० पद १९७ वें
देवो घरघेणा ॥ याचें गाऱ्हाणे सांगो मी कवणा ॥ध्रु॥
बहुताचीं बुडविलीं घरें ॥ याचि संनिघानें नव्हेचि बरें ॥१॥
जे जे यासी शरण रिघाले ॥ ते ते संसारावेगळे जाले ॥२॥
म्हणे केशव कळला हावो ॥ कैंसा पाहतो मैंद पहा वो ॥३॥
० पद १९८ वें
निःशब्द शब्दीं बोले ॥ त्याचा बाळक मी बाळक मी ॥ध्रु॥
मीपण ग्रासुनि डोले ॥ संशय विलया नेले ॥
जड जीव चिद्धन केलें ॥ त्याचा बाळक मी ॥१॥ त्याचा ॥
मंगलसम चिरे नेसे ॥ निज० पदिं निश्र्चळ बैसे ॥
अपार तोषें हांसे ॥ सहजीं सहज विळासे ॥२॥ त्याचा ॥
परम० पदासी सेवी ॥ सुखघनीं आवडी ठेवी ॥
भोगी अद्वय देवी ॥ न करी उठवाठेवी ॥३॥ त्याचा ॥
अखंड उघडा जाला ॥ निजांग लेणें ल्याला ॥
मुळींच्या ठाया आला ॥ निगमीं स्ववि जे त्याला ॥४॥ त्याचा ॥
निर्मन होउनि वागे ॥ निजरूपी निद्रा लागे ॥
एकपणेविण जागे ॥ केशव मज मी सांगे ॥५॥ त्याचा ॥