श्रीकेशवस्वामी - भाग ५

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद ९४ वें

निजसुख दीधलें । निज० पदिं ठेविलें । अंकि बैसविलें । मायबापें ॥२॥

मी तंव नेणते । त्यासि माझें वोझें । तारीलें निजभोजें । कृपावंतें ॥३॥

कृपावंत खरा । दयेचा सागरू । केला पै उद्धारू । आजि माझा ॥४॥

संसार आघवा । केला हा सुखाचा । अनंत जन्माचा । हरिला सीण ॥५॥

पुढतीं जन्म नाहीं । ऐसें येणें केलें । निजांग अर्पिलें ।मजलागीं ॥६॥

उद्धाराचें देणें । सांठवावें कोणें । फेडिलें पारणें । त्रैलोक्याचें ॥७॥

तिहीं लोकीं थोरू । सुकाळू पैं झाला । चिद्घनु वोळला । बाप माझा ॥८॥

वोसावला सद्गुरु । आनंदाव भरें । वाहवलीं पुरें । भवरोगाचीं ॥९॥

त्रिविध ताप गेले । जिवबुद्धी निरसली । सर्वांगी बाणली । निजशांती ॥१७॥

केशव म्हणे माझें । सद्गुरुमाहेर । विश्रांतीचें घर पावविलें ॥११॥

० पद ९५ वें

पावविलें बापें । विश्रांतिच्या घरीं । अभयकरू शिरीं । ठेवियेला ॥१॥

अभय थोर झालें । श्रीगुरूचें आम्हां । मिळणी परब्रह्मा । याच देहीं ॥२॥

याच देहीं आम्हां । ब्रह्मप्राप्ती सत्य । जालें कृतकृत्य । जन्म माझें ॥३॥

तुटला माया मोहो । फिटला संदेहो । देहीं देह विदेहो । होउनि ठेलों ॥४॥

भा्रंति वोवाळणी । सांडणी सांडिलें । ० पदीं बैसवीलें । आपुलिया ॥५॥

आत्म० पदीं ठाव । सांगतां नवलावो । खुंटला येवो जावो । अजी माय ॥६॥

केशव म्हणे माझा । सद्गुरु विसांवा । तेणें विश्रांतीचा ठेवा । दिधला मज ॥७॥

० पद ९६ वें

विश्रांतीचा ठेवा । दिधला वो मातें । बापें कृपावंतें । गुरुरायें ॥१॥

गुरुमुखें विश्रांति । जंव न पविजे देखा । तंव नाहीं सुटिका । संवसाराची ॥२॥

ऐसें आणोनि चित्तीं । करितां गुरुभक्ति । स्वरूपाची प्राप्ती । जाली माय ॥३॥

उद्धाराच्या गोष्टी । सांगतां फुकटा । नुघडे दारवंटा । कैवल्याचा ॥४॥

मुखीं ग्रास असे । न गिळितां आळसें । पिडिजें उपवासें । जियापरी ॥५॥

तैसा आत्मा नांदे । देहभरोवरी । परी भक्तीवीण हरी । दृश्य नव्हे ॥६॥

सद्गुरूची भक्ती । सर्वदा विश्रांती । येकान्तीं लोकान्तीं । ब्रह्मबोधू ॥७॥

ब्रह्मबोधू आम्हा । सद्गुरूच्या बोलें । रामराज्य जालें । आजि माय ॥८॥

केशव म्हणे माझा । सद्गुरु निजात्मा । तेणें निजधाम । पेठ केलें ॥९॥

० पद ९७ वें

निजधामीं पेठ । गुरुरायें केलें । उदरीं सांठवीलें । आपुलीया ॥१॥

प्रेमाचा सारसु । कृपेचा वोरसु काय सांगो ॥२॥

कृपेच्या (सागरा) सदगुरु दातारा । तेणें येरझारा ।

चुकवील्या येणें जाणें गेलें । दुजेंपण ठेलें । स्वरूपीं बोळवीलें । मायबापें ॥४॥

स्वरूपी बोळवण । जाली पेठवन । मागती आपण । बोलावया ॥५॥

बोलावा निजावा । काया-मनें-वाचा । विसांवा तिहींचा । गुरुरावो ॥६॥

गुरु माझा सखा । जिवलग सोयरा । त्याच्या उपकारा । काय वानूं ॥७॥

उपकारू केला । भवबंध छेदीला । सद्गुरु बापुला । अनाथ-बंधु ॥८॥

अनाथाचा बंधू । दिनाचा कैवारी । मज तंव सौंसारीं । गुरुरावो ॥९॥

संवसाराचें भय । निरसीलें अवघें । निजसुखें निजागें । ठेवियेलें ॥१७॥

निजसुखें आम्हां । आनंदाच्या कंदें । पूर्ण परमानंदे । आनंदवीलें ॥११॥

परमानंद झाला । सद्गुरुच्या संगे । सबाह्य श्रीरंगें । आलंगीलें ॥१२॥

माहेराच्या भेटी । मायसुता मीठी । यकायकीं पोटीं । हरपलें ॥१३॥

बाप तोचि माय । सांगो आतां काय । केशव म्हणे पाहें । मी नीज तान्हें ॥१४॥

० पद ९८ वें

ऐसी दशाप्राप्ती । असी ० पदीं विश्रांती । जाली उपशांती । जीवभावा ॥१॥

जीवशीवभाव । दोहींसी सामाव । तेथींचा अनुभव । अनिर्वाच्य ॥२॥

परा पारूशली । गती पांगुळली । निजवस्तु बोली । बोलवेना ॥३॥

बोलासी नातुडे । आगम्या आगम्य । सर्वांचा उपरम । प्राप्तिदशा ॥४॥

निजप्राप्त स्थिती । निजबोधें संत्रुप्ति । सद्गुरुची भक्ती । फळासी आली ॥५॥

केशव म्हणे आम्हां । सद्गुरुच्या पायीं । येणें जाणें नाहीं । ऐसें जालें ॥६॥

० पद ९९ वें

सद्गुरुचें नाम । तें माझी विश्रांती । म्हण कां अहोरात्रीं । राम राम ॥१॥

रामनाम वाचें । अखंड उच्चारा । करा त्या हाकारा । सद्गुरुसी ॥२॥

श्रीरामा सद्गुरु । तूं माझा बापुला । तुझेनि आपुला । विश्व जनूं ॥३॥

विश्र्वरूपा रामा । तूं निज विश्रामा । भेटी मेघश्यामा । द्यावी मज ॥४॥

पसरूनी बाह्या । क्षेम दे लवलाह्या । निजवीलें तापलीया । मज अनाथासी ॥५॥

अनाथाच्या नाथा । सद्गुरु समर्था । तुजविण सर्वथा । मज कोण आहे ॥६॥

केशव म्हणे माझे । पुरवी मनोरथ । भेटी दिल्ही त्वरित ।याचि देहीं ॥७॥

० पद १०० वें

याचि देहीं भेटी । दिल्ही गुरुराया । निरसुनीया माया । सदेहबुद्धी ॥१॥

नाथीली अविद्या । विद्यमान दिसे । तिने विश्र्व कैसें । मोहियेलें ॥२॥

घालुनि मोहजाळ । मोहिले तिन्ही लोक । नवल है कौतुक । अविद्येचें ॥३॥

नाहीं तेंचि दावी । आहे तें आच्छादी । मिथ्या देहबुद्धी । वाढविती ॥४॥

वाढवूनी देहबुद्धी । प्राणियांसी पीडी । जन्ममरण कोडी । भोगवीत ॥५॥

ऐसी हे अविद्या । दुर्घट सकळिकां । आटळ ब्राह्मादिकां । तरावया ॥६॥

तरली न वचे । एषणा ही लागोनी । ते स्वामीच्या वचनीं । मिथ्या जाली ॥७॥

मिथ्या जाली माया । हरपली काया । लगतांची पायां । निजभावें ॥८॥

जितुकें होतें तितुकें । नाहीं ऐसें झालें । अखंड कोंदले । आत्मरूप ॥९॥

आत्मरूपीं भेटी । माया विरे पोटीं । ब्रह्मानंदे सृष्टी । हेलावत ॥१७॥

केशव म्हणे आवघा । पायांचा प्रसाद । हृदयीं ब्रह्मानंद । प्रकाशलें ॥११॥

० पद १०१ वें

हृदयीं ब्रह्मानंद । प्रकाशला सिद्ध । तेणें भेदाभेद । पारूषलें ॥१॥

अवघा कोंदाटला । निजात्मप्रकाशू । नित्य निराभासु । सर्वगत ॥२॥

सर्वगत निज । स्वरूप कोंदलें । सहज तें येकलें । स्वभावसिद्ध ॥३॥

येकपणेंवीण । येक नादें पूर्ण । ब्रह्म सनातन । अनिर्वाच्य ॥४॥

अनिर्वाच्य ब्रह्म । कोण म्हणे तेथें । मी तूंपण जेथें । हरपलें ॥५॥

तेथें बोलणें चालणें । उठणें बैसणें । जिणें आणि मरणें । कांही नाहीं ॥६॥

कांहि नाहिं तेथें । तेंचि निज सहज । निली निज फुंज । गिळुनी असे ॥७॥

तेथें सुचीत सुखभाव । दोन्ही जाले वाव । एकला अनुभव । सद्गुरुकृपा ॥८॥

सद्गुरु-वचनें । सहजाचि भेटी । सहजीं सहज मिठी । पडली माय ॥९॥

गुरुभक्ती भावना । भेटी निरंजना । परिपूर्ण रचना । आत्मग्रंथी ॥१७॥

येथुनी वोविया । प्रारंभू पुरला । सहज तो उरला । अविनाश ॥११॥

अविनाश रूप । निष्कळ उरलें । तें गुरुकृपें लाधलें । केशवराजीं ॥१२॥

० पद १०२ वें

डोळे माझे तान्हेले । पाहतां वाटुली । कैं भेटेल माउली । श्रीगुरुरावो ॥१॥

माउलीची भेटी । करा मज वेगीं । रिघेन वोसंगी । प्रेमप्रीती ॥२॥

माहेरीचे वाटे । सदा माझे नयन । कैं येतां देखेन । बाप माझा ॥३॥

बाप माझा सखा । सोयरा जिवलग । स्वामी अंतरंग । गुरुरावो ॥४॥

सद्गुरुची भेटी । होईल जिये वेळीं । तैं मज दिवाळी । पुण्यकाळ ॥५॥

मुख न्याहळीन । पाईं घालीन मिठी । करीन उठाउठीं । निंबलोण ॥६॥

प्रीती आक्षेवन । करीन पंचारती । गुरु ब्रह्ममूर्ती । वोवाळीन ॥७॥

प्राण कुरवंडी । करूनी सांडीन । बसणें घालीन । मस्तकाचें ॥८॥

सद्गुरुचे पाय । ते माझी मिरासी । होईन क्षेत्रवासी । निरंतर ॥९॥

काया हें कैकट । सांडुनीयां दूरी । राहीन निरंतरी । गुरुचरणीं ॥१७॥

सद्गुरुचरणीं । अनुपम्य गोडी । केशव म्हणे बुडी । देईन तेथें ॥११॥

० पद १०३ वें

सौंसारबंधन । जेणें केलें शून्य । तयासी अनन्य । शरण रीघा ॥१॥

मायबाप तोची । सद्गुरु विसांवा । त्याच्या पाईं ठेवा । अखंड मन ॥२॥

तो बोधाचें निजरूप । हाची ज्ञानदीप । स्वानंदस्वरूप । गुरुरावो ॥३॥

केशव म्हणे त्याच्या । संगतीचा मारा । लागे तो परपारा । शीघ्र पावे ॥४॥

० पद १०४ वें

धन्य ते गुरुरायाची संगती । अविनाश० पद हें भोगवीती ॥१॥

नवल गुरुकृपेचा सौरसु । अंतर्बाह्य दिसतो परेशु ॥२॥

श्रुतिशास्त्रें धुंडितां न कळे । गुरुवाक्यें तें रूप आकळे ॥३॥

गुरुकृपें केशवीं अनुभवो । सांगे आत्मप्रचिती केशवो ॥४॥

० पद १०५ वें

गुरुरायाचें नाम सार सेवी । चित्त सद्गुरु पादांबुजी ठेवी ॥१॥

मग काळाचें भय तुज नाहीं । गुरुप्रसादें तरशील पाहीं ॥ध्रु॥

गुरु सच्चिदानंदघन मूर्ती । नको विसरूं तयाची गुणकीर्ती ॥२॥

म्हणे केशव सद्गुरूस्वामी । पहा निजबोधें अंतर्यामीं ॥३॥

० पद १०६ वें

डावें उजवें नाही त्यासी । शीघ्र उजावें घेउनि त्यासी ॥१॥

आम्ही मंगळधामा आलों ॥ पूर्ण मंगळ-रूप झालों ॥ध्रु॥

ज्ञानगंगेसी मज्जन करूनि ॥ द्वैतपाप बरवें हरूनी ॥२॥

गुरुकृपें केशविं वेगें ॥ लीन होउनि चिन्मय योगें ॥३॥

० पद १०७ वें

ज्ञानमार्गीचे कापडी होती । निजधामासी टाकुनि येती ॥ध्रु॥

तुज हेंचि मागणें देवा । देइं अखंड तयांची सेवा ॥१॥

पंथ त्रयाचें सांडुनि नांव । मूळ मार्गाची घेती धांव ॥२॥

आड वस्ती न करीती पाहो । दीन आहे तो पावलें ठावों ॥३॥

जेथें पावलें तो ठाव जालें । नाही परतोनी माघारें आलें ॥४॥

केशव म्हणे ते गुरुराव पाहीं । चित्त अर्पिन त्याचिया पायीं ॥५॥

० पद १०८ वें

डोळां नलगे निज सेजेसी । वृत्ति मीपणें व्याकुळ कैसी ॥ध्रु॥

आतां काय करूं गुरुराया । मज तुजविण नयेचि ठायां ॥१॥

जातिकुळाचा अभिमान अंगी । भोगिलेंचि भवदुःख भोगी ॥२॥

देहीं संकल्प विकल्प बहू । शुद्ध शिव मी म्हणवि तो जीउ ॥३॥

आदिनाथ वेद प्रसिद्ध । दिनबंधु आनंदकंद ॥४॥

म्हणे केशव त्रिभुवन-सारा । भेटि देउनि तारीं उदारा ॥५॥

० पद १०९ वें

गुरुनामस्मरणें तेंचि ज्ञान वो । गुरुचिंतने सायुज्य समाधान वो ॥ध्रु॥

गुरु केवळ निजानंद मूर्ती वो । भवतापहरण गुरुभक्ती वो ॥१॥

गुरु त्रिपुटीवेगळें ब्रह्म साचे वो । भाग्यवंता लागले ध्यान त्याचें वों ॥२॥

गुरु चिन्यम स्वरूप नित्य शुद्ध वो । गुरुचरणी विन्मुख पाय माथां वो ॥४॥

गुरु स्वामीं सकळ सुखदाता वो । म्हणे केशव विसरूं केविं आतां वो ॥५॥

० पद ११० वें

गुरुरायाचें ० पदतीर्थ सेवन । ज्यासी घडलें तेचि भुवनी पावन ॥ध्रु॥

त्याच्या संगतीचा मज लागो वारा । तेणें सखीय पावेन पैलपारा वो ॥१॥

गुरुमज्जनीं जीवनबिंदू उडती । पूर्वपुण्य तें ज्यावरी पडती वो ॥२॥

गुरुचरणीचें रज अति निर्मळ । तेणें मंडित जयाचें निटळ ॥३॥

गुरुवदनींचें निजसेश चांगले । तेणें हृदयकमळ ज्याचें रंगलें वो ॥४॥

गुरुमूर्ती स्वानंदमय साजिरी । म्हणे केशव बिंबली ज्याच्या अंतरी ॥५॥

० पद १११ वें

गुरुरायाचीं ० पद-युग्में चांगली । मती माझी अखंड तेथें रंगली ॥ध्रु॥

भवतापहरण निज पाउलें । पूर्वपुण्य म्यां लोचनीं पाहिलें रे ॥१॥

चिदानंदस्वरूप वेद वर्णिलें रे । आम्हांकारणे गुरुवत जालें रे ॥२॥

पाय हृदयीं धरितां भेदु गेला रे । ब्रह्मानंद केशवराजीं जाला रे ॥३॥

० पद ११२ वें

तुझ्या पायांची प्रीती बहु लागली गा । तुझी मूर्ती माझ्या हृदयीं कोंदली गा ॥ध्रु॥

गुरुराया मानस माझे मोहना रे ॥ तुज पाहतां आनंद जाला नयनां रे ॥१॥

तुझ्या वेधें वेधली मती पाहीं गा ॥ तुजपरतें सद्भक्ती आम्हां नाहीं गा ॥२॥

तूं सकळ मंगळनिधी देवा रे ॥ मोक्षाहुनि बरवी तुझी सेवा रे ॥३॥

विश्वबीजा, निष्कळा, ज्ञानसिंधू रे ॥ भवार्णवा, तारका, दीनबंधू रे ॥४॥

केशवस्वामी सद्रुपा सुखमूर्ती रे ॥ ऐक्यावरती वाईली तुझी भक्ती रे ॥५॥

० पद ११३ वें

गुरुरायाचें ० पदक्षेत्रवासी वो ॥ सर्व भावें होईन त्यांची दासी वो ॥ध्रु॥

मज करणें कांहिच नाहीं उरलें ॥ गुरुभक्ताचें वंदीन पाउलें ॥१॥

गुरुभक्त नांदती जया देशीं वो ॥ तो मी देश ध्याईन अहर्निशी वो ॥२॥

गुरुभक्तीचा कुळधर्म ज्या घरीं ॥ त्याच्या मूर्ती मी पूजीन अंतरी ॥३॥

गुरुदासांच्या आश्रमीं राहीन ॥ सर्व सुखाचें निजफळ लाहीन ॥४॥

गुरुवेगळें दैवत ज्यासी नाहीं वो ॥ म्हणे शरण त्याच्या पाईं वो ॥५॥

० पद ११४ वें

सखया गुरुराया अतिसदया ॥ झडकरि ये मम हृदया ॥ध्रु॥

येउनि लवलाहीं क्षेम देईं ॥ ब्रह्म० पदाप्रति नेईं ॥१॥

अनाथबंधू तूं चित्सुसुद्धू ॥ तुझाचि मजला वेधू ॥२॥

अगणित सुखधामासम रामा ॥ केशव म्हणे फळ आम्हां ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP