|
पु. १ वजन करणे ; वजन करण्याची क्रिया . २ वजन करुन पदार्थांचे समजलेले मान , परिमाण . ३ कल ; झोंक . राधेयपताकेचा होता मागेचि तेधवां तोल । - मोकर्ण ७ . ४० . ४ ( कांही जिन्नस तोलतांना ) गिर्हाइकांस हवा असेल तेवढ्या वजनाचा जिन्नस देऊन लोकरीतीप्रमाणे आणखी थोडासा जिन्नस वर देतात तो . ५ ( सामा . ) तुलना ; बरोबरी ; तुलनेस , जोडीस जुळणे ; समानता . मालोजीस मनसब देऊन तुमच्या तोलाचे करतो . ६ ( ल . ) महत्त्व ; मोठेपणा ; वजनदारी ; भारदस्तपणा . राष्ट्राचा केवल तोल । - संग्रामगीते १०८ . ७ - न . वजन करण्याचे परिमाण , माप , वजन . उदा० शेर , मण , तोळा , मासा इ० . [ सं . तुल = वजन करणे ] ( वाप्र . ) पु. ठराविक वजनावर घ्यावयाचा वर्ताळा . गुजराथेंत हा प्रचार आहे . - के ३१ . १० . १९३९ . ०देणे ( दुसर्याच्या मतास मान देऊन , आपले मत बाजूस ठेवून त्याच्या मतास ) मान्यता , अनुमति , संमति देणे ; आपला हेका सोडणे . ०मिळविणे ( जरतार धंदा ) वजन पडताळून पाहणे . ०लावून - ठमकत ठमकत , नखर्याने , छाती काढून चालणे . चालणे - ठमकत ठमकत , नखर्याने , छाती काढून चालणे . ०संभाळणे समता , साम्य , समतोलपणा राखणे . झोंक जाऊं न देणे , इकडे तिकडे न झुकणे तालाचा वि . १ बरोबरीचा ; सारख्या दर्जाचा , किंमतीचा , हिंमतीचा ; जोडीस अनुरुप . २ ( ल . ) बहुमोल ; भारी . म्ह ० जसा वारा वाजेल तसा तोल द्यावा = परिस्थितीप्रमाणे वर्तन ठेवावे . तोलास तोल घेणे देणे १ भारंभार घेणे , देणे . २ ( ल . ) ( द्रव्यव्यय , शौर्य वर्क्तृत्व इ बाबतीत दुसर्याशी ) बरोबरी करण्याची हिम्मत असलेला ; याच्या उलट फुसका ; क्षुल्लक ; किरकोळ ; क्षुद्र . २ भारी ; प्रचंड . भागानगरकर मोगल फौज तोलदार सामान पुरा आहे . - वाडशाछ १ . २ . ३ वजनदार ; मातब्बर ; भारदस्त ; अब्रूदार ; मान्यमान्यतेचा ; प्रतिष्ठित . [ तोल + फा . दार ] ०दारी स्त्री. १ तोलासतोल देण्याची शक्ति ; स्पर्धा ; ईर्षा ; बरोबरीच्या नात्याने वागण्याची हिंमत . २ ( क्व . ) प्रतिष्ठितपणा ; प्रतिष्ठा ; भारदस्तपणा ; वजनदारपणा ; मान्यमान्यता . [ तोलदार ] म्ह ० तोलदारीचा हेवा आणि सनकाडीचा दिवा = आपल्यापेक्षा उच्च दर्जाच्या माणसाशी , अंगी पात्रता नसतांहि स्पर्धा करणे ( मूर्खपणा होय ). तोलासन न . ( योग ) दोन्ही पायांचे चवडे जमीनीवर टेंकून बसावे . दोन्ही पाय एकाशी जुळवून , दोन्ही हात जमीनीवर टेंकून आसन उचलावे . यास डोलासन किंवा तोलासन म्हणतात . - संयोग ३५३ . [ तोल + सं . आसन = बसणे , बैठक ]
|