Dictionaries | References

लोधणे

   
Script: Devanagari

लोधणे     

अ.क्रि.  ( काव्य )
लुब्ध होणे ; झोंबणे ; चिकटणे ; गुंतणे . संसारसुखाचेनि पढतमूर्ख । लोधोन पडती । - दा ३ . १० . ३० .
संवय लागणे ; लालचावणे ; चटक लागणे . मायबाप बंधु बहिणी । नोवरी न दिसतां वाटे काणी । अत्यंत लोधला पापिणी । अविद्येने भुलविला । - दा ३ . २ . ४० .
लोटणे ; लुब्ध होऊन येणे . तटस्थ रामपूजेसी । प्राणीमात्र लोधले । प्राणीमात्र लोधले । - वेसीस्व ७ . ५० .
( ल . ) घडणे ; बनणे ; तद्रूप , तदाकार होणे . जिव्हा लोधली रसे । कमळ सूर्यपणे विकाशे । - अमृ ९ . ३ .
गाढ निजणे . तेथेचि येक लोधले । - गीता २ . १३९८ . [ सं . लुभ ] लोधलेपणे - क्रिवि . लोभाने ; लुब्ध होऊन . नयन हे लोधलेपण । निमेषोन्मेषांचे सांडणे ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP