० पद ५ वें
रामनामाची महिमा मोठी । नामें तरले कोट्यानुकोटी ॥ध्रु॥
म्हणा श्रीराम जयराम । भवरसागरतारक नाम ॥१॥
नामें प्रल्हाद तारीला । गजइंद्र सोडवीला ॥२॥
नाममात्रेंचि केवळ । उद्धरीला अजामेळ ॥३॥
व्यभिचारिण दुराचारी । नामें तरली गणिका नारी ॥४॥
व्यास वाल्मिक अंबरुषी । जाला नामेंचि उद्धार त्यांसी ॥५॥
नामापरतें नाही सार । तरले नामेंची अपार ॥६॥
गुरुकृपें केशवी नाम । म्हणतां स्वयंचि जाला राम ॥७॥
० पद ६ वें
नाम घेतां आनंद वाटे । रूप पाहतां प्रेम दाटे ॥ध्रु॥
काया सांगो नवलपरी । खूण जाणे आत्माहरी ॥१॥
रूप पाहतां मन नीवालें । क्षेम देतां बहु सुख जालें ॥२॥
केशव म्हणे जाली भेटी । निजभावें पडली मिठी ॥३॥
० पद ७ वें
स्वयें श्रीरामभक्ति करूनी दाऊं । जग अवघें भजनी लावूं ॥ध्रु॥
गुढी उभारूं नामाची । पव्हे घालूं हरिप्रेमाची ॥१॥
गळां घालुनि तुळशीमाळा । नाचों कीर्तनी वेळोवेळां ॥२॥
म्हणे केशव डोळेभरी । धनि पुरेतों पाहों हरी ॥३॥
० पद ८ वें
नामें गणिका वैकुंठवासी । नामें अढळ० पद ध्रुवासी ॥ध्रु॥
नाम चांगले । नामीं मन माझे रंगले ॥१॥
नामें तरले शुकादि योगी । नामें सोडविले भवरोगी ॥२॥
नामें रामदर्शन साचें । नाम गर्जत केशव नाचे ॥३॥
० पद ९ वें
या हो ब्रह्मांडाच्या कोटी । हरपले ज्याचिया पोटीं ॥ध्रु॥
त्याची भेटी केली जाणा । माझा कृपाळु सदगुरुराणा ॥१॥
देव, दानव, मानव, योगी । घ्याति निरंतर ज्यालागीं ॥२॥
केशवस्वामी त्रैलोक्यपाळ । तोडि नामेंचि भवदुःख-जाळ ॥३॥
० पद १७ वें
नाम घेतां बहु सोपारे । परी निर्दळी पातक सारें ॥ध्रु॥
थोर महिमा हरिनामाचा । नामें पावन करि तूं वाचा ॥१॥
रामनामां आळस केला । तो जीतचि नरकासी गेला ॥२॥
केशा म्हणे नामचि घ्यावें । नाम चिन्मय रामचि व्हावें ॥३॥
० पद ११ वें
रामनामाचा चोखाळा । कां रे न घेसी तूं चांडाळा ॥ध्रु॥
नाम घेतां भगवंताचें । काय वेंचे तुमच्या बाचे ॥१॥
रामनामी गर्वे जासी । तरी होशिल रौखवासी ॥२॥
नामघोष गर्जत वाचें । कान धरुनी केशव नाचे ॥३॥
० पद १२ वें
संसार-परथडी रे । नामें पाविजे रोकडी रे ॥ध्रु॥
नाम विश्रांतीरूप पाही । माक्ष नामेंवीण नाही ॥१॥
नामें जडमूढ जीव तरले । नामें मुनिजन उद्धरिले ॥२॥
नामें कैवल्य निजधाम । भेटे नामेंचि श्रीराम ॥३॥
नाम समाधि सुखदीप । नामें केवळ निजरूप ॥४॥
म्हणे केशव नाम घ्यावें ॥ नामरूपातीत व्हावें ॥५॥
० पद १३ वें
नाम साधूचें जीवन रे । तुटे नामेंचि बंधन रे ॥ध्रु॥
नामें सुखासी सुख जालें । नामं मीपण निमालें ॥१॥
नामें शाश्र्वत ० पद जोडे । नाम न म्हणती जन वेडे ॥२॥
म्हणे केशव हरिनाम । घेतां हरिरूपीं विश्राम ॥३॥
० पद १४ वें
नारायणहरि नारायण रे, नारायणहरि नारायण रे ॥
केशव माधव यादव मुकुंद, मधुसूदन मुरलीधर रे ॥ध्रु॥
करुणानिधि भक्त-कृपाकर, परमात्मा परमेश्र्वर रे ॥१॥
भवभय-मोचन, संकट-नाशन, परम-पुरुष, परब्रह्म रे ॥२॥
कंस-निर्दाळण, पांडव-रक्षण, गोपीमानस-प्रियकर रे ॥
अहिल्या-दद्धारण, त्रिमक-भंजन, पतीत-पावन रघुवीर रे ॥३॥
पूतना-शोषण, द्रौ० पदी-दुःखहर, गरुड-वाहन जगदीश्र्वर रे ॥
मयोरपत्रघर, पीतपटधारी, केशव-प्रभु, दीनोद्धर रे ॥४॥
० पद १५ वें
हरिनामस्मरण । न करि कां रे जना । नामस्मरणेंवीण नुद्धरीजे ॥ध्रु॥
एका नामें देखा । उद्धरली गणिका । तेंचि नाम फुकां ॥ न म्हणा कां ॥
प्रल्हाद, नारद । नामें जाले शुद्धबुद्ध । पुराणप्रसिद्ध जाणिसे ऐसे ॥१॥
जिहीं जिहीं जाण । केलें नामस्मरण । भगवंते आपण समान केले ॥
शुकासनकादिक । नामेंचि तरले देख । भवसिंधुतारक हरिनाम हें ॥२॥
हरिनामगजरीं । गर्जती प्रेमकरी । तयापरता हरी ॥ परता नव्हे ॥
केशव म्हणे आम्ही । पावलों विश्रांति नामीं । वृत्ती आत्मारामीं रामरूप हें ॥३॥