|
स्त्री. १ थकवा ; थकावट ; पुढें चालण्याची अशक्यता ; दुर्बलता ; कुंठितावस्था ( हा शब्द व्यापक अर्थाचा असला तरी याचा मर्यादित उपयोग करतात ). दहा लाडू खाईन म्हणत होतों परंतु पाच खातांच टेंक झाली . २ स्थैर्य ; धैर्य ; पक्का निश्चय ; ठाम समजूत ; अवसान ; सामर्थ्य ; शिकस्त ( आदरातिथ्य , धार्मिक विधि , दानधर्म यांतील ). ( क्रि० राखणें ; संभाळणें ; सोडणें ) प्रसंगीं २०० सुध्दां पाहुणे भोजनास आले तरी गृहस्थ टेंक सोडावयाचा नाहीं . ३ स्वाभाविक व नेहमींच्या किंवा संवयीच्या गरजा ; पक्कीसंवय ; परिपाठ ; टूक अथ ३ पहा . ( क्रि० राखणें ; संभाळणें ; साधणें ; चालविणें ; उतरणें . [ टेंकणें = बाजूला लवणें ; हिं . टेंक ] न. १ पेंव ; समूह ; पुंज . तेथ सिध्द येती गा आलोटें । सुरवरांचें टेकफुटे । - एभा १९ . २३३ . २ इच्छा ( व . ) गुर्मी , गर्व ; धैर्य . ३ ( व . ) हट्ट ; दुराग्रह . पुन . लहान टेंकाड , डोंगर , उंचवटा . ०धरणें घट्ट धरणें ; चिकटून राहणें ; नेट घरणें . टेकीस येणें - दमून जाणें ; असमर्थ होणें . टेकीस टेंक उतरणें - तोलास तोल देणें ; बरोबरी करणें ; स्पर्धा लावणें . ०दार टेकीचा पहा . टेकीचा - वि . आदरातिथ्यांत तत्पर , उदार , स्थिर ; शेवटपर्यंत टिकाऊ .
|