाचिया खोडां ॥५॥
म्हणे केशव त्याच्या ठायीं । प्राप्ती जगदीशाची नाहीं ॥६॥
० पद ८२४ वें
काळ देहासी आला खाऊं । आम्ही आनंदे नाचों गाऊं ॥१॥
आम्ही ऐसे निर्भय झालों । नित्य अक्षयी ठाया आलों ॥२॥
काळें गिळिला आमुचा देहो । आम्हीं काळचि गिळिला पाहों ॥३॥
म्हणे केशव आमुच्या ठायीं । देहासकट काळचि नाहीं ॥४॥
० पद ८२५ वें
संतसंग न करवे । मनीं राम न धरवे ॥१॥
तरी व्यर्थ हें जिणें । भूमीभार जाणणें ॥२॥
चिदानंद-सागरीं । बुडी न देववें जरी ॥३॥
केशवस्वामी कळेना । भेदाभेद गळेना ॥४॥
० पद ८२६ वें
वोही बडा नर नामका । बाबा चाकर मेरे रामका ॥ध्रु॥
सकल धंदा छोड देवे । हर वख्त हरनाम लेवे ॥१॥
मुनिजन की लेवे दुवा । सुख का दर्याव हुवा ॥२॥
दिल का धनी दिल में धरे । प्रेम का घनश्याम करे ॥३॥
आप निजध्यान में रहे । रामराह लोगनकू कहे ॥४॥
भेद भरम बिसर गया । निज० पद में मगन भया ॥५॥
कहत केशवराज कवी । अब हुँ मै रामछबी ॥६॥
० पद ८२७ वें
संतन के संग माया-ममता जली । अंदर की गॉंठी मेरी बोधसे खुली ॥१॥
राम का दिदार आजी मुझे दिया बे । दिल का जामिन अभिमान मुवा बे ॥२॥
सुख दुःख समान ब्रह्मानंदसे सहूं । जबतक गोपालजी को मिलमील रहूं ॥३॥
कहत केशवराज मेरी येकीन बडी । चिद्धनकि छबि मेरे दिल में खडी ॥४॥
० पद ८२८ वें
लाल बडा बे गोपाल बडा बे । हरवख्त हरदम मेरे दिल में खडा बे ॥ध्रु॥
संत का सिरताज मेरे घरकू आया । संसार बैरी मेरा मार चलाया ॥१॥
भातभात का अज मेरा किया दिलासा । लिखकर दिया चिदानंद मुकासा ॥२॥
कहत केशवराज कवी कविनका नबी । देखियामो बिसर गयी अपनी छबी ॥३॥
० पद ८२९ वें
अज घमंडी मेरी देखो । घमंडी मेरी देखो ।
सुरत बिना राममुरत । हृदयकमल रेखो ॥ध्रु॥
रामने दिदार । मुजे दिया सब लेदार ॥१॥
राम मेरा यार करे । बहुत मुसुं प्यार ॥२॥
कहत केशव बात । भऱ्या दिल में रघुनाथ ॥३॥
० पद ८३० वें
रामनाम कहो गोपालनाम कहो । संतके दरबार अप देखत रहो ॥ध्रु॥
संसार जंजाल सब छोडकर दिजे । लालनका जप प्रेम महालमें किजे ॥१॥
ज्यात का मनम ग्यान ध्यानसे तोडो । मन्मथका ख्याल ब्रह्मानंदसे छोडो ॥२॥
कहत केशवराज भाव दिलमें धरो । दिलका पछान बालन हकीकत करो ॥३॥
० पद ८३१ वें
ऐसें सद्गुरुनाथें केलें । माझ्या देहींचे मीपण नेलें ॥ध्रु॥
कानावाटे मी नयनासी आलों । शेखीं नयनाच्या नयनीं मी झालों ॥१॥
आकाशासी उरे ठाव । हेंही प्रत्यक्ष देखिला देव ॥२॥
केशव म्हणे मी जाणुनि भोळा । माझ्या सर्वांगी देखिला डोळा ॥३॥
० पद ८३२ वें
निर्गुण माया । आली सगुणासंगें खेळाया ॥ध्रु॥
ॐ ब्रह्म धुनी झाली । इच्छा देवीची पावली ।
पोटीं येकवीस पुत्र व्याली । कोमळ काया ॥१॥
रचिलें औटपीठ गोल्हाट । आणीक श्रीहाट तें त्रिकुट ।
पिंड-ब्रह्मांड ते नीट । दोन्ही त्या ठाया ॥२॥
माया आणी ब्रह्म पाहीं । एकरूप नांदती दोहीं ।
केशवरायासी म्हणे येई । अमृत प्याया ॥३॥
० पद ८३३ वें
एक नवल देखिलें बाई । माझे डोळां उगवली जाई ॥ध्रु॥
तिचें उफराटें लागलेंसें मूळ । देठाविण आलें येक फळ ॥१॥
तिच्या पाकोळिया नेणूं किती । गणितां शिणल्या वेदश्रुती ॥२॥
तिचा गंध पाहातां सर्वां भूतीं । अनुभवी भ्रमर सेविताती ॥३॥
व्यास प्रल्हाद चक्रवर्ती जनक । कपिल मुनी आणी सिद्धादिक ॥४॥
केशवस्वामीची कृपा पाहीं । गुणेंविण ते प्राप्त नोहे बाई ॥५॥
० पद ८३४ वें
बाइ हा शहाणा मोठा । चतुर शाहणा ॥ध्रु॥
मदनमनोहर गोकुळ सोडुनि । मथुरे केला वास ।
कापुर सोडुनि गंधक आवडे । कुब्जेच्या घरिं वास ॥१॥
बहुत राजस कुब्जा कैसी ? । कोळशाहुनि गोरी ।
लंब स्तन माजे बारीक । जैसी मृदंग भेरी ॥२॥
बाज मोडकी सुंभ तडकीडें । ढेंकुण ते चुळबुळती ।
फाटकी वाकळ सिंजुर (?) बहु । हरीस लागे प्रीती ॥३॥
पूर्णब्रह्म कुब्जेच्या घरीं । भाग्य तिचें बहु मोठें ।
केशवस्वामी आत्मा न भेटे । संचित बहु हें खोटें ॥४॥
० पद ८३५ वें
दयेच्या सागरा रामा येई रे । मज भेट देईं रे ॥ध्रु॥
मायेची पडली पायीं बेडी । हे कोण तोडी ॥
तुझिया नामाची केली जोडी । भवबंधन तोडी ॥१॥
सेडवग्र (?) घेतली घरीं धरणें । म्यां काय करणें ।
विषयीं गुंतलीं सकळही करणें । नाठवेचि तरणें ॥२॥
केशवीं दातारा निर्विकारा । साराच्या सारा ।
देइं तूं आपुलिया चरणीं थारा । हे दीनोद्धारा ॥३॥
० पद ८३६ वें
ऐसेंचि करा आतां । गुरुचरण धरा माथां ॥ध्रु॥
अभिमान तरु मोडे । निज राम सखा जोडे ॥१॥
संसारदुःख नासे । जगदीश जगीं भासे ॥२॥
अज्ञानसिंधु आटे । केशवीं केशव भेटे ॥३॥
० पद ८३७ वें
संसर्ग होतां त्याचा । विसर्ग पुढें कैंचा ? ॥ध्रु॥
देहपात झाला नाहीं । तंव राम कैचा कायी ? ॥१॥
आतां पूर्ण मंगळधामीं । मिरासी केली रामीं ॥२॥
श्रीरामचरणवासी । म्हणे केशव सौख्यराशी ॥३॥
० पद ८३८ वें (आरती १)
सहजाची आरती सहजीं गे माय । सहजीं सद्भावें ओवाळितां मी...जाय ॥ध्रु॥
सहजाची आरती सहजीं ओवाळूं । आत्माराम निजदृष्टी
न्याहाळूं ॥१॥
सहजाचें रूप सहज पाहातां डोळां । सहजीं सहज कैसा जाहला सोहळा ॥२॥
सद्गुरुकृपें केशवराजीं आरती ओवाळूं । सहजाचें रूप सहजीं सहज न्याहाळूं ॥३॥
० पद ८३९ वें (आरती २)
आरती गोपति हे तुज गोपाळराया । उजळितां उजळण झाली तन्मय काया ॥
सद्भाव निजभक्ति आरती करूं गोपती । वोवाळूं निजप्रेमें इंद्रिय साक्षित्व मूर्ति ॥
निरसे ताप तेणें पूर्ण विश्रांति वृत्ति । विठ्ठलीं आपेंआप होय स्वरूपप्राप्ती ॥१॥
स्वरूप शुद्ध तुझें निज नित्य निर्मळ । निश्र्चळ निष्कलंक तेजोमय अखिल ॥
आपेंआप संचलासे अंतर्ब्राह्य केवळ । पाहतां दृष्टी निवे मन होय पांगुळ ॥२॥
आरती निजतेजें पूर्ण प्रकाश झाला । उजळितां देहदीप हेत विरोनि गेला ॥
राहिलें लक्ष तेथें देहभाव निमाला । केशवीं गुरुकृपें शब्द निःशब्द ठेला ॥३॥
० पद ८४० पद वें
तरलों तरलों पै आम्ही । जितांचि मुक्ती गुरुनामीं ॥ध्रु॥
सद्गुरु हृदयीं भरला गा । मनोरथ माझा पुरला गा ॥१॥
पाहतां गुरुचें स्वरूप । सबाह्य झालों सुखरूप ॥२॥
केशव म्हणे गुरुभक्तीं । पायां लागति त्या मुक्ती ॥३॥
० पद ८४१ वें
आम्हा त्याविण बरवें काय । धरूं हृदयीं त्याचे पाय ॥ध्रु॥
आम्हा तारू अथवा मारू । परि तो आमचा सद्गुरु ॥१॥
देतां घेतां कर्में करितां । त्यासि विसंबेना आतां ॥२॥
म्हणे केशव त्याचे पायीं । उडी दिधली निश्र्चयीं ॥३॥
० पद ८४२ वें
म्हणुनि संतांसी भजावें । त्याचें पायीं लीन व्हावें ॥ध्रु॥
संत० पदीं धरितां भाव । आपेआप प्रकटे देव ॥१॥
देव संतापाशीं आहे । पुढत पुढती सांगों काय ॥२॥
म्हणे केशव संतभजनीं । जनार्दन जनीं वनीं ॥३॥
० पद ८४३ वें
ऐसें आवडे जयासी । देव खांदीं वाहे त्यासी ॥ध्रु॥
धाउनी हरिकथेसी भावें । कीर्तनीं नाचावें ॥१॥
प्रेमें हरिकथे लोळावें । क्षेम हरिभक्तांसी द्यावें ॥२॥
दास हरिभक्तांचे व्हावें । केशवस्वामीसी मिळावें ॥३॥
० पद ८४४ वें
साधु म्हणावें तयासी । नाहीं विषमता जयापाशीं ॥ध्रु॥
शिरीं ब्रह्मांउ कोसळे जेव्हां । स्वस्वरूपीं निश्र्चळ तेव्हां ॥१॥
काळें गिळिली देखे काया । परि शोकाची न पडे छाया ॥२॥
शत्रुमित्र आणी बंधू । हा त्रिविध नाहीं भेदू ॥३॥
कृपा करणें पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥४॥
काम, क्रोध, लोभ, चिंता । जेथें नुपजे सर्वथा ॥५॥
ज्यासी आत्मत्वें संपूर्ण । सर्व भूतीं कृपा पूर्ण ॥६॥
गुरुकृपें केशवीं पाहो । अनाथावरि विशेष स्नेहो ॥७॥
० पद ८४५ वें
कल्पनेनें सृष्टी केली । कल्पनेनें सृष्टी नेली ॥१॥
अवधीं मनाची कल्पना । मनोजय मुख्य ज्ञान ॥२॥
पाहतां कल्पना स्फरण । तेथें कैचें उरलें उरण ॥३॥
शास्त्र-अभ्यासाच्या कोटी । मन करी त्याची लुटी ॥४॥
म्हणे केशव हे मात । सकळ सिद्धांताचा सिद्धांत ॥५॥
० पद ८४६ वें
मुक्त म्हणतां कां गा भिसी । काय जाणती हीं पिशीं ॥१॥
देव म्हणुनी मानिसी धोंडा । आड पळती पोरें रांडा ॥२॥
वय गमाविलें येणें । व्यर्थ मूर्खाचें हें जिणें ॥३॥
येथें आहे तेथें नाहीं । देव भक्तां चुकी पाही ॥४॥
सांडि केशवीं मीपण । मग देवचि आपण ॥५॥
० पद ८४७ वें
स्फुट श्र्लोक
पूर्णता असे शिरीं ज्याचिया । वळखणें कसें म्हणसि तूं तया ॥
सकळिकांवरी सारखी दया । आपुलें दुजें नाठवे तया ॥१॥
कुंभ ठेविले बहुत मेदिनी । त्यांत बिंबला एक दिनमणी ।
आत्मा हा तसा वळखिला जनों । त्यासि भेद तो नूपजे मनीं ॥२॥
वदन आपलें आपणा जसें । दर्पणीं दुजे भासलें दिसे ।
विश्र्व मायेनें व्यापिलें तसें । परी तें मुळीं ब्रह्मचि असे ॥३॥
बहुत गाडगे परळ घागरी । भासली तरी मृत्तिका खरी ।
विश्र्व जाण गा तैसिया परी । पाहतां दिसे एकला हरी ॥४॥
देखणा हरी दीसतो हरी । दृश्यही हरी अदृश्यही हरी ।
सूक्तही हरी असूक्तही हरी । सर्वही हरी तया एकला हरी ॥५॥
ध्यान तेधवां होय वाउगें । समुळ ज्ञानही राहिलें उगें ।
विश्र्व पाहतां ब्रह्म आवघें । सहज केशवीं अवगणें मुगें ॥६॥
० पद ८४८ वें
धम जागो माहतास
ॐकार निजवृक्ष । त्रिगुणातीत अलक्ष । विस्तारला निजबोधें । स्वतः सिद्ध प्रत्यक्ष ॥
त्यावरी वेंघोनि संतापासी । दान मागों अपरोक्ष । तेही इच्छा पूर्ण केली । दावियले निजलक्ष ॥१॥
या गुरुरायाचा धर्म जागो । त्यांचे चरणीं चीत लागो । वचन मात्रें अभय केलें । नेदि आणिकासी मागों ॥ध्रु॥
कृपावंत संत बारे । ज्याचे देणें अमूप । वेंचिता न सरेची । अक्षय सुखरूप । सनाथ तेंही केलें मज ।
देउनि आत्मपडप । ज्ञानदीप उजळुनियां । प्रकाशिलें आपेआप ॥२॥
ज्याचें भावें नाम घेतां । गेले त्रिविधताप । ज्याचें मनीं रूप ध्यातां । स्वयं झालों तद्रूप ॥
कैवल्याचें देउनि दान । नीरसिलें पुण्यपाप ॥ सद्गुरुकृपें केशवराजीं । केलें सबाह्य सुखरूप ॥३॥
॥या गुरुराजाचा धर्म जागो॥
ॐ! ॐ!! ॐ!!!
श्रीसमर्थ रामदासस्वामींबद्दल श्रीकेशवस्वामींचे अंतःकरणात असलेला आदर खालील ० पदावरून ध्यानांत येईल.
० पद ८४९ वें
रामदास माउली अनाथाची । रामदास माउली ॥ध्रु॥
सच्चित्सुख घन, वरद प्रतापी । शांतीची साउली ॥१॥
अनाथ नर जे शरण रिघाले । तयांलागीं पावली ॥२॥
केशव केशवीं निजसुख भोगी । आठवितांचि धांवली ॥३॥
ॐ
श्री केशवस्वामीनीं श्रीसमर्थास भेट देण्याबद्दल पत्र लिहिलें त्यांतील ओंव्या.
तूं स्वानंदामृताची चखोटी । तूंचि चवी तुझ्या पोटीं ।
तें निरसुनियां दीजे भेटी । स्वानंद दृष्टी अवलोकनें ॥१॥
श्रीरामदासा परमसखया । स्वानंद-पान्हा गुरुवर्या ।
केशवे विज्ञप्ति ल्याहावया । हेंचि कारण ॥२॥
ॐ! ॐ!! ॐ!!!