Dictionaries | References

गुठें

   
Script: Devanagari
See also:  गुठा

गुठें     

पुन . नांगरलेली शेतजमीन सारखी करण्याचें , डिफळें फोडण्याचें एक औत , मैंद . ( कु . ) गुठो . नांगरलेली जमीन साफ करण्याचा फलक , औत . याला मधोमध वितीच्या अंतरानें एक लांब व एक आंखड अशा दोन दांडया बसवून त्यांचीं टोकें पुढें एकत्र बांधून टाकतात व तें एकत्रित जोड टोंक बैलांच्या मानेवरील जुवाच्या मधोमध बांधून तोल संभाळण्यांसाठीं बांधलेली दोरी हातांत धरून शेतकरी या आउतावर उभा राहून त्यावर आपलें वजन पाडतो . [ का . गुंट ]
०घालणें   १ चुतडणें ; फोडणें . २ तुडवून मळविणें ; चुरगळणें ( वस्त्र इ० ). गुठावणें , गुठाविणें - उक्रि . गुठयानें नांगरलेली जमीन सारखी करणें . गुठेफळी - स्त्री . ( राजा . ) गुठा पहा . गुठेणी - स्त्री . ( कु . ) गुठा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP