|
पु. पु. ( कों . ) पोहोरा ; विहिरींतून पाणी काढण्याचे तांब्याचे भांडे . [ सं . लोहघट ] पाणी , वारा , इ० चा ( आणि यावरुन मलुष्ये , प्राणी इ० चा ) एकदम आणि जोराने आलेला मोठा प्रवाह , लोंढा , समुदाय किंवा टोळी ; जोराची पुढे येणारी लाट . गतिमान पदार्थाच्याअ गतीचा किंवा वेगाचा जोर ; गतिमान पदार्थाने दिलेला धक्का किंवा अशा धक्क्याचा जोर . लहान चाकाचा लोट भारी , मोठ्या चाकाचा लोट हलका . हरएक प्रकारची कामे , काळज्या , जबाबदार्या इ० चे मनावर पडलेले दडपण . वक्तृत्वाच्या ओघाचा जोर . ( ल . ) ( आंबे , फणस इ० ची ) समृद्धी ; विपुलता ; लयलूट . लोटांगण ; नम्र होणे . लोट घेति पोट खरडिती ओंठ भजनी हालविती । - राला १९ . ७ . ( व . ना . ) लहान ओढा , नाला ; प्रवाह . [ लोटणे ] ०गाडा पु. ( सातार्याकडे ) आंत सामान भरुन ढकलीत न्यावयाची हातगाडी .
|