Dictionaries | References क काडीमात्र अकलेचे तोल, भाराभर विद्येचे मोल (सारखेच) Script: Devanagari Meaning Related Words काडीमात्र अकलेचे तोल, भाराभर विद्येचे मोल (सारखेच) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बुद्धि नसेल तर अनेक विद्या संपादन करूनहि काही लाभ नाही. बुद्धि किंवा युक्ति थोडीशी असली तरी ती वेळेवर जी उपयोगी पडते तशी भाराभर पुस्तकी विद्या पडत नाही. वरं बुद्धिर्न सा विद्या विद्यातो बुद्धिरुत्तमा। बुद्धिहीना विनश्यनित यथाते सिंहकारका।।-पंचतंत्र ५.३१. आपल्या विद्येचे फल पाहण्याकरितां रानात सापडलेल्या सिंहाच्या सांगाड्यापासून तीन ब्राह्मणांनी आपल्या विद्येच्या सामर्थ्यने सिंह तयार केला. चवथा बुद्धिवान होता तो सिंह जिवंत होण्यापूर्वी झाडावर जाऊन बसला. तेवढा वाचला, बाकीच्या तिघांस सिंहानें खाल्ले. याप्रमाणें पंचतंत्रात गोष्ट आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP