Dictionaries | References

लोटणे

   
Script: Devanagari

लोटणे

 क्रि.  ढकलणे , बंद करणे , रेटणे , सारणे ( दार );
 क्रि.  कष्टाने काळ कंठणे , घालवणे ( दिवस )
 क्रि.  निघून जाणे , पुरे होणे , संपणे ( दिवस , वर्ष महिने );

लोटणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  काळाच्या दृष्टीने एखादी गोष्ट, घटना इत्यादी वर्तमानातून भूतकाळात जाणे   Ex. आमची भेट होऊन आता बरीच वर्षे लोटली.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)

लोटणे

 स.क्रि.  
   ( एखादा पदार्थ ) ढकलणे किंवा पुढे दडपणे ; रगडणे ; लाटणे . बंद करणे ; जोराने पुढे दडपणे ; रगडणे ; लाटणे . बंध करणे ; जोराने लावणे ( दार ).
   ( दिवस , काळ इ० ) घालविणे अतिक्रान्त करणे ; कष्टाने काळ कंठणे ; ( खाद्य ; पेय , औषध , इ० ) घशाखाली घालणे ( नाखुषीने किंवा अधाशीपणाने ).
   ( हत्ती , घोडे , सैन्य , इ० चा ) शत्रूवर एकदम घाला पडणे ; जोराने चालून जाणे ; हल्ला करणे . देह समंधावरी लोटला । संकल्पावरी उठावला । - दा ५ . ९ . ४२ .
   दूर करणे ; सारणे ; दूर टाकणे . तेही तयाचा मग हात लोटी । - सारुह २ . ३१ . - अक्रि .
   ढकलले जाणे .
   जोराने येणे , घुसणे , वाहणे ; एकदम येणे ; पुष्कळ प्रमाणांत येणे , जाणे , जमणे . देवळामध्ये कथेला आज लाखो मनुष्य लोटले होते . अवचितां सुखसागर लोटला । - दावि १९३ .
   ( दिवस , वर्ष , काळ ) निघून जाणे ; पुरे होणे ; संपणे ; नाहींसे होणे ; गत होणे . इष्टविरहशोकोत्थित दुःसमूर्च्छेत लोटली घटिका । - मोकर्ण ६ . १ .
   ( भिंत , घर इ० ) कोसळणे ; ढासळणे .
   सर्व शक्ति एकवटून जोराने ( शत्रूवर ) तुटून पडणे . आकाशाहूनि विजू पडततेवी दक्षावरि अकस्मातवीरभद्र लोटला ।
   ( अश्रु ) जोराने वाहणे , येणे ; ( नदी , लोंडा इ० ) दुथडीभरुन वाहणे ; पूर येणे . जे पाणी लोटले ते लागलेच दोन्ही थडी भरल्या .
   काळेकुट्ट आणि वावटळीचे ढग येणे ; जोराचा पाऊस येणे . तिकडे जो पाऊस लोटला तो गांवचे गांव वाहविला .
   ( धान्य , फळे , पीक इ० ) भरपूर येणे ; अतिशय पिकणे ; लयलूट होणे ; समृद्धि होणे .
   आंथरुणावर लवंडणे ; निजणे ; पडणे .
   लोटांगण घालणे . लोटला पायी स्तवितचि । - दावि ४४ .
   तोडून टाकणे ; तोडणे . आणि नित्यादिक जे असे । ते येणे फळत्यागे नासे । शिर लोटलिया जैसेयेर आंग । - ज्ञा १८ . १२८ .
   पालटणे ; बदलणे . परी मनोधर्मु न लोटे । विकारविलाहि । - ज्ञा २ . ४१ .
   मोजणे ; मोजून टाकणे . बाप दुःखाचे केणे सुटलेजेथ मरणाचे भरे लोटले । - ज्ञा ९ . ४९६ .
   मरणे ; जाणे . येवढे अहोरात्र जेथिंचे । तेणे न लोटती जे भाग्याचे । देखती ते स्वर्गीचे । चिरंजीव । - ज्ञा ८ . १५७ . [ सं . लुठ ; प्रा . लोठ्ठ ; हिं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP