|
अ.क्रि. १ ( मादक पदार्थांच्या सेवनाने ) धुंद , बेहोष , उन्माद युक्त होणे ; तारकटणे . ( ल . ) ( संपत्ति , अधिकार इ० कांच्या योगाने ) मदोन्मत्त होणे ; माजणे . या ठिकाणी आपला तोल आपण संभाळला तरी कोणा तरी तारवटलेल्या व्यक्तीच्या मनाचा तोल बिघडून .... - सासं २ . १४८ . २ ( मादक पदार्थाच्या सेवनाने , जागरणाने , रागाने , पित्ताने , उन्हाने ) डोळे , चेहरा इ० जड व सुस्त होणे ; तर्र होणे ; ताठरणे ; विस्फारणे ; वटारले जाणे . आनंदीबाईंचे डोळे तारवटले . - इंप १०४ . [ तार , धुंदी ]
|